न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठ्ठीक्कर मला पण खूप आवडायच.. गेल्या समर मधे तर आम्ही इथे खाली चॉकने चौकोन आखुन ठ्ठिकर पाणी खेळलेलो. Happy सहि धम्माल आली.
एका पार्क मधल्या बड्डे पार्टीला खो-खो, डॉग & बोन (मराठीत काय म्हणतात आठवतच नाहिये), आणि डॉजबॉल खेळलेलो. Happy खो खो खेळल्यानंतर ४ दिवस पाय धरुन आलेले. Proud

डॉग अँड द बोन ला मराठी शब्द ऐकल्याचं आठवत नाही ..

एक मजा म्हणजे आमच्या काहि खेळांच्या नावात तोच शब्द दोनदा असायचा .. नेम नेम, क्रॉस क्रॉस, हेल्प हेल्प, खांब खांब .. पण लंगडी, कबड्डी, साखळी (ह्यात पेअर साखळी की कपल साखळी असला काहितरी उपप्रकार पण खेळायचो आम्ही खुप जास्त जण असले की!), विषामृत, नदी का पर्वत अशा नावंत मात्र शब्द एकदाच उच्चारला जायचा .. काय लॉजिक होतं काय माहित .. :p

अगं माफिया कसा खेळायचा ते मी अटलांटा GTG होतं तेव्हा पार्ल्यात सांगितलं होतं (खरंतर हे इथे लिहायचं काहिच प्रयोजन नाही पण असंच आपलं! :p)

स्वाती, माफिया बद्दल लिहितेय .. टाईप करून झालं की टाकते ..

ओके. Happy

खरंतर हे इथे लिहायचं काहिच प्रयोजन नाही पण असंच आपलं!
>>
अहो प्रयोजन असल्याशिवाय पार्ल्यावर लिहायला लागले लोक तर तो बाफ बंद पडेल! तिकडे सगळे प्रयोजनाशिवायच लिहीतात. Proud

एवढी सगळी बडबड करताय पण हे कोण आणणार पुढे??

०१)अनिलभाई -- २ किंवा ३ समोसा
०२)फचिन- १ शाकाहारी - ज्यूस, सोडा, पाणी, झिप लॉक...
०३)स्वाती_आंबोळे - छोले किंवा पांढर्‍या वाटाण्यांची उसळ
०४)परदेसाई (पापलेट आमटी), टेबल क्लॉथ्स
०५)झक्की - रंपा, पेपर प्रॉडक्ट्स : प्लेट्स, नॅप्किन्स, बाउल्स, चमचे, ग्लासेस
०६)मैत्रेयी - २ मोठे, २ लहान - व्हेज भाजी-पनीर बटर मसाला, आणि स्टोव्ह, पातेली वगैरे
०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या, लाडु
०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि रायता/कोशिंबीर.
१०)चमन - राजमलाई
११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
१२) विकु-- ???
१३) स्वाती - २ मोठे (२ मिश्रहारी ) - चिकन अ‍ॅपटायजर
१४) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना) -- ????
१५) सागर + १ (२ मिश्रहारी ) --चिज आणि खारवलेली बिस्किटे
१६) २ कारट्या + २ मुली --

पण 'शब्दवेध' म्हटलं तर झक्कींनासुद्धा कळलं नाही -
हेच काय, इतरहि अनेक खेळांची नावे सुद्धा ऐकली नव्हती.
आमच्या लहानपणी आम्ही अभ्यास करायचो. उनाड मुलांसारखे खेळ खेळत नाही बसलो.

०१)अनिलभाई -- २ किंवा ३ समोसा
०२)फचिन- १ शाकाहारी - ज्यूस, सोडा, पाणी, झिप लॉक...
०३)स्वाती_आंबोळे - छोले किंवा पांढर्‍या वाटाण्यांची उसळ
०४)परदेसाई (पापलेट आमटी), टेबल क्लॉथ्स
०५)झक्की - रंपा, पेपर प्रॉडक्ट्स : प्लेट्स, नॅप्किन्स, बाउल्स, चमचे, ग्लासेस
०६)मैत्रेयी - २ मोठे, २ लहान - व्हेज भाजी-पनीर बटर मसाला, आणि स्टोव्ह, पातेली वगैरे
०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या, लाडु
०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि रायता/कोशिंबीर.
१०)चमन - राजमलाई
११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
१२) विकु-- ???
१३) स्वाती - २ मोठे (२ मिश्रहारी ) - चिकन अ‍ॅपटायजर
१४) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना) -- ????
१५) सागर + १ (२ मिश्रहारी ) --चिज आणि खारवलेली बिस्किटे
१६) २ कारट्या + २ मुली --

आपले ए. वे. ए. ठि. झाल्यावर कुणि लगेच भारतात जाणार आहेत का? पुण्याला?
मी आपले मुंबई, पुण्याच्या "गटग" चे वृत्तांत वाचत होतो. तिथे सगळेजण झिपलॉक बॅगा बद्दल बोलत होते. मला वाटते आपण चार चार आणे वर्गणि काढून चांगल्याश्या, निरनिराळ्या आकाराच्या, डबल झिपलॉक असलेल्या, भारतातल्या स्वैपाकाला चालतील अश्या झिपलॉक बॅगा पाठवून देऊ.

स्वतः माझा संबंध झिपलॉक बॅगांशी क्वचितच. त्यामुळे कुठल्या आणायच्या, किती ते मला समजत नाही. पण ज्यांना समजते त्यांनी जरूर विचार करावा. बा. रा. करांतर्फे भारतातील माबोकरणींना भेट!

Pages