नमस्कार ! http://www.maayboli.com/node/13330 या लिंकवर पहिला भाग आहे.. तिथुनच पुढे..
एवढा मोठा रॉक पॅच बघितल्यावर सगळेच उत्सुक होते.. त्यातच वरती गुहेपर्यंत पहिली चढाई कोण करणार याची विचारणा झाली नि अपेक्षेप्रमाणे सगळेच तयार होते जायला नेहमीप्रमाणे लिडरनेच दोरीच्या सहाय्याने पहिली चढाई केली..
(गाईड दोरीला घेउन चढताना)
इथे चढताना प्रत्येकाला जरा कसरतच करावी लागणार होती.. कारण बहुतांशी सरळसोट असणार्या या पॅचवर पकडीसाठी फारच कमी खाचा होत्या.. त्यामुळे वरतुन सोडलेल्या दोरीचा आधार घेणे हाच एक उपाय होता.. इथे जरा गोंधळच उडणार होता.. कारण जो चढणार त्याला दोरीला पकडुन जोर काढत अक्षरक्षः चालत चढाई करायची होती.. या दोरीला ठराविक अंतराने ज्या गाठ बांधल्या होत्या त्यांनाच पकड म्हणुन वापरायचे होते !! नि ही चढाई होत असतानाच वरती असणार्यांनी दोरीने खेचणेही गरजेचे होते ! जर चढणार्याने आपण नेहमीप्रमाणे चालतो तशी चढाई केली तर वरतुन दोरी ओढणार्यांना त्रास कमी नि तितका वेळही कमी लागणार होता ! पण हे सगळे करताना समतोल बाळगणे गरजेचे होते ! नाहितर वरतून दोरी ओढर्यांना फक्त खेचाखेची करुन चढणार्याला Drop करण्यापलिकडे पर्याय नव्हता ! मला हे सगळे जरा अजबच वाटले पण तितके कठीण नाही वाटले !
लिडरलोक्सच्या मागोमाग जेवणाचे सामान असलेल्या बॅगा पहिल्या वरती पाठवण्यात आल्या.. शेवटी अंधार होण्याची वेळ आली होती.. नि रात्रीच्या जेवणाची तयारीदेखील करणे जरुरी होते..
बॅग वरती पोहोचताच एकेकाची पाळी आली नि सगळे श्वास रोखुन बघु लागले.. पहिले दोघे -तिघे (ज्यात 'सुन्या' पण होता ) फार सफाईने नि चपळाईने चढुन गेले !
(१,२,३... नि सुरू )
-----------------------
(सुन्या जोर लगाके !! )
------------------------
( ह्याला म्हणतात प्रयत्न ! :P)
हे सर्व चालु असताना मी मात्र एकाबाजुला ब्रेडबटरचा आस्वाद घेत सगळ्यांची धडपड बघत होतो.. सुन्याला आपल्या दोन्ही टांगा लांब लांब टाकत चढताना बघुनच कळले की 'जल्ला खालेल्ला सगला जिरनार तर..'
जे पहिले वरती चढून जात होते ते सगळे खेचाखेचीच्या कार्यक्रमात सामिल होत होते.. त्यातलेच काहीजण अलंगच्या पठारावरील असलेल्या गुहेच्या शोधात (अंधार पडला होता हे सांगणे नको !) गेले होते..
इथे वरती जिथुन खेचणार होते तिकडे एक मोठी टॉर्च लावली होती.. बाकी सगळे काळोखात एकमेकांना (खालचे नि वरचे) साद-प्रतिसाद देत खेचाखेची करत होते.. अंधारामुळे 'रोपवरती' नि 'खालून चढणार्यावरती' टॉर्चचा प्रकाश मारत हा कुस्तीचा खेळ चालु होता.. चढणार्याने 'हार्नेस' नि 'दोरी' नीट बांधली की खालतुन "ready" म्हणुन ओरडायचे नि वरतून "1,2,3.." आवाज झाला की शक्ती एकटावुन चढाईला सुरवात करायचे ! सहि वाटत होते बघताना ! पण हे सगळे पार पडत असताना "पुन्हा पुन्हा हार्नेस तपासणे, 'दोरी खेचणारे' नि 'चढणारा' तयार आहेत की नाही ते आवाज देउन दोनदा चेक करणे" अशी काळजी देखील घेतली जात होती.. त्यामुळे कसलेही विघ्न नव्हते ! फक्त प्रश्न्न होता 'ताकदी'चा !
