Maternity leave वरून परत कामावर रुजू झाल्यापासून सगळंच बदलून गेलंय.
म्हणजे, काम बरचसं तसंच आहे , पण लोक बदलल्यासारखे वाटतायत . कामाच्या ठिकाणी एखादी situation येते , पूर्वीसारखीच, पण आता माझा अंदाज आणि प्रतिक्रिया वेगळ्या असतात.
आणि वेगळ्या म्हणजे अगदी 'ऑंटी type '. Aunty आपल्या सर्वांच्या ऑफिसेस मध्ये एखादी तरी असतेच ना, तशी. जी नेहमी उशीरा कामावर येते पण संध्याकाळी सर्वात आधी निघते, तशी. जिला उशीरा थांबून काम करणं अजिबात म्हणजे अजिबात पटत नाही आणि जेव्हा नाईलाज होतो तेव्हा जिची प्रचंड चिडचिड आणि संताप होतो, तशी aunty .
खरंतर कुणी असं प्रत्यक्ष म्हटलं नाही, पण असंच बोलत असतील असं सतत वाटत राहतं . माझ्या maternity leave च्या आधी मी सुद्धा ह्या अश्या वागण्याला 'unprofessional ' समजायचे. म्हणून असेल कदाचीत. पण आपल्यापेक्षा लहान असलेल्या सहकाऱ्यांच्या नजरेत आपली अशी प्रतिमा असावी हे काही रुचत नाही. बरं , त्यात त्या मुली असतील तर ,"बघू हं , तू कसं करतेस " असं (मनातल्या मनात) म्हणून दुर्लक्ष करणं शक्य होतं . पण पुरुष - (खरंतर मुलं च असतात ती ) असतील तर काय? ते तर कधी "करणार" नसतात - मग त्यात अगदी उपरी, वेगळी असल्यासारखं होतं .
प्रश्न पाठ सोडत नाहीत. काय अर्थ आहे या कामाला ? का करतोय आपण हे सगळं?
- थोडे जास्त पैसे हवेत. financial freedom नाम कि भी कोई चीझ होती है!
पण पैसे कमावणं नेहमी एवढं कठीण का असतं ? मान मोडेपर्यंत , पाठ तुटेपर्यंत , उर फुटेस्तोवर - लोकांना पैश्यासाठी कामं करताना काही ना काही तोडावं , मोडावं , फोडावं का लागतं ? आणि मन? मन मारावं लागतं ना? एक नाही दोन मनं . एक मोठ्ठं , एक छोटुकलं.
पण माझ्या घरी बाई आहे बाळाला सांभाळायला.
-पण ती हि आपल्या बाळाला घरी ठेवून आलीय. तिलाही यायला उशीर झालाय. तिने दोन मनं मारलीत. आणि अजून नाश्ता केला नाही.
तिनेच का, ऑफिस मधल्या ऑंटीनेही नाही केला. 'ऑंटीज ' असच करतात. आल्याआल्या आधी चहा मागवतात किंवा कॉफी मशिनकडे घुटमळतात. unprofessional behaviour ! बाकीच्यांचा चहा नाश्ता डबा करून कामावर वेळेत पोचायचं म्हणून. पण बाई, वेळेत पोहोचणं नशिबी नाही!
बाई मिटींग्स घेतात. काम आहे ते. पण इतर वेळी थट्टा मस्करी करत नाहीत. हल्ली त्याच त्या जोक्स वर हसूच येत नाही. विनोद विनोदी वाटत नाही. नावं विसरतात. त्यामुळे ऑफिस मध्ये सहकारी असतात सगळे. मित्र - मैत्रिणी नाही.
तर हे असं आहे. नेमकं कसं हाताळायचं हे समजत नाही. 'सगळेच ह्यातून जातात' हे एक तर गुळगुळीत वाक्य झालंय आणि दुसरं म्हणजे हे उत्तर नाहीये. तुम्ही नेमकं कसं डील करता? किंवा काय केला होतं ?
Been there..Done that..
Been there..Done that..
लेखातली कळकळ.. तळमळ अगदी पोचली.
