पंच्याण्णऊ पॉईंट सत्याण्णऊ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

http://72.78.249.125/esakal/20100106/4893480797968659175.htm

मला कधीच पंच्याण्णऊ पॉईंट सत्याण्णऊ टक्के मिळाले नाहीत. पण मला कधी त्याचे वाईटही वाटले नाही! मला नेहमीच साठ, सत्तत, आंशी असे कमीच मार्क मिळाले, पण माझ्या घरच्यांना देखील कधी वाईट वाटले नाही! माझे शिक्षक तर मी खुप हुशार होतो/आहे असे म्हणतात. मी माझ्या जुन्या शाळेत गेलो कि एक माजी विद्यार्थी म्हणुन मला हुषार, अभ्यासु असे सांगुन ओळख करुन देतात अन चांगला वगैरे म्हणतात...

माझे वडिल शिक्षक्-मुख्याध्यापक-प्राचार्य होते. अन मुख्य म्हंजे आम्ही रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होतो. त्यामुळे आम्हाला परिक्षार्थी कधीच बनता आले नाही.

अन त्यामुळे काही अडलेही नाही. मु.पो.- कोरडगांव तालुका- पाथर्डी, च्या शाळेतुन शिकुन युरोप ऑस्ट्रेलियाच्या शाळेत शिकायला, नोकरीला जाणे म्हणजे यशस्वी होणे असे म्हणत असतील, तर मी ते पण झालो म्हणायचो!

पन हल्ली मुलांना पंच्याणाव पॉइंट सत्यान्नव मिळुन पण पालक खुष होत नाहीत. त्यांना नव्व्याण्णव पॉइंट शंभर च मार्क लागतात! Sad

प्रकार: 

आणि पालकाना या शर्यतीत लोटणार्‍या सामाजिक परिस्थितीला कोणी जबाबदार धरेल का?
ही परिस्थिती अफाट लोकसंख्या असल्याने झाली आहे.
लोकसंख्या अफाट का होते? इतकी मुले का झाली भारतात? कुणाचा बरे दोष?

मग आता काय करणार?

बरं, असेहि नाही की कुठलाहि व्यवसाय केला तरी चांगले आयुष्य जगण्याइतकी संपत्ति मिळेल. मानमरातब मिळेल. अगदी डॉक्टर किंवा वकीलच व्हायला पाहिजे, नाहीतर संगणक अभियंता! मग स्पर्धा जोरात असणारच.

अमेरिकेत तसे नाही. नाही मिळाला प्रवेश डॉक्टरीच्या कॉलेजात तर मी लोकांच्या घरचे बागकाम करण्याचा धंदा करीन, किंवा पेट्रोल पंप टाकीन, घरे बांधण्याचे काम करीन, काहीहि करीन. पैसे माझ्या अकलेवर नि कष्टावर अवलंबून. इतरांच्या बरोबरीने किंवा जास्तच पैसे मिळवीन, माझे मी हवे ते शिकेन. कुठल्याहि पार्टीत मला कुणि हसणार नाही! अगदी श्रीमंताची मुले सुद्धा लहान सहान कामे करण्यात कमीपणा मानत नाहीत.
तसे डॉक्टर, वकील यांचे आयुष्य तरी काय चैनीचे, आरामाचे असते का? मग करायचे काय डॉक्टर होऊन?

भारतात असे आहे का? का नाही? तसे झाले भारतात, तर मग एव्हढी जीवघेणी स्पर्धा होणार नाही.

ज्याला Dignity of Labor म्हणतात, ती भारतात आहे का?

रुनी,चंपक छान मांडलेत विचार, सगळं पटलं. फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे जरी पालक, पाल्य, जीवनशैली, शिक्षणसंस्था आणि मिडीया हे समीकरणाचा भाग असले तरी पालकांची वाटा सरवात मोठा किंवा सरवात जास्त परिणाम (चांगला किंवा वाइट) साधणारा आहे. मुलांकरता पालक हे एकमेव ठिकाण आहे जिथे त्यांना समजुन घेण्याची शक्यता आहे. वर नानबांनी दिलेल्या उदाहरणातल्या आई वडिलांसारखा विचार इतर पालक ही करु लागले तर खरच खुप फरक पडेल.

