Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन चिकवा.
मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328
नविन MI ची वाट बघतेयं आता.. >
नविन MI ची वाट बघतेयं आता.. >>>> आयपीएल धाग्यावर आलो असे वाटले पटकन.. आणि इथे टॉम क्रुझ कोणाला म्हटले जातेय असा प्रश्न पडला..
बाई दवे, तिथे सुद्धा आहे एक टॉम क्रुझ..
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स
दृश्यम ओरिजनल पाहिलयत का कुणी
दृश्यम ओरिजनल पाहिलयत का कुणी?
>>
येस
मल्याळम मधे 1 आणि 2 दोन्ही
अन् तमिळ मधे कमल हासन चा पपनसम (दृश्यम 1) पण
मोहनलाल फारच वरचा क्लास...
एकेका वाक्यात तीन-चार तीन-चार
एकेका वाक्यात तीन-चार तीन-चार एफ-वर्ड्स?
>>
अनुराग कश्यप AD असेल
"ऋन्मेष यांची दुसरी बाजूपण
"ऋन्मेष यांची दुसरी बाजूपण बरोबर आहे ."
+१०००
मुळात कुठलाही चित्रपट/अभिनेता/अभिनेत्री/दिग्दर्शक आवडणे किंवा न आवडणे हि पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष बाब असल्याने त्याचे सरसकटीकरण करता येत नाही. त्यामुळे असे एकाच गोष्टीकडे पाहण्याचे वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे दृष्टिकोन आणि त्यामागची विचारप्रक्रिया उलगडून दाखवणारे प्रतिसाद येत असतील तरच चर्चा चांगली रंगते, उद्बोधक होते असे माझे वैयक्तिक मत.
>>येस
>>येस
मल्याळम मधे 1 आणि 2 दोन्ही
अन् तमिळ मधे कमल हासन चा पपनसम (दृश्यम 1) पण
मोहनलाल फारच वरचा क्लास...>>
+१०००
"मोहनलाल फारच वरचा क्लास"
"मोहनलाल फारच वरचा क्लास" +
"मोहनलाल फारच वरचा क्लास" + 100000 त्याचा दृश्यम जास्त सॉलिड आहे. Acting च्या दृष्टीने.
मोहनलाल अभिनयाचा प्रश्नच नाही
मोहनलाल अभिनयाचा प्रश्नच नाही...पण तरी हिरो, मेन लीड म्हणून किंचित बोर प्रकरण आहे.
ललिता-प्रिती अनोरा साठी ++
ललिता-प्रिती अनोरा साठी +++११११
मी पण पाहिला पण अगदी त्यावर लिहिण्यासारखंही काही वाटलं नाही. ऑस्कर मिळण्यासारखं तर बिलकूलच नाही.
मारामारीचा बराचसा भाग पळवतच पाहिला. फ वर्ड ऐकून कान किटले. शेवटी कार मधल्या प्रसंगात दोघांसाठी वाईट वाटलं.
मोहनलाल अभिनयाचा प्रश्नच नाही
मोहनलाल अभिनयाचा प्रश्नच नाही...पण तरी हिरो, मेन लीड म्हणून किंचित बोर प्रकरण आहे. >> तो हिरो नाहिये रे प्रोटॅगोनिस्ट आहे सिनेमासाठी त्या.
>>"मोहनलाल अभिनयाचा प्रश्नच
>>"मोहनलाल अभिनयाचा प्रश्नच नाही...पण तरी हिरो, मेन लीड म्हणून किंचित बोर प्रकरण आहे.">>
😀
त्याचा 'भगवान' म्हणुन एक चित्रपट आहे त्याच्या बाबतीत हे विधान १००% लागु पडेल 😂
च्यामारी केवळ १२ की १९ तासांत चित्रपट बनवुन जागतिक विक्रम प्रस्थापित करायचा म्हणुन बनवलेला हा तद्दन भिकार चित्रपटही निव्वळ 'मोहनलाल आवडतो' ह्या कारणासाठी बघीतला होता! आणि इतके डोके फिरले होते की त्यादिवशी माझा आवडता कलाकार/ अभिनेता असला तरी मोहनलालच्या आई आणि बहिणीला (त्या त्यावेळी हयात्/अस्तित्वात असल्यास) न भुतो न भविष्यती अशा उचक्या लागल्या असतील ह्यात मलातरी तीळमात्र शंका नाही 😀
त्यापेक्षा मिथुनचा 'गुंडा' पुन्हा पाहिला असता तरी एकवेळ परवडला असता, इतका हा 'भगवान' भयंकर अत्याचारी चित्रपट वाटला होता...
