पंच्याण्णऊ पॉईंट सत्याण्णऊ
http://72.78.249.125/esakal/20100106/4893480797968659175.htm
मला कधीच पंच्याण्णऊ पॉईंट सत्याण्णऊ टक्के मिळाले नाहीत. पण मला कधी त्याचे वाईटही वाटले नाही! मला नेहमीच साठ, सत्तत, आंशी असे कमीच मार्क मिळाले, पण माझ्या घरच्यांना देखील कधी वाईट वाटले नाही! माझे शिक्षक तर मी खुप हुशार होतो/आहे असे म्हणतात. मी माझ्या जुन्या शाळेत गेलो कि एक माजी विद्यार्थी म्हणुन मला हुषार, अभ्यासु असे सांगुन ओळख करुन देतात अन चांगला वगैरे म्हणतात...
माझे वडिल शिक्षक्-मुख्याध्यापक-प्राचार्य होते. अन मुख्य म्हंजे आम्ही रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होतो. त्यामुळे आम्हाला परिक्षार्थी कधीच बनता आले नाही.
अन त्यामुळे काही अडलेही नाही. मु.पो.- कोरडगांव तालुका- पाथर्डी, च्या शाळेतुन शिकुन युरोप ऑस्ट्रेलियाच्या शाळेत शिकायला, नोकरीला जाणे म्हणजे यशस्वी होणे असे म्हणत असतील, तर मी ते पण झालो म्हणायचो!
पन हल्ली मुलांना पंच्याणाव पॉइंट सत्यान्नव मिळुन पण पालक खुष होत नाहीत. त्यांना नव्व्याण्णव पॉइंट शंभर च मार्क लागतात!
चंपक, रेव्ह्यु, रुनी, आगाऊ,
चंपक, रेव्ह्यु, रुनी, आगाऊ, वैद्य- पोस्ट आवडल्या.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5428801.cms
...... पण समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याचीही गरज आहे. शर्यतीत पहिला येणारा तर ग्रेट असेलही पण दुसऱ्या, तिसऱ्या नव्हे तर शर्यतीत भाग घेणाऱ्या प्रत्येकाच्या प्रयत्नांचे मोल तितकेच मोठे असते. हा समज झिरपायला हवा
.......पण तरीही मला खूप गोष्टी आवडायच्या. म्हणजे बटाट्याची भाजी तर आवडायचीच पण पावसांत भिजायलाही खूप आवडायचं. गेम शो खेळायला आवडायचे आणि हो, हिंदी सिनेमातल्या हिरो-हिरोईन्स तर खूपच. मोठा झालो की त्यातल्या सलमान खानसारखी बॉडी बनवायची हे तर मी केव्हाच ठरवलं होतं. पण ही सगळी माझी दरिदी लक्षणं आहेत. आयुष्यात मला कधीही 'मोठा' माणूस होता येणार नाही, असं तुम्ही सगळ्यांनी मला अनेकदा सांगितलंत. परीक्षेत नापास होण्याचं मी सोडलं नाही पण माझ्या जवळच्या मित्रानं त्याची आई रागावल्यानं माझ्याशी असणारी मैत्री मात्र कायमची सोडली. त्याच्यासकट तुमच्यापैकी कुणालाच मी आवडत नाही, हे मला कळलं होतं. तुम्हा सगळ्यांना मी आवडावं म्हणून मी काय काय केलं. हिंमत होत नसताना नाचात भाग घेतला आणि तोही धड न जमल्यानं चिडवून घेतलं. मग मात्र कुणालाच आवडत नसल्यानं जगायचं तरी कशाला असा विचार मनात घोंघावू लागला आणि आयुष्यात पहिल्यांदा मी कशात तरी यशस्वी ठरलो
वरील काही पोस्ट मध्ये
वरील काही पोस्ट मध्ये 'श्रमाला प्रतिष्ठा' हा मुद्दा आला. मराठी शाळेत असताना एक धडा होता ज्यात पंडित नेहरु ह्यांनी नागपुर च्या एका सभेत संत्र्याचे साल स्वतः उचलुन कचरापेटीत टाकले म्हणुन त्यांची स्तुती केली होती..
..... 'मोठ्या' माणसाने असे केले कि लगेच प्रसिद्धी मिळते, पण त्याचे अनुकरन होत नाही. अन छोट्या माणसाने असे केले कि त्याला छद्मी हास्याचा प्रतिसाद मिळतो...... ही मानसिकता देखील धोकादायकच आहे!