>>"आपल्यापेक्षा" यशस्वी कशासाठी, नुसता यशस्वी का नाही. <<
वर म्हटल्याप्रमाणे, ईच्छा असते; आग्रह नाही. आणि अशी ईच्छा अयोग्य नाही कारण सुजाण पालकांच्या ईच्छेमागे एक रॅशनाल असते/असावे.

त्याच बरोबर, आपल्या ईच्छापूर्तिसाठी पाल्यावर कोणत्याही प्रकारचं अवाजवी प्रेशर टाकणे हे सुद्धा चुक. पालकांनी आपल्या पाल्याच्या शारीरीक, मानसीक आणि बौद्धीक मर्यादा ओळखुन त्याला योग्य मार्गदर्शन करणे; त्याचा मित्र, मेंटॉर बनणे अत्यंत आवश्यक आहे. मग तुम्ही अमेरीकेत रहात असाल वा भारतात...

पण जर पाल्यात कुवत असेल तर त्याच्याकडुन अपेक्षा ठेवण्यात काही चुक आहे असे मला नाही वाटत.>>>

इथेच घोड पेंड खात... कशी ठरवायची कुवत... कोण ठरवणार... त्याचा क्रायटेरीया काय?
आपल्या पाल्यात कुवत नाही आहे हे कुणितरी सुजाण पालक मान्य करेल का?

नानबा तो मुलगा खरच नशिबवान आहे.

चंपकराव माझेही असेच आहे. दहावीला ८० % , बारावीला ८३%, BE झाल्यावर PhD करुन आता US मध्ये आहे. वर्गात कधिच नंबर आला नाही Uhoh चुलत भाउ समवयीन... सारखी तुलना चालायची (कारण तो नेहमी ९३+ )... पण मला स्वतःला कधी त्याची लाज वाटली नाही. ( बहुतेक born निर्लज्ज Happy )

>>>>>तुम्ही सध्याच्या कॉलेजेसच्या अ‍ॅडमिशनच्या मेरिट लिस्ट्स पाहिल्यात का? आधीच सीट्स कमी असतात. त्यात एका एका मार्काने प्रवेश मिळणे मुश्कील असते.>>>>

हे जरासे वाचायला कठीण वाटेल, पण मी ठरवलय जर तशी वेळ आली.. म्हणजे माझ्या मुलांना एखाद्या course ला प्रवेश घ्यायचा असेल तर मी management quota , कितीही पैसे भरुन घेइन पण त्यासाठी त्यांना त्या रॅट रेस मध्ये ढकल्णार नाही कि मी स्वतः त्यात पडणार नाही. लोक स्वतःच घर घेण्यासाठी ४० -५० लाख खर्च करतात त्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.

लोकांनो, लक्षात ठेवा:

The problem with rat race is that even if you win, you are still a rat.

मुलांचा कल कशाकडे आहे, त्यांना किती ओझं पेलतंय ह्याचा विचार बरेच पालक करत नाहीत हे खरे.

चंपक हा धागा सुरु करण्याबद्दल धन्यवाद ,
जेव्हा ईसकाळ मधली ३ लहान मुलांनी आत्महत्या केलेली बातमी वाचली तेव्हा अक्षरशः सुन्न झालो . काय वय होतं त्या मुलांच , त्यांना आत्महत्या शब्दाचा अर्थ तरी माहीत असेल का ?

नानबा ,रुनी , चंपक , झक्की , पाटील सगळ्यांनी खुप चांगले विचार मांडलेत , अजुनही वेळ गेलेली नाही पालकांनी डोळ्यावर बांधलेलं झापड काढुन मुलांना प्रोत्साहन द्यावं , त्याच्यांवर बळजबरी करु नये .

