न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०
ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०
वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा
बॉस्टनवासीयांना (साखि आणणार
बॉस्टनवासीयांना (साखि आणणार असतील तर) राइडची (जमल्यास बे आणि ब्रे पण) ऑफर यंदा सुद्धा आहे बर्का
आत्तातरी जानेवारीतल्या
आत्तातरी जानेवारीतल्या कुठल्याही शनिवारी चालेल. शक्यतो शनिवारच बघा.
प्रतिसाद अनिलभाई | 1 December, 2009 - 10:56
शनिवार ९/१६/२३/३०.
संपादन प्रतिसाद शर्मिला | 1 December, 2009 - 11:08
3, 12, 24
(या तारखा नसून वरच्या लिस्टमधील कारणांचे नंबर आहेत.)
प्रतिसाद मृण्मयी | 1 December, 2009 - 11:03
बारा की डीसी?? कुठे जाऊ? कुठलं गटग मेगा-गटग आहे? ठरवून सांगा. त्याप्रमाणे तिकिटांची आणि राहण्या-खाण्याची सोय करते.
प्रतिसाद अमृता | 1 December, 2009 - 11:08
आणि १२ कुठला.. १२ जानेवारी तर मंगळवार आहे. शनिवारच बरा...
प्रतिसाद सचीन | 1 December, 2009 - 11:08
कृपया ३ जानेवारी नको.. त्याच्यापुढचे कधीही.
प्रतिसाद अमृता | 1 December, 2009 - 11:10
कारण आहे होय... बाकि २ आकडे चांगले जुळले पण...
३ आणि १२ मलाही लागु.. बघुया
वैद्यबुवा | 1 December, 2009 - 11:19
मला सगळ्याच तारखा जमतील फक्त कुठले सण वार असतील तर सांगा, बायको "चिकन" ला बंदी घालेल उगाच.
प्रतिसाद झक्की | 1 December, 2009 - 11:39
मागच्या वर्षी १२ जानेवारी ते ७ फेब्रुवारी पर्यंत ३०० हून अधिक पोस्ट्स झाल्या होत्या, ए. वे. ए. ठि. बद्दल. यंदा २ नोव्हेंबर पासून आत्ता पर्यंत अजून पुरी १५ पोस्ट्स पण झाली नाहीत.
मला जानेवारीत फक्त ३० तारीख व फेब्रुवारीत ६, १३, २० वा २७ चालतील.
तेंव्हा कुणाला भारतात जायचे असेल, तर वेळीच जाऊन या.
ऑफिसात साहेबाला सांगा, की या दिवशी मी बाहेरगवी जाउ शकणार नाही. मुलांचे काहीहि कार्यक्रम ठेवू नका.
प्रतिसाद सायो | 1 December, 2009 - 11:56
आत्तातरी सगळे वार, तारखा चालतील. नी वरची सगळी न येण्याची कारणंही लागू होतील.
प्रतिसाद रूनी पॉटर | 1 December, 2009 - 12:34
आता काय बदलले, कारणं का? ते 'बदलून' दिसतय.
मला सगळ्या तारखा जमतील असे वाटतय. ए वे ए ठि कितीही तारखेला ठेवा पण शनिवारी ठेवा म्हणजे आम्हाला यायला जायला सोपे पडेल, मागच्यावेळेच रविवारी होते आणि झक्कींकढून घरी यायला रात्रीचे ११:३० झाले, दुसर्या दिवशी ऑफीस असणार्यांना जरा अवघड पडत ते.
सिंडे तू दही वडे आण यावेळी...
सिंडे तू दही वडे आण यावेळी... अमृताला खायला मिळतील म्हणजे
आधी मेनु ठरवायचा का? सिंडी :
आधी मेनु ठरवायचा का?
सिंडी : दहीवडे
लालु : बटाटावडे
नयनिश : बकरेका चिकन
काय ती घाई मेन्यू
काय ती घाई मेन्यू ठरवायची.:फिदी:
भाई, अहो ती लालू म्हणाली ना तिला जमणार नाही. मग ती ब व कसे आणेल.
ती कोणाबरोबर तरी पाठवू शकेल
ती कोणाबरोबर तरी पाठवू शकेल का विचारा! कोणी via India येणार असेल तर आणता येतील .. :p
भाई "बकरेका" ब्रँड कुठे
भाई "बकरेका" ब्रँड कुठे मिळतो? मी आपलं टायसन ब्रॅंडचं चिकन आणिन
नाहीतर तिला सांगू की आधी करुन
नाहीतर तिला सांगू की आधी करुन जा, फ्रिझ कर आणि रुनी तळेल आयत्यावेळी.
अगदी अगदी... माझे राहिलेत
अगदी अगदी... माझे राहिलेत मागच्यावेळी खायचे.
