शक्य तिथे आणि तेवढी काटकसर

Submitted by हर्ट on 19 January, 2010 - 04:46

मी माझे पुर्वीचे दिवस जे अत्यंत काटकसरीचे होते त्यांची जर आजच्या दिवसांशी तुलना करुन पाहिली तर माझी मला खूपच लाज वाटते! काटकसरीची जी सवय चांगली होती ती जशी जशी प्रगती होत गेली तशी तशी मागे पडत गेली. हल्ली प्रवास, कपडे, ग्रंथालयाचे दंड, विजेचे-पाण्याचे बील, खाणे-पिणे कुठेच मला कपात करता येत नाहीये. पुर्वी बस साठी मी तासंतास ताटकाळत उभा असायचे. हल्ली बस येत नाही आली तर इतर पर्याय मला असतात. हीच गत अनेक माझ्यासोबतच्या मित्रांची आहे. काटकसर ही फक्त पैशाचीच असते असे नाही. जी कुठली गोष्ट जास्त खर्च होते.. नि वाया जाते तिथे तिथे आपण काटकसर करू शकतो.

तुम्ही जी काटकसर पुर्वी करायचे आणि आत्ता करता त्याबद्दल इथे नीट लिहा. कदाचित इथे उधळपट्टी करणारे भानावर येतील!!!!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वेळेची भयंकर उधळपट्टी करते आणि मला त्याची अतिशय लाज वाटतेही..
मी वेळ असा उधळते -

१. सुरवात अगदी सकाळपासुनच होते, न चुकता ५ वाजता डोळे उघडतात तरीही अजुन थोड्या झोपेची गरज आहे म्हणुन मी परत डोळे मिटून घेते. झोप ६-६३० पर्यंत येत नाही कारण मुळात ती पुर्ण झालेलीच असते. तरीही उगीचच पडुन राहते आणि मग नाईलाजाने ७ वाचता उठते. जेव्हा जेव्हा ५ वाजता डोळे उघडले आहेत आणि तेव्हाच निश्चयाने अंगावरील चादरीला लाथ मारुन उठले आहे, तेव्हा तेव्हा दिवस अतिशय मोठा आहे असा भास झालाय आणि दोन चार कामेही जास्तीची झाली आहेत.

२. उठल्यावर कामे भरपुर असुनही इकडेतिकडे टंगळमंगळ करते. बाई येऊन चहा करेपर्यंत उगाच गच्ची ते हॉल - परत गच्ची असा उपद्व्याप करते. हा वेळ मला माझे आवरुन घरही थोडे आवरण्यात घालवता येईल.

३. सध्याच्या नोकरीत पुढे जाण्याच्या संधी अजिबात नाहीयेत. ज्या क्षेत्रात काम करतेय त्यात अजुन भरपुर अभ्यास करायचा बाकी आहे. तो केल्याशिवाय दुसरीकडे नोकरीची संधी नाही मिळणार. ऑफिसात कामही जास्त नसते, अभ्यासाच्या भरपुर संधी उपलब्ध आहेत. असे असतानाही उगाचच नेट सर्फिंग करण्यात वेळ घालवते. वेळ वाया घालवते हे माहित असुनही 'फक्त आजचा दिवस, उद्यापासुन अभ्यासाला सुरवात करुया' असे स्वतःला फसवत राहते.

४. संध्याकाळी घरी गेल्यावर परत सकाळचीच पुनरावृत्ती. Sad घरीही नेट उघडुन बसते.

वेळेचा असा प्रचंड दुरूपयोग केल्याची प्रचंड खंत रात्री बिछान्यात पडल्यावर जाणवते. पण ती तेवढीच. दुस-या दिवशी परत येरे माझ्या मागल्या...

हे सगळे इथे मुद्दाम लिहिलेय अशाकरता की ते वाचुन मला परत परत माझी लाज वाटेल आणि काहितरी सुधारण्याचा प्रयत्न करेन..