***
फायनान्शियल स्टॅबिलिटी ह्या शब्दाला काही अर्थ नाही! कारण कितीही पैसेमिळावले तरी आपण स्टेबल झालो असे कोणालाच कधीही वाटत नाही. पण आपल्याला किती पैसे मिळवायचे हे एकदा पक्के केले कि मग 'कमी' पैशातही तो स्टेबल राहु शकतो.
***
'भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे?' हा विचार जर सतत मनात असेल तर माणुस कधीच 'स्टेबल ' होणार नाही!!!
***
लंबी रेस का घोडा बनवण्यापेक्षा लवकरात लवकर 'मोठा' माणुस बनन्याची वा बनवण्याची जी वृत्ती आहे ती धोकादायक आहे.
अशी ही उदाहरणे समोर ठेवावीत... http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=38824:2...
आपल्या मुलाला जिवघेण्या
आपल्या मुलाला जिवघेण्या स्पर्धेत ढकलण्यामागचा पालकांचा मुख्य उद्देश त्याला बदलत्या काळात देखील स्वताच्या पायावर निट उभे राहता यावे हाच असतो.
आणि पायावर उभे रहायला मिळकत लागते.
तेव्हा सद्यस्थितीत मिळकतीचे काय काय मार्ग आहेत याची यादी बनवायला हवी.
मिळकतीचे मार्ग खुप आहेत असे मोघम वाक्य कामाचे नाही.
मुळातच ही परीस्थिती (जीवघेणी
मुळातच ही परीस्थिती (जीवघेणी स्पर्धा) का आणि कशी निर्माण झाली याचा विचार करणं जरुरीचं आहे. एकिकडे आपण अभिमानाने म्हणतो की पुढील १० वर्षात भारतातील तरुणांची लोकसंख्या इतर देशांपेक्षा जास्त असणार आहे; एकुणच आपली वाढती लोकसंख्या ही लायाबिलिटी नसुन ह्युमन कॅपीटल (अॅसेट) आहे वगैरे, वगैरे...
दुर्दैवाने या वाढत्या तरुणवर्गाला योग्यत्या संधी उपलब्ध करुन देण्यात आपली यंत्रणा अपयशी ठरली आहे आणि त्यामुळे मोकळ्या जागा आणि उमेदवार यांच्यामध्ये भयंकर व्यस्त प्रमाण निर्माण झालं आहे. १०० जागांसाठी १ लाख अर्ज येतात, मग साहजीकच टॉप १०० लोकांना नोकरी/प्रवेश मिळतो. हे चित्र पाहुन पालक आपापल्या पाल्यांना टॉप १०० लोकांमध्ये येण्यासाठी स्पर्धेत ढकलतात. मुलांवर प्रेशर टाकलं जातं; जाणता-अजाणता ते प्रेशर वाढत जाऊन त्याचा कधितरी विस्फोट होतो. त्यात भर भ्रष्टाचाराची. आहे ही अशीच परिस्थिती पुढे चालु राहिलि तर ९७% मार्क मिळवुन इंजीनियर/डॉक्टर होण्यार्याचे सुद्धा वांधे होणार आहेत.
मग यावर उपाय काय? तरुणवर्गाला चाकोरीबाहेरचे व्यवसाय करण्यास उत्तेजन देण्याबरोबरच लोकसंख्या मर्यादीत ठेवण्यासाठी उपाय योजना करण ही काळाची गरज आहे असं वाटते. पण हे सगळं आव्हान पेलण्यास राजकीय पक्ष तयार आहेत का? रीफॉर्म घडवण्यासाठी आवश्यक असलेलं धारीष्ठ्य आणि राजकीय ईच्छाशक्ती त्यांच्याजवळ आहे का? Its a million dollars question...
राज,मी सुद्धा हेच
राज,मी सुद्धा हेच म्हटलयं,
माझी ७ जानेवारीची पोस्ट बघा.
-----------------------------------------------------------
<< सफल माणसांकडे बघितले तर त्यातले सगळेच काही या जीवघेण्या स्पर्धांतून गेले नव्हते. >>
भाग्यश्रीजी अगदी सहमत,
पण एक लक्षात घ्या की सर्व पालकांची 'सफल' ची व्याख्या काय आहे?
