India's got latent - चला निषेध नोंदवूया.

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 February, 2025 - 14:16

India's got latent - चला निषेध नोंदवूया.

India's got latent अश्या नावाचा एक कार्यक्रम येतो.
कुठे येतो कल्पना नाही. पण फेसबूक, इन्स्टा, युट्यूब वर शॉर्ट आणि रिल्स स्वरूपात याचे व्हिडिओ मुबलक बघावयास मिळतात.

Latent या शब्दाचा अर्थ काय मला माहीत नाही. मी आधी ते टॅलेंट समजूनच याचे काही एपिसोड बघितले. एक दोन फनी वाटले म्हणून अजून काही एपिसोड बघितले तसे वरचेवर दिसू लागले. आणि हळूहळू त्यांचा ठेवणीतील 18+ स्टॉक समोर येऊ लागला. मग मात्र मी न बघण्याची काळजी घेऊ लागलो कारण मोबाईल मुलांच्या हातात सुद्धा जातो.
तरीही अध्येमध्ये याचे व्हिडिओ नजरेस पडायचेच. आणि रिल बघने हे असे व्यसन आहे की जे समोर येईल ते झोप उडवून बघितले जाते.

गेल्या आठवड्यात मात्र हादरवून टाकणारे व्हिडिओ नजरेस पडले. मुले मुली एकत्र बसले आहेत आणि एकमेकांची खेचणे म्हणजे रोस्ट करणे या नावाखाली काहीही अश्लील शब्दफेक चालू आहे. म्हटले हे तर फार वाया गेलेले प्रकरण आहे. दूर राहिलेलेच चांगले.

आणि आज त्यांनी काहीतरी मोठे कांड केले, अश्लील टिप्पणीचा कळस गाठला ज्या बद्दल दिलगिरी व्यक्त करताना दिसले.

बातमी काय हे शोधले तर खरेच किळस वाटावे आणि युवा पिढीची चिंता वाटावी असे एकेक व्हिडिओ समोर आले.

चिंता यासाठी वाटली कारण ज्याने आज हे कांड केले त्या Ranveer Allahbadi याला नरेंद्र मोदींच्या हस्ते National creater award असा पुरस्कार मिळाला आहे.

चिंता यासाठी वाटली कारण हा शो जो चालवतो तो समय रैना नावाचा मुलगा अमिताभच्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात आला होता आणि अमिताभ त्याच्या विनोद बुद्धीचे कौतुक करतl होता.

चिंता यासाठी वाटली कारण ही मुले एकीकडे आदर्श म्हणून समोर आणली जात आहेत तर तेच दुसरीकडे चुकीचा आदर्श ठेवत आहेत.

कोण बनेगा करोडपतीमध्ये या समय रैना सोबत एक तन्मय भट म्हणून मुलगा आलेला. जर मी चुकत नसेल तर यालाच मी कित्येक वर्षांपूर्वी एआयबी रोस्ट या कार्यक्रमात रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करन जोहर या बॉलीवूड कलाकारांसोबत अश्लीलतेची निचतम पातळी गाठताना पाहिले होते.

आज India's got latent ची बातमी पाहिल्यावर तो कार्यक्रम आठवला कारण मी त्यावेळी देखील मायबोलीवर धागा काढला होता. आणि धक्का तेव्हा बसलेला जेव्हा काही लोकं त्या कार्यक्रमाचे कौतुक करत होते, तर कित्येक जण आपल्याला काय त्याचे म्हणत होते. उलट रुचत नाही तर आपण असले कार्यक्रम बघू नये हा उपाय सुचवत होते.

तो धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/52596

आज पुन्हा मायबोलीवर धागा काढला कारण आज "आपल्याला काय त्याचे?" म्हणावे अशी परिस्थिती उरली नाहीये. आज कॉलेज जाणारया प्रत्येक मुलाकडे मोबाईल असतो तर शाळेत जाणाऱ्या मुलांचे सुद्धा इंस्टाग्राम अकाऊंट असते. आणि त्यांनाही हे व्हिडिओ कुठल्याही सेन्सॉरशिपशिवाय बघायला उपलब्ध असतात.

मुळात लहान मुलांनीच काय पुरेशी अक्कल न आलेल्या कुठल्याही तरुणांनी असे व्हिडिओ बघू नयेत असे वाटते.
सोशल मीडियावर सर्रास दिसणाऱ्या या कंटेंटवर काही निर्बंध असावेत असे वाटते.
म्हणून आज संधी मिळाली आहे तर निषेध नोंदवतो!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोक होता तो?
वर मी ज्या लिंक शेअर केल्या त्यात ते सारे जोक होते का?
माझी विनोदाची व्याख्या काही चुकते का?