दिवसाचे नीट वेळापत्रक आखुन ५०-६० टक्क्यांपर्यंत ते पाळण्याचा प्रयत्न करणे आता सुरू केले आहे. नेटभेट दिवसातुन फक्त १ तासच असा संकल्प केलाय यश यायलाच हवे असा निश्चय केलाय...

(हे लिहिल्यावर लगेच नेट बंद, सकाळपासुन ३-४ तास गेलेत आधीच..)

साधना हा माझाच आयडी तर नव्हे? वरची तिची पोस्ट मीच तर नाही लिहिली? Wink
माझीही तीच गत आहे. कळून वळत नाही म्हणतात त्यातला प्रकार. करण्यासारखं बरंच काही आहे पण आजचा दिवस तर गेला, उद्या करु म्हणून पुढे ढकलणं चाललंय फक्त. आत्ताही इथे टाईप करत बसून मी तेच करतेय Sad

शाळेत असताना घराजवळ सायकलचं दुकान होतं. हवा भरायला ५० पैसे घ्यायचे ते.
एक दुकान खूSSSप लांब होतं. ते पंचवीसच पैसे घ्यायचे.
एकदा मी सायकल हातातून घेऊन फिरत होते - मामा भेटला. त्यानं कारण विचारलं - सांगितलं हवा नाहिये सायकल मध्ये - तो म्हणाला अगं घराच्या इथे तर दुकान आहे ना! मग मी त्याला ५० पैशाची कोन्सेप्ट सांगितली.. तो चाट! म्हणाला वरचे पंचवीस पैसे माझ्याकडून घे! पण मला काही ते पटायचं नाही.

आता बीनं वरती सांगितल्या सारखीच गत आहे बर्‍यापैकी.

सध्या पोळ्या घरीच करते बर्‍यापैकी (पूर्वी कावन च्या फक्त भाजायच्या पोळ्या वापरायचे) - बर्‍यापैकी वाचतात.
बाकी गरजा खूप वाढवलेल्या नाहियेत अजून तरी (घरात गादी पाहिजेच, टीव्ही पाहिजेच, सोफा पाहिजेच असं काहीच नाही)
पण कपड्यांचं अतोनात वेड आहे! महिन्यातून १-२ तरी घेतले जातातच! (ह्याची गरज नाहिये असं वाटतं!)

काटकसर करण्यासाठी आपण अजुन काही वाया घालवत आहोत का याचा पण विचार करावा लागेल. ५ रुपये (डॉलर वगैरे काहीही) वाचवण्यासाठी तासभर वेळ घालवणे. वेळ महत्वाचा की पैसे ते पण ठरवावे लागते पण वाचवलेला वेळ सत्कारणी लागला पाहीजे.

पण एक जाणवते की आपण काही काही गोष्टी खुप ग्रुहित धरतो. मला खालील गोष्टीत कटकसर करावी वाटते
१. कपडे खरेदी
२. घरातले वाणसामान (ग्रोसरी) - घरात डाळी, भाज्या वगैरे असताना भरमसाठ अजुन आणणे. फ्रीज भरलेला असताना उगिचच अजुन कुकिंग करणे.
३. कुपन आहेत म्हणुन उगिचच खरेदी करणे.
४. भांडी वगैरे घासताना नळ तसाच चालू ठेवणे.
बरेच काही सांगता येईल. मी स्वतः प्रयत्नाने स्वतःला बदलायचा प्रयत्न करतेय.

साधना , मी सुद्धा असाच वेळ वाया घालवतो . एकवेळ गेलेला पैसा कैक पटीने कमावता येईल , पण गेलेला क्षण कधीही परत येणार नाही .
असं वाटतं की , हम नही सुधरेंगे Sad

नेट वर वेळ जाउ नये म्हणुन मी गेले ७ महिने (लॅपटॉप घेणे अन मग त्यावर) नेट कनेक्शन घेणे टाळतोय. मध्ये तीन महिने घरी पीसी अन नेट होते. वेळ तर वाया जातोच उलट चंपी शी भांडण होते ते वेगळेच! Happy

नको तो लॅपटॉप! Happy

असं वाटतं की , हम नही सुधरेंगे >>>> नर्मदेतले गोटे आहोत आपण, असेतसे थोडेच सुधारणार! Happy

बी चे म्हणणे बर्‍यास प्रमाणात मला लागू पडते.

