Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कितीही मोठी पोस्ट लिहा. सत्य
कितीही मोठी पोस्ट लिहा. सत्य बदलत नाही. >> गम्मत म्हणजे ह्या विषयावर सर्वात मोठी पोस्ट तुझीच (varachI) आहे.
"अंबानी समूहाची घमेंड क्रिकेटप्रेमींनी उतरवली ज्यांना वाटत होते की ते काहीही मनमानी निर्णय घेणार आणि क्रिकेटप्रेमी चालवून घेतील." ह्या विधानात कळीचा मुद्दा हा आहे कि तोच 'मनमानी निर्णय' अजूनही कायम आहे नि तेच (सो कॉल्ड) क्रिकेट्प्रेमी (तू ही त्यात आला आहेस) तो मान्य करून त्यावर मूग गिळून गप्प बसले आहेत. ह्यात नक्की कोणाची घमेंड उतरली हे दिसतेय. 'अंबानी ची मिजास' नि 'रोहितने अचिव्ह केले' ह्यांचा परस्पर संबंध फक्त बादरायण संबंध आहे. तसे करून तुझ्या इगोला समाधान मिळत असेल तर एंजॉय माडी !
कितीही मोठी पोस्ट लिहा. सत्य
कितीही मोठी पोस्ट लिहा. सत्य बदलत नाही
अस लिहून ह्या पानावरची तरी सर्वात मोठी पोस्ट लिहिली आहे.
पांड्या ने सँटनरचा कोटा
पांड्या ने सँटनरचा कोटा पूर्ण नाही केला हे विचित्र वाटले. एकंदर मुंबईची बॉलिंग बुमरा येइतो अडखळत धडपडत राहणार असे दिसतेय. मॅचचा निकाल काहिही लागो, पण मॅच चुरशीची झाली तर मजा येईल. मुंबईकडे बॅटींग पॉवर आहे नि ग्राऊंड पण चांगले आहे.
"'I will never be in favour
"'I will never be in favour of Dhoni batting at number 9. Not ideal for team,' tweeted Irfan Pathan"
दोन दिवसांपूर्वी इरफान पठाण सडेतोड बोलतो असे कोणीतरी म्हणाले होते.
वैधानिक इशारा : वरच्या दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी संबंध आहे.
धोनीच वय झालेलं आहे त्यामुळे
धोनीच वय झालेलं आहे त्यामुळे कालच्या सामन्यात अश्विनच्या अगोदर येऊन काहीही फायदा झाला नसता. धोनी शेवटच्या २-३ ओव्हरच खेळणं योग्य आहे.
197 ! मुंबई विरुद्ध किमान 200
197 ! मुंबई विरुद्ध किमान 200+ लक्ष्य असणं महत्त्वाचं
बघू गुजरात मुंबईला ह्या धांवसख्येवर हरवू शकते का ? गिल आणि कं फलंदाजीत चमकदार कामगिरी करणार पण .. !!!
गम्मत म्हणजे ह्या विषयावर
गम्मत म्हणजे ह्या विषयावर सर्वात मोठी पोस्ट तुझीच (varachI) आहे.
>>>>
या विषयाच्या सुरुवातीलाच मी काय लिहिले ते वाचले नाही का... मी या विषयावर निबंध लिहू शकतो असे मी आधीचा म्हणालो आहे. आणि रोहित शर्मा बद्दल म्हणाल तर सलग सात दिवस सात रात्र न जागता लिहू शकतो.. त्यामुळे माझ्या मोठी पोस्ट लिहिल्याने तुमची छोटी होत नाही.
दोन दिवसांपूर्वी इरफान पठाण
दोन दिवसांपूर्वी इरफान पठाण सडेतोड बोलतो असे कोणीतरी म्हणाले होते.
....
कोणीतरी काय मीच..
आणि मला त्याच्या कोहली विरुद्ध सडेतोड पोस्टचे व्हिडिओ सुद्धा सापडले.
जे कारण असू शकते.
नंतर क्रिकेट धाग्यावर शेअर करतो.
इथे शर्मा चर्चेत मध्येच कोहली पठाण नको..
