१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
घ्या म्हणजे पॅन केक करायचे
घ्या म्हणजे पॅन केक करायचे आता
नालेसाठी घोडा की काय तसं प्रकरण होणार बहुतेक
स्वाती धन्यवाद बघते आता काय करायच ते.
गावच्या उकड्या तांदळाची पेज,
गावच्या उकड्या तांदळाची पेज, भात याव्यतिरिक्त आणखी काही करता येईल का?
घावणे, ईडली, डोसे होऊ शकतील का?
त्याचा रवा काढून आणल्यास
त्याचा रवा काढून आणल्यास इड्ली करता येइल
श्यामली, मॅपल सिरप दोसा,
श्यामली, मॅपल सिरप दोसा, पूरी, चपातीबरोबरही चांगले लागते. पॅनकेकवर अफलातून
सेट डोश्यासाठी batter कसं
सेट डोश्यासाठी batter कसं तयार करतात माहीत आहे का कुणाला?
पुण्यात एफ सी रोडवरच्या रूपालीतला माझा अगदी फेवरीट आहे.
दिसायला जाडसर स्पॉन्जी असतो. आणि खायला आहाहा!...........लुसलुशीत, लोण्यासारखा............
,
मीराधिका अनुमोदन. डोश्याचेच
मीराधिका अनुमोदन. डोश्याचेच बॅटर पण ते फर्मेन्ट होउ द्यायचे नाही. त्या बरोबर इथे कोकोनट स्टु सारखे देतात. गाजर बीन्स, मटार घातलेली नारळाच्या रसातील साधारण कढीच. पुण्यात काय देतात? मी पण सेट दोश्याची फॅन आहे.
श्यामली, फ्रेंच टोस्ट वर पण
श्यामली, फ्रेंच टोस्ट वर पण छान लागते मेपल सिरप.
उद्या पॅन केक ट्रायल
उद्या पॅन केक ट्रायल हाये..आणि नुसत्या तांदळाच्या धिरड्याबरोबर जनतेला आवडून झालंय. हुश्श्य!
मीराधिका,
मीराधिका,
http://www.aayisrecipes.com/2009/04/25/set-dosa/ या दुव्यावर मस्त रेसिपी आहे सेट डोश्याची.
उकड्या तांदळाच्या ईडल्या
उकड्या तांदळाच्या ईडल्या चांगल्या होतात. भाजणीच्या पिठात तांदळाचे पिठ मिसळून आम्बोळ्या होऊ शकतील. पण चव !!!
माझ्याकडे तांदळाचा रवा शिल्लक
माझ्याकडे तांदळाचा रवा शिल्लक आहे. इडली सोडून त्याचं काय करता येईल?
स्वाती२, आईज रेसीपीज वाचून
स्वाती२,
आईज रेसीपीज वाचून सेट डोसा केला. छान झाला. इतर रेसीपीज पण आवडल्या.
माझ्याकडे एक कुकिंग मिल्क
माझ्याकडे एक कुकिंग मिल्क चॉकलेट आहे. चुकुन आणलेले! त्याचे काय करावे हे प्लीज कोणीतरी सांगाल का? सोपी पा कृ सांगा बॉ!
वत्सला कुकींग चॉकलेट म्हणजे
वत्सला
कुकींग चॉकलेट म्हणजे बेकींगसाठी वेगळा असतो तो चॉकलेट बार ना. केक, कुकीज करतांना त्या बॅटर मधे किसुन टाकता येईल ते चॉकलेट.
वत्सला, त्यात बरोबरीने
वत्सला,
त्यात बरोबरीने कुकिन्ग बिटर चॉकोलेट, सुका मेवा टाकून माय्क्रोवेव मध्ये ३० से. ३० से. असे मेल्ट करायचे
व मग प्लॅस्टिक मोल्ड मध्ये घालून फ्रिज मध्ये ठेवायचे. ५ मि. ने काढून डब्यात ठेवायचे. मुलांना चॉकोलेट्स होतात. गिफ्ट पण देता येतात चांगल्या पेपर मध्ये बांधून.
तसे मेल्ट करून थाळीत प्लॅस्टिक वर पसरायचे व वरून आवडीचा सुका मेवा पेरायचा. गार झाले की
तुकडे पाडायचे. चॉकोलेट बार्क म्हणतात.
साधे मफिन्स करून वर टॉपिन्ग म्हणून.
मेल्ट करून त्यात उत्तम प्रतीचे शेंगादाणे घालायचे व फ्रिज करायचे. किन्वा अमेरिकीतील इतर काही नट्स
मॅकडेमिया वगैरे. पोस्ट डिनर सर्व करता येते.
माझ्या कडे गावचा मालवणी खाजा
माझ्या कडे गावचा मालवणी खाजा आहे बरेच दिवस पडुन आहे कोणी खातच नाही काय करता येइल? प्रसाद म्हणुन आलेला आहे त्यामूळे टाकुन देऊ शकत नाही काही करता येईल का?
