केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या भाषांना आज अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे.
याआधी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि उडिया या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता.
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीचे निकष -
1) भाषेचे साहित्य हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
2) भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने होणारे फायदे -
1) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
3) अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
थोडक्यात सांगायचे झाल्यास मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठी भाषेचा अभिमान असलेल्या प्रत्येकाला ही बातमी आणि या घटनेचे महत्त्व समजायला हवे असे वाटल्याने वरील माहिती गुगल करून शोधली आहे.
सर्वांचेच अभिनंदन
हो. तोही आहेच.
हो. तोही आहेच. १ मे राज्याचा स्थापना दिन असल्याने तो साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाचा काही वेगळा सोहळा असतो का याची कल्पना नाही.
त्या लेखाच्या शीर्षकातच
त्या लेखाच्या शीर्षकातच सरांनी मराठीला तिची जागा दाखवून दिली आहे.
>>>>
म्हणजे? कुठली जागा आणि कशी दाखवली?
.
मराठी दिवस आला त्याला सर दोष देतात.
>>>>
दोष
मायबोलीकरांना इसापनीती
मायबोलीकरांना इसापनीती नव्याने आठवून देण्यासाठी इथं त्याचा जन्म झाला आहे. आता थोड्यावेळातच अख्खा जाहीरनामा गुंडाळून “तुम्हाला माझा रोल मिळाला असता तर तुम्हीही हेच केलं असतं“ असं जुवेकर स्टाईल उत्तर देतो की नाही बघा तो
लिहायचे आहेच. मलाच इच्छा आहे.
लिहायचे आहेच. मलाच इच्छा आहे.
पण मराठी दिवसाच्या धामधुमीत ते उचित वाटले नाही. आणि त्यानंतर सध्या घरात रंगकाम सुरू आहे. पुराव्यासाठी फोटो टाकू शकतो. पण गरज नसावी. ते संपताच पुढच्या आठवड्यात मुलीचा वाढदिवस. आमच्याकडे तो एक उत्सवच असतो. त्यासाठीच रंगकाम सुरू आहे. परत या आठवड्यात होळी आणि रंगपंचमी. वीकेंडला माझी फुल बॉडी चेकिंग. या सगळ्यात ऑफिस कामाला एका दिवसाची सुट्टी नाही. व्यस्त तर आहेच. पण आता जास्त ताणायच नाही याचीही कल्पना आहे. बघतो कसे जमते तसे जमवतोच लवकरात लवकर...
व्यग्र
व्यग्र
व्यग्र उग्र वाटतो, तर व्यस्त
व्यग्र उग्र वाटतो, तर व्यस्त मस्त. उग्र प्रेम करू नका, मस्त प्रेम करा.
मराठीवर म्हणतो मी.
कामात व्यग्र की कामात व्यस्त?
कामात व्यग्र की कामात व्यस्त?
की दोन्ही बरोबर?
जो शब्द बरोबर आहे तो वापरेन या पुढे..
व्यग्र उग्र वाटतो, तर व्यस्त मस्त. >> हो हे खरोखर तसे वाटते
कामात व्यग्र√ की कामात
कामात व्यग्र√
की कामात व्यस्त?व्यस्त म्हणजे inversely
व्यस्त म्हणजे inversely related. व्यस्त प्रमाण गणितात वापरतात.
हिंदीत व्यस्त म्हणजे मराठीत व्यग्र.
मराठी दिवसाच्या धामधुमीत ते
मराठी दिवसाच्या धामधुमीत ते उचित वाटले नाही?? उद्या म्हणशील गणपतीत गणपती आणि नवरात्रात दांडिया हे काय खरं नाही. दोन्ही एकदम दिवाळीत करू!!
असो. विषयाबाहेरचे प्रतिसाद फुगवून मनाइतके झाले असतील तर उगाच काय लिहितोस इथं? नवीन धाग्यावर लिही. तो धागा मराठीप्रेमाचाच हवा असंही काही नाही. ते प्रेम एव्हाना कळलंच आहे, त्यामुळे त्याची गरजही नाही.
सर, सावकाश लिहा. इथे आधी
सर, सावकाश लिहा. इथे आधी कोणीतरी लिहिलं तसं मराठी भाषा दोन हजार वर्षांपासून आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून तिने दहा वर्षे वाट पाहिली. तुमच्या लेखासाठी आणखी थोडी वाट पाहील.