इथे कुणाला काय इजा झाली?
>>>>>
ज्याला तो घाणेरडा प्रश्न विचारला गेला ती व्यक्ती तरी याची तक्रार करू शकते का?

स्वतः शोधून शोधून लोकं क्लिप बघतात आणि दंगा करतात.
>>>>
मला त्या सर्व क्लिप फेसबुक वर दिसल्या. काहीही शोध न घेता.

वर मी ज्या लिंक शेअर केल्या त्यात ते सारे जोक होते का?
माझी विनोदाची व्याख्या काही चुकते का?
>>>>
हो ते जोकच आहेत.

ज्याला तो घाणेरडा प्रश्न विचारला गेला ती व्यक्ती तरी याची तक्रार करू शकते का?
>>>नाही. तुमचे मन दुखावले म्हणून पोलिसांत तक्रार करायला काय तुम्ही लहान मुलं आहात का? तुमचा निषेध नोंदवा आणि शांत बसा.

येथील बहुतांश चर्चा एकाच मुद्द्यावर चालू आहे यात दुसरा मुद्दा सुद्धा असा आहे की..

१) युवा पिढी असे कंटेंट बघून बिघडेल हा एक मुद्दा झालाच...

२) पण दुसरा मुद्दा असा की जर मी ऑनलाईन एखाद्या नॉन-पॉर्न साईट वर जात आहे. तर मला तसाच साफसुधरा कंटेंट बघायला मिळणे गरजेचे नाही का? ते बघून मी बिघडतो की नाही हा नंतरचा मुद्दा झाला पण मी का अश्या अनसेन्सरड मटेरिअल मधून मला हवे ते वेचावे? घरात किंवा बाहेर चार लोकांसमोर रीळ बघत असताना मध्येच असा एखादा व्हिडिओ सुरू होऊन मी का खजील व्हावे?
किंबहुना मला जे ऐकायला सुद्धा कानांना घाण वाटते ते मी का ऐकावे?

मला त्या सर्व क्लिप फेसबुक वर दिसल्या. काहीही शोध न घेता.
>>>सगळ्या दंगा करणार्यांनी शेअर केलेल्या.

आणि दिसल्या तर पोस्ट करणाऱ्यांना ब्लॉक करा. अलाहाबादिया आणि रैना हि नावेच ब्लॉक करा. तरीही काम नाही झाले तर फेसबुक अकाउंट डिलीट करा.

ज्याला तो घाणेरडा प्रश्न विचारला गेला ती व्यक्ती तरी याची तक्रार करू शकते का?
>>>नाही. तुमचे मन दुखावले म्हणून पोलिसांत तक्रार करायला काय तुम्ही लहान मुलं आहात का?
>>>>

ओके म्हणजे मानसिक इजा, एखाद्याचा अपमान करणे, शिवीगाळ करणे यासाठी कायद्याची मदत मागायला जाऊ नये जे असे करतात ती लहान मुले असतात?? सिरीसली??

सगळ्या दंगा करणार्यांनी शेअर केलेल्या.
>>>>>>>
चूक!
दंगा आता झाला..
मी दिलेल्या लिंक पुन्हा बघा..
त्या आधीच्या एपिसोडच्या आणि केव्हाच्याच शेअर झाले आहेत. आधीपासून त्या फेसबुकवर आहेत. दंगा करणाऱ्यांनी नाही तर असे कंटेंट आवडणाऱ्यानी फिरवला आहेत.
प्लीज तुम्ही पूर्ण माहिती घ्या आधी. नंतर बोलूया.

तिऱ्हाईत माणसाने अचानक येऊन शिव्या देणे वेगळे आणि शिव्या देणे ह्यासाठीच लोकप्रिय असलेल्ल्या कॉमेडी शो मध्ये शिवीगाळ होणे वेगळे हे समजतं नसेल तर अवघड आहे. स्पेसिफिकली रोस्ट च्या शोला जाऊन रडारड करणे मूर्खपणाचे आहे.

तसा काही consent form भरून घेतात का? त्याची प्रत बघायला आवडेल.
अन्यथा उद्या त्यातील जज एखाद्याला फिजिकली नागडा करतील आणि इथे असेच होते बोलतील..