माझ्या मते शक्य असेल तर कामाचे तास ऑफिशियली कमी करून घेतले (अर्थातच पगार पण कमी होणार) तर हा गिल्ट ५०% कमी होतो. आपण काम कमी करतोय तर पैसे पण कमी घेतोय.. कंपनी आपले फुकट लाड करत नाहीये / चोचले पुरवत नाहीये हे आपल्या आणि आपल्या आजुबाजूच्या लोकांना क्लिअर होतं. गिल्ट, टाँट, सूचक नजरा बऱ्यापैकी बंद होतात.
अर्थात प्रत्येक जॉबमध्ये हा ऑप्शन असतो असं नाही.
नाहीतर एकीकडे WFH वाले जॉब शोधत राहायचे. थोडे पैसे कमी मिळाले तरी हरकत नाही. बाईला न काढता उलट एकीकडे बाळ नजरेसमोर राहते आणि खाणे पिणे बऱ्यापैकी वेळेत होते.
तुम्ही इतर डिटेल्स.. जसे की तुमची सपोर्ट सिस्टिम.. आर्थिक परिस्थिती.. कौटुंबिक जबाबदाऱ्या याविषयी जास्त लिहिलं नाही त्यामुळे याहून जास्त सल्ले द्यायचं टाळते आहे. फक्त सध्या पैश्याचा विचार न करता शक्य तितक्या जबाबदाऱ्या आउटसोर्स करून तुम्ही आणि बाळ, तुमच्या दोघांची तब्येत आणि एकमेकांसोबत दिला जाणारा वेळ यावर सगळा फोकस ठेवा.
तब्येतीची अजिबात हेळसांड करू नका एक स्त्री म्हणून नम्र विनंती _/\_
यातून गेले आहे. त्यामुळे
यातून गेले आहे. त्यामुळे तुमची मनस्थिती समजू शकते. गांगरून जाऊ नका.
बाळ झाल्यावर आयुष्य बदलतं. वेळेवर काम संपवून निघण्यात काही चूक नाही हे दिवसातून 100 वेळा घोका.
मॅटर्निटी लीव्हमुळे साहजिकच आईची जवळीक बाळाशी जास्त असते. पण त्याला बाबांची सवय होते/करवून देता येते. त्यामुळे बाळासाठी वेळेवर घरी पोहोचण्याची /त्याला सांभाळणाऱ्या नॅनीला वेळेवर रिलीव्ह करण्याची जबाबदारी फक्त तुमचीच नाही. मुलाला २ पालक असतात. दोघांनी एकमेकांसाठी वर्क लाईफ बॅलन्स अड्जस्ट करायचे असते.
लेट सिटिंग्स प्रिप्लॅन्ड करता येतील का, काही कॉल्स/मिटींग्स घरून अटेंड करता येतील का ते पहा.
कामाचा साधारण अंदाज आल्यावर लेट होणार आहे असं दिसत असेल तर बाळाच्या बाबाला आगाऊ सूचना देऊन वेळेवर घरी पोहोचायला सांगा. एकाच वेळी दोघांनाही प्रचंड काम आहे व उशिरापर्यंत काम करावेच लागेल असे दिवस फार कमी असतात.
ऑफिस फार लांब असेल तर दोघांपैकी एकाच्या ऑफिसजवळ शिफ्ट होता येईल का ते पहा. स्वतःच्या घरी रहायच्या नादात दोघानांही खूप वेळ प्रवास करावा लागत असेल तर ते उपयोगी नाही.
दोघांनाही हायब्रीड मॉडेल मध्ये काम करता येत असेल तर सरळ प्लॅन करून कुणी किती दिवस घरी राहायचे हे ठरवा.
तुम्हीच नाश्ता/डबा बनवला तर तुम्हाला कुणी भारत रत्न देणार नाहीये किंवा नाही बनवला तर तुरुंगात टाकणार नाहीये.
स्वयंपाक, साफसफाई ही कामं आउटसोर्स करता येतात, स्वतःची तब्येत नाही. तुम्ही आजारी पडलात तर घडी विस्कटेल हे लक्षात ठेवून नाश्ता न करणे वगैरे प्रकार टाळाच.
वीकेंडला पूर्व तयारी करणे, घरगुती रेडी मिक्सेस वापरणे वगैरे उपाय वापरून स्वतःचे काम सुटसुटीत करा.
