आजकाल आपण विविध समाजमाध्यमे, आंतरजाल यावर बरेच साहित्य/ लेख/ लिखाण वाचत असतो.
यावेळी त्या लेखनात आपल्याला आवडणारे, उपयुक्त, महत्वाच्या वाटणाऱ्या संदर्भाची साठवण तुम्ही कशी करता? बरेचदा हे लिखाण किंवा त्यातील संदर्भ त्यावेळी लगेच वापरात येत नाहीत. परंतु, नंतर भविष्यात एखादा लेख लिहीण्यासाठी किंवा त्या विषयाबाबत अधिक माहीती मिळविण्यासाठी हे संदर्भ उपयोगी पडतात.
असेही दिसून आले आहे की, आंतरजालावर उपलब्ध असणारे असे लिखाण किंवा त्यासंबंधीचे दुवे (link) कालांतराने निष्क्रीय होतात (उघडत नाहीत). अशावेळी तुम्ही ते साठवतानाच ती माहीती कॉपी पेस्ट करून साठवता का?
असे संदर्भ अकारविल्हे, विषयनिहाय साठवून ठेवता का?
मी माझ्यासाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप करून त्यात असे फॉरवर्ड, आंतरजालावरील लेखांच्या ऑडिओ /व्हिडिओच्या लिंक पाठवून ठेवतो. तरीही वेळेला हवं ते सापडत नाही.
तसेच छापील माध्यमाततील संदर्भ (वृत्तपत्र, मासिकातील लेख/ माहिती यांची कात्रणे), पुस्तकातील लेख (नाव, पृष्ठ क्रमांक) कसे साठवून ठेवता?
म्हणजे भविष्यात तो संदर्भ पाहीजे असल्यास लगेच सापडेल.
लिहून ठेवायचे वहीत.पुस्तकांची
लिहून ठेवायचे वहीत.पुस्तकांची नावे ,महत्त्वाचे नंबर अतिशय महत्त्वाचे वाटणारे संदर्भ लिहून ठेवायचे.कारण मोबाईल मध्ये सेव केलेले कधीही गायब होऊ शकते जसे की व्हॉट्सअँप उडालं , मोबाइल फॉरमॅट झाला ,हरवला ,चोरीला गेला.
मोठे लेख वगैरे लिहिणे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही पण त्यासाठी पीसी लॅपटॉप वर बुकमार्क करणे हाच ऑप्शन जास्त सोपा पडतो.
मी माझ्यासाठी एक व्हॉट्सॲप
मी माझ्यासाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप करून त्यात असे फॉरवर्ड, आंतरजालावरील लेखांच्या ऑडिओ /व्हिडिओच्या लिंक पाठवून ठेवतो.
>>>>>
मी सुद्धा अगदी हेच करतो.
पण हो, नंतर माझ्याही ते लक्षात राहत नाही. कधीतरी तो ग्रुप चाळून साफसफाई करून घेतो. महत्वाच्या वाटलेल्या गोष्टी पुन्हा त्याच ग्रूपवर फॉरवर्ड करून वर आणून ठेवतो.
मायबोली धागे आणि प्रतिसाद नावाचा देखील एक ग्रुप बनवला आहे जिथे धागे काढायची नोंद करून ठेवतो. पुढे सारे वरच्या पोस्ट सारखेच.
छापील माध्यमातील उप्युक्त
छापील माध्यमातील उप्युक्त वाटलेले विषयानुसार / लेखकानुसार सॉर्ट करून ठेवतो / ठेवायचो.
जालावरचं फक्त बुकमार्क करून ठेवायचो. आता फेसबुकवर audience - only me करून पोस्ट करून ठेवतो.
पण यांचा पसारासुद्धा विकत घेऊन अजून न वाचलेल्या पुस्तकांसारखा वाढतोच आहे.
कल्की, ऋन्मेऽऽष, भरत धन्यवाद.
कल्की, ऋन्मेऽऽष, भरत धन्यवाद.
मोबाईल मध्ये सेव केलेले कधीही गायब होऊ शकते>>>> हो, हे अनुभवले आहे.
मायबोली धागे आणि प्रतिसाद नावाचा देखील एक ग्रुप बनवला आहे जिथे धागे काढायची नोंद करून ठेवतो.>>>> ग्रेट.
छापील माध्यमातील उप्युक्त वाटलेले विषयानुसार / लेखकानुसार सॉर्ट करून ठेवतो / ठेवायचो.>>>> भारीच.
लिंक्स बुकमार्क करतो. काम
लिंक्स बुकमार्क करतो. काम झाले की काढून टाकतो.
काही नोंदी करायच्या असतील तर Apple Notes वापरतो.