सर सोशल मीडियावर अलगॉरिदम असतो, तुम्ही जर फक्त छान छान भुभुचे, लहान बाळांचे, कुकिंग शो चे व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या फिडमध्ये तेच दिसत राहतं
ज्याअर्थी तुम्हला किंवा अन्य कोणाला दिसतायत ते व्हिडीओ तर तुम्ही ते तुमच्या दंडणग्या कुतूहहलपोटी बघितले असणार
मला अद्याप एकही असा व्हिडीओ माझ्या फिडमध्ये आलेला नाही

मला कायम हत्ती, भुभु, प्राजक्ता माळी आणि वर्ल्ड वॉर 2 चेच व्हिडिओ दिसत असतात

त्यामुले ही रडारड करण्यापूर्वी आपले सोशल मीडिया अकाउंट साफ करा, रिसेट करा किंवा बेस्ट म्हणजे बंद च करा

Consent form
सदर पार्टीसिपंटने काही तक्रार केली आहे का? माझ्या माहितीप्रमाणे भावना दुखावलेले वीर सगळे इतर आहेत.

फिजिकली नागडा करणे वेगळे. जोक आणि फिजिकली नागडा होणे, व्हायला लावणे ह्यात फरक आहे.

ओके म्हणजे Consent form नसतो.
एखाद्याला कुठल्या लेव्हल पर्यंत नागडे केले जाणार हे त्या त्या दिवशी मूड नुसार ठरणार..
ओके माझी काही हरकत नाही. बघून घेतील तिथे जाणारे आणि शो करणारे..

पण मुळात धागा हा त्या एका प्रश्नावर नाहीये. आणि तुम्ही तोच एक प्रश्न पकडून बसला आहात. म्हणून म्हटले आधीच प्लीज वाचून घ्या.

ओके म्हणजे Consent form नसतो.
>>>> असे कुठे म्हणलं?
तुम्ही जर दुसऱ्याच्या बिहाफ वर ऑफेन्ड होत असाल तर कनसेन्ट होती की नाही हे तुम्ही आधी तपासायला हवे ना.

तुम्ही जर दुसऱ्याच्या बिहाफ वर ऑफेन्ड होत असाल तर कनसेन्ट होती की नाही हे तुम्ही आधी तपासायला हवे ना.
>>>>>

असे गरजेचे नाही.
उद्या मी जॉब इंटरव्ह्यू साठी गेलो आणि मला असा अनुभव आला तर मला तक्रार करायचा हक्क हवा.

आता तुम्ही म्हणाल उदाहरण चुकले आहे.
पण जर consent form नसेल तर दोन्ही उदाहरणे एकाच झाली.

आता मला सांगा यातला पहिला व्हिडिओ कसा दिसतो?>>>

तुम्हला कोणीतरी लिंक पाठवलेली असते व्हाट्सप्प किंवा कुठेतरी
तुमचे अकाउंट जिथे आहे त्या मशिनवर कोणीतरी असा व्हिडीओ पहिला
किंवा तुम्ही स्टँडप कॉमेडी बघता आणि त्या अनुषंगाने हा व्हिडीओ आला

किंवा तुम्ही स्टँडप कॉमेडी बघता आणि त्या अनुषंगाने हा व्हिडीओ आला
>>>>>

येस मी बघतो.
मला ते आवडते.
आणि आता तुम्ही म्हणत आहात की काही जण विनोदाच्या नावावर वाह्यात व्हिडिओ सादर करतात म्हणून मला आता माझ्या आवडीचे बघणे सुद्धा बंद करावे लागणार.. किंबहुना तुम्ही मला फेसबुकचं बंद करायचं सल्ला दिला आहे.

माझ्या मते वाण्याच्या दुकानावर बीयर/ दारु विकायला परवानगी द्यावी.... अर्थातच वाणी १८ वर्षे वय आहे की नाही हे विचारल्या नंतर आणि ग्राहकाने त्यास होकार दिल्यावर ती तो ग्राहकाला विकू शकतो असे हवे.

किंबहुना तुम्ही मला फेसबुकचं बंद करायचं सल्ला दिला आहे.>>>अगदी बरोबर
काय जग कोसळत नाही नाही बघितलं फेसबुक तर
पण बघितलं आणि असा व्हिडिओ बघावा लागला तर मग कोसळू शकतं
मग कशाला रिस्क घेता

ओके

दोन दिवसांपूर्वी या धाग्यावर आमच्या सोसायटीतल्या भांडणाचा उल्लेख केला होता. त्या वेळी एका काकूंनी व्हिडीओ पोस्ट केला होता. तो शोधत होते.
व्हिडीओ पोस्ट करता येत नाही. त्यातले हायलाईट्स..