एके काळी मी बर्‍यापैकी काटकसरी होतो, आता तेव्हढा नाही आहे. काळ पुढे जस-जसा सरकतो आहे, तस-तसा काटकसरीच्या बाबतीत मी थोडा निष्काळजी Angry होतो आहे असे मलाही वाटते.

तुम्ही जी काटकसर पुर्वी करायचे आणि आत्ता करता त्याबद्दल इथे नीट लिहा.
---- माझा प्रथम प्रयत्न शक्यतोवर पायी जाण्याचाच असतो. नंतरची पसंती सार्वजनीक वहानास (बस) मिळायची.

कपड्यांच्या बाबत अजुनही सावध आहे, म्हणजे चव नाही म्हणा. कुठल्याही कारणाने (स्वस्त आहे वा भविष्यात महाग होणार आहे म्हणुन) घरात साठवणुक होत नही, जे जगाचे होणार आहे त्याला सामोरे जावे असे मला वाटते. (वर्षापुर्वी तुरडाळीचे भाव वाढत असतांना आमच्या कडे कैक लोकांनी वर्षभर पुरेल एव्हढे धान्य साठवले आणि भाव वाढीला अप्रत्यक्ष पणे मदत केली).

अगदीच महत्वाचे असल्याशिवाय कागदांचे प्रिंट घेत नाही.

विज, पाण्याच्या वापरात खुप काटकसरी नाही, पण वाया जात नाही याची दक्षता बाळगतो.

बाजारात जातांना अजुनही घरातुन थैल्या सोबत घेतल्या जातात.

माझ्या मुलींचे वापरुन झालेली तसेच चांगल्या वापरण्या जोग्या स्थितीत असलेली खेळणी, कपडे, पुस्तके आम्ही आमच्या मित्र परिवारात वापरतो. कपडे देण्याच्या अगोदर स्वच्छ घुऊन तसेच ईस्त्री करुन देतो जेणेकरुन वापरणार्‍यांना पण त्याचा आनंद मिळावा.

Reduce, Recycle, Reuse चा अवलंब करायचा प्रयत्न करतो. काळानुरुप माझ्यातला उत्साह कमी होतो आहे, पण आता मुलीच पुढाकार घेतात. (निवडणुकीत ग्रिन पार्टी च विजयी होणार अशी भोळी समजुत होती)

मी कितीही प्रयत्न केला तरी खर्च होतोच्.(हे काहि गर्वाने नाही सांगत ) पण आता नवरा जरा question करतो, अग सफरचंद आहेत ना.. मग कशाला आणखी? उद्या युद्ध होणार नाहीये.. परत येवु वाटल्यास.अशी गम्मत करतो. (कारण माझे सामान खूप भरायचे.):). माझी अर्गुमेंट ही की वीक डेज मध्ये मला आवडत नाही ग्रोसरी करायला. आणि तुही नसतोच्..कोण येणार वगैरे.. (नवीन असताना पहिल्यांदा मला तो कंजूषच वाटला,रागही यायचा. मग मी गपचूप स्वःता जावून पुन्हा काही घेवून यायचे उगाचच. आता जरा जरा कळतेय की असे बरोबर नाही खर्च करणे.... कॉलेजचे शिक्षण ते नोकरी लागल्यापासून तसे मी एकटीच इतके वर्षे रहात असल्याने स्वःताचेच एकायची सवय.. कोणी टोकायला पण नाही. माझ्या आई वडिंलानी कधीच काही विचारले नाही पैशाच्या बाबतीत. आधी पप्पा पैसे देत मग नोकरी लागल्यावर जरा आणखी वाढली सवय. लग्न झाल्यावर भांडण नवर्‍याशी कि तू फळे कमी घेतोस वगैरे. Happy सवय अशी होती की जेवण करताना सगळे असलेच पाहिजे. भाकरी कधीतरी करणार पण सर्व पिठे इथे मिळतील. Happy

