नागपुरी तडका : झ्यामल-झ्यामल

Submitted by अभय आर्वीकर on 17 January, 2010 - 23:10

नागपुरी तडका : झ्यामल-झ्यामल

कायरं श्याम्या इथंतिथं झ्यामल-झ्यामल करतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

ईचीबैन हे गजकरण भलतच भारी असते
चहाड्या-चुगल्या केल्याबिना पोट भरत नसते
अफवा पेरासाठी लोकायचे कानफट पाजवतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

याची टोपी त्याच डोस्क, काट्याने काटा काढतोस
साथ देईन त्यालेच तु, तोंडबुचक्या पाडतोस
सिध्यासाध्या असामीले, बोटावर नाचवतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

समोरच्या तंगडीमध्ये, आडवी तंगडी घालतोस
त्याले उबडं पाडूनशान, त्याच्या म्होरं चालतोस
समद्यायले झाशा देवुन, अभये भाकरी भाजतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

..गंगाधर मुटे..

( नागपुर आणि आसपासच्या काही जिल्ह्यात बोलली जाणारी भाषा एक आगळी बोलीभाषा आहे. ही भाषा वर्‍हाडी,झाडी मध्ये पण मोडत नाही. त्यामुळे या प्रकाराला 'नागपुरी तडका' हे नांव शोभुन दिसेल असे वाटते.)
.....................................................................
मोंढा = पाठीचा खांद्यालगतचा भाग.
इतर शब्दांचे अर्थ समजुन घ्यायला कठीन नाहीत.
.....................................................................

ता.क- कवितेत जरी "मोंढा" हा शब्द असला तरी त्याऐवजी कवितेचा भावार्थ अधिक परिणामकारक करण्याच्या हेतुने कविता वाचतांना किंवा गातांना मोंढ्याऐवजी दुसरा पर्यायी शब्द-ज्याला जो आवडेल तो- वापरायला काहीही हरकत नाही. Happy
......................................................................
२) बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका
.....................................................................

गुलमोहर: 

साहेब ते खरूज डिलीट केलं तर जमेल का?
अश्विनीमामी, तुम्हाला 'खरुज' ऐवजी पर्यायी शब्द वापरावा असे म्हणायचे काय ?
.........................................................
तुमच्या मताचा आणि त्या मागीलभावनेचा मी आदर करतोय.
पण कवितेत वर्णन केलेला शाम्याला जो मानसिक रोग आहेना ती मानसिक खरुजच आहे,त्यापेक्षा चांगला चपखल बसणारा दुसरा सौम्य विकारच नाही.
.................................................................
खरुजला पण पर्यायी शब्द शोधतोय.

साहेब ते खरूज डिलीट केलं तर जमेल का?>> माझं पण तेच म्हणन आहे. लई बेक्कार बिमारी होय्जी हि. आता काय सांगु, किती त्रास व्हायचा म्हणुन.
आजकाल खरुजचे आणी माताचे रुग्ण दिसत नाही कुठे.
मला वाटते मी खरुजचा शेवटचा व ओम पुरी माताचा शेवटचा रुग्ण असावा!

बाकी कविता मस्त जमलिन्जी. तुमाले भरपुर शुभेच्छा.

मधुकरराव शारिरिक खरुज वर रामबाण औषधे आहेत हो..
पण ती मानसिक खरुज म्हनुन तिला अमरत्व प्राप्त झालय ना त्यावर इलाज ?

लई झ्याक जमल हो भाउ ...
वर्‍हाडी मधे एक 'मी सोटे बोलतोय' हा कविता संग्रह वाचण्यासारखा आहे.

'मी सोटे बोलतोय' हा कविता संग्रह कॉलेज लाईफ मध्ये वाचला होता..
देविदास सोटे आणि विठ्ठल वाघ हे दोघेही वर्‍हाडी कवि.
आम्ही वर्‍हाड आणि झाडी यादोहोंच्या मध्यात असल्याने आम्हाला या दोन्ही भाषा निट येत नाही.
आमची तिसर्‍याच तर्‍हेची बोलिभाषा आहे.पण मिळती जुळती आहे....

गन्गाधरजी, बरे झाले, तुम्ही "मोन्ढा" चा अर्थ स्पश्ट केला ते....मला वाचताना काही तरी भलतच वाटले होते Wink Biggrin

<< गन्गाधरजी, बरे झाले, तुम्ही "मोन्ढा" चा अर्थ स्पश्ट केला ते....मला वाचताना काही तरी भलतच वाटले होते >>
कवितेत जरी "मोंढा" हा शब्द असला तरी त्याऐवजी कवितेचा भावार्थ अधिक परिणामकारक करण्याच्या हेतुने कविता वाचतांना किंवा गातांना मोंढ्याऐवजी दुसरा पर्यायी शब्द-ज्याला जो आवडेल तो- वापरायला काहीही हरकत नाही. Happy

Pages