१. कुठला मॅटर कुठे पोस्ट करावा याचे भान कायद्याने सज्ञान असलेल्या प्रत्येकाला असते अशी आपल्या सर्वांची समजूत आहे.
२. एखाद्या उद्देशाने चालू असलेल्या व्हॉट्स ऍप सारख्या चॅट ग्रुप वर त्या विषयाशी संबंधित पोस्टस केल्या पाहीजेत याची जाणिव प्रत्येकाला आहे असे आपण गृहीत धरले आहे.
३. जिथे प्रत्येक जण एकमेकांना ओळखतो अशा व्हर्च्युअल जगात सुद्धा प्रत्यक्ष गावात, कॉलनीत, सोसायटीत आपण जसे वावरतो तसेच वावरले पाहीजे , हे आपण प्रत्येक जण पाळतोच.
४. सोशल मीडीया प्लॅटफॉर्म्स अनेक स्वरूपाचे असतात. जिथे एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणायचे बुलेटिन बोर्डस असतात ( ऑर्कुट / फेसबुक / रेडीफ / याहू इ) तिथे अनोळखी लोक सुद्धा असतात. अशा ठिकाणी प्रत्येक जण खरी ओळख देईल असे नाही. ही बेसिक माहिती सर्वांना असतेच.
५. क्लोज्ड चॅट ग्रुप्स आणि असे ग्रुप्स यातला फरक समजला तर कुठे काय पोस्ट करायचे हे समजतेच.
६. नेहमीच्या लोकांच्यात मागितल्याशिवाय सल्ले देऊ नयेत हे तर आपण सर्व जण पाळतो.
७. जिथे आपण राहतो तिथे कुणाला तरी आपल्या सल्ल्याची गरज आहे असा समज करून घेणे म्हणजे इतरांना आपल्या पेक्षा कमी समज आहे असा ग्रह असणे. कदाचित तुम्ही त्या विषयातले तज्ञ असालही, पण ओळखीच्या क्लोज्ड ग्रुप मधे एखादा पर्सनल विषय सुरू करताना कुणाच्या घरी त्या विषयाला धरून काही अप्रिय घटना झालेली आहे का याचे भान असायला हवे जे सुदैवाने आपल्या सर्वांकडे आहे.
८. वैवाहिक आयुष्य कसे असावे हे वाचनात आले तर लगेच शेअर करू नये. कदाचित एखाद्या जोडप्यात सुसंवाद नसेल, त्यांना आपल्याला उद्देशून हे पोस्ट केले आहे असे वाटू शकते.
९. मुलांचे संगोपन कसे करावे हा विषय एखाद्या बिघडलेल्या मुलांच्या आईवडलांना डिस्टर्बिंग वाटू शकतो.
१०. एखाद्या विषयाचे ज्ञानदान करणे ही जगातली सर्वात चांगली गोष्ट आहे. पण ओळखीच्या लोकांच्या सभेत कुणाचा तरी अपमान होत नाही, कुणाच्या दुखत्या रगेवर बोट ठेवले जात नाही याचे भान असणे ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. जी आपल्या सर्वांकडे आहे याचा अभिमान आहे.
११. शेवटी संगोपन हा मोठा विषय आहे. यावर एखाद्या जाणकाराने लेख लिहीला आणि त्यावर चर्चा घडली तर उत्तमच. पण त्यासाठी वेगळा ग्रुप असावा. त्यात रस असणारे लोक तिथे येतील. सोसायटीच्या ग्रुपवर असणे हे कंपल्शन असल्याने इथे कुणीही इतर विषयातले आपले ज्ञान इथे प्रदर्शित करणार नाही हे आपण आजवर पाळत आलेलो आहोत आणि यापुढेही पाळतच राहू.

या काकू काऊन्सलर आहेत.

संबंधित विषयावरचे त्यांचे मत..
मुलांना आपले मत नीट समजावून सांगावे. सोशल मीडीया कसा वापरावा , त्यातले धोके दाखवावेत. ते काय बघतात यावर जासूसी नको, पण मुलांचे मित्र कोण आहेत हे माहिती असावे. सगळी काळजी घेऊनही मुलं जर नको त्या साईटवर जात असतील तर जाऊ द्यात. अडवलं तर त्यांच्यात ओढ निर्माण होते. जाऊन येऊ द्यात. माहिती झाली कि नंतर ते जात नाहीत. काही गोष्टी त्यांच्यावर लादता येत नाहीत. आपल्या पिढीत अंतर आहे हे मान्य करा आणि त्याप्रमाणे मुलांचे वागणे मर्यादेत असेल तर खूप काळजी करू नका.

