माझं त्याच्या आयुष्यात येणं ही पूर्वनियोजितच होत्त. हां तसा थोडा उशीर झाला जरा लवकर येता आलं असतं तर त्याला अजून समजून घेता आलं असतं आणि कदाचित कथेचा शेवट त्याला त्याच्या रीतीने करता आला असता आणि ती कथा तुम्हाला आम्हाला वाचायला मिळाली असती. पण या सर्व जर तर च्या गोष्टी खरंच त्याला कथा संपवायची होती का ही त्याचा तोची जाणे. खरतर तुम्हा सर्वानाच उत्सुकता असेल की कवठीचाफाला ओळखणारी ही आसामी कोण? पण त्याच्या प्रमाणेच मला ही अनभिज्ञ राहून माझा त्याच्याबद्दलचा दृष्टिकोण सांगायला आवडेल. हा दृष्टिकोण सगळ्यानाच आवडणार नाही पण मी जेवढा त्याला जवळून पाहिलंय तितका तुम्ही कोणी नसेल अनुभवला. कवठीचाफा जस तुमच्या आयुष्याचा रहस्य होता तसंच आमच्या साठी पण तो एक रहस्य म्हणूनच राहिला. त्याने आयुष्यात असंख्य चुका केल्या पण त्याच्या चुकांची झळ कधी त्याने दुसऱ्याला बसू नये याची काळजी घेतली. हे जरी असलं तरी त्याची ती एक चूक हो आपण आता तिला चुकच म्हणूया तिने त्याचा शेवट त्याच्या हातातून हिरावून घेतला. त्याला त्याचा शेवट इतक्या लवकर व्हावा अशी इच्छा नव्हती, होय त्याचा शेवट होणारच होता कदाचित ही खूणगाठ त्याने आधीच दर्शवलेली पण तो इतक्या लवकर होईल आणि त्याचे काम अपूर्ण राहील असे त्याला खरंच वाटले नव्हते पण शेवटी करत्यास आपण नाकारू शकत नाही आणि इथला कर्ता त्याचा मरण आधीच निश्चित करून आलेला होता.
माझं आणि त्याचं नात वेगळ होतं. जसा त्याच्या आजूबाजूच्या प्रतेयकाचा त्याच्याबद्दल एक विशिष्ट दृष्टिकोण होता तसा माझा खचित नव्हता. इतक्या वर्षात त्याला जवळून पहिल्या नंतर एक गोष्ट मात्र नक्की कळली की त्याच्या कथा प्रमाणे त्याचे आयुषयाही तितकेच रहास्यमई ठेवायचे होते. अगदी त्याचा जाणं सुद्धा एक अनाकलनीय रहस्यच आहे. इतका हसरा,बुद्धिमान सुंदर असा हा आसामी असा अचानक जगापासून संबंधच कसा तोडून बसला? आता तुम्ही म्हणाल ही मला दिसत असून उमगत असून मी का नाही मध्ये पडले? उत्तर सोप आहे जे त्याच्या सारख्या माणसाला नाही जमले तिथे मला काय जमणार होते? तो परिस्थिति आणि त्याच्या चुकी पुढे हतबल होता कारण एकदा चूक झाली की तिथून माघार घेणं त्याच्या तत्वात बसत नव्हत. त्याला वाटल की तो यातून बाहेर पडू शकेल पण बाहेर जाण्याचे दरवाजे करत्याने बंद केलेले त्याला दिसलेच नाहीत किंबहुना दिसूनही त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणाला आवाज दिला नाही. कारण त्याला माहीत होते एकाच जाणं सगळ्यांच्या मरणापेक्षा बरे. तो कधी गप्पा च्या मूड मध्ये असला की मला सांगत असे, माझं गूढ मी गेल्या नंतरच तुम्हाला उकलेल पण त्यासाठी त्याने मरायलाच हवे का असे मी नेहमी त्याला विचारात असे त्यावर हसून तो विषय सोडून देत असे.