<<< पण जर पाल्यात कुवत असेल तर त्याच्याकडुन अपेक्षा ठेवण्यात काही चुक आहे असे मला नाही वाटत.>>>
>>>तुम्ही सध्याच्या कॉलेजेसच्या अ‍ॅडमिशनच्या मेरिट लिस्ट्स पाहिल्यात का? आधीच सीट्स कमी असतात. त्यात एका एका मार्काने प्रवेश मिळणे मुश्कील असते.>>>.
कदाचीत पालकांची हीच अपेक्षा , मुलांना आत्महत्येला प्रेरित करणारी पहिली पायरी असावी ( ह्याला कृपया वैयक्तीक आरोप समजु नये ).

मला इथे माझ्या भावाचे उदा. द्यावे वाटते.आमचा काळ ८५ ते ९० चा. त्यावेळीही रॅट रेस होतीच. मझा भाउ सेंकड क्लास आला होता दहावीला (हैद्राबादेत फस्ट्क्लास म्हणजे हुषार) खुप नाराज झालो होतो सगळेच. कारण तो हुषार कॅटेगरित मोडत होता. त्यावेळी सगळे सायन्सला जायचे पण तो कॉमर्सला गेला (जावे लागले) ओपनमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली नही govt. college मध्ये. त्यानंतर दोन वर्षानी म्हण्जे १२वी झाली की बँकेची परिक्षा दिली आणि वयाच्या १८व्या वर्षी त्याला Union bank मध्ये आझमगढ (युपीत) नोकरी मिळाली होती. आणि तो तिथे सहा महिने जॉब ही केला होता. त्यानंतर त्याने बर्याच बँकेत नोकरी केली. एकही पैसा आमच्या आइ-वडिलांनी आमच्या शिक्षणावर खर्च केला नाही. आणि आम्ही ९०% मधले तर नाहिच नाहि. तरीहि आम्ही sucessfull म्हणता येइल असे जीवन जगत आहोत.

<< सफल माणसांकडे बघितले तर त्यातले सगळेच काही या जीवघेण्या स्पर्धांतून गेले नव्हते. >>
भाग्यश्रीजी अगदी सहमत,
पण एक लक्षात घ्या की सर्व पालकांची 'सफल' ची व्याख्या काय आहे?
आपला मुलगा- भगतसिंग,राजगुरु,म.गांधी,मनमोहनसिंग,सोनिया गांधी,डॉ.कलाम,बिल गेटस,टाटा-बिर्ला,अंबानी,व्यावसायीक,उद्योगक,व्यापारी,विक्रेता,कलाकार,लेखक,पत्रकार किंवा शेतकरी - यापैकी काहीही व्हावा असे वाटत नाही. (आणि या क्षेत्रात सफल होण्यासाठी ६० टक्के मार्क्स सुद्धा पुरेसे होतात.)
सर्व पालकांना आपल्या मुलाला सहाव्या वेतन आयोगाचा लाभार्थी बनवायचा आहे आणि तिथे १ व्हॅकन्सी व २००० उमेदवार असे प्रमाण आहे.
त्यासाठी ही सारी कुत्तरओढ चालली आहे.
जर आहे या व्यवस्थेत परिवर्तन होणार नसेल तर पालकांचे काही चुकते असे मला अजिबात वाटत नाही.
इथे एकट-दुकट सफलतेचे उदाहरण कामाचे नाही किमान ६०-७० टक्के जनता डोळ्यासामोर ठेवुनच विचार करावा लागेल.

