चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कोणत्याच त्या जुन्या डिस्ने चित्रपटांचे रिमेक्स आधीपेक्षा आवडलेले नाहीत. जंगल बुक सकट. त्यात आधीची मजा नाही
>>>१००+

मला कोणत्याच त्या जुन्या डिस्ने चित्रपटांचे रिमेक्स आधीपेक्षा आवडलेले नाहीत. >>> +१

पण याचे एक कारण हे पण असावे का ? आपण ओरिजीनल चित्रपट पाहिले तेंव्हा आपले वय त्या कल्पनारम्य वातावरणात हरवून जायचे होते. त्यामुळे तो जो काही अनुभव होता तो डोक्यात पक्का बसला. नविन चित्रपट बघताना आपण मोठे झालो होतो त्यामुळे पहिल्या वेळेइतके हरवून जायला झाले नाही आणि पहिल्या वेळेच्या अनुभवाशी तुलना करता हा अनुभव फिका वाटला? अर्थात ही एक शक्यता आहे. आजच्या पिढीतील मुलांना विचारले पाहिजे.

मला स्वतःला चीत्रे काढून बनवलेले सिनेमे खूप जास्त आवडतात. त्यात 'कार्टून' फॅक्टर अधिक असतो. टेक्नॉलॉजी वापरून बनवलेले अ‍ॅनिमेशनपट चकाचक असले तरी टँव टँव अशा बॅकग्राउंड म्युझिकला मॅच होणारा कार्टून' फॅक्टर त्यात फार कमी असतो.

आपण ओरिजीनल चित्रपट पाहिले तेंव्हा आपले वय त्या कल्पनारम्य वातावरणात हरवून जायचे होते. त्यामुळे तो जो काही अनुभव होता तो डोक्यात पक्का बसला >>> मी एक जंगल बुक सोडला, तर बाकी ओरिजिनल्स सुद्धा बरेच नंतर पाहिले. पण तरीही तो अनुभव डोक्यात बसला आहे हे खरे आहे. डिस्नेने एक फॉर्म्युला सेट केला, तो इतका चपखल बसला आहे की त्याचे व्हेरिएशन इतरांनीच काय, पण इव्हन डिस्नेने केलेले आवडत नाही.

टँव टँव अशा बॅकग्राउंड म्युझिकला मॅच होणारा कार्टून' फॅक्टर त्यात फार कमी असतो. >>> Happy Happy

टेक्नॉलॉजीवाले डिस्ने-पिक्सारचे चित्रपट आहेत, त्यात कथा व संवाद दोन्ही चांगले असल्याने तरीही आवडले होते. फाइण्डिंग नीमो, कार्स (पहिला) हे दोन तरी नक्कीच. जंगल बुक, लायन किंग हे चित्रेवालेच आहेत त्यामुळे प्रश्नच नाही.

बाय द वे, ट्रान्स प्रिन्सेस वर स्वतंत्र पिक्चर काढण्याबद्दल काहीच तक्रार नाही. एक कथाविषय म्हणून अपीलिंग असेल तर असेल. पण स्नो व्हाइट इतर प्रकारे दाखवलेली आवडणार नाही. तुम्ही जुने ठोकताळे मोडीत काढा, चित्रपटनिर्मितीत वोकनेस आणा, लोकांच्या मनातील अशा चित्रपटांचे साचे बदला, तुम्ही ते जुने पिक्चर आवडणारे लोक भाबडे आहात, दुनिया काय आहे हे तुम्ही पहिचानलं नाहीत (क्रेडिट पुलं) वगैरे उच्चासनी पकवा - काय वाट्टेल ते करा. पण रिझल्ट अपीलिंग नसेल तर कोण बघणार. ड्रीमवर्क्स च्या "श्रेक" सिरीजने डिस्नेच्या प्रत्येक ठोकताळ्याचे स्पूफ केले. पण श्रेक जमून गेला. तो आधी नुसता बघताना सुद्धा आवडतो. मग यातील अनेक गोष्टी अ‍ॅण्टि-डिस्ने आहेत हे रिअलायझेशन आले की अजून मजा येते. पण त्याआधी तो एक पिक्चर म्हणूनही अपीलिंग आहे हे महत्त्वाचे.