मला सुरुवातील ४ भाज्या, ५-६ प्रकारची वेगवेगळी फळे, २-३ प्रकारचे मासे, चिकन्/खिमा त्याचबरोबर डाळी हे करायचे(हे सर्व एकटी असताना हां) आणायची सवय होती. तेच ते जेवणाचे मसाले आणा... वेगवेगळे मसाले घ्यायची सवय. किचनची भांडी घ्या वेगवेगळ्या प्रकारची.
साहजिकच जेवण बनवायची आवड असल्याने मित्र-मैत्रीणी पडिक असायचे माझ्या घरी म्हणून पण जरा अतीच करायचे कारण कोणी कौतूक केले की मग आणखी जेवणं,आणखी ग्रोसरी करत रहायचे,मग कळले की असे करणे हा मुर्खपणा आहे.आपले पैसे मात्र जातात ग्रोसरीत; कोणाला काहि तितकेसे प्रेम व आपुलकी नसते जितकी आपल्याला असते असे कळले नी कमीच केले. असो. Happy
पण तरीही कितीतरी भाज्या/फळे नुसत्या फ्रिजमध्ये मागे पडून फुकट जात. मग काढ नी फेक. हात मोठा असल्याने जेवण ही तसे बरेच व्हायचे. जेवण फुकट नाही जायचे कारण मित्र-मैत्रीणी घेवून जात आवडिने पण इतके जेवण झाले की फळे नेहमी फुकट जात कारण मूडच नसायचा एकदा का छान जेवले की........... व भरपूर जेवण करून थकायचे.
तेच कपड्याच्या बाबतीत्,दिसले कि घे. कूपन आहे म्हणून घे अशी सवय. एक दिवस कपाट लावयला काढले(जेव्हा लग्न ठरले आता मूव करायला लागणार ..म्हणून सॉर्ट करत होते..) म्हणून बघते तर काय कितीतरी ट्रॉउझर्स, ड्रेसेस काय नी काय... उगाचच ज्वेलरी घेणे... बरेचसे तसे पेटीतच रहाते कारण प्रवास खूप होतो मग काढा नी घाला कशाला.. तरी घेणे चालूच जिथे जाईन तिथे. जिथे जाईन तिथे भेटी घेणे गरज नसताना...
जिकडे तिकडे जाईन तिकडची फेस क्रीम्,फेस्पॅक.. एक धड चेहर्‍याला लागत नाही पण हौस. रेसीपी बूक्स्,हेल्थ बूक्स.. उगाचच घेणे हळू हळू बंद करतेय.

१.आता कपडे घेणे टाळतेच. जे आहेत तेच काढत नाही महाग आहेत नंतर घालू करत..:). कितीही कूपने येवोत चांगल्या चांगल्या दुकानातून..नकोच पण असे स्वःताला सांगते. Happy
२.मेनू ठरवते की दोनच भाज्या.. एक पालेभाजी,एक फळभाजी,१-२ फिश... एखादी चिकन वा मटण.
गरज असेल तरच कोथींबीर ,आले वगैरे(हे मी उगाचच ज्यास्त आणायचे.. अगदी दर वेळेला). कोथींबीर नीट पेपरात असायची गुंडाळलेली पण तरीही ज्यस्त असलेली बरी म्हणून आणायचे.बाहेर जाणार असेल तर मग आणखी कॅन्सल करते एक दोन मेनु. अश्याने फुकट जायची चिंता नाही व केले आहे ते संपवायची चिंता नाही कधी बाहेर जेवले तर... कारण बाहेर जेवणे हे होतेच २-३ वेळा आठवड्यातून. घरात आधी बघते काय खरेच लागेल ते..
कॉस्कोत जेवढे लागेल तेच घेते. वगैरे वगैरे.