अपेक्षेप्रमाणे बर्याच जणांची ताकद अपुरी पडली नि साहाजिकच वरतुन दोरी ओढणार्यांना ताण सोसावा लागला ! दोघातिघांनी सुरवातीलाच नांगी टाकली.. 'जमणार नाही, ओढुन घ्या' चा नारा लावला.. खरेतर चढणार्या प्रत्येकाने थोडीफार शक्ती खर्ची करणे जरुरीचे होते.. पण त्यांना ते काही जमले नाही नि त्यामुळे "Drag & Drop" चा (साध्यासोप्या शब्दात "फरफटत" !!) पर्याय स्विकारावा लागला.. (याचवेळी 'सुरवातीलाच वरती न गेल्याबद्दल मी स्वतःचेच आभार मानले' 'जल्ला ओढुन ओढुन हात जळले असते ना !! ')
पण अगदी शेवटी चढणार म्हणुन काही आराम नव्हता ! थंडीमुळे शरीर आखडुन गेले होते.. थोडी उब मिळावी म्हणुन तिथेच छोट्याजागेत शेकोटी लावण्यात आली ! आम्ही जिथे उभे होतो तो अलंगच्या खांद्यालगत असलेला कडाच होता.. नि त्या रॉक पॅचची चढाई सर केली की १०-२० पायर्या चढुन अलंगच्या पठारावर पोहोचणार होतो.. काहीअवधीतच माझी पाळी आली.. 'ready' म्हणताच मी चढाई सुरु केली.. पण जल्ला वरच्यांच्या अंगात काय आले होते माहित नाही.. वरतुन जास्तीच जोराने खेचल्याने मला नीटसे उभे राहताच आले नाही.. एकंदर माझी पण 'फरफटीची' अवस्था झाली... शेवटी "थांब, थांब" ओरडलो नि स्थिर झालो.. पुन्हा जोमाने चढू लागलो.. अर्धा पॅच झाला नि जल्ला माझी हवाच निघुन गेली... पुन्हा "टाईमप्लिज" मागितला .. आता कळुन चुकले होते किती सोप्पे होते ते ! पुन्हा मग ताकद सर्वपणाला लावुन (वरतुन ओढणार्यांची मदत घेत) हळुहळु धापा टाकत एकदाचा वरती पोहोचलो ! हुश्श !! ओढाताण करुन हातांना नको तेवढा व्यायाम मिळाला होता.. बरं जिथे वरती पोहोचलो तिथे जागाही हवी तेवढी ऐसपैस नव्हती ! छोटेखानी गुहा होती.. तिकडेच मला विश्रांतीसाठी 'जबरदस्तीने' बसवण्यात आले ! (ही देखील योग्यप्रकारे घेतली जाणारी काळजी..) कारण रात्री अंधारात थकुन भागुन चढुन गेल्यावर धडपडण्याचा संभव होता नि तोल जरा जास्तच गेला तर.....