आणि कुठेस आहे म्हणे हे गटग??
आले तर यावेळी चिवडा विथ बारिक
आले तर यावेळी चिवडा विथ बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवीमिरची आणि लिंबू माझ्याकडून.
त्याला काहितरी मजेदार नाव
त्याला काहितरी मजेदार नाव असेल तरच तुझ्याकडुन एक्सेप्ट केल जाइल.. नाहितर चुबुक वड्या आण
ब. वडे मै आणि रुनिला करायला
ब. वडे मै आणि रुनिला करायला सांगा. गेल्या वेळी त्यांनीच बरेचसे काम केले होते आणि त्यांना रेसिपीही माहीत आहे. मै कडे आता चॉपरसुद्धा आहे.
हे जीटीजी चुकले तर वाईट वाटून घेऊ नका, एप्रिलमध्ये डीसीचे आहेच.
खास आणि फक्त माझ्यासाठी
खास आणि फक्त माझ्यासाठी उकडीचे मोदक कुणी आणणार असेल तर आणि तरच मी दहीवडे आणेन
कारण एवढे करायचे आणि मला मात्र खाता येत नाहीत 
सशल येणार नाही, नाही का? मृ,
सशल येणार नाही, नाही का? मृ, चिवड्यावर फ्रोजन खोबरं चालायलाही हरकत नाही.;)
ठेव तुझे दहिवडे तुझ्याचकडे..
ठेव तुझे दहिवडे तुझ्याचकडे.. मीच करते जा आता उद्या
सिंडे तुला तू केलेले दहिवडे
सिंडे तुला तू केलेले दहिवडे खाता येत नाहीत..इतके कडक होतात की काय
मला दही आवडत नाही
मला दही आवडत नाही
सशल येणार नाही, नाही का? >>>
सशल येणार नाही, नाही का? >>> काय हे पुणेरी बोलणं .. सायो, तू कशामुळे अशी बाटलीस??? :p
अमृता, तू मोदक चांगले करतेस
अमृता, तू मोदक चांगले करतेस का? अरे वा, मग तू आणच या जीटीजीला
अमृताचे मोदक(उकडीचे) सिंडीचे
अमृताचे मोदक(उकडीचे) सिंडीचे हल्ली हल्लीच प्रसिद्ध झालेले द व, रुनी-मै ह्या जोड्गोळीचे ब व ... व्वा वा, यायचं जमवायलाच हवं
ए बाबा, मी नाही ह मोदक बिदक
ए बाबा, मी नाही ह मोदक बिदक चांगले करत... एवढ्या लोकांसाठी तर नाहिच नाहि..
अमृता, मोदक तू चांगले करतेस
अमृता, मोदक तू चांगले करतेस पण तुला एवढ्या लोकांकरता करायचे नाहीयेत असं म्हण की. उगाच मोदकांना का वाईट म्हणा.

अग, नाहिच्च करत मी मोदक
अग, नाहिच्च करत मी मोदक चांगले. आणि असे गटग साठी करायचे म्हंटल्यावर तर हमखास बिघडतील. त्यामुळे ते आपण सोडुन बोलुया
सिंडी, तू दहीवडे इतरांसाठी कर
सिंडी, तू दहीवडे इतरांसाठी कर आणि तुझ्यासाठी त्यातले काही वडे फोडणीच्या पाण्यात चुबुक सोडून केलेले चुबूक वडे कर. वड्यातलं तेल पाण्यात उतरुन तुझं डाएटही सांभाळलं जाईल

ह्याला म्हणतात मिनेसोटातल्या उंटावर बसून बारातल्या शेळ्या हाकणं
ठरलं का? कधी?
ठरलं का? कधी?
मी उद्या आमच्या त्या हॉलची
मी उद्या आमच्या त्या हॉलची अव्हेलेबिलिटी बघून सांगू शकेन.
अगो, बाराकर शेळ्या(मेंढरं)
अगो, बाराकर शेळ्या(मेंढरं) आहेत असं तुला म्हणायचय का ?
बाराकरांना शेळ्या.मेंढरं
बाराकरांना शेळ्या.मेंढरं म्हणून अगो(चरपणा करुन) पंगा घेणार नाही.
<<बाराकर शेळ्या(मेंढरं) आहेत
<<बाराकर शेळ्या(मेंढरं) आहेत असं तुला म्हणायचय का>>
बहुधा नाही, नाहीतर बाराकर त्यांना उंटावरची शहाणी म्हणतील.
भेळ, दही बटाटा पुरी, इ. गोष्टी कोण आणणार आहे?
मी आले तर आणायची तयारी आहे.
मी आले तर आणायची तयारी आहे.
Pages