>>"मागे 'देवदास' कादंबरीवरचा
>>"मागे 'देवदास' कादंबरीवरचा एक लेख वाचला होता. त्यातलं एक वाक्य अगदी लक्षात राहिलंय- पारो आणि चंद्रमुखी दोन्ही अगदी सशक्त व्यक्तिरेखा आहेत. मग दोघी देवदाससारख्या कमकुवत व्यक्तिमत्वाच्या प्रेमात कशा काय पडतात? शरतबाबूंनी असं का दाखवलं असावं?">>
ह्यावरुन थोडं अवांतरः: पुराणकालीन (१९५५ सालचा) देवदास बाजुला ठेऊ... माबोकरांना त्याच कथेवर आधारीत असलेला २००२ चा शाहरुखचा 'देवदास' आवडला की २००९ चा अभय देवलचा 'देव.डी' आवडला होता?
मलातरी भन्साळीच्या पकाऊ 'देवदास' पेक्षा अनुराग कश्यपचा आधुनीक 'देव.डी' संगीतासहीत सर्वच बाबतीत सरस वाटला होता...
असामी, हो. म्हणून हिरो/मेन
असामी, हो. म्हणून हिरो/मेन लीड असे दोन्ही लिहीले आहे. दृश्यं २ मोहनलाल यांचा आधी आला. थोडा पाहिला. बोअर झालो. मग म्हटले आपल्या सिंघमचा यायची वाट बघूया.
तो पण बोरच झालो ती गोष्ट वेगळी
मग दोघी देवदाससारख्या कमकुवत
मग दोघी देवदाससारख्या कमकुवत व्यक्तिमत्वाच्या प्रेमात कशा काय पडतात?
>>>>>
कादंबरीचे माहीत नाही..
पण चित्रपटात शाहरुख घेतल्यावर कोण नाही प्रेमात पडणार
अनुराग कश्यपचा आधुनीक 'देव.डी
अनुराग कश्यपचा आधुनीक 'देव.डी'
>>>>>
अरे हा बघायचा राहिला आहे माझा.. तेव्हा लहान होतो. आणि फॅमिली चित्रपट न वाटल्याने बघायचा राहिला होता.
त्यातले गाणे मात्र तेरा इमोशनल अत्याचार आजही मूड आलो की गुणगुणतो..
मलातरी भन्साळीच्या पकाऊ
मलातरी भन्साळीच्या पकाऊ 'देवदास' पेक्षा अनुराग कश्यपचा आधुनीक 'देव.डी' संगीतासहीत सर्वच बाबतीत सरस वाटला होता...
>>>
देव डी भारीये. भंसाळीचा पाहिला नाहीये.
मी एकही देवदास पाहिलेला नाही.
मी एकही देवदास पाहिलेला नाही. ष्टोरी वरून कधी पाहावासा वाटलेला नाही. देव डी पाहिला आहे. पण फार लक्षात नाही. मी तो पाहिल्यानंतर कधीतरी मला त्याचा देवदास संदर्भ समजला.
बाय द वे मुकद्दर का सिकंदरही देवदासवरच लूजली बेतला होता असे वाचले आहे आणि ते खरे असावे. तो मात्र पन्नास वेळा पाहिला असेल
बाय द वे मुकद्दर का सिकंदरही
बाय द वे मुकद्दर का सिकंदरही देवदासवरच लूजली बेतला होता असे वाचले आहे आणि ते खरे असावे
>>>
मी शाहरुखचा देवदास पाहिला आणि केस उपटून घेतले. हमेशा तुम को चाहा गाण्याव्यतिरिक्त काहीच आवडले नाही. देन डी पाहिला नाही.