आपला मुलगा- भगतसिंग,राजगुरु,म.गांधी,मनमोहनसिंग,सोनिया गांधी,डॉ.कलाम,बिल गेटस,टाटा-बिर्ला,अंबानी,व्यावसायीक,उद्योगक,व्यापारी,विक्रेता,कलाकार,लेखक,पत्रकार किंवा शेतकरी - यापैकी काहीही व्हावा असे वाटत नाही. (आणि या क्षेत्रात सफल होण्यासाठी ६० टक्के मार्क्स सुद्धा पुरेसे होतात.)
सर्व पालकांना आपल्या मुलाला सहाव्या वेतन आयोगाचा लाभार्थी बनवायचा आहे आणि तिथे १ व्हॅकन्सी व २००० उमेदवार असे प्रमाण आहे.
त्यासाठी ही सारी कुत्तरओढ चालली आहे.
जर आहे या व्यवस्थेत परिवर्तन होणार नसेल तर पालकांचे काही चुकते असे मला अजिबात वाटत नाही.
इथे एकट-दुकट सफलतेचे उदाहरण कामाचे नाही किमान ६०-७० टक्के जनता डोळ्यासामोर ठेवुनच विचार करावा लागेल.
काल थ्री इडियट्स हा चित्रपट
काल थ्री इडियट्स हा चित्रपट पाहिला!
एकदम मस्त! कयामत पासुन इडियट पर्यंत अमिर कमाल करतोय!
'तारे जमीन पर' मध्ये समाजातील फक्त काही विद्यार्थ्यांना असणार्या/ होउ शकणार्या अनियमिततेबद्दल/ रोगाबद्दल माहिती दिली होती, पण या चित्रपटात संपुर्ण समाजालाच लागण झालेल्या एका भयंकर रोगाबद्दल (यशस्वी होण्याच्या/ मोठा होण्याच्या) मत मांडले आहे, असे वाटले.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5431173.cms
नापास मुलांची गोष्ट नावाचे एक पुस्तक सर्व पालकांनी वाचवे असे आहे . आज विविध क्षेत्रांत अग्रगण्य असलेल्यांनी शाळेत कधी ना कधी कशी आपटी खाल्ली हे प्रांजळपणे कबुल केले आहे आणि आपण त्यातून कसा मार्ग काढला हेही सांगितले आहे . अपयश म्हणजे सर्व काही नव्हे हा मंत्र मुलांना शिकवला जावा असे हे अनुभव सांगतात ..
---------
व्यक्तीमत्व संजीवनी नावाचे पुस्तक कुणी वाचले आहे का/ त्याबद्दल माहीती आहे का?
ashuchamp.. तुमची पोस्त
ashuchamp.. तुमची पोस्त छान,पण तुअमच्याइतका patience किती जनांकदे असतो? तुम्ही पैसा,यश याबाबतीत जितका balanced विचार करताय ते किती जणांना जमते?
आगाऊ .. वडिल मोठे doctor असणे हा फार मोठा advantage आहे तुमचा.
वैद्द्य>> खुप पैसा मिळवने हे ध्येय नसलेच पाहिजे हे मान्य , पण मोठ्या शहरात survival साठी ,आयुअष्याचा दर्जा राखण्यासाठी पैसा लागतो हे तर तुम्ही नाकारणार नाही ना? आपल्याला पैसा मिळत असताना पैसा म्हनजेच सगळे नाही असे म्हणने खुप सोपय. पण ज्यांच्याकदे नसतो त्यांना कमी पैशांपायी ज्या तडजोदी कराव्या लागतात त्यांना त्याचा त्रास होत असतो.त्यांची आयुष्यावबद्दल प्रचम्द तक्रार असते. आणि आपल्या मुलाना तो त्रास होउ नये म्हणुन ते लोक मुलाना अशा field मधे पाठवतात जिथे पैसा मिळव्याची खात्री असते.
इथे मुलाच्या आवदीचे काम करु द्यावे असा विचार खुप जन मांदतात. पन १६-१७ व्या वर्षी किती जनाना खरेच कलते आपल्याला काय आवडते, अशा वेळेस आइ-वडीलांचे ऐकने योग्य नाही का?
माझी एक छोती ९वीतली भाची आहे modelling करायचे म्हणते, त्या क्षेत्रातल्या संभाव्या धोक्याम्ची,त्रासाची ,पैशांच्या अनियमिततेची,short life ची तीला पुरेशी कल्पना नाही अशा वेली तीचे आइ वडील तीला विरोध करत असतील तर चुक काय?