मी दम खाईपर्यंत माझ्या मागे राहिलेले लिडरचे दोन मदतनीस पटापट चढुन आले !! जसे काही पायाखालचीच सरळ वाट ! मान गये उत्साद ! आमच्या बॅगा गुहेच्या शोधात गेलेल्यांबरोबर पुढे गेल्या होत्या.. नि आम्हाला आता लाकडं घेवुन पुढे जायचे होते.. टॉर्चच्या प्रकाशात प्रत्येकी पायरीवर एक असे सगळे खेटुन बसले होते नि ह्याच साखळीमार्फत लाकडं वरती पोचवण्यात आली.. ह्या पायर्या अतिशय अरुंद होत्या.. नि प्रत्येक पायरीवर एका बाजुस पकडण्यासाठी छोटा खड्डा पाडला होता.. का ते कळले नव्हते.. टॉर्चच्या प्रकाशात फक्त पायर्या दिसत होत्या.. आजुबाजुचा काहिच मागमुस लागत नव्हता.. हे सर्व पार पडताना मात्र एक लक्षात आले की सगळेजण प्रामाणिकपणे आपापल्यापरिने मदतीचा हात देत होते नि ह्या सांघिक कामगिच्या जोरावर आम्ही एकदाचे अलंग गाठले !
पठारावर पोहोचलो नि पुन्हा सुसाट वार्याने आम्हाला छेडायला सुरवात केली ! तिथुनच मग लाकडं उचलुन गुहेच्या दिशेने पायपीट सुरु केली.. इथे सापांचा सुळसुळाट असल्याचे वाचले होते त्यामूळे मी जरा टरकुनच होतो काही अंतरावरच पाण्याचे टाके लागले नि सगळ्या बाटल्यांचे "रिफिलींग" झाले.. काही मिनीटांतच गुहा गाठली नि मघासपासुन कानाभोवती घोंघावणार्या वार्यापासुन सुटका झाली.. गुहेत शिरताच काहीजण झोपायची जागा ठरवण्यात मग्न झाले.. काहिजण आपल्या बॅगेत ढवळाढवळ करण्यात मग्न झाले.. काहिजण लिडर्सलोकांना जेवणखाण्यात मदतीस लागले.. तर काहिजण आहे त्या स्थितीत पेपर टाकुन आडवे झाले ! एका बाजुस मेणबत्तीच्या प्रकाशात कांदा,टोमॅटो कापणे चालु होते तर गुहेच्या प्रवेशद्वारावरच टॉर्चच्या प्रकाशात चुल पेटवणे चालु होते !! एकंदरीत ट्रेकर्संलोकांच्या या दुनियेत वावरताना मस्तच वाटत होते !
लौकरच 'पुलाव्-पापड' मेनु तयार झाला नि संपुर्ण दिवसातला पेटपुजेचा अंतिम कार्यक्रम पार पडला.. जेवण आटपताच अर्थातच डाराडुर ! घोरपडांमध्ये (घोरत पडणारे = घोरपड) घोरण्याची शर्यत सुरु झाली नाहि तर नवलच !
पहाटे लवकर उठुन सुर्योदय बघण्याचा आमचा प्लॅन साहाजिकच थंडीने धुडकावून लावला ! उठेपर्यंत उजाडले होते.. पण बाकीचे अजुन साखरझोपेतच होते ! म्हटले सुर्योद्य हुकला तरी सुर्याचे तरी दर्शन घेउन म्हणुन आम्ही चारचौघेजण गाईडला घेवुन बाहेर निघालो.. गुहेच्या बाजुने एक वाट वरच्या बाजुस जात होती.. तिथुन पुढे गेले असता वाटेतच पाण्याच्या भल्यामोठ्या टाक्या आढळतात...
(अतिशय सुंदर अशा पाण्याच्या टाक्या)
--------------------------
(फोटोत नीट पाहिले तर वरच्याबाजुस असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ तीनचार मोठ्या कोरलेल्या पायर्या आहेत)
काहि टाकितले पाणी तर शुद्ध वाटत होते.. गाईडला विचारले असता कळले की बारामाही पाणी टिकुन असते ! खोली तर म्हणे न समजण्याऐवढी खोल आहे !! पण एकुण या टाक्यांचा विस्तार बघुन यांचे त्याकाळचे वैभव काही औरच असावे याची कल्पना आली.. तिथुनच आम्ही पुढे वरच्या बाजुस निघालो.. पुन्हा वाटेत पुर्वीच्या बांधकामाचे अवशेष आढळले ! एका बाजुला एकुलत्या एक राजवाड्याची(गाईडने सांगितल्याप्रमाणे) भिंत तर अजुन बर्यापैंकी शाबुत आहे !