मुकद्दर का सिकंदर पाहिलाय. परत कधीही बघायची तयारी आहे. गाणी आवडतात त्यातली.
बाय द वे मुकद्दर का सिकंदरही
बाय द वे मुकद्दर का सिकंदरही देवदासवरच लूजली बेतला होता
>>>>>
आता ही वाचून तसा विचार करून पाहिले तर खरेच की...
पण नाही.. विनोद खन्ना वर राखीचे प्रेम होते अमिताभ वर नव्हते..
अजून सुद्धा असे देवदास असतील. आठवायला हवेत.
कबीर सिंग सुद्धा जाता जाता राहिला त्या ट्रॅक वर.. शेवट बदलला.
देव डी नाही पाहिला पण 'देवदास
देव डी नाही पाहिला पण 'देवदास' थेटर मधे पाहिला होता. संलिभ इतका झगमगाट करतो की तुम्हाला किमान त्या वेळी त्याच्या उणिवा दिसू नयेत. नंतर लक्षात याव्यात. देवदास दुनियेचा राग का करतो तेच कळालं नाही नेमकं. ना पारोवर प्रेम केलं ना चंद्रमुखीवर, मग एवढा त्रागा कशाचा..! खरं प्रेम दारूवरच केलं. 'दारूदास' नाव हवं होतं.
'मुक्कदर का सिकंदर' पर्फॉर्मन्स वाईज दमदार होता. त्याचं श्रेय अमिताभलाच जातं. तेव्हाचा त्याचा पर्सोना त्याच्याच कारकिर्दीतलाही सर्वात 'पीक पॉईंट' असावा. शिवाय सलाम ए इश्क, मुजरे, रेखा, किशोर कुमार सगळेच जमून आले आहे.
विनोद खन्ना वर राखीचे प्रेम
विनोद खन्ना वर राखीचे प्रेम होते अमिताभ वर नव्हते.. >>>
अरे ती लेडीज व्हर्जन नाहीये.
राखी-अमिताभ- रेखा - अशा संदर्भाने बघ. विनोद-राखी-अमिताभ अशा ने नाही
'दारूदास' नाव हवं होतं. >>>
हे गाणं तुझे वाक्य चपखल दाखवते 
https://www.youtube.com/watch?v=b3sl_BwpuRg&t=48s
अरे ती लेडीज व्हर्जन नाहीये.
अरे ती लेडीज व्हर्जन नाहीये. >>
'चंद्रमुखी हो या पारो की फरक पैंदा यारो' ह्या ओळी एवढ्या चपखलपणे दिल्यामुळे तुला बोनस पॉईंट.

'पीने वालों को गाणं' मला धमाल वाटतं. मला पाठ होतं, आता उजळणी करते.
मुकद्दर का सिकंदर - मी अगदी
मुकद्दर का सिकंदर - मी अगदी रीलीज झाला तेव्हा मंगला ला पाहिल्याची आठवण आहे. त्यानंतर केबल आणि ओटीटी वर कुठे लागला तर बघतेच पुन्हा. काय केमिस्ट्री आहे अमिताभ रेखाची! अमिताभ चे अँग्री यंग मॅन रोल मधे डोळ्यांतून आग ओकतो तेवढाच परिणामकारक यात राखीवरच्या असफल प्रेमाचे ते दुखावलेपण, अपमानाचा सल त्याच्या डोळ्यात दिसतो. राखी मात्र फार बोअर वाटते मला त्यात. काय ती हेअरस्टाइल.
अमिताभच्या बेस्ट इयर्स पैकी एक असेल हे . आत्ता कन्फर्म करण्यासाठी पाहिले मुद्दाम - अमिताभ ची बेस्ट इयर्स - १९७८ या एका वर्षात कस्मे वादे, डॉन, त्रिशूल आणि मुकद्दर का सिकंदर! याआधी १९७५ मधे शोले, दीवार, चुपके चुपके आणि मिली!! आणि १९८१- त्या वर्षात याराना, बरसात की एक रात, नसीब, लावारिस, सिलसिला आणि कालिया!! बाबो!!