क्रिकेट अन् लॉजिक देवा
क्रिकेट अन् लॉजिक देवा
याला माफ करा
याला कळतंच नाही तो कधी काय बोलतो
आज याच्या आवडत्यांसाठी जे लागू असेल ते सर आँखो पर
आणि जर काही नसेलच तर ओढून ताणून कसलेही संबंध जोडून इतरांना कनफ्यूज करायचं अन् काहीही झालं तरी ' मी हेच म्हणालो होतो ' म्हणून स्वतःला शेंदूर माखायचा...
एक अंबाती रायडू कॉमेन्ट्री बॉक्स मधे, अन् एक हा इथे...
मुंबईची अनाकलनीय टुकू टुकू
मुंबईची अनाकलनीय टुकू टुकू बॅटिंग.
मला एक समजत नाही तुमच असामी
मला एक समजत नाही तुमच असामी अंकी. सोडा ना. कशाला लटकलाय.
मुंबई तीन हरल्या वरच जागी
मुंबई तीन हरल्या वरच जागी होते .
मुंबई तीन हरल्या वरच जागी
मुंबई तीन हरल्या वरच जागी होते . >> ते जागे झाले तरी फारसे काही तरी करतील असे वाटत नाही मला तरी. बॅटींग मधे गॅप्स तयार झाल्या आहेत नि त तिथे अननुभवी खेळाडू आहेत. बॉलींग बुमरा येइतो लंगडीच राहणार आहे.
एकदा कप्तान बदलून ट्राय
मुंबईने एकदा कप्तान बदलून ट्राय करायला हवे..
रोहीत शर्मा आहे तोपर्यंत पुन्हा त्याला कर्णधार करायला हरकत नाही.
तुमच्याकडे २०-२० मधील जगातला सर्वोत्तम कर्णधार आहे आणि तुम्ही त्याचा वापर करत नसाल तर गणित चुकणारच
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DHyrNBUzMQL/?igsh=MW0xYjF5aTEyanNpcA==
रोहितचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. अंबानीने घोडचूक केली त्याला कॅप्टन पदावरून दूर करून. पांड्यासाठी विनाकारण एव्हडा खर्च केला. बाप तिकडे मर मर काम करत कमवतोय आणि माय लेक इकडे उडवताहेत. एकंदरीत अंबानीची अधोगती सुरू झाले.
बोकलत व्हिडिओ अचूक आहे पण
बोकलत व्हिडिओ अचूक आहे पण त्याचे टायटल नाही.
त्या व्हिडिओला कॅप्शन ग्रेटेस्ट कॅप्टन ऑफ आयपीएल दिले आहे जी चुकीचे आहे.
ग्रेटेस्ट कॅप्टन ऑफ 20-20 असे हवे ते.
इंटरनॅशनल ट्वेंटी-ट्वेंटी मध्ये त्याचा जगात सर्वाधिक विनिंग रेशिओ, एकूण एक सामने जिंकून वर्ल्डकप पटकावणे हे सुद्धा जोडले तर या फॉरमॅटमध्ये त्याच्यापेक्षा भारी कप्तान दुसरा नाही जो वर्ल्ड कप, आयपीएल, चॅम्पियन लीग मिळून एकूण आठ फायनल खेळला आहे आणि आठ पैकी आठ जिंकला आहे.
आणि हो, नुसते आकडे त्याच्या फेवरमध्ये आहेत म्हणून नाही तर ते मैदानावर सुद्धा दिसते. त्याचे डावपेच असो, गेलेला सामना खेचणे असो, संघभावना जागवणे असो, लीडरशिप असो एकूणच तो पॅकेज आहे.
आणि हेही काय कमी म्हणून निव्वळ फलंदाज म्हणून देखील तो लिजंड आहे. त्यातही सर्वाधिक पाच शतक, सर्वाधिक षटकार, वेगवान शतक असे कैक विक्रम या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावे आहेत. आणि यात देखील आकडे त्याच्या फेवर मध्ये आहेत म्हणून नाही तर तो कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आहे हे दिसून येते. तो निव्वळ statpadder नसून त्याच्या इनिंग इम्पॅक्ट इनिंग आहेत.
मोठ्या स्पर्धात आणि गेल्या काही आयसीसी ट्रॉफी मध्ये त्याने आपला परफॉर्मन्स वेगळ्याच लेव्हलला उंचावला आहे. ट्वेंटी-ट्वेंटी म्हणाल तर या जिंकलेल्या वर्ल्ड कप मध्ये तो वर्ल्ड कप इतिहासात एका एडिशनमध्ये सर्वाधिक धावा काढणारा कप्तान झाला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला आपल्या फलंदाजीने नॉकआऊट केले.. त्यामुळे विषय जरी आयपीएल असला तरी निव्वळ आयपीएल मधील सर्वोत्तम कर्णधार इतकाच टॅग नको त्याला. जे डीझर्व करतो ते श्रेय मिळायला हवे.
