मभागौदि २०२५ शशक - रिपुदमन- हह

Submitted by हह on 27 February, 2025 - 07:56

'घु  घु  घु आवाज सारखा का येत आहे....किती लाऊड आवाज...इतके काळे काळे धूसर दिसतय...ओठाला इतकी कोरड का पडलीये...कसला कुबट वास मारून राहिला आहे यार...ओह्ह शिट्!'

समोर रोल केलेला जॉइन्ट..अर्धवट जळालेली थोटके..रिकामी बाटली. इतक्या दिवसानी पुन्हा त्याच जुन्या चक्रात. खाडकन उठून उभा राहिला तो.

'सकाळी कौशल आनंद प्रॉडक्शनच्या स्क्रीन टेस्ट साठी गेलेलो.
तोंडावर असिस्टंटने म्हंटले बॉडी अच्छा बनाया है, but we are looking for actors!'

पुन्हा ते आठवून त्याच्या डोक्यात सणण झाले. गच्च मूठ आवळून खोलीतल्या बॉक्सिंग बॅग वर एक जोरात पंच मारला त्याने.

'हा ब्रेक मिळाला असता तर आपण जिम ट्रेनर पासुन थेट bollywood सेलेब्रिटी...पण साला पुन्हा रिजेक्ट!
पुन्हा उद्या सकाळ पासून 1-2-3-4...inhale..exhale...चाळीशी पन्नाशीच्या गळेपडू आंटयांची थुलथुल ढेरपोटे.. त्यांच्या बकवास घरगुती गॉसिप ना लेम हसणे. Repeat 1-2-3-4...inhale.. exhale.
नो मोअर धिस ब्लडी बुलशिट् यार!'

सकाळी त्याच्या समोर बसलेल्या त्या काटकुळ्या बंगाली मुलाची निवड झाली होती.

'काय नाव सांगत होता? हा..रिपुदमन! त्याच्यासारखा आपला बाप पण ह्याच इंडस्ट्रीत हवा होता!'

पंखा मोठा करत, त्याने घामट टीशर्ट आणि जीन्स काढून टाकले. समोर आरशात बघत मसल फ्लेक्स केले. आपले रुंद खांदे, भरदार छाती..कोअर टाइट करुन पोझ घेतली..भरगच्च मांड्या आणि प्रमाणबद्ध कमावलेले स्नायू बघून तो खूष झाला. स्वतःच्या देखण्या रूपाचा त्याला प्रचंड अभिमान वाटला. अंडरवेअर किंचित खाली ओढत एक सेक्सी स्माईल देउन त्याने एक सेल्फी घेतली. इंस्टा वर एक आणखी thirst trap.  पण पुढच्या पाच मिनिटात त्यावर येणार्‍या त्याच त्या likes .. जाळ आणि बदाम छाप कॉमेंट्स बघत त्याला उबग आला.

'काहीतरी नविन थ्रील हवेय यार आयुष्यात. ह्या नुसत्या emojis घेऊन काय झाट अमिर बनणार आपण!
काहीतरी असे हवे जे फटाफट फेमस बनवेल. In real life स्टार..सेलेब्रिटी नाही तर इंटरनेट स्टार तरी यार...or may be a pornstar?'

काही सुचेना..झरझर मोबाइलवर स्क्रोल करायला लागला तो. मोबाइल स्क्रीन वरच्या असंबद्ध रिल..अन शेवटी ब्राउसर उघडून त्याने टाइप केले Onlyfans.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त! Happy
जाळ आणि धूर बदाम संगाटच! Proud
हो - त्रिशशक मारलेलं दिसतंय. Proud

अरे ते सगळे Shadripu कथेत घेऊन लिहू असे डोक्‍यात होते त्यामुळे जास्त झाले शब्द.
संयोजक एंट्री बाद केली तरी माझी हरकत नाही.

खूप दिवसांनी दिसलीस, हह! Happy

शशक नसली तरी कथा छान. शशक केली असतीस तर अजून भारी वाटली असती.
बर्‍याच दिवसांनी हह टच वालं काहीतरी वाचायला मिळालं. छान वाटलं Happy