बाळ होण्यापूर्वीची प्रवासाची पद्धत (पब्लिक/प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट) बदलायची आहे का हे ठरवा. आपण सवयीने जुनी पद्धत वापरतो पण बदल केल्यास बराच फायदा होऊ शकतो हा स्वानुभव आहे.
माझेमन किती प्रॅक्टिकल पोस्ट.
माझेमन किती प्रॅक्टिकल पोस्ट.
१००% अनुमोदन !!
काय करायचंय याची मदत वरच्या
काय करायचंय याची मदत वरच्या पोस्टिंवरून होईलच .मला यातला अनुभव नसल्यामुळे फक्त तुमच्या आंटी टाईप वाल्या वाक्यासाठी सल्ला देतेय.तुम्ही आई झालात म्हणजे आयुष्यात एक स्टेप पुढे गेलात हे जरी खरं असलं तरी, पण म्हणून का तुम्ही लगेच आंटी टाइप होत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचं काम प्रोफेशनली आणि सिंसीयरली करताय .तरीसुद्धा कामावर लेट होणं, बाळाची कामं ,काळजी घेणं त्याकरिता वेळेची कसरत होणं, यामुळे थोडाफार स्ट्रेस येणं ,बाळासाठी आणखी वेगळा गिल्ट साहजिक आहे .पण त्याचा जास्त विचार करू नका .शक्यतो सपोर्ट सिस्टिम बळकट करा मग ते घरातले असो की सांभाळणारी बाई.सगळंच करायला जाऊ नका.बाळ जसं प्रायोरिटी आहे तसा जॉब ही प्रायोरिटी आहे. आणि बाळ नवरा बायको दोघांची जबाबदारी आहे.सगळं बाळासाठीच करताय त्यामुळे बाळाबरोबर आनंदी राहा.जास्तच स्ट्रेस होत असेल तर वर सांगितल्याप्रमाणे काम कमी करून घ्या.
आणि कोणी तुम्हाला आंटी टाईप बोलत नाहीये आणि प्रश्न तुम्हाला तसं वाटण्याचा ,तर आंटी टाइप वागत नसाल तर तो येतोच कुठे आणि थोडंफार वागतही असाल तरी ठीक आहे लोकं समजून घेतात .माणसं आहोत आपण रोबो नाही.त्यामुळे हे "आंटी टाइप झालेय" ते डोक्यातून पूर्णपणे काढून टाका . त्याचा फार विचारही करू नका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या .
हेल्थ ची हेळसांड करू नका. फिजिकल हेल्थ बरोबर मेंटल हेल्थ ची पण काळजी घ्या.
"Never forget what you are.
"Never forget what you are. The rest of the world will not. Wear it like armor, and it can never be used to hurt you." - टिरिअन लॅनिस्टर
तुम्ही बदललेल्या आहात तर आहात. ते स्वीकारा आणि पुढे चला.
बाकी ऑफिसात आल्यावर लगेच आधी चहा/ कॉफी पिणे ह्यात अन-प्रोफेशनल काय आहे? घरुन निघायला उशीर झाला तर ड्राईव्ह करत सकाळची पहिली मिटिंग घेणे, वेदर खराब आहे तर पोराला शाळेत सोडायचं आहे त्यामुळे तोवर घरुन काम करणे, काम झालं की घरी जाणे, घरच्या जबाबदार्या सांभाळून काम करणे, पोरांना स्विमिंगला घेऊन जाऊन स्विमिंग पूलच्या काठावर बसून झूम कॉल अटेंड करणे, एकीकडे स्वयंपाक करत असताना, लॉंड्री फोल्ड करताना कोड कंपाईल करत ठेवणे, हापिसात बसून रोज उशीरा काम न करणे, करायचं झालं तर घरुन करणे.... इ. वागण्यात अन-प्रोफेशनल काय आहे नक्की? तुम्हीच विचार करा.