ती चूक जेव्हा आमच्या आयुष्यात येत होती तेव्हा तिचे अभद्र संकेत आम्हाला सर्वाना दिसत होते पण त्याकडे सर्वानी दुर्लक्ष केले कारण प्रयतेक गोष्टीकडे तिराहीताच्या नजरेने बघण्याचा आमचा स्वभाव नाही त्याचा होता का हे जवळ असून मला कधी कळले नाही. तिची काळी नजर, ते बुभुक्षित डोळे सतत काहीतरी शोधत असायचे. तिच्या जिभेला जरी रक्ताची चटक लागलेली असली तरी शब्द मात्र तोलून मापून आणि मधाळ वापरायची. तिची काळी सावली जरी प्रतेकला जाणवली असली तरी तिच्या डोळ्याच्या डोहातून पाहेर पडायची कोणाची हिम्मत नव्हती अगदी त्याचीही नाहीच. अंतर्मनाला सतत जाणवत असे की हे वाईट आहे आपण असा नको बोलायला वागायला तरी नकळत शरीर भारावल्यासारख वागत असे. तिच्या मते ती सोडून बाकी कोणीही सुखी नसायला हवे. जो जो तिच्या काचाट्यातून बाहेर पडायला बघे त्याच्याबद्दल बाकीच्याच्या मनात ती द्वेष तयार करे. ती वावटळी सारखी आयुष्यात आली आणि आम्ही तिच्या कचाट्यात अलगद सापडलो. जेव्हा मान काढून स्वताला सोडवण्यासाठी धडपड केली तेव्हा ती वावटळ ज्याचा बळी घेण्यासाठी आलेली त्याला घेऊन निघून गेली. तिचे संकेत मिळाले जरी असले तरी तिच्या मायजाळात अडकलेल्याना मात्र ते दिसलेच नाही. त्याला मात्र संकेत स्पष्ट दिसलेले आणि तो म्हणायचं सुद्धा की ही माझं बळी घेऊनच शांत होणार. आता ती वावटळ शांत आहे असे मी म्हणणार नाही कारण एक बळीने तिचे काळीज काही थंडावू शकत नाही. तिची आता उरलेल्यावर नजर आहे.
सरते शेवटी एवढंच सांगायचय की कल्पनिकता आणि सत्यता या मधील रेघ फार पुसटशी आहे जो जाणकार आहे त्याला ते कळेल अन्यथा कल्पनिकतेला सत्य समजणारे तुम्ही पहिले नाहीच!!
कवठीचाफा
Submitted by मृदगंध on 28 February, 2025 - 01:29
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कथेचे नाव वाचुन कवठीचाफाच
कथेचे नाव वाचुन कवठीचाफाच आठवला
पण म्हटले तसे नसणार, ही कवठीचाफा फुलाची गोष्ट असणार..
फारसे काही कळले नाही पण इतक्या सुंदर गोष्टी लिहिणार्याने आपल्या आयुष्याची गोष्ट अशी दुसर्या कोणाला लिहायला द्यायला नको होती असे वाटले. नियतीपुढे कोणाचे काय चालते…
कवठीचाफ्याला मनापासुन श्रद्धांजली. जिथे असेल तिथे सुखात असुदे.
आईगं. हे खरंच कवठीचाफ्याबद्दल
आईगं. हे खरंच कवठीचाफ्याबद्दल आहे? वाचून वाईट वाटले.
आपल्या आयुष्याची गोष्ट अशी
आपल्या आयुष्याची गोष्ट अशी दुसर्या कोणाला लिहायला द्यायला नको होती असे वाटले.>>> +१११११ अगम्य गूढ भाषेत काहीतरी खरडलंय. माणूस गेल्यावर हे असलं कायतरी कसं काय लिहवतं?
बोकलत, माणुस ताणाखाली असतो,
बोकलत, माणुस ताणाखाली असतो, जीवलग गेल्याने सैरभैर झालेला असतो. त्यांना जसे हवे तसे लिहु द्या. तुम्ही कृपया तुमची कमेंट सध्या एडिट केल्यास बरे होईल.
कवठीचाफा म्हटले की हा
कवठीचाफा म्हटले की हा मायबोलीकर कवठीचाफाच आठवतो.. _/\_
माबोच्याच कवठीचाफा बद्दल
माबोच्याच कवठीचाफा बद्दल लिहिले आहे की. वाईट वाटले वाचून. तुम्हाला यातून लवकर सावरण्याचे बळ मिळो!
जवळची व्यक्ती अकाली जाणे, आपल्याला इच्छा, कळकळ असूनही काहीच न करता येणे फार निराश करणारे असते. प्रत्येकाची त्यातून सावरण्याची प्रोसेस वेगळी असते. मृद्गंध यांना ते अशा प्रकारे इथे एक्सप्रेस करावेसे वाटले तर इट्स ओके.
कवठीचाफ्याला मनापासुन
कवठीचाफ्याला मनापासुन श्रद्धांजली _/\_
काय लिहिलंय ते कळालं नाही,
काय लिहिलंय ते कळालं नाही, उमगलं नाही.
स्पष्ट तरी लिहा ना?
काहीतरी चुटपुट नका लावू.