कुठलाही पालक आपला अहंकार सुखावण्यासाठी किंवा स्वतःची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी मुलांवर अभ्यासाचा दबाव आणत नाही. मुलांचे भले व्हावे अस्सच त्यामागे हेतु असतो.
भारतात आवडते म्हणुन मुलांना कुणीही झाडुवाला,माळी,mechanic,चांभार्,सुतार,plumber,मजुर व्हायला support करु शकत नाही, कारण त्यांचे income अत्यंत कमी असते.राहणीमानाचा दर्जा अत्यंत खालवलेला असतो.अगदी कलेच्या क्षेत्रातही प्रचंड unstability आणि insecurity आहे.
10वी १२वी झालेल्या मुलीनाही चांगला नोकरी करणारा नवरा हवा असतो ह्यातच सगळे आले.माझ्या कला शाखेतल्या एवदेच काय BSc असलेल्या देखील सर्व मैत्रिणीनी लग्न मात्र IT professiona मुलांशी केलेली आहेत.
कमी मार्क पडलेल्या आणि यशस्वी झालेल्या लोकांचे उदाहरणे नेहमी देली जातात. पण stastical data जर तुम्ही पाहिलात तर मार्क कमी असुन आयुष्यात यशस्व्वी झालेत अशांपेक्षा जास्त मार्क पडलेले लोक नेहमीच financially stable असणयाचे % जास्त आहे.
दुसरा मुद्दा कमी मार्क जेव्हा असतात तेव्हा तुम्हाला योग्य career सापडुन त्यात financialy settle होइपर्यंत जेव्हदा वेळ जाणार असतो तोपर्यंत sustain व्हायची सगळ्याच कुटुंबाची कुवत असते का? engineering ला गेलात तर बीई झाल्या झाल्या २१-२२ व्या वर्षी नोकरी मिळण्याची तरी शाश्वती असते. medicalला शिक्षण पुर्न व्हायला जरी वेल लागत असला तरी पुढे पैसे मिळणार ह्याची कुठेतारी खात्री असते.
बाकी कुवत ,मुलांची कोवळी मने ,मार्कांपेक्षा आयुष्य जास्त महत्वाचे इत्यादी मुद्दे valid आहेतच.

पण stastical data जर तुम्ही पाहिलात तर मार्क कमी असुन आयुष्यात यशस्व्वी झालेत अशांपेक्षा जास्त मार्क पडलेले लोक नेहमीच financially stable असणयाचे % जास्त आहे. >>>>

आर्क हे अनुमान तुम्ही कसे काढलत याबद्दल अधिक सखोल माहिती लिहीणार का प्लीज.

ok. माझ्या वर्गात आम्ही ६० -६५ मुली होतो. त्यात ज्याना ८०-८५% च्या वर मार्क पडायचे (अशा फक्त १५-२० असु)त्या सगळ्या आज finanacially indepedent aahet.most of them are IT professionals,CA,doctors,officers.
ज्या मुली कमी मार्क पदनार्‍या होत्या त्याना ba,bcom ,bsc ला admission ग्यवी लागली .त्यातल्या बरर्‍याच जानीना नोकरीच्या, फारशा चाम्गल्या पगारासारख्या सम्धी उप्लब्ध झाल्या नाहीत. त्यातही ज्या चांगल्या घरच्या higher middle class,well qualified familyतुन होत्या त्यानी नंतर MBA करुन्,net set देउन,MCM,MCA करुन, किंवा चांगला कमावता(परदेशस्थ किअंवा भारतीय) नवरा मिलवुन त्यांचेही बरे चालले आहे.पण अशाम्ची संख्या फारच थोडी.
Bed,ded करुन शिक्षिका झालेल्या काही आहेत पण अनुदानीत शालेत नोकरी असेल त्यांनाच बरा पगार मिळतोय.काहीना ओळखीने /वशिल्याने छोट्या ,खासगी नोकर्‍या आहेत्,पण पुण्यासारख्या ठिकाणी survive व्ह्यायला तो पगार पुरेसा नाही.

बाकी उरलेल्या profesiannly ,financially काहीच साम्गण्यासारखे नाहे.तरी आम्हा अ तुकदीतल्या मुलींची स्थिती बरी आहे जस जसे ब,क,ड कदे जाल तसे तसे साम्गण्यासारहे काहेच नाहे. आता तुम्ही एक चांगली माता होणे,ग्रुहीणी होणे ,माणुस होणेहे तितकेच म्हत्वाचे ,पैसा म्हणजे सगळेच नाही, असेही म्हणाल तर मग त्या argumentच्या विरोधात बोलण्यासाठे माझ्याकदे काहीच नाहे.
बर हा data माझ्याच नाही माझ्या मोठ्या मावसबहिणींच्या ,लहान भावंडांच्या बाबतीत तितकाच लागु होतो.
एक सांगते मला कुणालाच underestimate नाही करायचे आहे. माझा स्वतःचा धाकटा भाउ अभ्यासात यथा तथा आहे, पन त्याच्यावर कुठलीच आर्थिक जबाब्दारी नसल्याने he can afford to take his own time.not all are that lucky.