श्रेक मधला एक ऑटाफे संवाद. त्यातील "डॉंकी" (गाढवाचे नावच ते आहे) बोलू शकतो याचे प्रिन्सेस फिओनाला आश्चर्य वाटते. पण प्रत्यक्षात तो डाँकी सतत अव्याहत बडबड करणारा आहे (एडी मर्फीने अफलातून आवाज दिला आहे.)
Fiona: "Oh he talks!"
Shrek: "Yeah, it's getting him to shut up, that's the trick" Happy

पूर्वीचे चे कार्टून असत त्यात एक गोंडसपणा होता
तो आताच्या अनिमे मध्ये रियलिस्टिक करण्याच्या नादात हरवून गेलाय
मोगली आणि लायन किंग मध्ये हे अगदी ठळकपणे दिसतं

कार्टून हे कार्टूनच असली पाहिजेत अशी एक चळवळ उभी केली पाहिजे आता

मला स्वतःला चीत्रे काढून बनवलेले सिनेमे खूप जास्त आवडतात. त्यात 'कार्टून' फॅक्टर अधिक असतो. टेक्नॉलॉजी वापरून बनवलेले अ‍ॅनिमेशनपट चकाचक असले तरी टँव टँव अशा बॅकग्राउंड म्युझिकला मॅच होणारा कार्टून' फॅक्टर त्यात फार कमी असतो. >>> मोठ्ठा +१

रीमेक्स अ‍ॅनिमेशन्सचेच काय, कुठलेच 'तसे' वाटणार नाहीत हे बहुधा काढणार्‍यांनीही गृहितच धरलेलं असतं. कारण पहिल्याला आधी नॉव्हेल्टी आणि मग नॉस्तॅल्जियाची वलयं मिळत जातात.
म्हणजे ज्याने अमिताभचा डॉन पाहिलेला आहे, त्याला शाहरुखच्या डॉनमध्ये 'वो बात नहीं' असं वाटणारच - काहीही करा!
त्यामुळे बहुधा ज्यांनी ओरिजिनल सिनेमे पाहिलेले नाहीत त्यांचं मत रीमेक्सच्या बाबतीत अधिक वेटेजसह ग्राह्य धरायला हवं असं मला वाटतं. Happy

अभिषेक बच्चन चा बी हॅपी बघितला प्राईमवर. छान आहे. त्या मुलीचं पण काम गोड आहे. थोडे आगाऊ सारखे संवाद आहेतच. पण तिच्या निरागसपणामुळे चालून गेलंय. अभिषेक सिंगल पॅरेंट दाखवलाय. त्या मुलीची आई अपघातात गेलेली असते. या छोटीला इंडियाज सुपर डान्सर बनायचं असतं. त्यासाठी वडिलांचा विरोध आणि आजोबांचा सपोर्ट या सगळ्ञातून शेवटी तिला अभिषेकची परवानगी मिळते. पण नंतर काय काय प्रॉब्लेम्स येतात ते कसे सोडवतात अशी स्टोरी. मधे मधे थोडा जड्/सेंटी झाला की मी पुढे ढकलत होते. पण बघितला शेवटपर्यंत. अभिषेक आणि ती छोटी त्यांचा एक डान्स मस्त आहे जोगवा टाईप्स.

कारण पहिल्याला आधी नॉव्हेल्टी आणि मग नॉस्तॅल्जियाची वलयं मिळत जातात >>> एग्झॅक्टली. पहिला अनुभव जी छाप सोडतो ती पुसणे सोपे नसते. विशेषतः जेंव्हा पहिला अनुभव दर्जेदार असतो.

प्रेक्षकही एवॉल्व होत जातात. कधी काळी प्रचंड आवडणारा दिवारचा 'मेरे पास मॉ है' हा संवाद आज मलाच प्रचंड हास्यास्पद वाटतो. जगताना नातेवाईक आणि पैसा दोन्ही लागतात. त्यामुळे असे डायलॉग जर आज कुणी लिहिले तर त्याची मस्त पिसे काढली जातील. पण त्या काळात अँग्री यंग मॅन ही संकल्पना नविन होती आणि त्या झंझावातात तो डायलॉग आवडून गेला होता.