हैद्राबाद ला मस्त रोखलंय
हैद्राबाद ला मस्त रोखलंय दिल्लीने!!
तरी काही कॅचेस सुटले नाहीतर अजून हालत खराब झाली असती!!
स्टार्कची मस्त बॉलिंग
हैद्राबाद ला मस्त रोखलंय
And now kuldeep joined the party
डॅडी टीम आज परत हरणार.
डॅडीज टीम आज परत हरणार.
मॅच मधे डीप जाणे समजू शकतो.
मॅच मधे डीप जाणे समजू शकतो. पण करियर मधे?
पराग ला शिव्या घालणार होतो,
पराग ला शिव्या घालणार होतो, आर्चर ला लास्ट / सेकंड लास्ट ओव्हर दिली नाही म्हणून...
पण संदीप नी धोनी ला घेतला
हिच पोस्ट मी दुसरीकडे लिहिली
हिच पोस्ट मी दुसरीकडे लिहिली होती. कॉपी पेस्ट करतो.
आर्चर आज 3 ओवर 13-1
त्याला चौथी ओवर बॉलिंगचं दिली नाही.
संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे यांनी शेवटच्या दोन ओवर टाकल्या.
असे का?
अगदी उत्तम निर्णय!! मला
अगदी उत्तम निर्णय!! मला बिलकुल आश्चर्य वाटले नाही!!
आर्चर टेम्परामेंटल बॉलर आहे..... तो जितकी टोकाची चांगली बॉलिंग टाकू शकतो तितकीच टोकाची माती खाऊ शकतो.... परागचे त्याबद्दल कधी नव्हे ते कौतुक
त्याला खरेतर सुरुवातीलाच चौथी ओव्हर देऊन त्याचा कोटा संपवायला पाहिजे होता!!
आर्चर तिसऱ्या ओवरला थोडा
आर्चर तिसऱ्या ओवरला थोडा पसरलेला.. पण पहिल्या दोन ओवर कडक.. बरेच काळानंतर काल त्याला बुलेट गोलंदाजी करताना काल पाहिले.
आर्चरचा वेग या वयात धोनीला जड गेला असता..
आणि कदाचित म्हणून तर तो आला नसावा असेही वाटले
आर्चरच्या सध्याच्या
आर्चरच्या सध्याच्या फॉर्ममध्ये शेवटच्या प्रेशर ओव्हरमध्ये त्याला न आणणे हा तसा पटण्यासारखा निर्णय होता पण त्यापेक्षा १८वी ओव्हर तिक्षणाला देण्याबद्दल परागचे जास्त कौतुक.... फक्त ६ रन्स आल्या त्या ओव्हरला!!
मला वाटते धोनी क्रिझवर नवीन
मला वाटते धोनी क्रिझवर नवीन असताना तीक्षणाला आणणे फार सोपा निर्णय होता. तीक्षणा किंवा हसरांगा यांना धोनी मारायचा प्रयत्न करणार नाही हे जवळपास उघड होते. वर्षानुवर्षीचा पॅटर्न आहे हा.
थेट मैदानातून.
थेट मैदानातून.

मॅच बघायला आलोय.
मुंबईला लक्ष्य 117 !!!!
मुंबईला लक्ष्य 117 !!!!
चेंडू एवढा स्विंग होताना मुंबईत पाहायला मिळणं दुर्मिळच !!!
फ्लेमिंङ धोनीबद्दल जे बोललाय
फ्लेमिंङ धोनीबद्दल जे बोललाय ते पाहून बहुधा धोनीचा शेवटचा सीझन असावा असे वाटतेय. तसे असेल तर जुना धोनी बॅटींग करताना एकदा तरी बघायला मिळाला तर क्या कहना !
रिकलटन चा राणाला मारलेला
रिकलटन चा राणाला मारलेला सिक्स पाहिला का ? कसला झक्कास शॉट होता. खर्या अर्थाने पुल म्हणता येईल असा.
Pages