मी वैयक्तिक अनुभव लिहीत आहे.परन्तू ज्यानी ज्यानी आपल्या व्यथा व्यक्त केल्या आहेत त्यामागील प्रामाणिकपणा वादातीत आहे हे ही मान्य करतो्. हल्ली मुलांच्या शिक्षणास काय समोरे जावे लागते हे मी ही पाहतोच आहे.
माझ्या थोरल्या मुलीस आठवी पासून लोक ,स्वभाव्,वर्तणूक इ कडे कल आहे असे अम्हा उभयतांचे निरिक्षण होते.
माझ्या दोन्ही मुली जेम तेम बारावीला पास झाल्या/हल्लीच्या व्याख्ये प्रमाणे ७०-७२ टक्के गुण अन त्यात सायन्स मध्ये तर ६०-६२ % .आम्ही त्यांच्यावर कुठले ही प्रेशर आणले नाहे व rat race ची ही कदर केली नाही.त्याना बी ए व नन्तर एम ए पर्यन्त शिकताना प्रोत्साहन दिले.या दरम्यान एकीस सायकालाजीची गोडी लागली व ती क्लिनिकल सायकालाजिस्ट झाली.पुढे अमेरिकेत पी एच डी केली व प्रतिथयश कौन्सेलर तिथेच झाली व अजून आहे.
दुसरी ने जरी सायकालाजी मध्ये एम ए केले तरी तिला त्यात फारसे स्वारस्य वाटले नाही व ती आता जहिरात्शास्त्र व मास कमुनिकेशन मध्ये पोस्ट ग्राड करीत आहे.
आपणास क्षेत्राच्या व्याख्या बदलने जरूरीचे आहे व ज्यात मुलास गोडी आहे त्याच्या allied fields शी त्याना अवगत करून त्यांचा ओढा monitor करावयास हवा,
अर्थात्"घायल की गती घायल जाने"हे ही खरे-पण माझा अनुभव कुठे उपयोगी पडतो का ते पहा.

तरी आम्हा अ तुकदीतल्या मुलींची स्थिती बरी आहे जस जसे ब,क,ड कदे जाल तसे तसे साम्गण्यासारहे काहेच नाहे. >>>>

काहीतरी प्रचंड घोळ होतोय... अ तुकडीतील ३३% मुली (६० पै की २०) (म्हण्जे चार तुकड्याम्धील ८.३३ %, म्ह्न्ण्जे २४० पैकी २०)...

तर ९१.६७ % मुली अयशस्वी????? Uhoh

हे बघा मी कुणालाच अयशस्वी ठरवत नाहिये. तो अधिकार मला नाही.
मला एवदेच सामगायचे आहे, भारतात चाम्गले मार्क असतील तर गोष्ती सोप्या होतात.
चांगल्या घरचे असाल आणि कमी मार्क असतील तरी सोप्या होतात.
अपवादात्मक उदाहरणे देउन कमी मार्क आणि त्या अनुषंगाने आयुअष्यात settle होताना होणारा त्रास दुर्लक्षित करता येत नाही.

"सारी उम्र हम मर मर के जीये, एक पल तो अब हमे जीने दो, जीने दो" असच म्हणाव वाटतय.

या आत्महत्या अत्यंत दुर्दैवी आहेत Sad . अजून आयुष्य नीट पाहील नसताना त्याचा निरोप घ्यायची वेळ आली त्या बिचार्‍यांवर. पालकांनी खरच विचार करावा अशी परिस्थिती आहे.

रेव्यु यांचे अभिनंदन .