(अजुनही तग धरुन असलेली भिंत)
----------------------
(उद्ध्वस्त बाजु)
-----------------------
(झरोक्यातुन दिसणारी अलंगवरची टेकडी)
ह्या छोट्या राजवाड्याच्या सगळ्या भिंती जर अजुनही उभ्या असत्या तर ते बघण्यात वेगळाच आनंद मिळाला असता... कदाचित इथे भरपुर पडणारा पाउस नि सोसाट्याचा वारा यापुढे त्यांचा टिकाव लागला नसावा ! नि त्या भर म्हणजे या गडाकडे झालेले दुर्लक्ष !!
तिथुनच पाच मिनीटात आम्ही अलंगच्या अगदी उंच भागावर जाउन पोहोचलो ! नि समोरील विहंगमय दृश्य पाहण्यात गुंग झालो !!
------------------------
(सोनेरी पाणी)
_______________
(अशा पार्श्वभुमीवर मी स्वतःचा फोटु काढुन घेतला नाही तर नवलच ! :P)
सुर्योद्य नशिबात नव्हता पण सकाळच्या वेळेत इथे आल्याचे फळ मिळाले होते ! कड्यावर उभे राहुन दरी न्याहाळण्याची मजा पण काही औरच असते.. इथुनच मागे वळुन पाहिले तर लांबून 'मदन' नि 'कुलंग' डोकावताना दिसत होते !
नि "C" च्या आकारात असलेली अलंगची एक बाजुही वेगळी झाल्याचे वाटत होते ! एवढे सगळे दिसत असले तरी अलंगचा टॉप आम्ही गाठला नव्हता !! तो टॉप म्हणजे अलंगवर असलेली टेकडीच समजा !! जी पुर्णपणे अलंगच्या एका बाजुस कोपर्यात आहे ! नाश्तापाणी चुकेल या भितीने (:P) आम्ही तिथुनच माघारी फिरलो नि खाउनपिउन येण्याचे ठरवले !
गुहेत परतलो तर चहाची नि मोठा टोपभर मॅगीची जय्यत तयारी सुरु झाली होती ! पाककृतीचे जराही ज्ञान नसले तरी सगळेजण चुलीभोवती बसुन आपापले फोटो काढुन घेत होते ! मॅगी खाताना देखील सगळ्यांनी आपापली स्टाईल (म्हणजेच स्टिलच्या ग्लासातून खाणे, चमच्याऐवजी लाकडाच्या छोट्या काठीने खाणे इत्यादी !!
) वापरली ! भक्कम नाश्ता पार पडेपर्यंत दहा वाजत आले होते नि अर्ध्यातासातच परतीच्या प्रवासाला लागायचे होते..
आम्ही पुन्हा मोर्चा त्या राहिलेल्या टेकडीवर वळवला.. तर बाकी सगळे पाण्याच्या टाक्या बघायला गेले ! टेकडी दिसायला जरी दुर होती तरी काहिवेळेतच आम्ही जवळ पोहोचलो.. इथेही वाटेत दोन पाण्याने भरलेल्या टाक्या लागतात.. टेकडीपाशी गेलो असता कसलातरी छोटा दगडी स्तंभ नजरेस पडला !
पुर्वी याच ठिकाणी देवीचे देउळ होते असे ऐकले ! पण त्या स्तंभाखेरीज तशी खुण काहि सापडली नाही ! इथेही न शिरण्याजोगी गुहा आहे ! तिथुनच पुढे आम्ही त्या छोट्या टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो !! इथे तर आमची वार्याशी झुंज सुरु झाली ! इथुन कळसुबाईरांगेत असलेल्या डोंगररांगा दिसत होत्या ! इथेही मित्राने झेंडा फकवण्यासाठी आणला होता.. पण चाकु नि दोरी न्यायला विसरल्यामुळे आमचा ध्वजरोहणाचा कार्यक्रम हुकला !:( तसा आधीच एक भगवा तिथे दिमाखाने फडकत होता !