अभिषेक सिंगल पॅरेंट दाखवलाय. त्या मुलीची आई अपघातात गेलेली असते. या छोटीला इंडियाज सुपर डान्सर बनायचं असतं. त्यासाठी वडिलांचा विरोध आणि आजोबांचा सपोर्ट या सगळ्ञातून शेवटी तिला अभिषेकची परवानगी मिळते. पण नंतर काय काय प्रॉब्लेम्स येतात ते कसे सोडवतात अशी स्टोरी.
>>
शिक्षणाच्या आयचा घो टाईप वाटतंय हे...

त्यामुळे बहुधा ज्यांनी ओरिजिनल सिनेमे पाहिलेले नाहीत त्यांचं मत रीमेक्सच्या बाबतीत अधिक वेटेजसह ग्राह्य धरायला हवं असं मला वाटतं >> फा ला पूर्ण मोडित काढले ईबा तुम्ही Lol

टेक्नॉलॉजी कार्टूनपटांना हानिकारक असते हे मला नाही पटलं. कोको, फाइंडिंग निमो, अप, श्रेक, मादागास्कर, आइस एज, फ्रोझन हे सगळे अमेझिंग चित्रपट आहेत. हे जुन्या रेखाचित्र फॉर्मॅट मध्ये इमॅजिन सुद्धा करू शकत नाही.

बाय द वे स्नो व्हाईट चं imdb रेटिंग पाहून या

म्हणजे ज्याने अमिताभचा डॉन पाहिलेला आहे, त्याला शाहरुखच्या डॉनमध्ये 'वो बात नहीं' असं वाटणारच - काहीही करा!
>>>>>>

घड्याळाचे काटे फिरले की वेगळे काहीही करायची गरज राहत नाही Happy

आताच्या जनरेशनला अमिताभचा डॉन इतका भारी वाटेल याची शक्यता फार कमी.

मला स्वतःला अमिताभचा डॉन हा काही पटींनी भारी वाटतो पण मी या जनरेशनचा नाही तर नाईनटीज किड आहे.

आमच्यासाठी जसा अमिताभ होता तसा आजच्या जनरेशनसाठी तो शाहरूख आहे.
त्या आधीचे अमिताभच काय जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल, संजय दत्त वगैरे कोणा हिरोचे पिक्चर बघण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो. त्या काळातले पिक्चर हल्लीच्या मुलाना मानवत नाहीत.

अजून एक बेस्ट उदाहरण म्हणजे अग्निपथ.
काय क्रेझ होती त्या पिक्चरची आमच्या काळात.
पण आजच्या मुलांना अमिताभचा नाही तर हृतिकचा आवडतो. आणि आधी त्यांनी हृतिकचा पाहिला तर विषयच संपला Happy

Meet John Doe (1941) पाहिला. ( Plex)
मै आजाद हूं चा मूळ पिक्चर. आझाद प्रमाणे इथे जॉन डो हे फिक्शनल कॅरेक्टर आहे. मै आझाद हूं नीटसा लक्षात नाही त्यामुळे तुलना करता येत नाही, पण त्याचं भारतियीकरण उत्तम होतं. मूळ ब्रिटीश पिक्चर अफलातून आहे. युट्यूबला १०८० पी कॉपी आहे. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट आहे.
https://www.youtube.com/watch?v=0v0bFoYxsfU

>>टेक्नॉलॉजी कार्टूनपटांना हानिकारक असते हे मला नाही पटलं. कोको, फाइंडिंग निमो, अप, श्रेक, मादागास्कर, आइस एज, फ्रोझन हे सगळे अमेझिंग चित्रपट आहेत. हे जुन्या रेखाचित्र फॉर्मॅट मध्ये इमॅजिन सुद्धा करू शकत नाही.>>
+१०००
मोआना १, मोआना २, मुफासा: द लायन किंग सारखे (मधल्या काळात पाहिलेले आणि प्रचंड आवडलेले) कार्टूनपट हे जुन्या रेखाचित्र फॉर्मॅट मध्ये इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. जुने कार्टूनपट वाईट होते असे अजिबात नाही, उलट ते पाहुनच तर अ‍ॅनीमेशनपटांविषयी गोडी निर्माण झाली, पण आताचे आधुनिक कार्टूनपट मात्र जास्तीच आवडु लागलेत 😀

Be Happy पाहिला. प्राईम - अभिषेक बच्चन आणि त्याची मुलगी.
फार म्हणजे फार आवडला
ज्यांचे मुलीवर, नाचावर आणि नाचणाऱ्या मुलीवर प्रेम आहे त्यांनी जरूर बघावा..
काय कमाल केमिस्ट्री दाखवली आहे बापलेकीत
नोराचे डान्स बोनस आहेत.