खरं तर मराठी भाषा गौरव दिनाच्या मायबोलीवरील उपक्रमाच्या संयोजकांनी तुमच्याकडूनच विशेष लेख लिहून घ्यायला हवा होता. इथे हजारोंनी सदस्य आहेत. पण मराठी भाषा अभिजात घोषित होताच धागा काढला कोणी ? तुम्ही! तेव्हा तुमचेच मराठी भाषेवर सर्वाधिक प्रेम आहे. जर तुम्ही आणखी १०-११ महिने लेख नाही लिहिला तर पुढल्या वर्षी तुमच्याकडून लेख मागवायला मी संयोजक मंडळात नक्की जाणार!
लिहायचंच असेल आणि घरात रंगकाम सुरू आहे तर तुमच्या घराजवळ इतकी निसर्गरम्य ठिकाणं आहेत, तिथे जाऊन लिहा, असं मी म्हणणार नाही.
इतर कामांतून शर्माजींसाठी लोकांच्या अंगावर धावून जायला वेळ कसा मिळतो, असंही मी विचारणार नाही.
तुमच्या घरातल्या लहानसहान कामांसाठी तुम्ही मायबोलीवर धागा काढता. पण रंगकामासारखं महत्त्वाचं काम काढताना मायबोलीवर धागा न काढण्याइतकी तुम्ही मायबोलीवर माया पातळ केलीत का असाही प्रश्न मी विचारणार नाही.
आणि तुमची फोटो टाकायची हौस इतकी दांडगी की त्यासाठी तुम्हांला तुमच्या इतर आयडींचा आधार घ्यावा लागतो, तरीही तुम्ही इथे फोटो टाकत नाही म्हणता हे वाचून तर मी सद्गदित झालो असेही म्हण्णार नाही.
सावकाश होऊ द्या सर. काही घाई नाही. त्यानिमित्ताने तुमच्या या धाग्यावरच्या प्रतिसादांची संख्या वाढत राहील, हे तुम्हांला नक्कीच आवडेल.
पण प्रेम असले म्हणजे निबंध
पण प्रेम असले म्हणजे निबंध लिहिला पाहिजे असे थोडीच आहे.
आता हेच बघा ना. पाकिस्तान मुर्दाबाद! इंग्लंड मुर्दाबाद!
ते गोरे, पाकिस्तानी किती मूर्ख हे दाखवणारे विनोद केले की आपली देशप्रेम कसे निर्विवाद सिद्ध होते आणि स्फूर्ती चढते आपल्याला. कोणी सांगितलंय की त्यासाठी देशावर प्रेम का आहे यावर निबंध लिहायला पाहिजे? आणि समजा लिहिलाच तरी चार दिवस ओसरल्यावर पुढे काय? प्रेम म्हटलं की सारखे उतू येणारच. आयुष्यभर निबंध लिहित बसायचे का?
तसेच इतर एक दोन भाषा धरून त्यांचा उद्धार वेळोवेळी केला, त्यांची खिल्ली उडवणारे विनोद केले आणि आपली भाषा कशी एकमेव आहे, अमुक फक्त मराठीतच, असले फॉरवर्ड्स उचित प्रसंगी शेअर केले की झाले ना. आपल्या भाषेवर प्रेम निर्विवाद सिद्ध होते, होत रहाते आयुष्यभर.
सकाळी चहा घेताना कप हातातून
सकाळी चहा घेताना कप हातातून निसटला,
पण मी तो पडू दिला नाही,
हसत बायकोकडे बघत म्हणालो ,
*"वाचला"*
बायको म्हणाली "वाचला" नाही...
*"वाचलात"!*
एकाच शब्दामधला *"त"* चा फरक
पण दहशत जाणवून गेला !!!
अशी ताकत फक्त मराठीतच!
*मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
-------------
हा एक नमुना.
खालची ओळ प्रसंगौचित्यानुरूप बदलावी किंवा नाही बदलली तरी चालते.
>>> अशी -- 'ताकत' -- फक्त
>>> अशी -- 'ताकत' -- फक्त मराठीतच!
मस्त
Pages