आम्ही पुन्हा गुहेपाशी येईपर्यंत बाकी सगळे उशीर नको म्हणुन परतीच्या प्रवासात मार्गस्थ झाले होते ! आम्ही लागलीच बॅगा घेउन निघालो ! पुन्हा रात्री ज्या पायर्यांवर बसुन लाकडं सरकवली होती तिथे पोहोचलो नि डोळे विस्फारले गेले.. कसल्या धोकादायक पायर्या होत्या..
पायर्यांच्या एका बाजुस कातळकडा चिकटुन होता तर दोन वित लांबीच्या पायरीला दुसरी बाजुच नव्हती.. थेट पायथा !!! ज्याला उंचीची भिती वाटते तो तर गारच पडला असता इथे ! आम्हालाच विश्वास बसत नव्हता की इथुनच रात्री आपण बिनधास्तपणे लाकड घेउन आलो होतो..
(फोटोत वाटते त्यापेक्षा खत्री स्पॉट आहे हा.. )
आता तर पाठीवर बॅग असल्याने अजुनच जपुन सरपटत उलटे उतरावे लागत होते ! आता मला त्या पायर्यांवर पाडलेल्या खडड्यांचे रहस्य कळले !
आता ९० फुटी रॉक पॅचवरुन रॅपलिंग होत असल्याने पुन्हा या जागेत ट्रॅफिक जॅम झाले ! एकेक करुन सगळे दोरीने उतरु लागले ! पण टेन्शन कोणालाच नव्हते ! जोरजोराने गाणी गात फोटो शुट करत रॅपलिंग चालु होते !
(दोरीसंगे कडेलोट :P)
-------------------------
(सुन्या दि ग्रेट ! )
-----------------------------
(एन्जॉय !!)
दुपारचे बारा वाजले होते तेव्हा घरी पोहेचेपर्यंत रात्रीचे १२ पालटुन जाणार याचा अंदाज आला.. मदन पेक्षा या ठिकाणी केलेली रॅपलिंग मला जास्त आवडली !
लिडरलोकांनी उशीर होईल म्हणुन घोळक्या घोळक्याने इतरांना पुढे जाण्यास सांगितले होते.. त्याप्रमाणे गड उतरण्यास सुरवात झाली ! जंगलातुन धमालमस्ती करत कधी पायथ्यापाशी येउन पोहोचलो ते कळलेच नाही ! खाली येईस्तोवर संध्याकाळचे चार वाजले ! गडाच्या पायथ्याशी आलो नि गावकर्यांची चाहुल लागली.. वाटेतच सुरु असलेल्या मळणीचे दृश्य !
