चारोळ्या...

Submitted by गणेश कुलकर्णी on 13 January, 2010 - 02:32

१) पक्ष्यांचां हल्ली आवाज
कानावर खुप कमी येतोय..
तुझ्या आठवणीचां थवा मात्र
माझ्या कायम सोबत राहतोय.

२) जीवनात प्रत्येक गोष्ट
खूप संघर्ष करुन भेटते
तू मला किती सहज...,
भेटलीस!

३) तू काल भेटलीस
तेव्हा बागेतली फुले फुलली,
आज तू आली नाहीस..
म्हणून वेडी ती ही रुसली!

४) खरंच ना तुझं माझं नातं
किती वेडं आहे...
प्रत्येक ॠतूत सतत
फुलणारे गुलमोहराचे झाड आहे.

५) डोळ्यांतून आसवं ओघळायची
तुझी अनावर आठवण झाल्यावर
वेडी आसवं सुध्दा जास्ती वेळ
विसावायची गालावर!
:गणेश कुलकर्णी(समीप)

गुलमोहर: 

पक्ष्यांचां हल्ली आवाज
कानावर खुप कमी येतोय..
तुझ्या आठवणीचां थवा मात्र
माझ्या कायम सोबत राहतोय>>>>>>>>> अप्रतिम वाटली ही रचना ,पु.ले.शु.