आगाऊ .. वडील मोठे doctor असणे
आगाऊ .. वडील मोठे doctor असणे हा फार मोठा advantage आहे तुमचा.>>> तो कसा काय? आर्थिक, सामाजिक,बौद्धिक.कुठल्या प्रकारे? प्लीज जरा विस्ताराने सांगा.
आर्थिक>> माझ्या आधीच्या
आर्थिक>> माझ्या आधीच्या म्हनजे माझ्या बाबांच्या पीधीतल्या dcotor चे financial status हे सहसा चाम्गलेच म्हनजे higher middle,higher class ह्यातच मोदते. तुम्ही जेव्हा मोठे हा शब्द वापरलात त्यवरुन मी ते ग्रुहीत धरले.अशा वेलेस तुम्हाला पैशापाथे लागायचे काही कारणच उरत नाहे.
सामाजिक>सर्व professions मधे medical professionalla भारतात सर्वात जास्त मान मिळत्तो. (सर्वात जास्त donation medical seat ला द्यावे लागते ते उगाच नाही.)when u come from such a respectable family ,u get respect from society being member of that family.this can be termed as advanatge of ur family background.
इथे मी उदाहरन देते,
माझ्या नात्यातली एका प्रथितयश doctorची मुलगी bcom असुन तीला engg.नवरा मिळाला.
आमचे postmanकाका सांगत होते तत्यांची मुलगी mcom throught distinction असुन लोक तीला १०वी १२वी अशी स्थले सुचवतात.
बौद्धिक>> being son of intellectual person u get all opportunitities to interact with intellectuals/educated class vey natuarlly .u dont have to take special efforts for it.
any way this last post form my side. तुम्ही आणि तुमची मुले काय घालायचे तो गोंधळ घाला.
माझ्या पोस्टचा मूळ मुद्दा हा
माझ्या पोस्टचा मूळ मुद्दा हा होता की पालकांनी त्यांचे स्वतःचे शिक्षण, सामाजिक स्थान याचा बाऊ न करता,तुलना टाळून, मुलांना करीअर करु दिले तर मुलांचा फायदा होतो.याला सर्वात ओळखीचे म्हणून स्वतःचेच उदाहरण दिले!
मोठे डॉक्टर याचा असा सोयिस्कर अर्थ काढलेला असणार याची मला खात्री होतीच.
last post form my side.>> असे म्हणुन तुम्ही इथून माघार घेतलीच आहे आणि या बाबीची इथे चर्चा करुन बीबी भरकटवण्यात मलाही गम्य नाही. त्यामुळे तुमचे गैरसमज दुर करणारे उत्तर तुमच्या विपूत देत आहे. (इतर गरजूंनी ते तिथेच वाचावे!)
माझ्या नात्यातली एका प्रथितयश doctorची मुलगी bcom असुन तीला engg.नवरा मिळाला.>>> अरेरे, माझं याबाबतीत मात्र नुकसान झालं बघा,मला नाय मिळाली इंजिनीअर बायको
तुम्ही आणि तुमची मुले काय घालायचे तो गोंधळ घाला.>>> याचा अर्थ कळला नाही.
श्री विश्वास नांगरे
श्री विश्वास नांगरे पाटील...
दिलेल्या दुसर्या भागातील मिनिट ६ ते ७ जरुर ऐका!
http://www.youtube.com/watch?v=kkcrcdFnOeM&NR=1
भाग तीन सुंदरच!:)
http://72.78.249.124/esakal/2
http://72.78.249.124/esakal/20100114/5606489952315936034.htm
एक आवाहन: विद्यार्थ्यांना आणि पालकांना...
हेमंत हजारे, लंडन
http://72.78.249.124/esakal/2
http://72.78.249.124/esakal/20100117/5299134200244157528.htm
मुंबई - विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत होणारी वाढ सरकारसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. शिक्षक- पालक संघटनांना एका मंचावर आणण्यासाठी शालेय शिक्षण खात्याने प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सर्व संबंधितांना एकत्र आणण्याची शक्यताही शालेय शिक्षण खाते तपासून पाहते आहे.
<< शिक्षक- पालक संघटनांना एका
<< शिक्षक- पालक संघटनांना एका मंचावर आणण्यासाठी शालेय शिक्षण खात्याने प्रयत्न सुरू केले आहेत. >>
आग सोमेश्वरी अन बंब बमलेश्वरी......!!