रेव्यु, Happy
आर्च, मार्कं कमी पडतायत हा कशाचा सिग्नल आहे? सतत काही विषयांमध्ये मार्क कमी पडत असतील तर त्या विषयात रस, कुवत नक्की कमी पडत असणार. अशा मुलांना जर पालकांनी सक्ती केली तर कसं चालेल. हे उदाहरण जर एरवी अगदी उत्तम पण एकदाच नेमक्या १२वी च्या परिक्षेत कमी मार्क पडणार्‍यांना सुद्धा लागु पडतं. समजा पडले कमी मार्कं तर लगेच तु दिलेल्या "स्टॅटिस्टिकल डॅटा" ला धरुन ही मुलं सुमार "करियर" करतील असं नक्की होतं का? अगदी हीच विचारसरणी मुलांवर प्रचंड दबाव टाकणारी आहे. जास्त पगार, जास्त पैसे हे खरं तर ध्येयच नसलं पाहिजे. "Financial Stability" सुद्धा फारच सापेक्ष आहे. तुमच्या "Stable" ची व्यख्या तुमच्या आयुष्याची धुळधाण सुद्धा करु शकते हे आपल्या सारख्या आई वडिलांनी लक्षात घेतलेच पाहिजे. ज्या गोष्टींमध्ये आवड आहे किंवा जास्त "स्कील" आहे त्यात पुढे जाण्याकरता प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे. जसं माणुस जन्माला आला की चालायला शिकतो तसच आवडीच्या आणि चांगल्या येत असलेल्या गोष्टींमधुन स्वत:च्या पायावर उभं राहायला किंवा थोडक्यात "स्टेबल" व्हायला पण शिकतो. मोठं (वयानी) होऊन यशस्वी व्हायला खरं तर मार्कांपेक्षा "आत्मविश्वास" जास्त उपयोगी येतो. अर्थात आवडत असलेल्या किंवा आपण पारंगत असलेल्या "फिल्ड" मध्ये आपण असलो की आत्मविश्वास, हुरुप आपोआप येतो ह्यातच सगळं आलं.

याबाबतीत गुजरात्यांचा दृष्टिकोन बघा. खरी गोष्ट. माझा मित्र काही वर्षांपूर्वी भारतात गेला असताना, त्याच्या एका गुजराती मित्राला भेटला. काय कसे कय? मुलांचे कसे चालले आहे? असे विचारल्यावर तो म्हणाला, 'मोठा मुलगा अभ्यासात हुषार आहे, तो कदाचित् डॉक्टर, वकील काहीतरी होईल, पण लहानाचे लक्षण ठीक नाही. जराहि अभ्यास करत नाही. त्याला अमेरिकेला पाठवून द्यावे लागेल.

नि खरेच त्याचा लहान मुलगा अमेरिकेत आला नि दहा वर्षात, एक दोन मोटेल्स नि तीन चार लहान दुकानांचा मालक बनून मजेत रहातो.

भारतात असे का होऊ शकत नाही? इथे प्लंबर्स, कार्पेंटर्स, वेल्डर्स असे सगळे लोक सधन असतात. शाळेत मार्क मिळाले नाहीत म्हणून त्यांना पैसे कसे गुंतवावे हे कळत नाही असे नाही. धंद्यात यशस्वी कसे व्हावे व रहावे हे त्यांना चांगले समजते.

मुख्य म्हणजे लहानपणापासून इथे मुलांची नैसर्गिक वृत्ति काय करायची आहे, कुठल्या क्षेत्रात काम करणे त्यांना जास्त जमेल, आवडेल, ते नेहेमी बघत असतात. मग सगळ्यांनाच गणितात, विशेषतः पार्शल डिफरेनशियल इक्वेशन्स, किंवा क्वांटम फिजिक्स मधे ९७.९५ टक्के मार्क मिळवण्याचे टेन्शन येत नाही! हवा तो विषय ते निवडू शकतात. तिथेहि स्पर्धा असतेच, पण त्या मुलांना मग त्याचे टेन्शन येत नाही.