राखी-अमिताभ- रेखा - अशा
राखी-अमिताभ- रेखा - अशा संदर्भाने बघ.
>>>
तसंच बघितले. वाक्यरचना गंडल्याने कन्फ्युजन झाले असावे.
देवदास आणि पारोचे एकमेकांवर प्रेम असते जे सफल होत नाही. (असेच होते ना?)
पण इथे अमिताभ आणि राखी यांचे एकमेकांवर प्रेम दाखवले नाहीये.
हा येडा एकतर्फी प्रेमाच्या दुःखात बुडताना दाखवला आहे.
राखीचे पूर्ण करिअर मधे कुणावर
राखीचे पूर्ण करिअर मधे कुणावर प्रेम आहे असे वाटले नाही, एक ते 'करण अर्जुन' सोडले तर. सगळ्यांना कन्फ्यूज करणारे मिक्सड सिग्नल देते ती आणि आपल्याला वाटते त्याग केला. इथे डिरेक्ट सिग्नल सुद्धा समजू नयेत असे ऐंशीचे दशक, त्यात मिक्स्ड सिग्नल. विनोद मेहरा, अमिताभ, शशी कपूर सगळे कन्फ्यूज वाटतात तिच्यासोबत. काय चाललंय कुणाला माहीत - वाईब्ज
सगळ्यांना कन्फ्यूज करणारे
सगळ्यांना कन्फ्यूज करणारे मिक्सड सिग्नल देते ती...
>>>>
फ्रेंडशिप डे ला राखी लिहून बँड बांधत असेल... कोणीही कॉन्फुजच होईल
राखीचे पूर्ण करिअर मधे कुणावर
राखीचे पूर्ण करिअर मधे कुणावर प्रेम आहे असे वाटले नाही. >>>
करण अर्जुन सारखाच श्रद्धांजली पण अपवाद आहे. म्हणजे नायक नवरा/प्रियकर नसला तर तिचे सिग्नल बरोबर जायचे.
नायक नवरा/प्रियकर नसला तर
नायक नवरा/प्रियकर नसला तर तिचे सिग्नल बरोबर जायचे.
>>>> तेच तर.
ऋ
पण इथे अमिताभ आणि राखी यांचे
पण इथे अमिताभ आणि राखी यांचे एकमेकांवर प्रेम दाखवले नाहीये. >>> हो बरोबर आहे. मला वाटले तू आधी राखी हे सेण्ट्रल कॅरेक्टर धरून बोलतोयस. मला वाटायचे देवदास मधेही पारोचे प्रेम नसते. पण आता माहिती वाचली तर जालिम जमाना वगैरे मुळे त्यांचे लग्न बिग्न होत नाही असे दिसते.
राखीचे पूर्ण करिअर मधे कुणावर प्रेम आहे असे वाटले नाही >>>
ती फक्त जीवन मृत्यू मधल्या झिलमिल सितारोंका आँगन होगा मधे व शर्मिलीतील खिलते है गुल यहाँ गाण्यात त्यातल्या त्यात क्लिअर वाटते.
मैत्रेयी - टोटली! १९७८-७९ ही त्याच्या पहिल्या इनिंग चे पीक वर्षे होती.
फ्रेंडशिप डे ला राखी लिहून
फ्रेंडशिप डे ला राखी लिहून बँड बांधत असेल... कोणीही कॉन्फुजच होईल >>>
त्यात तिचे नाव "राखी" !
झिलमिल सितारोंका आँगन होगा
झिलमिल सितारोंका आँगन होगा मधे व शर्मिलीतील खिलते है गुल यहाँ गाण्यात त्यातल्या त्यात क्लिअर वाटते.
हो, त्यातल्या त्यातच. मला आठवतंय तसं - झिलमिल मधे ती संसारा बाबत (स्वप्नं ) समाधानी आहे आणि शर्मिलीत ती स्वस्तुतीने खूष झालेली आत्मकेंद्री सुंदरी होती. हे प्रेम नोहे... 
>>>>
Pages