बी हॅपी मीपण पाहिला अभिषेक पेक्षा मुलीचं काम आवडलं नंतर नंतर थोडा पळवला पण एकंदरीत लहान मुलांना आवडेल असा आहे. शेवटचं गाणं खूप सेंटी आहे. अभिषेक type cast होतोय असं वाटतंय बापाच्या भूमिकेत लागोपाठ दोन चित्रपटात बाप म्हणून.

नेफी वर आल्या आल्या देवा पाहिला. सुरुवातीला नुसता शाहिद कपूरचा मार धाड पिक्चर असेल असे वाटले पण पुढे जाऊन तो एक गुंतागुंतीचा थ्रिलर बनतो. चक्क खिळवून ठेवणारा निघाला. खूप फास्ट पिक्चर नाहीये पण त्यांनी जी वळणं दाखवली आहेत ती जमून आलेली आहेत. शाहिद कपूर नेहमी प्रमाणेच बेस्ट! अगदी जीव ओतून प्रामाणिकपणे अभिनय करतो.

स्पॉयलर ------------------------

सुरुवातीलाच त्याची स्मृती जाते. त्यानंतर पिक्चर मध्येच फ्लॅशबॅक मध्येच रिअल लाइफ असा घडतो. तेव्हा त्याने नवीन शाहिद आणि जुना शाहिद यांच्यातला फरक मस्त दाखवलाय.

ऑफीसर नावाचा नेफ्लिवर ट्रेंडिंग असलेला पिक्चर पहायची चूक मी केली. तुम्ही करू नये असं सुचवीन.
साऊथच्या या अशा ना शेंड ना बुडखा सस्पेन्स थ्रिलर्सचा नॉशिया येऊ लागलाय. फक्त फ्लॅशबॅक्स आणि फ्लॅशबॅक्स.
आता सरळ रेषेतल्या कथा छान वाटू लागल्यात. हिंसेच्या दृश्यात किती हिंसा दाखवायची तरी नायककुमार लगेच नीट होतात.
अशा पिक्चरमधे इमोशनल कनेक्ट मुळीच नसतो. फक्त स्क्रीप्ट आणि टेक्नीक म्हणजे पिक्चर नाही हे साऊथवाल्यांना आता सांगायला पाहीजे.

मलाही 'मेहता बॉईज' विशेष आवडला नव्हता. काही प्रसंगांवर हसू आले पण चित्रपटाबद्दल येथे येऊन लिहावं असं वाटलं नाही. मला बोमन इराणी ओव्हररेटेड वाटतो, त्याचा अभिनय हावभाव लाऊड वाटतात. त्यापेक्षा अविनाश तिवारीचे (खाकी सिरीज फेम) काम आवडले होते. शेवटी शेवटी तो टिपिकल तरुण मुलाचे आणि ज्ये ना बाबांचे जमत नाही कारण बाबा विक्षिप्त व मुलगा आत्मकेंद्री, करिअर ओरिएन्टेड या वळणावर गेला. अगदी शेवटी बाबांच्या छोट्याशा टिपमुळे याचे ऑफिसातले अडलेले काम होऊन मराठी मालिकेतल्या प्रमाणे मिटींगमधे हा सगळ्यांना प्रभावित व अवाक करून सोडतो आणि बाबांची खरी किंमत कळते ई ई. त्यातल्या एका सीन मधे बाबा व मुलगा गाडीतून जात असताना, मुलगा ड्राईव्ह करत असतानाही फक्त त्याचे ड्रायव्हिंग सेफ नाही हे दाखवून द्यायला बोबा म्हणजे बोमनबाबा स्टीअरींग गरागरा वळवून हॅन्ड ब्रेक चालत्या गाडीत उचलून लावतात. तेव्हा तर रागाच्या भरात स्वतःचा व मुलाचाही जीवाची रिस्क घेणारा 'बापू सेहत के लिये तू तो हाणीकारक है' वाटलं.