ईथे मला माझा अनुभव शेअर करायला आवडेल. माझा शिक्षणाच्या बाबतीत आनंदच होता. गणित आणि सायन्स म्हणले की पोटात गोळा यायचा. मग जे व्हायचे तेच झाले. पोटापुरते मार्क मिळवत दहावी बारावी झालो आणि आर्टला दाखल झालो. ईथेही पुढे काय करायचे आहे याबाबत अंधार होता. माझ्या आईला धास्ती होती की नुसत्या आर्टसवर माझे पुढे काही होणार नाही. त्यामुळे तिने वडीलांच्या विरोधाला न जुमानता सॉफ्टवेअरच्या कोर्सला घातले. पण तिथेही मी आईची निराशा केली, पास देखील होऊ शकलो नाही.
पदवीधर झालो पण नोकरी नाही अशी परिस्थिती. पण सुदैवाने त्यांनी मला कुठेही प्रेशराईज केले नाही. मग पडेल ती कामे केली, अगदी साईटवर सुपरवायझर पासून घरोघरी जाऊन पुस्तके विकण्यापर्यँत. त्याचवेळी पत्रकारीतेबद्दल आकर्षण निर्माण झाले, थोडा अभ्यास करून प्रवेश घेतला आणि आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. इथे इतिहास,भाषा, कला, क्रीडा असे सगळे आवडते विषय त्यामुळे पटकन रूळलो.
पत्रकारीतेतीलच बायको मिळाली, दोन वर्षाचा मुलगा आहे. आता पगाराचे म्हणाल तर आयटी किंवा सॉफ्टवेअरच्या मानाने अगदी किरकोळ. पण माझ्या लेखी मी कुठेतरी स्टेबल झालो, किमान माझ्या कुटुंबाचे पालन-पोषण करू शकतो, त्यांना वेळ देऊ शकतो, समाजात मान मिळतो हे यशस्वीपणाचे लक्षण आहे.
हे सगळे सांगायचे कारण की माझे पालक. त्यांनी जर माझ्यावर अपयशीपणाचा शिक्का मारला असता तर आज जे काही थोडेफार मी करू शकलो नसतो किंवा कदाचित आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयालाही गेलो असतो. त्यांनी मी धडपड करून काहीतरी करायचा प्रयत्न करतोय हे पाहीले आणि नातेवाईक-शेजारीपाजाऱयांच्या कॉमेंटसपासून वाचवले हे माझे भाग्यच समजतो.

<<पण माझ्या लेखी मी कुठेतरी स्टेबल झालो, किमान माझ्या कुटुंबाचे पालन-पोषण करू शकतो, त्यांना वेळ देऊ शकतो >>

हेच जास्त महत्वाचे नाही का?

वरती झक्कींनी मांडलेले मुद्दे पण फारच महत्वाचे आहेत भारतात. Dignity of Labor हे मिळायला पाहीजे. अजुनही खुप लोक (नातेवाईक व इतर ओळखीचे लोक) तुमचे शिक्षण किती यावरुन तुमची हुषारी ठरवतात. व पालक बहुतेक यासर्व गोष्टींना बळी पडत जातात.

चम्पक छान चर्चा चालु आहे. सध्या गेले ३-४ दिवस रोज ३-४ विद्यार्थ्यांनी तरी आत्मह्त्या केल्याच्या बातम्या येतायत. मग अस वाटत ना की फकत नापास झाले किन्वा अशी कोणतिही तात्पुर्ति कारणं एवढी मोठी कधी होतात की आयुश्यच सम्पवावस वाटावं?

मी पण एक आई आहे. आणि सध्या अगदी K G च्या admission पासुन दबाव आणि स्पर्धा face करतिये पण दिवसभर खुप श्रम केल्यानंतर्ही माझ्या मुलांना काही जमल नाही ,स्पर्धेमुळे मिळालं नाही तरी at the end of the day मी माझ्या मुलांना हेच सांगेन की life is all about to be happy and if you are happy, and honest you are not a looser.

कालपरवापासुन ७ आत्महत्यांच्या बातम्या वाचल्या आणि सुन्न व्हायला झाले. पण त्याचबरोबर विचार आला की आजची मुले मनाने इतकी दुबळी होत चालली आहेत का की अपयशाला तोंड देउन त्यावर मात करायचा प्रयत्न करण्यापेक्षा ती मृत्युला कवटाळत आहेत. असे असेल तर त्यांच्या संगोपनात आपण कुठेतरी कमी पडत आहोत का?
का आपण त्याना खुप जपत्/त्यांच्या शिक्षणात हस्तक्षेप करत असल्याकारणाने ती आपल्यावर जास्त अवलंबुन रहात आहेत आणि स्वतः लढण्याची/विचार करण्याची क्षमता गमावुन बसत आहेत?
काही वेळा वाटते की आपण मार्गदर्शक, सहाय्यकाची भुमिका घ्यायला हवी आणि त्यांचे त्यानाच ठरवु द्यावे त्यानी काय करायला हवे.