मागे वळुन पुन्हा एकदा "अलंग, मदन नि कुलंग" या त्रिकुटदुर्गाला पाहुन घेतले
(अलंग, मदन (मध्ये त्रिकोणी आकारासारखा) नि बाजुलाच कुलंग )
नि आम्ही गावची वाट पकडली ! पण नेमकी वाट चुकीची निघाली ! आम्ही पाचच जण होतो ! पण चुकलेला वाटेमुळे आम्हाला ते छोटे गाव फिरता आले ! येथील घरांपेक्षा त्यांचे दरवाजे बघण्यासारखे होते ! वाटेत भेटणार्या छोट्या पोरांना स्मितहास्य देत त्यांचे फोटो टिपत आम्ही ठरलेल्या ठिकाणी (गाईडचे घर) पोहोचलो ! सगळेजण आराम खात अंगणात पडले होते ! तिथे बॅग ठेवतानाच कळले आमच्या ग्रुपमधल्या एका उत्साही ट्रेकरने जेवणासाठी गावठी कोंबडीचा प्लॅन शिजवला होता !:P हे ऐकताच रविवार चांगलाच सत्कारणी लागल्याचे वाटले आमच्या मागाहुनच लिडरलोक्स,सुन्या नि इतर बाकीचे येउन पोहोचले ! कोंबडी शिजेपर्यंत गरमागरम कांदेपोह्याचा कार्यक्रम उरकवला ! नि लगेच जेवणासाठी अंगणातच मांडी घालुन बसलो ! शाकाहरी ट्रेकर्संसाठी "भेळ"चा पर्याय असल्याने काळजी करण्याचे कारण नव्हते ! अशाप्रकारे चहाच्या वेळेत आम्ही नाश्ता, जेवण नि शेवटी चहा असा मोठा नि अंतिम पेटपुजेचा कार्यक्रम आटपला.. शेवटचे ग्रुप फोटो घेउन आवरते घेतले.. नशिबाने एक टेम्पो (ट्रेकर्संलोकांचे आवडते वाहन !) आमच्या सेवेसाठी हजर झाल्याने एसटीची वाट बघावी लागली नाही.. नि गावचा निरोप घेउन आम्ही "कसारा" स्टेशनच्या दिशेने कुच झालो !
आतापर्यंत केलेल्या ट्रेकपैंकी हा "अलंग-मदन" नेहमीच स्मरणात राहील ! जिथे Trekking, Climbing नि Rappling एकाच वेळी अनुभवता आले ! पुन्हा या भागात यायचे तर "कुलंग" चे निमित्त आहेच !!
समाप्त नि धन्यवाद
मस्तच अनुभव!! आणि पायर्या
मस्तच अनुभव!! आणि पायर्या फोटोतही खत्रीच दिसतायत..
मस्त फिरवुन आणलस.
मस्तच रे यो! >> अशा
मस्तच रे यो!
>> अशा पार्श्वभुमीवर मी स्वतःचा फोटु काढुन घेतला नाही तर नवलच
अफलातून फोटो आहे हा !
योगेश शेट , काय खतरनाक ट्रेक
योगेश शेट ,
काय खतरनाक ट्रेक आहे . एकदम झक्कास .
जल्ला नुस्ता फोटु बघुनश्यानच सगली हवा टाईट .
>>> (अशा पार्श्वभुमीवर मी
>>> (अशा पार्श्वभुमीवर मी स्वतःचा फोटु काढुन घेतला नाही तर नवलच ! )
हा फोटो एकदम खत्री!
जल्ला नुस्ता फोटु बघुनश्यानच
जल्ला नुस्ता फोटु बघुनश्यानच सगली हवा टाईट .>>>
अगदी अगदी, खतरा... यो दोन्ही भाग एकदम जबरी.
मस्त!! ढगामादचा सुर्य आणि
मस्त!!
ढगामादचा सुर्य आणि खाली पाण्यात पडलेलं प्रतिबिंब अ प्र ति म!!!
झक्कास
झक्कास !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सही.
सही.
(अशा पार्श्वभुमीवर मी स्वतःचा
(अशा पार्श्वभुमीवर मी स्वतःचा फोटु काढुन घेतला नाही तर नवलच ! )
>>>>>बेस्ट योग्या...
मस्त फोटो आणि वर्णन... सगळेच
मस्त फोटो आणि वर्णन...
सगळेच फोटोज एकदम नादखुळा आहेत
व्वा! मस्तच.
व्वा! मस्तच.
बापरे बाप्!मान गये
बापरे बाप्!मान गये
मस्त रे एकदम !! भारी आहे
मस्त रे एकदम !! भारी आहे वृत्तांत आणि फोटोज..
मस्त रे एकदम !! भारी आहे
मस्त रे एकदम !! भारी आहे वृत्तांत आणि फोटोज..
जबरी फोटो आणि वॄत्त्तांत!
जबरी फोटो आणि वॄत्त्तांत!
