आयपीएल २०२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32

लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजही एका बॉटम फोर संघाने टॉप फोर संघाला मात दिली.. पॉइंट टेबल रोचक होणार आहे. पहिल्या चार मध्ये देखील पहिले दोन कोण येतात याला महत्त्व असल्याने रंगत वाढते.

चेन्नई गेली बाहेर ऑफिशियली...
तीन संघ 12 वर आहेत.. आणि त्या तिघांच्या आपसात मॅचेस आहेत. त्यामुळे त्यातील दोन संघ एकतरी सामना जिंकणारच. आणि दोन संघ 12 पेक्षा जास्त..
चेन्नई सर्व सामने जिंकून 12 झाले तरी मागेच राहणार..

चेन्नई आऊट!

*चेन्नई गेली बाहेर ऑफिशियली... * - आत्ताच कुठेतरी हे वाचलं -
नवरा - अग, टिव्हीचा रिमोट कुठे आहे ?
बायको - CSK !
नवरा - का s s य ?
बायको - बॉटम ऑफ द टेबल !!!
Wink

छान आहे.. ग्रूपवर टाकतो आमच्या जिथे काही कट्टर थालाप्रेमी आहेत.. त्यांची खेचायला मजा येते हल्ली Happy

बॉटम ऑफ द टेबल !!! >>> भाऊ Lol

कालचा तो बाउण्ड्रीवरचा कॅच मजेदार होता. मला खरे हे बाउण्ड्रीवरचे बॉल पुन्हा उडवून घेतलेले कॅचेस "टॉप कॅचेस" मधे इतके वाटत नाहीत. पण कालचा मस्त होता. स्लो मो मधे पब्लिकच्या कमीजास्त होणार्‍या आवाजामुळे जास्त मजा येते बघायला रिप्ले मधे. तरीही मी पाहिलेल्या यावेळच्या कॅचेस मधे तो कमिण्डू मेंडिसने घेतलेला सर्वात अफलातून होता.

वैभव सूर्यवंशी पाहिला की १९९२ च्या कप मधला इंझमाम आठवतो - एकूण ठेवणीवरून Happy आणि साई सुदर्शन जितका पाहिला आहे त्यावरून तरूणपणीचा पण डावखुरा अझर वाटतो. तो तमिळ असला तरी हैदराबादी खेळाडू वाटतो.

चेन्नईमधे एक "अय्यर" पंजाबच्या टीमला जिंकून देतो. That's India for you! Happy

मुंबई कत्तल करत सुटली आहे. जेव्हापासून रोहीत शर्मा सिरीयसली गेम मध्ये आला आहे..

आज नवीन बॉल वर धावा बनवणे इतकेही सोपे वाटत नव्हते जेव्हा मुंबई खेळत होती.
रोहीत शर्माने आपला अनुभव वापरला आणि खेळ बदलला. त्याने अर्धशतक मारले ज्यात 9 फोर होते पण एकही सिक्स नाही. हल्ली कधी असे झाले नसावे. आणि तरीही 31 बॉल अर्धशतक झाले.
मुंबईची 10 ओवर 100-0 अशी सुरुवात झाली तिथेच ती सामना जिंकली. कारण मुंबई गोलंदाज सुरुवातीला विकेट काढायची पुरेपूर शक्यता होतीच.
आणि तसेही मुंबईला आजवर कोणी 200+ चेस केले नाही.

मुंबई पहिली
चेन्नई शेवटून पहिली.

एका स्टेजला मुंबई आणि चेन्नई नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर होते. दोन चॅम्पियन टीम एकत्र तळाला म्हणून मीम फिरत होते.

आज मुंबईला वर बघून दिल्ली पंजाब बंगलोर गुजरात या चार स्पर्धेत असलेल्या आणि ट्रॉफी जिंकायची आशा असलेल्या संघांचे धाबे दणाणले असतील हे नक्की.. कारण मुंबई चॅम्पियन टीम आहे आणि त्यांना कसे जिंकायचे हे माहित आहे.

या दरम्यान चेन्नई पाठोपाठ राजस्थान सुद्धा आज प्लेऑफ स्पर्धेच्या बाहेर पडली असेल. जे उद्या होणार होते ते आज झाले इतकेच.

हैदराबादचे भविष्य उद्या गुजरात सोबत ठरेल.

