नागपुरी तडका : झ्यामल-झ्यामल

Submitted by अभय आर्वीकर on 17 January, 2010 - 23:10

नागपुरी तडका : झ्यामल-झ्यामल

कायरं श्याम्या इथंतिथं झ्यामल-झ्यामल करतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

ईचीबैन हे गजकरण भलतच भारी असते
चहाड्या-चुगल्या केल्याबिना पोट भरत नसते
अफवा पेरासाठी लोकायचे कानफट पाजवतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

याची टोपी त्याच डोस्क, काट्याने काटा काढतोस
साथ देईन त्यालेच तु, तोंडबुचक्या पाडतोस
सिध्यासाध्या असामीले, बोटावर नाचवतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

समोरच्या तंगडीमध्ये, आडवी तंगडी घालतोस
त्याले उबडं पाडूनशान, त्याच्या म्होरं चालतोस
समद्यायले झाशा देवुन, अभये भाकरी भाजतोस
बैन तोंडाले खरूज अन मोंढ्याले खाजवतोस....!!

..गंगाधर मुटे..

( नागपुर आणि आसपासच्या काही जिल्ह्यात बोलली जाणारी भाषा एक आगळी बोलीभाषा आहे. ही भाषा वर्‍हाडी,झाडी मध्ये पण मोडत नाही. त्यामुळे या प्रकाराला 'नागपुरी तडका' हे नांव शोभुन दिसेल असे वाटते.)
.....................................................................
मोंढा = पाठीचा खांद्यालगतचा भाग.
इतर शब्दांचे अर्थ समजुन घ्यायला कठीन नाहीत.
.....................................................................

ता.क- कवितेत जरी "मोंढा" हा शब्द असला तरी त्याऐवजी कवितेचा भावार्थ अधिक परिणामकारक करण्याच्या हेतुने कविता वाचतांना किंवा गातांना मोंढ्याऐवजी दुसरा पर्यायी शब्द-ज्याला जो आवडेल तो- वापरायला काहीही हरकत नाही. Happy
......................................................................
२) बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका
.....................................................................

गुलमोहर: 

गंगाधरराव , तुमचा श्याम्या लय इब्लिस बेण दिस्तय . Lol
तुमच्या लिखाणावरुन वाटतया तुमाले " ढुंगणाले " म्हणायचं आशीन . Proud

अहो दाजीबा,अब्रुचा होईल फज्जा,
हे वागणं बर नव्हे...
.............................................
"काही" शब्द लिखान करतांना टाळायला हवेत.

Pages