अजुन तेवढी गाडी रुळावर आली नाही. पण खरेच खुप आता वाईट वाटते की बरेच सेविंग केले असते मी अगदी हजारांवर वगैरे पण खूपच फुकट गेले. मी नोकरीला लागल्यापासून जरा ज्यास्तच उधळले अश्या सवयीने.
माझी ही कथा तर ह्याच्यापेक्षा माझी जूळी बहिण चौपट आहे. तिच्याकडे कधीही कोणी गेले तर फळबाजार, फुलबाजार असेल्(आम्ही तिला चिडवतो.. असे). आता मीच तिला लेकचर देते. स्वःताला ही सुधारायचे काम चालू आहे पण ते खरे तर नवर्‍यामूळे होतेय. Happy

पण आता नवरा जरा question करतो, >>>
पण ते खरे तर नवर्‍यामूळे होतेय. >>
ही दोन वाक्ये सोडल्यास बाकी सगळे मंजुर! Happy

माझ्यापेक्षा माझे वडील खुप काटकसरी होते..! म्हणुनच सरकारी नोकरीच्या तुटपुंजा पगारात ( आम्ही ४ बहिण-भाऊ) त्यांनी ३-३ घरे तिही दोनमजली बांधुन एक उदाहरण घालुन दिले! त्यांचे संस्कार आम्हावर आहेतच! म्हणुनच मलाही कधी-कधी बससाठी वाट बघतांना केवळ वेळ वाया जाऊ नये म्हणुन जेव्हा रिक्षा करावी लागते, तेव्हा वाईटही वाटते! १-२ रुपयाने तुरीची दाळ स्वस्त म्हणुन ते नव्या सांगवीतुन जुन्या सांगवीत स्कूटर नेत! जवळच्या अंतरासाठी गाडी न्यायची गरज नाही....मग बाजारात चालत-चालत फिरायचे! कधी कधी हा काटकसरीचा डोस आम्हाला जास्त होत असे....मग आमची चिडचिड! लहानपणी तर कधी एक आख्खी शिसपेन्सील मिळाल्याचे आठवत नाही मला.! कायम अडकित्त्याने तिचे २ तुकडे करुन वापरायचो! आणि आता आमची मुलं अर्धवट वापरलेली पेन्सिल/ कलर्स / क्रेयॉन्स फेकून देतात/ मागच्या वर्षीच्या वह्यांचे २-४ पेजेस भरलेले असतानाही अख्खी वही रद्दीमधे टाकतात तेव्हा ओरडते मी त्यांच्यावर!
वह्यांचे कोरे पेजेस काढुन घरीच त्याची रफ वही करायची, एवढच काय कॅलेंडरच्या मागच्या को-या पानांवर गणिते सोडवायची सवय आमची!
कुठलीही गोष्ट वाया जात नाही हे त्यांचे वाक्य असायचे.... ! घरातील रद्दी/ दुधाच्या पिशव्या दर महिन्याला रद्दीवाल्याकडे ! प्लास्टीक/ लोखंडी भंगार/ काचेच्या बाटल्या इ. भंगारवाल्याकडे हे सगळे करायला वडील रिटायर्ड होते म्हणुन त्यांना जमायचे! पण आम्ही वेळेअभावी वैतागुन कधी कधी तसेच कचरापेटीत फेकतो.

जाता जाता: माझ्या जाऊबाईंनी आम्हाला काटकसरीचा दिलेला धडा: त्यांच्या माहेरी शेजारील एक विधवा बाईने तिच्या ३ मुलांना व्यवस्थित शिक्षण करुन मार्गी लावले.... ती उडालेले बल्ब/ ट्युब इ. साठवुन ठेवायची नंतर त्यांच्या मागचे अ‍ॅल्युमिनियम काढुन तेही भंगारमधे देत असे. तिच्या काटकसरीची हाईट म्हणजे बाई काडेपेटीची एकच काडी/ किंवा मग पेपर (लाईटर नसावा बिचारीकडे) वापरुन दरवेळेस दुसरा गॅस पेटवणार. गॅस पेटवायचा की ओढ काडी असं करायच नाही! Proud

ह्म्म.. काटकसरी असावे असे हल्ली पटायला लाग्लेय. पण खूप काटकसरी लोकांना जीवनातील काही गोष्टींचा आनंद घ्यायला जमत नसते असेही पाहलेय. बॅलेन्स करायला जमले तर ठिक....