आता ऑस्ट्रेलियातील शाळांमध्ये
आता ऑस्ट्रेलियातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरची एकच चाचणी घेतली जाणार आहे. अन तिचे रिजल्ट जाहीर करुन शाळांना रेटींग देणार आहेत. अन ते वेबसाईट वर जाहीर करुन पालकांना मुलांसाठी शाळा कोणती चांगली हे ठरवायला मदत करणार आहे. सरकारचे म्हणने आहे कि, ह्याने शाळेची लायकी/दर्जा कळेल!
पण शिक्षक संघटनांना हे नको आहे. संघटनेने काम बंद / परिक्षेवर बहिष्कारा चा इशारा दिला आहे.
दै. सकाळ दि. २४/०१/२०१०,
दै. सकाळ दि. २४/०१/२०१०, पुरवणी "सप्तरंग" मधील 'उत्तम कांबळे यांचे मला भावलेले चार शब्द.
पोरासाठी चार शब्द
उत्तम कांबळे (uttam.kamble@esakal.com)
प्रिय पोरा,
सगळेच विद्यार्थी नसतात गुणवान,
नसतात सगळेच ज्ञाननिष्ठ
तुलाही हे सारं कळेलच कधी ना कधी...
मात्र, आता थोडं हेही शिकच ः
जगात प्रत्येक महापुरुषामध्येही
असतो एक सामान्य बुद्धीचा विद्यार्थी
प्रतिभावंत विद्यार्थी असतात जगात;
तसे सारे आयुष्य लढाई करून
स्वतःला जायचे तेथेच
जाणारेही असतात विद्यार्थी.
मला माहीत आहे पोरा,
साऱ्याच गोष्टी नाही झटपट आत्मसात होत,
तरीही वळूनवळून करावा लागतो विचार
तणावात बुडून मिळवलेल्या यशापेक्षा
तोलात राहून मिळवलेलं यश मौल्यवान आहे !
यश कसं मिळवायचं हे शिक;
आणि झालंच, तर
अपयश कसं पचवायचं हेही शिक...
नसतील शाळा शिकवत, तर
लढून लढून जखमी झालेल्या
नि जखमांतूनच पीक घेणाऱ्या
बापाकडं पाहून तर शिकच शिक...
शिक्षणासाठी शेत विकलं
म्हणून खचून नको जाऊ;
आत्मविश्वास नाही अजून विकला,
याचा गर्व नको विसरू !
मात्र त्याचबरोबर
लाभू दे तुझ्या मनाला संयम
अन् जगणं समजून घेण्याचं बळ...
समजून घे :
आकाशभरारी घेणाऱ्या पक्ष्यांच्या
पायालाही चिकटतात मातीचे कण
डोळ्यांतून गळणाऱ्या त्यांच्या स्वप्नांचे
पृथ्वीवर होतात मोती
शाळेत स्वतः हाही धडा घे,
श्वास संपवून मिळवलेल्या यशापेक्षा
एक पाऊल मागं जाणं असतं सुंदर.
आपली स्वप्नं, आपल्या वाटा
व्यवस्थेच्या जबड्यातून ओढून काढायला शिक
सर्वांनी ठरवलं मूर्ख, तरी ठासून सांग ः
मी विद्यार्थी आहे - परीक्षार्थी नाही!
माणूस आहे - रेसचा घोडा नाही!!
इतर मुलांनाही पटवता आलं तर बघ
मृगजळाच्या मागं धावत
आतडी गमावू नयेत
आणि हेही त्यांना सांग :
शिक्षकांचं ऐकावं - पालकांचं ऐकावं;
पण समजून घ्यावं त्यांना, स्वतःचीच ऊर्जा वापरून
फेकाव्यात अवास्तव अपेक्षा
आणि स्वीकारावी पायाला लागेल तेवढीच माती
हसत हसत शिकावं, काळजातला ताण फेकून...
आणि ऐक पोरा,
कमी गुणांची, नापासाची
लाज नको बाळगू
पास-नापास पार करून
आयुष्य असतं धावत - कधी नको विसरू
बापामधला नको पाहू
घोड्याचा मालक,
बापामधला नको विसरू
प्रेमळ पालक...
पोरा, पुरेपूर समजून घे
भरपूर करायची असते कमाई;
पण भरपूर घाम गाळून
आत्मा विकून नव्हे...
मनाचा आणि मनगटाचा
धिक्कार करणारा आलाच ऋतू, तर
आईच्या पदराखाली लपायला शिक...