दुपारी जेवताना प्राऊडली मुलांचे जोक मारा, फालतू आचरट जोक्सना हसू नाही आलं तर हसू नका. मान वर करुन जगा. आणि तुमच्या टर्म्स वर जगा. जे तुमच्या बरोबर येणार नाहीत त्यांना राहू द्या. सगळे जण पेरेंट बनतात. आई-बाबा सगळ्यांना हे लागू आहे. कधी घरी लवकर गेलात तर मान खाली घालून बिलकुल जाऊ नका. मान वर करुन टीम्स वर जाहीर करुन जा. तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करत आहात तेवढं पुरेसं आहे आणि असायलाच हवं.
अमितने फार छान आणि चपखल
अमितने फार छान आणि चपखल लिहीले आहे. सध्या ज्याकरता वेळ द्यायची गरज आहे ते जमेस धरून कोणत्या कामाला किती वेळ लागावा याचा जनरल अंदाज ठरवा. बॉस/मॅनेजर किंवा ज्यांना कोणाला तुम्ही answerable आहात त्यांना तशी कल्पना द्या. आणि ते जमवायचा शक्यतो प्रयत्न करा. बाकी पब्लिकच्या मतांची चिंता करू नका. आणि याची खात्री बाळगा की इतर बरेच स्त्री-पुरूषही ऑफिसमधे भरपूर रिकामटेकडेपणा व अनप्रोफेशनलगिरी करत असतात. पण त्यांच्याबद्दल कोणी आवर्जून चेक करत नसल्याने ते उघड होत नाही. नाहीतर बिड्या फुकायला बाहेर जाणारे ते ब्रेक रूम मधे गप्पा मारणारे असंख्य आहेत. कोणी काही विचारलेच कधी तर हा मुद्दा ठणकावून मांडा. कोणीही ते नाकारू शकणार नाही इतकी उदाहरणे सर्वांनीच पाहिली आहेत.
याची खात्री बाळगा की इतर बरेच
याची खात्री बाळगा की इतर बरेच स्त्री-पुरूषही ऑफिसमधे भरपूर रिकामटेकडेपणा व अनप्रोफेशनलगिरी करत असतात. पण त्यांच्याबद्दल कोणी आवर्जून चेक करत नसल्याने ते उघड होत नाही. नाहीतर बिड्या फुकायला बाहेर जाणारे ते ब्रेक रूम मधे गप्पा मारणारे असंख्य आहेत.
>>>>
अगदी अगदी
कामाच्या शहरात एकटेच राहत असल्यामुळे, घरात एसी नाही म्हणून, रश अवर ट्रॅफिक टाळण्यासाठी किंवा घरातल्यांशी पटत नाही म्हणून १०० सुट्टा ब्रेक घेऊन उशिरापर्यंत ऑफिसात बसणारी माणसं खूप पाहिलीत. त्यामुळे वेळेवर निघण्याचा अज्जिबात गिल्ट बाळगू नका.
<तुम्ही बदललेल्या आहात तर
<तुम्ही बदललेल्या आहात तर आहात. ते स्वीकारा आणि पुढे चला.> अमितव यांना +१.
हे लिहिताना मी गॅसलायटिंग तर करत नाही ना, अशी भीती आहे.
तुम्ही जे आँटी टाइप वर्तन म्हणताय तसं लेबल तुम्ही , तुमच्या आधी याच परिस्थितीतून गेलेल्या स्त्रियांना लावलं होतं का? कारण तुम्ही ते लेबल स्वतःला लावून घेताय. इतर सगळेही तुमच्याकडे तसेच बघत असतील, असं तुम्हांला वाटतंय किंवा तुम्ही ठरवून टाकलंय का?
२५-३० वर्षांपूर्वी मी काम करीत असलेल्या ऑफि सात अशीच स्थिती असे. बहुसंख्य स्टाफ २५-३० वयाचा असल्याने लग्न, मॅटर्निटी लीव्ह, परत येणं हे अनेकींच्या बाबत होत असे. आमच्या सेक्शनमध्ये झालेला एक जोक आठवतो - एकदा माझी एक सहकारी ऑफिसर म्हणाली की जो माझ्या अंडर येतो, त्याचं / तिचं लग्न होतं. त्यावर माझ्या लक्षात आलं की मॅटर्निटी लीव्ह वरून परत आलेली कर्मचारी माझ्या अंडर येते असे तेव्हा
तीन वेळा झालं होतं . कुणी मॅटर्निटी लीव्हवर गेली, की तिच्या जागी कोणी येत असे आणि तिने रिझ्युम केलं की तिला दुसरा सेक्शन मिळत असे.