बॅलेन्स करायला जमले तर ठिक.... >>>> अगदी अगदी. उधळेपणा आणि अतीकंजुषी टाळावी. कधी कधी अतीकाटकसर गरजेची असते तेव्हा ती केलीच पाहिजे.

काटकसर करणे खुप महत्वाचे आहे हे मला अगदी मनापासुन पटले आहे (वर मनुने लिहिल्यासारखे, आधी भरपुर उधळल्यावरच ही अक्कल आलीय मला). आपल्याला पैसा कमावताना किती कष्ट पडतात, मग ते कष्टाचे पैसे वापरताना नीट विचार करुन वापरायला नको? वस्तु घेण्याच्या बाबतीत तर मी मुलीलाही 'गरज आहे का?' हा प्रश्न पहिल्यांदा स्वतःला विचारायची सवय लावलीय.

कुठलीही गोष्ट कधी करायची त्याची योग्य वेळ पण ओळखता यायला पाहिजे. मला आज हिमालयात ट्रेकसाठी जावेसे वाटतेय. त्याचवेळी माझ्या आईला ट्रेकिंग हे उगाचच पैसे घालवा आणि स्वतःचे हातपायही सोबत मोडुन घ्या ह्या कॅटेगरीतले वाटते. पण माझ्यासाठी आजच जाणे महत्वाचे आहे, कारण हे काम मी उद्यावर ढकलले तर कदाचित उद्या तेवढी ताकद माझ्यात राहणार नाही आणि एका सुंदर अनुभवाला आणि आनंदाला मी कायमची मुकले ही खंत मात्र राहिल.

हा विनोद पूर्वी मायबोलीवर झाला आहे पण नव्या पिढीसाठी उत्तम. नेने आणि लेले यानी रबरी शिक्का बनवताना 'ने' आणि 'ले' या एकाच अक्शराचा बनवून घेतले कारण नेने /लेले लिहिताना एकच अक्षर दोनदा उमटवायचे अशी कल्पना.

मी सिगरेट सोडूनही आता २५ वर्षे झाली. कुठलेही व्यसन मला नाही. खाण्याचाही नाद नाही. कपड्यातही फार नाही. पण फालतूच्या वस्तू घेण्याचा नाद. माझ्याकडे २०-२५ इअर फोन असतील. साताठ पेन ड्राइव्ह . असंख्य पुस्तके. कधी कधी माझ्याकडे असलेली पुस्तके मी डबल आनलेली आहेत. ‍कॅसेटच्या काळात खूप कॅसेट आणत असे.आता सीडीज. त्यात सापडली नाही की आपल्याकडे नाही असे समजून पुन्हा आणणे. बर्‍याच ब्रीप्फ केसेस्.अनेक पोर्टेबल हार्ड डिस्क. आता बोसची साउन्ड सीस्टीमचे डोकयात. गरज नसताना लिहिण्याचे पेन आणणे. काय करावे.?

कधी माझ्याकडे असलेली पुस्तके मी डबल आनलेली आहेत>>>>>>>
मी भेटतो तुम्हाला. घेवुन जाइन पुस्तकं Happy
मी वेळेचा सदुपयोग करायला हवा. कधी वेळ असेल तर टिव्ही लावुन उगाच चॅनेल बदलत वेळ वाया घालवतो.
आमच्या घरी मी नोकरीला लागेपर्यंत टिव्ही, टेप, रेडिओ काहीच नव्हत. त्यावेळी कधी टिव्हीवाचुन अडलय अस वाटत नव्हत. केबल बंद करावी अस खुप वेळा वाटत पण.... शेवटी पंचगंगेतला गोटाच हो मी.....