पण उद्या हैदराबाद जिंकली पाहिजे म्हणजे ते सुद्धा स्पर्धेत राहतील काही काळ आणि गुजरातला धक्का बसल्याने पॉइंट टेबलचा वरचा भाग सुद्धा मजेशीर होईल.

तरीही मी पाहिलेल्या यावेळच्या कॅचेस मधे तो कमिण्डू मेंडिसने घेतलेला सर्वात अफलातून होता. >> ब्रेव्हीसचा बघेतोवर माझेही हेच मत होत. त्याने तीनदा एकट्याने केले म्हणून तो माझ्या लेखी अधिक चांगला कॅच ठरतोय.

रोहित आणि पांड्या मुंबई मॅनेजमेंटसमोर बसले होते. नीता भाभी टेन्शनमध्ये होत्या. रोहित आणि पांड्याचं सूत जुळत नव्हतं. मुंबई पाचपैकी एकच मॅच जिंकली होती. नीता भाभी बोलल्या अरे मुलांनो तुम्हाला काहीच कसं नाही वाटत आपण सगळ्या मॅचेस इथून पुढे जिंकायला हव्या. नीता भाभी लेक्चर देत होत्या आणि रोहित पांड्या विरुद्ध दिशेला बघून दुर्लक्ष करत होते. शेवटी लेक्चर संपल्यावर ते दोघे बाहेर जायला निघाले इतक्यात सगळीकडे काळोख झाला, मोठी स्क्रीन सुरू झाली त्यावर रोहित आणि पांड्याचे सेलिब्रेशन सीन्स दाखवण्यात आले. बॅकग्राउंडला “भले बुरे ते घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसाऊ त्या वळणावर त्या वळणावर” गाणं वाजवण्यात आलं आणि रोहित पांड्याला पाझर फुटला. दोघे एकमेकांना मिठीत घेऊन ओक्साबोक्शी रडू लागले. रडतच बाहेर पडले आणि मग पुढची स्टोरी सर्वश्रुत आहेच.

हा प्रसिद्ध कृष्णा कसोटीसाठी सुद्धा तयार वाटत आहे. ऑस्ट्रेलियात आपल्याकडे बुमराह सोडून कोणी गोलंदाज चालत नव्हता.

प्रसिद्ध दोन वर्षे ईयरमार्क केलेला आहे. तो मधे इंजर्ड असल्यामूळे खेळत नव्ह्ता. ऑस्ट्रेलिअयामधे शेवटची टेस्ट खेळला होता.

हो, प्रसिद्ध नवीनच आलेला तेव्हा promising वाटलेला. म्हणजे काही चमकायच्या आधीच पोटेन्शियल दिसले होते. त्याची हिट द डेक स्टाईल पाहता आणि कुठल्याही पिचवर बाऊन्स मिळवायचा ते पाहून कसोटीच नाही तर वन डे मध्ये सुद्धा मिडल ओवर विकेट टेकर ठरणार असेच वाटलेले. पण मधल्या काळात पुन्हा हरवलेला. फिटनेस कारण असेलच यामागे कारण वेगवान गोलंदाजांबाबत फॉर्म आणि फिटनेस हातात हात घालून असतात. पण त्यामुळे मधल्या काळात जे पाहिले त्यात साधारण वाटू लागलेला. आता पुन्हा तसाच गोळीबार करू लागला आहे. आयपीएल सगळेच सामने पूर्ण बघणे होता नाही, स्पेशली मिडल ओवर फार नाही बघितल्या जात, पण गेले काही सामने त्याची बॉलिंग पाहिली आहे. आपल्या याच स्ट्रेंथवर त्याने विकेट काढल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये फलंदाज पेसचा फायदा उचलायला बघतात, पण याच्या पेसवर बीट होत आहेत.
जोफ्रा आर्चरबाबत आपण ही दोन्ही रूपे पाहिली आहेत.