त्यांच्या सुट्यांचं प्रमाण वाढणार, ऑफिसात जास्त वेळ थांबायला जमणार नाही, हे अगदी सहज स्वीकारलेलं होतं. माझ्या अशा एका असिस्टंटला तिच्या सासरच्यांकडून सपोर्ट नव्हता. तिच्या दांड्या खूप होत. ऑफिसात यायला उशीर होई. आणि मस्टर बरोबरच सकाळी टेबलवर मिळणारा नाश्ता चुकू नये यासाठी तिची धावपळ होई. यात कोणालाही काही वावगं वाटलं असं मला आठवत नाही.
तिचे अन्य टाइपचे - तुमच्या शब्दांत आँटी वर्तन - दुसर्यांच्या खासगी बाबींत भोचक चौकशा किंवा कमेंट करणे हे मात्र खटकत असे. हाही संसारी होण्याचा परिणाम की मूळ स्वभाव ते मला माहीत नाही.
तुम्ही जास्त ओव्हररिअक्स्ट
तुम्ही जास्त ओव्हररिअक्स्ट होताय. कसा असता ना आपण सहा महिने तिथे नसतो त्यामुळे आपली गरज राहिलेली नसते आपण आधी जरी सिनियर असलो तरी गोष्टी पुढे निघून गेलेल्या असतात.
मी पण ह्यातून गेले आहे जाताना हैंडओवर देऊन गेले होते तो माझी पोस्ट वर होता मला दुसऱ्याच टीम मधे माझ्या ज्युनियर ला रिपर्टिंग करायला लावला.
तुम्ही गरजेचे नाही आहात हेच तुम्हला काही दिवस दाखवून दिला जात , अशा वेळी शांत रहा आणि कंफर्ट झोन एंजॉय करा उगाच भावनेच्या भरत जाऊन राजीनामा वैगेरे देऊ नका सध्या घरी तुमची जास्त गरज आहे उलट जेवढ्या कमी जबाबदारी मिळेल तेवढेच काम करा अगदी स्वतःला न्यू जॉइनी समजून चाला काही दिवसांनी तुमच महत्त्व आपोआप निर्माण होईल तुम्हला निर्णय प्रक्रियेत पण घेतील थोडा धीर धरा.
अरे वाह अभिनंदन
अरे वाह अभिनंदन

आयुष्यातले सर्वात सोनेरी दिवस असतात हे.. कुठे लोड घेता. मस्त एन्जॉय करा
आणि हो, काही झाले तरी जॉब सोडू नका, किंबहुना कुठली तडजोड करू नका जी अनावश्यक आहे.
या धाग्यावर आलेल्या पैकी ज्या पोस्ट रुचतील त्याच सोबत ठेवा, बाकीच्या विकून टाका. कारण कोणाला काही पडले नसते. तुम्ही धागा काढला म्हणून आम्ही प्रतिसाद देत आहोत. रिकामा वेळ सत्कारणी(!) लावत आहोत.
ऑफिसमधील सोकॉल्ड कलीग जनता सुद्धा यापेक्षा काही वेगळी नसते. त्यांनाही कोण काय करतेय याचे काही पडले नसते. वेळ जात नाही म्हणून गॉसिप करतात. जर कोणाला पडली असते तर ती फक्त तुमच्या लीडला/मॅनेजरला ज्याच्या अंडर तुम्ही काम करता. ज्याच्यासाठी तुम्ही एक रिसोर्स असता. तुमच्या चांगल्या वाईट कामाचे फायदे तोटे परिणाम त्याला भोगावे लागतात.
तुम्ही खरेच किती काम करता आणि किती पाण्यात आहात हे सगळ्यात चांगले त्यालाच ठाऊक असते. जर तो समाधानी असेल तर बाकी जनता जाते तेल लावत.
आणि त्याला देखील तुमच्याकडून वेळेत आणि अचूक काम निघते इतकेच हवे असते. मग ते तुम्ही चहा पित करता, कॅन्टीन मध्ये बसून करता, घरून करता, सकाळी अर्धा तास उशीरा येऊन करता की रात्रीचे बारापर्यंत जागून करता याच्याशी फारसे घेणे देणे नसते. त्यासाठी कंपनीने एच आर कामाला ठेवले असतात. आणि त्या सुद्धा सहसा समजून घेणाऱ्या बायका असतात.