योग्या, तुझा फोटु लई झकास
योग्या, तुझा फोटु लई झकास आलाय. सही है भिडु.!
नेहमीप्रमाणेच जबरदस्त. बरं
नेहमीप्रमाणेच जबरदस्त. बरं केलंस हे लिखाण वेगळं केलंस ते
<<पण जल्ला वरच्यांच्या अंगात
<<पण जल्ला वरच्यांच्या अंगात काय आले होते माहित << मेल्या वरच्या लोकांत ?? मीच होतय मरे..
मस्तच लिवलस हा!
तो फोटू मस्तच हा !
सुंदर अनुभव... योग्या, तुझा
सुंदर अनुभव...
योग्या, तुझा फोटो(हवेतला ;)), सुर्याचा फोटो आणि सोनेरी पाणी तुझ्या ब्लॉगवर पोस्ट रे... मला तिन्ही खुप आवडले... केदारने म्हंटल्यासारखे एकदम नादखुळा...
धन्स फ्रेंडलोक्स
धन्स फ्रेंडलोक्स
पहिला फोटो भन्नाट... कसलीही
पहिला फोटो भन्नाट... कसलीही मदत न घेता स्वताच्या जीवावर एवढा अवघड कातळटप्पा पार केलेल्या गाईड ला माझा सलाम...
तो पहिला चढाई करणारा शूज
तो पहिला चढाई करणारा शूज वगैरे न घालताच चढतोय ! गेल्या जन्मी घोरपड असावा. त्या ग्रेट माणसाला
लय भारी! पाण्याच्या तळ्यांचे,
लय भारी! पाण्याच्या तळ्यांचे, सोनेरी पाण्याचा आणि लपलेल्या सूर्याचा फोटो खतरी! मस्तच रे योग्या!
आणि, पहिल्या फोटोमधल्या गाईडला खरच सलाम!
जर चढणार्याने आपण
जर चढणार्याने आपण नेहमीप्रमाणे चालतो तशी चढाई केली तर वरतुन दोरी ओढणार्यांना त्रास कमी नि तितका वेळही कमी लागणार होता ! पण हे सगळे करताना समतोल बाळगणे गरजेचे होते ! नाहितर वरतून दोरी ओढर्यांना फक्त खेचाखेची करुन चढणार्याला Drop करण्यापलिकडे पर्याय नव्हता ! मला हे सगळे जरा अजबच वाटले पण तितके कठीण नाही वाटले !

योगेश तु ग्रेट आहेस!!!!
फोटो आणि लेख दोन्हीही चा बु क
अशा पार्श्वभुमीवर मी स्वतःचा
अशा पार्श्वभुमीवर मी स्वतःचा फोटु काढुन घेतला नाही तर नवलच >>>>>>>>
फोटु भारीच आहे रे. तो फोटु काढणार्याच कौतुकच आहे पण त्यापेक्षा तुझ जास्त कौतुक.
का सांग??
अरे मारुतीरायानंतर तुच एक सुर्याच्या दिशेने त्याला पकडण्यासाठी झेप घेतलेला.
सगळे फोटो मस्त आणि वर्णन तर भारीच.
असेच ट्रेक करत जा.
दंडवत!
दंडवत!
अप्रतिम... एक ट्रेक लिस्ट वर
अप्रतिम...
एक ट्रेक लिस्ट वर टाकून ठेवलाय आजपासून...:-)
योगी, धम्माल..... तुझा फोटो
योगी, धम्माल.....
तुझा फोटो तर अप्रतिम.....
योगी मस्तच, फुल धमाल केली
योगी मस्तच, फुल धमाल केली आहेस, पुढिल ट्रेक साठि मी नक्की येइन, मला तर आत्ताच उत्सुकता लागलि आहे.
योग्या हवेतील फुटो लय भारी...
योग्या हवेतील फुटो लय भारी... आणि कडा चढणारा लिडर तर लयच भारी...
वृत्तांत पण झकास...
Pages