बरेच दिवसाचा असल्याने खराब
बरेच दिवसाचा असल्याने खराब झाला असेल तर टाकून द्या प्रसाद असला तरी. चांगला असेल आणि घरातलं कुणी खात नसेल तर देऊन टाका वाटेत कुणी रस्त्यावर रहाणारी मुलं दिसली तर.
शिल्पा खाज्याच काहि होणार
शिल्पा खाज्याच काहि होणार नाहि वाटत. वाटुन टाक.
धन्स रुनी आणि मामी! होय रुनी
धन्स रुनी आणि मामी! होय रुनी तो चोकलेट बार आहे.
हे पदार्थ डिप फ्रिज / फ्रिज
हे पदार्थ डिप फ्रिज / फ्रिज कुठे ठेवायचे?
कोकोनट मिल्क; तोफु ( मी डिप फ्रिज मध्ये ठेवल तर दगडाहून टणक झालय ), खवलेला ओला नारळ
कोकोनट मिल्कचा कॅन असेल तर
कोकोनट मिल्कचा कॅन असेल तर फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. मात्र कॅन उघडल्यावर लगेच वापरायला हवा. कॅन/पॅक वर Storage Instructions आहेत का पहा. खवलेला नारळ मात्र डीप फ्रीजमध्येच ठेवायला हवा, बरेच दिवस टिकवायचा असेल तर. टोफुबद्दल कल्पना नाही.
कोकोनट मिल्कचा कॅन वापरुन
कोकोनट मिल्कचा कॅन वापरुन उरला असेल तर फ्रीझरमधे क्युब्स करुन ठेवु शकता.
टोफू फ्रिजमधे ठेवला तरी चालतो.
तोफू क्लिंग फिल्म मधे
तोफू क्लिंग फिल्म मधे गुंडाळून, फ्रीजमधे ठेवला तर आठवडाभर टिकतो. त्यानंतर त्याला थोडा वास यायला लागतो. घरच्या घरी तोफू करायची कृति मी लिहिली होती.
तोफू सहजपणे मिळू शकतो. पण
तोफू सहजपणे मिळू शकतो. पण फ्रिज मध्ये ठेवता येतो हे माहीत नव्हत. आणि कोकोनट मिल्कच्या क्युब्ज वापरायच्या कश्या? रुम टेंम्परेचर ला आणून पातळ होत की पाण्यात मिक्स करायच?
कोकोनट मिल्कच्या क्युब्ज थॉ
कोकोनट मिल्कच्या क्युब्ज थॉ करायच्या फक्त. आधी फ्रीझरमधुन काढुन रेफ्रिजरेटमधे ठेवल्या तर लवकर थॉ होतात.
मटार कसे टिकवायचे
मटार कसे टिकवायचे (मॅफकोप्रमाणे)? वाफवुन डीप फ्रीज करायचे कि तसेच डीप फ्रीज करायचे?
आणि साधारण किती दिवस टिकतात?
मी सध्या कॉर्न डीप फ्रीज केले आहेत air tight container मध्ये. २ महिने छान राहिले आहेत .
खवलेला ओला नारळ air tight
खवलेला ओला नारळ air tight container मध्ये डीप फ्रीजमध्ये चांगला रहातो.. मी ठेवते नेहमी
डेसिकेटेड खोबरे हा काय प्रकार
डेसिकेटेड खोबरे हा काय प्रकार असतो? मी कधी वापरला नाही. आणि ड्रिंकींग चॉकलेट एवजी कॅडबरी किंवा इतर वापरू शकते?
डेसिकेटेड खोबरे हा काय प्रकार
डेसिकेटेड खोबरे हा काय प्रकार असतो >>> किसलेला नारळ/ खोबर्याचा कीस.
मटार डीप फ्रीज करण्यासाठी,
मटार डीप फ्रीज करण्यासाठी, मीठ घातलेल्या उकळत्या पाण्यात मिनिटभर बूडवून ते लगेच थंड पाण्यात टाकायचे. मग छोट्या छोट्या पिशव्यात सीलबंद करायचे.
डेसिकेटेड कोकोनट, म्हणजे सुक्या खोबर्याचा कीस. हा शुभ्र आणि बारीक असतो. (पण कधी कधी त्याला जुनाट वास येतो ) हा चॉकलेट्स, वड्या, अनारसे वगैरे करताना उपयोगी पडतो. कोमट दूधात अर्धा तास भिजवून ठेवला, तर वाटणात ओल्या नारळासारखा वापरता येतो. अर्थात सुक्या खोबर्यासारखा पण, करंजीच्या सारणात, मसाल्यात वगैरे वापरता येतो.
Pages