त्रिशुल मधले साहिर चे गाणे आठवले..
"मैं तुझे रहम के साये मे न पलने दूंगी..
जिंदगानी की कडी धूप मे जलने दूंगी..
ताके तप तप के तु फौलाद बने..
मा की औलाद बने..."

आशिष अभिनंदन , जे तुमच्या पालकांनी तुमच्यासाठी केल तेच तुम्ही तुमच्या मुलांसाठी सुद्धा कराल अशी खात्री आहे .
<<< काही वेळा वाटते की आपण मार्गदर्शक, सहाय्यकाची भुमिका घ्यायला हवी आणि त्यांचे त्यानाच ठरवु द्यावे त्यानी काय करायला हवे. >>> मनस्मी अगदी योग्य बोललास , आपण फक्त मुलं चांगला मार्ग सोडणार नाहीत ह्याकडे काटेकोर लक्ष देऊन त्यांचा मार्गदर्शक , सहाय्यक ,मित्र , सखा , बनलो तर कदाचीत अशी वेळ येणार नाही .

मला वाट्ते की पालकांचा रोल यामधे सर्वात महत्वाचा आहे. आमच्या 'हायली क्वालिफाईड प्रोफेशनल' घराण्यात मी अगदी सहजपणे नतद्रष्ट म्हणून गणला जाऊ शकलो असतो पण माझ्या पालकांनी ती तुलना,हेटाळणी कायम टाळली. 'तुझे वडील एवढे मोठे डॉक्टर मग तू का नाही झालास' या मूर्ख प्रश्नाला मी हजारो वेळा तोंड दिले आहे. पण याचे माझ्या वडीलांनी दिलेले उत्तर मला सर्वात पटलेले आहे ते म्हणतात 'तो डॉक्टर झाला ही असता पण तो चांगला डॉक्टर झाला नसता, आणि ते मला नको होते'.
आता मी आज जे काही करतो आहे ते मनापासून एंजॉय करतो आहे (माझी यशाची संकल्पना!) , वाटेल तेंव्हा वाटेल ते पुस्तक-सिडी खरेदी करु शकेन एवढा पैसा आहे (माझी श्रीमंतीची संकल्पना!) आणि त्याचे श्रेय माझ्या पालकांना आणि बायकोला जाते.

आपल्या देशात दारिद्र्य दूर करायच्या संकल्पनांतील एक मुख्य मध्यम वर्गीय संकल्पना म्हणजे मुलांना डाक्टर्.इन्जिनीयर्,कलेक्टर इ करणे.
यात कजाग आई बाबांचा पुढाकार असतो.जे ते करू शकले नाहीत त्याची अपेक्षा ते वारसा कडून करतात.
यास भरीस भर आपली समाज व्यवस्था.
अमक्याचा मुलगा/मुलगी आय आय टी प्रवेशात यशस्वी झाली -तू काय केलेस "गाढवा/गाढवी(?)?"
अन्य अनेक व्यवसाय आहेत्-श्रमाचे महत्व जाणले तर अन्ग मेहनतीचे काम ही उत्कृष्ट असते व बरेच पैसे ही आणू शकते असा विचार करण्याची ही आपली कुवत आपण गमावोन बसलो आहोत.
हे व्यवसाय्,कार्यक्रम व्यवस्थापन्,पर्यटन व्यवस्थापन्,बागकाम्;चर्मकार उद्योग्,ज्युवेलरी डेजाईन -----अनेक आहेत.

कजाग आई बाबांचा
>> हे नाही पटलं रेव्यु.. बर्‍याचदा हे ते स्वतःच्या उत्कर्षाकरता नाही करत - तर मुला/लीच्याच करतात.
हां आता, त्यांच्या उत्कर्षाच्या संकल्पना बरोबर असतात का नाही हा विषय वेगळा..

Pages