मस्त धागा रे बी! धन्स! Happy
मला मुळातच उधळमाधळ आवडत नाही. कशाचीच.. पैसा, वेळ, वीज, पाणी इ. जिथे तिथे कमीत कमी गोष्टी कशा वापरता येतील ते पाहते. पण कधीकधी त्यावर विचार करुन डोक्याला एक सवयच पडून गेली आहे. उदा. पुण्यात आजवर मी क्वचित १-२ वेळा एकटी रिक्षाने हिंडले असेन. ज्या दिवशी गाडी नसेल तेव्हा बस हा पर्याय स्वस्त आणि मस्त आहे , शिवाय एकट्या मुलीला सुरक्षित हे डोक्यात इतके फिट्ट बसले आहे की रिक्षाने आपण जाऊ शकतो ही गोष्टच मी विसरुन गेले आहे. त्यामुळे कधी नाईलाजाने रिक्षा करावी लागलीच तर १० रु बस च्या तिकीटाजागी ४०-५० रु देताना हळहळ वाटते.
ही चांगली बाजू झाली. पण पुण्यातल्या मुलींचा वीकपॉईंट म्हणजे तुळशीबाग! तिथे जाताना ही अक्कल कुठे सांडते कळत नाही! दर वेळेस गेले की नेलपेंट्ची बाटली! कधी कधी त्याच शेड च्या २-२ येतात आणि एवढं करुन ते न लावताच सुकून फेकून द्यायची वेळ येते. Sad मागे एकदा मैत्रीणीच्या नादाने बर्‍याचशा ड्रेसवर मॅचिंग होणारे केसांचे क्लिप्स घेऊन आले आणि अक्षरशः दुसर्‍या दिवशी हेअर कट केला! Proud आता त्या क्लिप्स माझे केस वाढायची वाट पाहतायत! Sad
असंच प्रवासाला जाताना घ्यायची औषधे. काळजी , जवळ असलेली बरी, म्हणून घेतली जातात पण वापर झाला नाही तर एक्स्पायरी डेट पायी फेकून द्यावी लागतात! असो, अशा बर्‍याच गोष्टी आहेत.. पण या धाग्यावर चर्चा केल्याने बरेच शिकायला मिळेल!

मागे एकदा मैत्रीणीच्या नादाने बर्‍याचशा ड्रेसवर मॅचिंग होणारे केसांचे क्लिप्स घेऊन आले आणि अक्षरशः दुसर्‍या दिवशी हेअर कट केला>> अगदी अगदी. माझे नेहमी होते. केस शोल्डर परेन्त म्हणून लाम्ब कानातील आणायची. मग लगेच पार मिलिटरी कट करायचा. काट्कसर हा जीवनाचा एक भागच आहे.
माझे दोन आणे.
१) मुलांपुरतेच पिझा वगैरे ऑर्डर करायचे. त्या बरोबर येइल ते सीजनिन्ग/ तिखट सॉस टिश्युज जपून ठेवायचे व वापरायचे. अर्धा किलो इटालिअन सीजनिन्ग व तिखट्पूड पिझा ह्ट चे जमविले आहे.
२) मासिके/ व्रुत्तपत्रे घ्यायची नाहीत. सकाळी ५ वाजताच वर्ल्ड न्युज स्कॅन करते ( कामामुळे) तेच पेपरात येते. ग्लॉसीज वेस्ट. जमेल तेवढी माहिती नेट वरून घ्यायची.
३) बाहेर जाताना घरून पाणी नेणे. मुले लहान असताना स्नॅक्स पण.
४) साड्या घेत नाही आता. एक काळी व एक जीन्स घेतली आहे त्यावर शिवलेले टॉप्स, चान्गले सलवार कमीज सेल मधे ( बिबा ब्रॅन्ड) काळी./ पांढरी लेगिन्गस आहेत त्यावर काहीही. अर्थात माझ्या वयाला चालते.
५) मेकप ची साधने घेणे सोडले. पहिले फार आवड्त असे. एक लिप्स्टिक फक्त असते.
६) क्रेडिट कार्डवरील खर्च आटोक्यात ठेवणे. प्रवास खर्च कंपनीतून घेते.
७) मुलगी व कुत्रे सोडून कोणालाही गिफ्ट्स घेत नाही. ( खरेच. ) नातेवाइकांना स्टॅन्डर्ड म्हणजे
घरी बनविलेली चॉकोलेट्स रीसायकल्ड ड्ब्यात. व मोठ्याना मलाइ बर्फी. ( शप्पत)
८) इथला भिकेचा बीबी वाचून भीक देणे सोडले.
९) मला हे परवडत नाही असे म्हणायला शिकले आहे.
१०) एक बघा आपल्याला मोठी फि़क्स्ड डिपॉझिट्स बनविणे जमत नसेल तर छोटी छोटी बनविते.
पोस्ट्ल सेविन्ग करते.