मी ह्यातून गेलिये. आधी थोडी
मी ह्यातून गेलिये. आधी थोडी माझी गोष्ट सांगते. आणि मी त्या वेळी कसं निभावलं किंवा त्यातून शिकले ते सांगते.
मी सुरुवातीला ( ML आधी) सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट (एम्बेडेड सिस्टीममध्ये) होते . त्यामुळे एकदा ऑफिस मध्ये गेलो की क्वचित कधी उजेड असताना घरी निघायला मिळायचे... सकाळी ९ la पोहोचलो की रात्री कितीही ८-९-१० ही व्हायचे.. बऱ्याचदा शनिवारी ही काम करायला लागायचे... नवऱ्याचे ही कामाचे स्वरूप तसेच होते.
त्या व्यतिरिक्त commute - ट्रॅफिक नुसार ५० मिनिटे ते २ -२.३० तास प्रत्येकी जायला यायला..
पण तरी खूप जास्त त्रासदायक वाटायचे नाही... कारण बहुदा काम आवडीचे, टीम खेळीमेळी ची असावी...
अर्थात घरच्या आघाडीवर (किती / कसा) आनंदच (?) ... मदतनीस मावशींच्या कृपेने ती बाजू चालली होती.
---
त्यामुळे बाळ येणारं म्हणजे बऱ्याच पातळ्यांवर बदल करावे लागले/ केले..
शक्य होते म्हणून.. लोकेशन ट्रान्स्फर घेतली. वेळ खूप कमी झाला 30 ते 40 मिनिटं पुढे अजून कमी झाल्या वीस मिनिटे पर्यंत.
डेव्हलपमेंट कामाला बदली घेतली. मेन्टेनन्स प्रोजेक्ट मध्ये गेले. तिथे सुरुवातीलाच सांगून ठेवलेल की उशिरा थांबणार नाही.
गरजे प्रमाणे सुट्ट्या , कधी लवकर / उशिरा निघणे/ पोहोचणे.. काही महिने मॉर्निंग शिफ्ट, काही महिने असे गेले की मला घरून काम करावे लागले ही गोष्ट मी 2010 -११ ची सांगत्ये.
आता ह्या सगळ्यात मला गिल्ट होतं का? आणि कंपनीने का जमवून घेतलं?
तर मला अजिबात गिल्ट नव्हत.
मी बाकीच्या सवलती घेतल्या तरी, कसंही करून डिलिव्हरी डेट पाळणे, कामात accuracy, efficiency ठेवून बाकी सहकाऱ्यांच्या पेक्षा पाच दहा टक्के जास्त output देणे. या गोष्टी मी त्यावेळी सांभाळत होते.
कंपनीने जमून घेतलं असावं कारण
एक बिलेबल रिसोर्स. खात्रीशीर माणूस होत की जी एवढ्यात कंपनी सोडणार नाही. वेळ सोडली तर फार जास्त मागण्या नाहीत. ( थोडा कमी पगार, संथपणे पगारवाढ , बढती.. दिली तरी चालण्यासारखे..
त्यावेळी ठराविक वर्षांचा अनुभव, आणि skillset असलेले लोकं मिळायचे नाहीत. - मुलाखती घ्यायला लागलेलो त्यामुळे मार्केट मध्ये काय उपलब्ध आहे ह्याची कल्पना आली होती.
शेवटी कंपन्या bottom line बघतात. तुम्ही त्यांना पैसे कमवून देत असाल तर ते negotiate करायला तयार असतात..
—
तुमचा लेख वाचताना
थोडा गोंधळ, आत्मशंका त्यामुळे कुठेतरी आत्मविश्वास हरवलाय अशासारख काही जाणवलं.
स्वतःचे strengths ओळखा. तुम्ही कंपनीला काय देताय, तुमच्यामुळे कंपनीला फायदा होतोय का हेही जाणून घ्या. त्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आत्मसंत कमी होतील.