ठसवून घे स्वतःच्या मनावर
जे भावतं आणि जे गावतं
तेच मिळवेन मी
आत्मा गमावून
धावत्याच्या मागं नाही लागणार मी!
नीट समजून घे पोरा,
आत्महत्या करून कळत नसतं आयुष्य;
तर लढूनच जाणावं लागतं आयुष्य
यासाठी अंगी बाणव
प्रश्न विचारण्याचं सामर्थ्य!
जगण्याचा अर्थ सांगणारं शिक्षण!
आत्महत्या असते मूर्खपणाची
तिच्यासाठी अक्कल नसते लागत
जगणंच असतं शौर्याचं
लढल्याशिवाय नाही ते उमजत...
तुझा दृढ विश्वास पाहिजे :
दगा देणाऱ्या ऋतूनंतरही
त्याचीच पुन्हा वाट पाहणाऱ्या आपल्या बापावर...
माफ कर पोरा, मी फार बोलतो आहे,
माझं नव्हे, तर तुझंच भलं चाहतो आहे
बघ, आयुष्यातील सुरवातच बघ
माझाच पोरगा तू
उगवणारा सूर्य तू नक्कीच पाहशील !
तुला हवं तसंच चित्र तू काढशील !
आशाळभूत बापासाठीही
थोडा रंग ठेवशील !
हा सारा ताण - ताण...
मरणाची सुटली घाण-घाण...
काळाच रंग फासशील तू त्यांच्यावर
ते कधीच दिसू नयेत म्हणून...
उद्याच्या सूर्याआड येऊ नयेत म्हणून...
अब्राहम लिंकन, वसंत बापट यांचे स्मरण करून आणि उगवतीच्या हातात कळ्या-फुले देऊन
सर सेनापती वा वा खरोखर विचार
सर सेनापती
वा वा खरोखर विचार करण्या जोगे आहे.
धन्य वाद.
सेनापती: धन्यवाद!
सेनापती: धन्यवाद!
झक्कींनी/arcनी मांडलेली एक
झक्कींनी/arcनी मांडलेली एक बाजू तर इतरांनी मांडलेली बाजू, दोन्हीमध्ये तथ्य आहेच. ह्या समस्येस अजून एक अंग आहे असे मला वाटते. आपल्या समाजव्यवस्थेत स्वतःच्या मुला-मुलींच्या आयुष्यात पालक अतिशय गुंतवून घेतात. मग त्या पाल्याचे पुढच्या आयुष्यातील स्टेटस, यश इत्यादी गोष्टी पालकांच्या आयुष्याचे मानदंड बनतात (defining parameters). पाल्याचे आयुष्य बरे जावे हा हेतू प्रबळ की त्याच्या आयुष्याच्या यशाने माझ्या आयुष्य सफल होणार आहे ही भावना प्रबळ असते ह्याबद्दलची सांख्यिक माहिती माझ्याकडे नाही. मला वाटते पहिला पर्यायच जास्त प्रबळ असावा.
आपला मुलगा मुलगी हे स्वतंत्र व्यक्ति आहेत, त्यांचे आयुष्य (मग भरे वा बुरे) कसे जगावे हा त्यांचा प्रश्न आहे, जे काम ते करतील हा संपूर्णपणे त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांचे एका विशिष्ट वयोमर्यादेपर्यंत पालन-पोषण करणे ही आपली जबाबदारी (नैतिक जबाबदारी, कायदेशीर जबाबदारी असते की नाही ते माहिती नाही) आहे कारण त्यांना जन्माला घालण्याचे कृत्य आपण केलेले आहे (ज्यात त्या व्यक्तिचा म्हणजे पाल्याचा काहीही सहभाग - say - नसतो) - ही भुमिका जन्माला घालण्यार्या-सांभाळणार्या व्यक्तिंची असावी. तसेच भविष्यात त्यांनी आपल्या आई-वडिलांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणे हा पर्यायच पाल्यांना-मुला-मुलीला उपलब्ध करुन देउ नये व त्याची स्पष्ट कल्पना मुलाला-मुलीला-पाल्याला कळत्या वयापासून द्यावी.
ह्या भुमिकेतून काही प्रश्न तरी सुटतील असे मला वाटते.
http://72.78.249.124/esakal/2
http://72.78.249.124/esakal/20100204/5051712445139352936.htm
या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकारी पातळीवर उपायांबरोबरच पालकांनीही सजग झाले पाहिजे.
Pages