त्यात पहिली ओळच डिफॉल्ट शिर्षक म्हणून सेव्ह होते म्हणून ती लिहितांना नंतर शोधायला सोपी पडेल अशी लिहितो.
उदा. हैदराबादी किस्से असे note title असेल तर आत काय असेल हे पटकन समजते. काम संपले की नोट्स डिलीट करतो.
लिंक्स सेव्ह करतो. पण तो
लिंक्स सेव्ह करतो. पण तो मजकूर सेव्ह करत नाही. कधीकधी लिंकबरोबर माझे त्यावेळचे पॉईण्ट्स लिहून ठेवतो.
कामाच्या क्षेत्रासंबंधी जे असते ते इतक्या लगेच (तुझ्या भाषेत) "निष्क्रीय" होत नाही - किमान त्याचा रिलेव्हन्स असेपर्यंत उपलब्ध असतेच. कारण ते बहुतांश अधिकृत साइट्स किंवा ब्लॉग्ज वरचे असते, व ते कधी गायब झाल्याचे आठवत नाही.
जनरल सोमिकरता वाचलेले वगैरे नंतर गायब होउ शकते. पण त्याकरता मी अजून वेगळे काही केलेले नाही.
धन्यवाद अनिंद्य, फारएण्ड.
धन्यवाद अनिंद्य, फारएण्ड.
काही नोंदी करायच्या असतील तर Apple Notes वापरतो.>> OK.
लिंक्स सेव्ह करतो. पण तो मजकूर सेव्ह करत नाही. कधीकधी लिंकबरोबर माझे त्यावेळचे पॉईण्ट्स लिहून ठेवतो.>>>> चांगली आयडिया.
कामाच्या क्षेत्रासंबंधी जे असते ते इतक्या लगेच (तुझ्या भाषेत) "निष्क्रीय" होत नाही - >>>>>
काही वृत्तपत्रीय बातम्यांच्या लिंक नंतर उघडत नाही असे घडले आहे.
किशोर मासिकातील निवडक लेखांची सेव्ह केलेली लिंक आता उघडत नाही.
कदाचित माझे टेक्निकल ज्ञान कमी पडत असेल.
थोडं विचित्र वाटेल पण मी
थोडं विचित्र वाटेल पण मी गुगलची उत्पादने जवळपास शून्य किंवा अतिशय कमीतकमी प्रमाणात वापरत असल्याने 'क्रोम' हा अनेकांचा आवडता किंवा नित्य वापरातला ब्राउझर पी.सी ,लॅपटॉप किंवा फोनवर डिफॉल्ट ब्राउझर म्हणून अजिबात वापरत नाही. आयफोनवरही फायरफॉक्स हा माझा एकमेव आवडता आणि भरोसेमंद ब्राउझर असून त्यातले 'पॉकेट' हे माझे अत्यंत आवडते एक्स्टेंशन!
संदर्भासाठी ज्या काही वाचनखुणा (बुकमार्क्स) साठवायच्या असतील त्या 'पॉकेट' मध्ये (नंतर शोधायला सोपे पडावे म्हणून विशिष्ट 'टॅग' सहित) सेव्ह करतो. नंतर कुठल्याही डिव्हाईस वरून त्या कधीही कुठेही पाहता/वाचता येतात. विशिष्ट टॅग्स दिलेले असल्यामुळे खंडीभर एन्ट्रीजमधून ते शोधायलाही अवघड जात नाही 😀
संजय भावे, माहितीसाठी धन्यवाद
संजय भावे, माहितीसाठी धन्यवाद.
संदर्भासाठी ज्या काही वाचनखुणा (बुकमार्क्स) साठवायच्या असतील त्या 'पॉकेट' मध्ये (नंतर शोधायला सोपे पडावे म्हणून विशिष्ट 'टॅग' सहित) सेव्ह करतो. >>>>> याबाबत तुमच्याकडून अधिक माहिती घेतो.
मी एक ms word डॉक्युमेंट
मी एक ms word डॉक्युमेंट केलेय. त्यात वेगवेगळी शिर्षक दिलेत विषयवार, त्या खाली लिंक व तिची संक्षिप्त माहिती लिहितो. त्या फाईलचं नावच माझ्या लिंक्स असे आहे.
याची प्रिंटही घेऊन ठेवता येते.
फाईलचं नावच माझ्या लिंक्स >>>
फाईलचं नावच माझ्या लिंक्स >>>> मस्त.
याची प्रिंटही घेऊन ठेवता येते.>>> 👍
हे Excel, Access, word table
हे Excel, Access, word table मध्ये sort सुध्दा करता येईल.