तुम्हाला जे हवंय त्याची यादी करा प्रशांत क्रमानुसार, पहिल्या २ - ३ गोष्टी ch फक्त फोकस करा.. बाकी सगळा गोंधळ (noise) म्हणून दुर्लक्ष करा.ज्यात लोकं तुम्हाला काय बोलतायत, बाजूचा किती वेळ काम करतोय, की टाईमपास करतोय वगैरे वगैरे सगळं आलं.
पूर्वी तुम्ही कोणाला कशामुळे ऑंटी म्हणाल्यात त्यामुळे आता लोक तुम्हाला काय म्हणतील वगैरे वगैरे विचार आणि जेवढ्या लवकर काढून टाकालं तेवढे पटकन बाहेर पडाल.
***
वर पण खूप चांगल्या उपयोगी कमेंट्स किंवा सल्ले अनेकांनी दिले आहेत.
खूप दिवसांपासून उत्तर द्यायचं होतं पण वेळ लागणार होता म्हणून उशीर झाला.
तुम्हाला शुभेच्छा!
वाचून एक काळ डोळ्यासमोर तरळला
वाचून एक काळ डोळ्यासमोर तरळला. आता मागे बघताना वाटतं, हे आपण केलं? आणि कसं आणि कधी?
मग वाटतं वय तरुण होतं. एक महत्वकांक्षा होती.
पण त्यावेळी त्रास न्हवता तस वाटत. म्हणजे सगळेच दिवस काही रडण्यात नाही घालवले. पण आता कळतय. त्या त्रासाने मनाला, शरीराला त्रास झालेला आता कळतोय. कधी रडलेय, तर कधी काहीच विचार न करता स्वतःला आवडलेली महागडी पर्स घेवून अर्धा घरखर्च घातला.. जस्ट टू फिल गूड. मुर्खपणा होता. पण केलाय त्या त्यावेली बरं वाटावे म्हणून.
आता नक्की काय केले...
हे करायचचं आहे अशी परीस्थिती(माझी तरी) होती. शिक्षण घेतले होते, त्यासाठी पैसा खर्च केला होता अमेरीकेत. कर्ज होते अमेरीकेतील शिक्षणाचे दोघांचेही(नवरा व मी). मुलं हि हवी होती.
त्यामुळे खुप विचार न करताच गाढव मेहनत केली.
दोघं होतो हिच जमेची बाजू. साधारण आराखडा होता कोण कोण काय करणार.
काय काय ऑप्शनला टाकायचे, किती खर्च करायचा. मन मारून जगण्याकडे तसा कल न्हवता, उलट नवरा म्हणजे कल की कल देखेंगे आहे. मी तरी कंजूष होते(तशी नाहीये पण त्याकाळात होते). नोकरी लागेल तेव्हा केली व धरली परीस्थितीनुसार. मुलं झाल्यावर गरजेनुसार(आर्थिक) नोकरी केली. पण जेव्हा केली तेव्हा खूपच मेहनत केली कारण शिक्षणाचे कर्ज चुकवायाचे होते.
आधी आजू बाजूंचा लोकांचा विचार करायची. मग बंद केले.
ऑफिस हि फक्त कामाची जागा आहे. दुसरे म्हणजे तुम्ही जसं आणि जे काही दुसर्याला जज करता त्यामुळेच तुमच्या डोक्यात तसे विचार येतात व खचता. तेव्हा काहीही कोणाबद्दल गॉसिप करायचे नाही ऑफिसात तरी.
आता ह्या अनुभवातून तुम्हाला काय मिळणार माहित नाही. कारण प्रत्येकाची जर्नी असते. त्यानुसार त्याने ठरवावे. एकच साचा कधीच ठरवू शकत नाही.
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.
किती प्रॅक्टिकल गोष्टी ! थँक्यू सो मच . कालच्यापेक्षा आजचा जरा चांगला असे दिवस चाललेत. म्हणजे प्रगती आहे म्हणायला हरकत नाही. मानसिक गोंधळ सुद्धा कमी होत आहे. पण तरीही झंपी म्हणाल्यासारखी 'रिटेल थेरपी' चालते अधून मधून.
पण खरंच सगळ्या प्रतिक्रिया वाचून खूप आधार वाटला. धन्यवाद.