
पत्रापत्री
—------
नावाप्रमाणे ही पत्रापत्रीच आहे, म्हणजे माधवराव आणि तात्यासाहेब ह्या दोन साठीतील (अंदाजे) निवृत्त मित्रांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे आणि त्या पत्रांतून उलगडत गेलेल्या घटना, माणसं, कुटुंब, कुटुंबीय आणि पर्यायाने सामाजिक परिस्थितीचा, सामाजिक मनस्वास्थ्याचा आरसा!
आता कोणालाही वाटेल, पत्र व्यवहार - तीही प्रेमपत्रंही नव्हेत, म्हणजे किती रुक्ष. पण पत्रापत्री लिहिली आहे खुद्द दिलीप प्रभावळकरांनी - ज्यांनी डायरी म्हणजेच अनुदिनीला (गंगाधर टिपरे) एव्हढ लोकप्रिय केलं.
नर्मविनोदी शैली, विसंगती आणि विरोधाभासावर मारलेल्या कोपरखळ्या, माणसाच्या स्वभावाचे विविध कंगोरे अशा पैलूंनी नटलेली ही पत्रापत्री अतिशय मनोरंजक आहे.
तात्यारावांचा परदेशवारीचा किस्सा तर लाजवाब! ऐकताना अपूर्वाईची आठवण येते. आज जर पुलं असते तर अपूर्वाईत कदाचित असही एखादं प्रकरण समाविष्ट झालं असतं, असा विचारही एखाद क्षण मनात येऊन गेला. कदाचित पुलं आणि दिलीप प्रभावळकर दोघंही आवडत असल्यामुळे असेल पण त्यांच्या शैलीत समान सूत्र सापडतं.
पत्रापत्री आधी स्टोरीटेलवर (मोबाईल ऍप) दिलीप प्रभावळकरांच्या आवाजात ऐकलं.अर्थात् अतिशय आवडलं.
त्यामुळे इकडे प्रयोग येणार म्हंटल्यावर न जाण्याचा प्रश्नच नव्हता.
हा प्रयोगही रंगतदार झाला आहे. दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे हे दोन प्रतिभावंत कलाकार दोन-सव्वादोन तास प्रेक्षकांनी खिळवून ठेवतात.
दोघंही उत्तम कलावंत असल्यामुळे एक पत्र वाचत असताना त्यावेळी दुसऱ्याच्या रिऍक्शनही बघण्यासारख्या आहेत.
९५ वर्षांच्या दादोबांच्या आवाजातील कंपनं, हातातील थरथर प्रभावळकरांनी उत्कृष्ट दाखवली आहे. अभिवाचनाचा एक उत्तम नमुना वाटला.
व्यक्तीशः मला दिलीप प्रभावळकरांच्या आवाजातील ऑडिओ बुक ( storytel app वरील पत्रापत्री) जास्त आवडलं. एक तर ते जास्त विस्तृत - चार तासांचे आहे. कदाचित पुस्तक ( श्राव्यस्वरूपात असली तरी) माध्यम मला जास्त जवळच वाटत हे ही एक कारण असावं. स्वतंत्रपणे पुस्तक ऐकताना त्या लयीत, जगात हरवून जायला होतं. उलट नाट्य/ अभिवाचन सगळ्यांबरोबर ऐकताना ती लय तुटल्यासारखे वाटत होते, तसेच काही विनाकारण /जास्तीचे लाफ्टरस् व्यत्यय वाटत होते.
निखळ मनोरंजन देणारा पत्रापत्रीच प्रयोग तुमच्या जवळच्या ठिकाणी येणार असेल तर जरूर बघा. नाहीतर storytel वर ऑडिओ बुक ऐका. किंवा पुस्तक घेऊन वाचा.
----
हा धागा पत्रापत्री किंवा दिलीप प्रभावळकरांच्या इतर कलाकृतींसाठी वापरता येईल.
अरे वा! उत्तम ओळख.
अरे वा! उत्तम ओळख.
