Submitted by भास्कराचार्य on 26 February, 2025 - 04:39
टिजिआयेफच्या फणकाऱ्यातच ती बारमध्ये येऊन बसली. तिच्यासारख्या रूपगर्वितेशी कोणीतरी बोलायला येणारच की! स्वतःशीच खूश होत तिने बारकडे मान वळवली. तिला पित बसलेला तो दिसला. ती थबकली. त्याला हाक मारावी का? पण इगो! "झक मारत येईल की!" पण ही कोण नालायक? त्या दोघांना इतक्या जवळ आलेलं पाहून तिला सुचेनासंच झालं. मन ताळ्यावर येतंय तोवर ती हरामखोर त्याला घेऊन चक्क बाथरूममध्ये..! भरभर ही त्यांच्यामागे गेली आणि स्टॉलमधला वखवखलेला प्रणय फटीतून बघायला लागली. अचानक त्याचे काळेभोर डोळे तिच्यावर स्थिरावले. ते डोळे आता तिचे कधीच नाहीत? कधीच?? "तो माझा आहे!" संतापाच्या भरात ती बाहेर येऊन गाडीसमोर कधी आली हे तिचं तिलाही समजायचा प्रश्नच नव्हता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह! जमलीय.
ओह! जमलीय.
समजलीय अस वाटतं..!
समजलीय अस वाटतं..!
धन्यवाद मानव.
धन्यवाद मानव.
आबा, तशी सरळच कथा आहे की.
छान!
छान!
मस्त!
मस्त!
मस्त
मस्त
धन्यवाद!
धन्यवाद!