'देवा' बद्दल काहीही कल्पना नव्हती. शाहिद कपूर खरंच जीव ओतून काम करतो. रेकोसाठी धन्यवाद धनि.

'बी हॅप्पी' मलाही पहायचा होता पण विसरून गेले होते. 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' सुरू केला, मग मधेच 'द रेसिडेन्स' ही नवीन विनोदी सिरीज चार एपिसोड पाहिली आणि नंतर रमडकृपेने 'जानी दुष्मन' पूर्ण पाहिला. असं काहीही चालू आहे. Happy

देवा पाहिला! शाहिद एके शाहिदच आहे...पण शेवट अगदिच " अरे अस कुठ असत का टाइप आहे" वेगळाच शेवट
बी हॅपी पाहायला सुरवात केली पण अभिषेक बच्चन फारच कटाळवाणा वाटतोय..एन्गेजिन्ग नाही वाटला..
रेसीडन्स मी पण ४ भागापर्यत आलिये...ती डिटेक्तिव्ह भन्नाट आहे.
जानी दुश्मन वाचायला सुरवात केलये..रमडने भन्नाट लिहलय..

तेव्हा तर रागाच्या भरात स्वतःचा व मुलाचाही जीवाची रिस्क घेणारा 'बापू सेहत के लिये तू तो हाणीकारक है' वाटलं. >>> इथे पोस्ट कोणाची आहे याचा अंदाज बरोबर आला Happy तोपर्यंत आयडी पाहिला नव्हता.

"किलर्स" मी तासभर पाहिला आहे. बघताना एंगेजिंग वाटला होता पण अजूनही पुन्हा लावून उरलेला बघावा असे वाटलेले नाही. इतर पर्याय समोर आले की त्याकडे दुर्लक्ष करून राहिलेला पिक्चर बघण्याइतके अपील वाटलेले नाही.

Prince of Egypt हा जुना ऍनिमटेड सिनेमा पाहिला. खुप आवडला.

इजीप्तच्या फॅरोने हिब्रू मुलांची कत्तल करण्याचा सपाटा लावला असतो. त्यामुळे एक बाई आपल्या बाळाला एक टोकरीत ठेऊन नदीत सोडते. तसेच, आईस विश्वास असतो की हाच मुलगा ज्युंचा तारणहार होईल. (ह्यांतून कर्णाची आठवण खास येते. हया प्रकारच्या कथेची पाळेमुळे गिलगमेश च्या कथेत सापडतात.)
तो मुलगा फॅरोच्या पत्नीस सापडतो आणि तो मुलगा, मोझेस, फॅरोचा मुलगा म्हणून वाढतो. प्रिन्स रामसेस आणि मोझेस ह्यांच्यात खुप घट्ट मैत्रीचे संबंध असतात.

पण तारुण्यात मोझेसला आपल्या जन्माबाबत सत्य समजते आणि हिब्रू लोकांच्या गुलामगिरीबाबत त्याला संताप येतो. त्यात त्याच्या हातून एक इजीपशीयन सैनिक मारला जातो आणि मोझेस राजधानीतून पळतो आणि मेंढपाळ म्हणून आयुष्य जगतो. पुढे हिब्रू देव त्याला हिब्रूनची गुलामगिरी संपवण्यास पुन्हा रामसे समोर धाडतो. मग पुढे काय होते त्याची कथा.

ही कथा जुन्या करारातील exodus हया प्रकरणावर आधारित आहे. त्यामुळे, ज्यू, ख्रिषचन आणि मुस्लिम तिन्ही लोकांना हया कथेवर कमी अधिक प्रमाणावर विश्वास आहे. हा सिनेमा बऱ्यापैकी ऍकयुरेटली बनवला आहे - त्यामुळे जुन्या करारातील अ-दयाळू, संतापी, कत्तलखोर देवाचे रूप सिनेमातून डोकावते.

ऍनिमेशन अत्यंत सुंदर आहे. खासकरून रेड सी पार्टींगचा सीन पारणे फेडणारा आहे. अवश्य पहा.

Pages