धन्यवाद ओळख करून दिल्याबद्दल.
धन्यवाद ओळख करून दिल्याबद्दल.
सामो, अमितव धन्यवाद!
सामो, अमितव धन्यवाद!
काल सहजच बघितलं तर कळलं, दिलीप प्रभावळकर ८० वर्षांचे आहेत. त्यांची एनर्जी (ऊर्जा), उरक अफाट आहे.
छान ओळख.
छान ओळख.
आजच पहिले हे नाटक. अतिशय
आजच पहिले हे नाटक. अतिशय सुरेख आहे. दोघे कसलेले कलाकार आहेत त्यामुळे मजा येते.
सुरेख लिहीलंयत. मी पाहिलाय हा
सुरेख लिहीलंयत. मी पाहिलाय हा द्विपात्री प्रयोग. नाटकाच्या धाग्यावर रिव्ह्यूही लिहीला आहे.
https://www.maayboli.com/node/2212?page=14
छान ओळख.
छान ओळख.
अरे वा. छंदीफंदी धन्यवाद
अरे वा. छंदीफंदी धन्यवाद धाग्याबद्दल.
आम्ही काल संध्याकाळी पाहून आलो. अपेक्षेपेक्षा गर्दी कमी होती. नवीन नाटक आणि वेगळा प्रयोग म्हणून कदाचीत असे असेल.
प्रयोग मस्त झाला. दोघेही कसलेले कलाकार असल्याने त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यास मज्जा आली. तसा अभिवाचनाचा प्रकार असला तरी दोघांनीही आपापल्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव सुंदर दर्शवले. एकाच्या वाचनाला दुसऱ्याची चेहऱ्यावरच्या बदललेल्या भावांनी दिलेली प्रतिक्रिया, त्यांच्या आवाजातले चढ उतार, त्यांची बोलण्याची लय असे सगळे पाहून गंमत वाटली. दोघांनी ही एक एक अधिक भूमिका ९०-१०० तील वृद्धांची केली. मामीने लिहिल्याप्रमाणे केंकरेंचा आवाज मस्त लागला तिथे.
मला त्यांचे प्रत्येक प्रसंगाला दिलेले वेगवेगळे गाण्यांचे क्यू आवडले. त्यामुळे प्रसंग काय असणार आहे त्याची पार्श्वभूमी तयार होते. प्रभावळकरांनी इतक्या वयात पण असे नाटक करणे म्हणजे त्यांच्या कलेला हॅट्स ऑफ! सुरुवात थोडी संथ वाटली पण लगेचच वेग पकडला नाटकाने आणि मग संपताना अरे अजून थोडे हवे होते असे वाटले.
त्यांचे अजून दोन तीन आठवडे इकडे प्रयोग आहेत. कोणाला आवड असल्यास नक्की जा. इथे तिकिटांची लिंक -
https://kallolentertainment.org/patrapatri
अस्मिता rmd मामी आणि धनी
अस्मिता rmd मामी आणि धनी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
हो विजय केंकरे म्हणाले की कार्यक्रमाला तशी कमी गर्दी असते म्हणून...
हो बहुतेक वाचनाचा कार्यक्रम आहे, अभिवाचनाचा, त्यामुळे बरेच लोक येत नसावेत.
मामी तुमचा अभिप्रायही वाचला...
रॉयल ऑपेराला सुद्धा कधी जमले तर जायला पाहिजे.
धन्यवाद. ओळख करून दिल्याबद्दल
धन्यवाद. ओळख करून दिल्याबद्दल.
छान!
छान!
पेपरात याची जाहिरात पाहिल्याचं आठवतंय.
लक्ष ठेवून प्रयोग बघायला हवा.
ऋतुराज आणि ललिता - प्रीति
ऋतुराज आणि ललिता - प्रीति धन्यवाद!
त्यांनी सांगितले ३५ प्रयोग केलेत ..
बहुदा वय आणि इतर कार्यक्रमात व्यस्त ता यामुळे जास्त प्रयोग करत नसावेत..