Submitted by पुरंदरे शशांक on 26 February, 2025 - 00:24
निळे जांभळे
निळे जांभळे रेखिलेसे रुजामे
फुलांनी किती भव्य पायातळी
झर्यातून काही खळाळे खुळावे
कसे बिंबते दर्पणाचे मनी
फुले साजिरी सोनकीही भरारे
लकाके तरी कंच पाचूवरी
कुठे शीळ वृक्षावरी ही सुखावे
मना घेउनी जातसे अंबरी
निळे मोकळे थेट आभाळ जागे
जरा मेघ कोठे खुळावे वरी
कडा डोंगराच्या खूणावून जाती
दरी काजळीची विसावे उरी
कुठे दर्पणी बिंब झाके रवीचे
तडागे नुरोनी अती देखणी
कशीदा कुणी काढिला नक्षीवाणी
कसे रान डोले वरी मन्मनी
.................................................................................
रुजामे....गालिचे
सोनकी...श्रावण, भाद्रपदात माळरानावर फुलणारी पिवळी गवतफुले
पाचू....हिरव्या रंगाचे रत्न
अंबर....आकाश
झाकणे....डोकावून पहाणे
तडाग...तळे, जलाशय
नुरोनी...न उरोनी
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहाहा..!!
अहाहा..!!
अहाहा..!! >> +1
अहाहा..!! >> +1
खूप छान.
खूप छान.
सोनकी हे नाव माहीत नव्हते.
खूपच सुंदर कविता.
खूपच सुंदर कविता.
दहावीच्या पेपरला पाठ्य पुस्तकाबाहेरील कविता यायची , (अन्सिन पोएम )...तसे वाटतेय.
वा! काय सुरेख लयबद्ध
वा! काय सुरेख लयबद्ध शब्दचित्र उभं केलंत.
कडा डोंगराच्या खूणावून जाती
दरी काजळीची विसावे उरी. >>>> आहा!
खूप छान!
खूप छान!
मस्तच!!
मस्तच!!
शशांक, अतिशय देखणी झाली आहे
शशांक, अतिशय देखणी झाली आहे कविता.
श्रावणातल्या कास पठाराचे काव्यचित्र आहे माझ्याकरता हे.
व्वा फारच सुंदर... निसर्ग
व्वा फारच सुंदर... निसर्ग चित्र काव्य...
सुंदर कविता.
सुंदर कविता.