Submitted by रसरंगी on 2 March, 2025 - 08:44
कठीण निर्णय होता. पण काय करणार?
शेवटी आपलीच मुलगी. आई वडील म्हणून आपण जितकं समजवायचं ते सगळं केलं.
तिचीच तीव्र इच्छा होती की तिला मुलगी नाही तर मुलगा बनायचंय.
म्हणूनच आपण त्याला मान्यता दिली. ती म्हणाली तिचं स्वप्न ती मुलगा बनूनच पूर्ण करू शकेल.
आज आपल्या मुलीचं एका मुलामधे यशस्वीपणे परिवर्तन झालं आहे.
आपण अजूनही त्याचा उल्लेख 'ती' असाच करतोय.
तोंडात बसलंय ना. पण प्रयत्न करू संबोधन बदलायचा. नावही बदलायला हवं. लोकांनाही सांगायला हवं. काय लपवणार?
काय ठेवूया नवीन नाव?
अगदी नवीन नको. आधीचंच थोडं बदलूया. शिखंडीनीचं शिखंडी करूया. पांचालनगरीत आजच दवंडी पिटवतो की प्रजेने राजकुमार शिखंडीला योग्य मान द्यावा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त! संदर्भ आवडला.
जबरदस्त! संदर्भ आवडला.
शशक स्पर्धा मतदान यादीत या शशकचे नाव दिसले नाही.
ही शशक मुदत संपल्यानंतर आली
ही शशक मुदत संपल्यानंतर आली आहे, म्हणून यादीत नाही.
ही शशक मुदत संपल्यानंतर आली
ही शशक मुदत संपल्यानंतर आली आहे, म्हणून यादीत नाही.>>
सॉरी ते लक्षात नाही आलं. १ मार्च पर्यंत मुदत होती का?
जबरदस्त! संदर्भ आवडला.>.
जबरदस्त! संदर्भ आवडला.>.
धन्यवाद!
ही शशक मुदत संपल्यानंतर आली
ही शशक मुदत संपल्यानंतर आली आहे, म्हणून यादीत नाही.>>
हो हे माझ्या नंतर लक्षात आलं. मला वाटतं २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत होती पण शशक मतदान यादीत १ मार्चच्याही शशक दिसताहेत.
मस्त! आवडली..
मस्त! आवडली..
पण शिखंडी याचे उलटे होते ना.. म्हणजे पुरुषाच्या शरीरात एक स्त्री अडकली होती ना..
मला वाटतं २८ फेब्रुवारी
मला वाटतं २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत होती पण शशक मतदान यादीत १ मार्चच्याही शशक दिसताहेत.
>>>>
मतदानाचा धागा काढण्याआधी ज्या आल्या होत्या त्या सर्व घेतल्या.
माझी शतक सुद्धा एक मार्चला आहे पण मतदान धागा यायच्या आधी.
मला तर 28 फेब्रुवारी लास्ट डेट आहे याची कल्पना सुद्धा नव्हती.
निसर्गाचा लेख तर मी वीकेंडलाच लिहिणार होतो. विकेंड मुदतीत असणार असे धरूनच चाललो होतो. कारण वीक डे मध्ये कामात वेळ कुठे काढणार.. त्यामुळे तो लेख देखील रविवारी रात्री प्रकाशित केला. अर्थात ती स्पर्धा नव्हती.