>>>पुन्हा आणणे. बर्‍याच ब्रीप्फ केसेस्.अनेक पोर्टेबल हार्ड डिस्क. आता बोसची साउन्ड सीस्टीमचे डोकयात. गरज नसताना लिहिण्याचे पेन आणणे. काय करावे.?

रॉबीनहूड, या वस्तू ज्यांच्या आणल्या त्यांनाच परत देण्याचा पर्याय कसा वाटतो ?

Happy

़खुपच उपयुक्त धागा सुरु केलात बी! मी बर्यापैकी काटकसरी आहे. ग्रोसरी आणायला जाताना लिस्ट प्रमाणेच आणावी असा माझा कटाक्श असतो ( हल्ली बाळ लहान असल्याने लिस्ट जरा मागे पडली आहे पण या बाफ मुळे परत सुरु करते) लिस्ट समोर असली की सुपर मार्केट मध्ये उगाचच रेंगाळावे लागत नाही आणि नको त्या गोष्टी टरॉली मध्ये येवुन बसत नाहीत आणि वेळही वाचतो. वाढदिवसांना शक्य तोवर ठरवीक रक्कमेची गिफ्ट व्हॉवचर द्यावीत असे मला वाटते आणि बर्याच्दा मी ते देतेही. रोजच्या स्वयंपाकात खुप अन्न शिजवुन ते फ्रोजन करुन ठेवत नाही प्रमाणातच करते पण तरीही कोणी येणार असेल तर वेळेवर कमी पडु नये म्हणुन खुप स्वयंपाक करुन ठेवते अर्थात तो वाया जात नाही कारण मित्र घेऊन जातात पण मला स्वयंपाकाचा अंदाज येत नाही याचे वाईट वाटते! ( मला शिजवलेले अन्न फ्रोजन करुन वापरण्याचा फार कंटाळा आहे) अजुन एक म्हणजे मी पाणी खुप वापरते. वीजेचाही थोडा अपव्यय होतोच नकळत! पुर्वी फोन करतांना चार वेळा विचार करायचे पण हल्ली त्यावर पण खर्च होतो बराच!

>>>>रॉबीनहूड, या वस्तू ज्यांच्या आणल्या त्यांनाच परत देण्याचा पर्याय कसा वाटतो ?
जीएस सिक्सर Rofl मला यावरुन 'ओय लक्की लक्की ओय' आठवला Happy

उधळ-माधळ करायची नसेल तर पर्चेसिंगमधली एक कल्पना फार उपयोगाची आहे.. पर्चेस रेक्विझिशन आल्याशिवाय पर्चेस ऑर्डर काढायची नाही.. कुठलीही वस्तू घेताना तिची गरज आहे का? आत्ताच घ्यायला हवी का? आणि घेतल्यास उपयुक्तता किती? हे तीन प्रश्न स्वतःला विचारले की सगळ्या सवयी सुटतील.. ह्या तीन प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली तर रेक्विझिशन अप्रूव्ह झाली.. मग पीओ काढायचा काय तो अवकाश..

जी एस Lol
शँकी तू म्हटल्यावर मला डोळ्यासमोर दृश्य आले हूड एका जागी बसलेत आणि आजुबाजुला ह्या सगळ्या वस्तुंचे ढीग लागलेत, त्यात एक पामेरीयन कुत्र पण आहे. Proud
मी पण लिहीन लवकरच माझ्या सवयी बद्दल.

Pages