मभागौदि २०२५ - शशक - नको रे मना मत्सरू - अनन्त्_यात्री

Submitted by अनन्त्_यात्री on 26 February, 2025 - 04:21

माझ्या पाच शशकांना मिळून जितके प्रतिसाद नाहीत त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद त्या महामायेच्या एकमेव शशकला? प्रतिभेची पारखच नाही कुण्णाला उरलेली.

काय नाहीये माझ्या पाच शशकांत?

माझी "काम" शशक वाचून खजुराहोची मैथुनशिल्पं पेन्शनीत जातील. "क्रोध" वाचून शिवशंभू तृतीयनेत्र गॉगलवतील. "लोभ" वाचून कवडीचुंबकही लंगर उघडेल, "मोह" वाचून भस्मासूर मोहिनीअट्टम विसरेल. "मद" वाचून ट्रम्पतात्याही सर्वोदयी होतील. पण माझी गाडी मत्सराशी अडलीय कारण मला मेलीला मत्सर म्हायतीच नाय ना.

आता "मत्सर" शशक लिहिण्यासाठी इतर शशक "लिहिण्या"पूर्वी लावला तसा कौल डीपसीकला लावला

पण मग आठवलं की त्यालाही बिचाऱ्याला मत्सरस्पर्श झालेलाच नाहीय.

मग आता जाते
चॅट जीपीटीच्या वाटे
जे डीपसीकचा मत्सर करते ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हा हा छान आहे.

"मोह" वाचून भस्मासूर मोहिनीअट्टम विसरेल. >> Lol

Lol

छान...