गिल साई आणि बटलर... काय त्रिकुट जमलंय!!
एकदम फॉर्मिडेबल बॅटींग लाईन अप

पण सध्या सगळ्यात जास्त चान्स मुंबईचे वाटतायत.... त्याखालोखाल आपला सपोर्ट GT ला..... तो नेहरा डोक्यात जातो कधी कधी पण उतना चलता है Happy

त्रिकुट जमलंय >>

अगदी...
पण खाली सुंदर,एसआरके,तेवातिया,राशिद अजूनही तितकेसे फॉर्म मधे दिसत नाहीयेत. एखाद्या सामन्यात त्रिमूर्ती खेळले नाहीत तर बॅटिंग गडगडेलसं वाटतंय Sad

एखाद्या सामन्यात त्रिमूर्ती खेळले नाहीत तर...
>>>>>
मुंबई नॉकआउट मध्ये इथेच घाव करणार हे नक्की

मुंबई गुजरात आरसीबी पंजाब दिल्ली... अशी सध्याच्या फॉर्मची क्रमवारी आहे.

“ काय त्रिकुट जमलंय” - येस्स! आणि तिघांपैकी किमान दोघं किंवा बरेचदा तिघंही कन्सिस्टन्सीने खेळतायत. त्या तिघांनंतर बॅटिंग तितकी स्ट्राँग वाटत नाही. बॉलिंग मात्र जबरदस्त आहे (रशिद फॉर्ममधे नसूनही). मला आश्चर्य वाटतं कि तेवातिया ला कधीच बॉलिंग का देत नाहीत. तो बॅटिंग करू शकणारा बॉलर आहे.

आरसीबी जिंकली तर त्यांची जी एक इमेज आहे की चांगले खेळतात आणि मने जिंकते पण ट्रॉफी नाही... ती संपुष्टात येईल.

आचरट सामना झाला आज शेवटी.
चेन्नई हातातला सामना काय घालवत होते. पण आरसीबी, त्यात एक खुद्द कोहली शेवटच्या अटीतटीत हातातले झेल, छे गोळे सोडून त्यांना ते सहजी करू देत नव्हते. मी म्हणालो ना यांना कॅच सोडायचे पैसे मिळत असणार.
अखेरीस ३ बॉल १३ हवे असताना आयपीएल स्पेशल कंबरेच्या वर नो बॉल आणि सिक्स येत सामना ३ बॉल ६ विथ फ्री हिट आला आणि तरीही चेन्नई हरायची ती हरलीच.

या सगळ्यात आयुष म्हात्रे मस्त खेळला हे एक आवडले.

IMG-20250504-WA0004.jpg

मला आश्चर्य वाटतं कि तेवातिया ला कधीच बॉलिंग का देत नाहीत. तो बॅटिंग करू शकणारा बॉलर आहे. >> फे.फ. नोंद घेतली आहे Happy

आजचे साम्ने शेवटची इनिंग वगळता मजा आली बघायला. पराग कडे बघून आज परत उफ्फ वाटले. प्रभसिमरन हा माझ्यासाठी ह्या वेळचे सरप्राईज आहे. पंजाब त्याच्या एव्हढे पाठी का लागलेले होते ते कळले. पंतबद्दल वाईट वाटतेय. त्याचे भोग काही संपत नाही. मयांक मॅच रेडी नाहि असे अजून वाटते का ? अ‍ॅक्युरसी हा त्याचा मह्त्वाचा पाया होता तो अजूनही मिसिंग वाटतोय.

“ नोंद घेतली आहे” - नेहरा-गिलने घेतली तर बरं होईल. Happy एक ऑप्शन असूनही न वापरणं अनाकलनीय वाटतं हे खरं.

“ आजचे साम्ने शेवटची इनिंग वगळता मजा आली बघायला.” - नक्कीच. मला तर राजस्थान ७१/५ वरून एक रन ने हारतील - इतक्या अटीतटीची मॅच होईल असं वाटलंच नव्हतं. पराग आऊट झाल्यावर तर नक्कीच अपेक्षा नव्हती. प्रगती आहे रॉयल्सची. शेवटच्या ओव्हरमधे ९ रन्स हवे असताना, २ रन्स ने हारणारी टीम, २२ हवे असताना, १ रन ने हारली. Happy

प्रभसिम्रन जबरदस्त खेळलाच, पण अर्षदीप ने काय कमाल स्पेल टाकला पहिला!! त्याला स्विंगही मिळाला आणि त्याची अ‍ॅक्युरसी पण मस्त होती. मजा आली.

मॅचच्या आधी नेहरा म्हणाला कि रोहितचा लेफ्ट आर्म सीमरविरुद्ध असलेला वीकनेस बघून अर्शद खान बॉलिंग ओपन करेल. जनरली टाईट लिप्प्ड नेहरा हे म्हणाला नि तसेच झाले.

Pages