कोबीची कोशिंबीर

Submitted by ऋतुराज. on 17 March, 2025 - 11:31

कोबीची कोशिंबीर
कोबी आवडणारे आणि न आवडणारे अनेक जण आहेत.
कोबीची भाजी सर्रास होते पण झटपट होणारी ही कोशिंबीर कोबी न आवडणाऱ्यांना देखील आवडेल.
साहित्य:
कोबी १५० ग्रॅम भाजीला चिरतो तसा चिरून
कढीपत्ता, कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, जिरे, मोहरी, हिंग, तेल, मीठ, लिंबू आणि अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे
कृती:
प्रथम कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात हिंग, जिरे मोहरीची फोडणी द्यावी. यातच कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकावी. आता एका भांड्यात चिरलेला कोबी घ्यावा त्यावर वरील फोडणी टाकावी. चवीनुसार मीठ टाकावे व लिंबू पिळावे. सगळ्यात शेवटी सर्व्ह करताना डाळिंबाचे दाणे व कोथिंबीर टाकावी.

20250312_205952.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.. तुमच्या आणि आमच्या सौभाग्यवतींच्या खाण्या-पिण्याच्या आवडी बर्‍यापैकी समान आहेत …

खाण्यातल्या माझ्या नखरेल सवयींनी वैतागतात घरचे-दारचे पण आता सुधारणे पलीकडची केस आहे हे मान्य झालंय

कसली ही जीभशिंदळकी असे म्हणतात अन देतात सोडून 😀

अवांतर पुरे करतो

कृपया असे लेखन ललित लेखनात न प्रकाशित करता , पाककृती आणि आहारशास्त्र विभागात पाककृती म्हणून प्रकाशित करा.

धन्यवाद वेमा.
माझ्याकडून तो चुकून गुलमोहर ललित मध्ये प्रकाशित झाला.

Pages