लिंक्स देऊन त्या बघा म्हणून पुन्हापुन्हा सांगितलं जात आहे...
हा प्रचारच झाला ना..
(आता त्या लिंक उघडल्यामुळे अल्गाॅरिदम कदाचित तसेच कंटेट पुन्हा पुन्हा दाखवेल, हा ही प्रसारच झाला.)

आता त्या लिंक उघडल्यामुळे अल्गाॅरिदम कदाचित तसेच कंटेट पुन्हा पुन्हा दाखवेल >> +१
मी क्लिक केलं नाही. या आधी धागालेखकाने दुसर्‍या एका साईटबद्दल त्यावर सॉफ्ट पॉर्न असतं असा उल्लेख केला होता. मी फेसबुकवर सहा महीन्यातून एकदा डोकावत असल्याने कदाचित असेल मला असे काही दिसले नाही. पण अन्य ठिकाणी सुद्धा मला त्या साईटच्या अशा जाहीराती दिसल्या नाहीत कि खुद्द त्या साईटवर माझ्या पुढ्यात असा कंटेट आला नाही.

तुमचा फीड हा कदाचित तुमचे फ्रेंड सर्कल, तुमच्या सर्फिंग वर ठरत असावा. मी एका कथेच्या निमित्ताने Adventure vvideos पाहिले त्यानंतर युट्यूबचा फीड अशाच व्हिडीओने भरून गेला होता. आता नॉट इंटरेस्टेड, डोन्ट रिकमेंड चॅनेल ही टूल्स वापरून तो कंट्रोल मधे आणला आहे.

ज्या उत्साहाने ऋ याने धागा काढला व ज्या विमा एजंटीय चिकाटीने तो फेसबूक लिंक्स देत आहे ते पाहून मला फार पूर्वी झालेला अत्रे / माटे / फडके वाद आठवला.

माटे : फडक्यांच्या साहित्यात अश्लीलता आहे.
वाचक : कुठे आहे ?
माटे : 'उन्माद' कादंबरीत पान ५६ वर नायिका नायकाला चहा देताना तिचा पदर खाली पडतो व तिच्या उन्नत ऊरोजांचे वर्णन आहे.
वाचक : अरे बापरे !
माटे : शिवाय 'प्रीत उमलली अशी' मध्ये पान ६७ वर नायिकेच्या नितंबांचे वर्णन आहे.
वाचक : अरे बापरे !
माटे:: 'नकळत सारे घडले' मध्ये पान ११७ वर नायिका कपडे बदलत असताना तिच्या मांड्या नायकाला दिसतात.
वाचक : अरे बापरे ! ( मनातल्या मनात पुस्तक नावाची नोंद होते)

ता. क : कादंबर्‍यंची नावे काल्पनिक आहेत.

>>तुमचा निषेध नोंदवा आणि शांत बसा.<<
इतकं सोप्प नाहि ते. असतं तर हा गदारोळ उठलाच नसता. पोलिसांनी एफआयआर लिहुन घेतले याचा अर्थ तक्रारीत तथ्य आहे. शिवाय, रैना आणि अहलाबादिया या दोघांनी माफि मागितली, क्लिप्स उडवल्या म्हणजे त्यांना त्यांच्या गुन्ह्याची जाणीव झालेली आहे किंवा त्यांच्या वकिलांनी करुन दिलेली आहे. मराठित एक म्हण आहे - कर नाहि त्याला डर कशाला..

अ‍ॅट द एंड ऑफ द डे, लॉ ऑफ द लँड प्रिव्हेल्स...

हमारे जमानेमे कृष्णराव मराठे नावाचे एक सद्गृहस्थ होते. त्यांचा अश्लीलतेबद्दल प्रचंड राग होता. जिथे त्याना अश्लीलता दिसे तिकडे ते धावून जात. म्हणून त्यांचे नावच अश्लील मार्तंड असे पडले. त्यांचा हा किस्सा.
मा. विनायक ह्यांनी दिग्दर्शित केलेला "ब्रँडीची बाटली" (१९३९)हा चित्रपट तेव्हा गाजला होता.
कथा :प्र.के.अत्रे
कथासूत्र :बगाराम हा सिधासाधा म्युनिसिपल कारकून.तो दारूबंदीच्या मोहिमेत उतरतो.त्याचं दारूविषयीचं अज्ञान त्याची नोकरी जायला कारणीभूत होतं.त्याच्या दारूबंदीविषयीच्या खुळचट कल्पना पाहून त्याच्याबरोबर काम करणारी एक तरुणी त्याची कानउघाडणी करते.खरं तर तिच्याबद्दल बगारामला ओढ निर्माण झालेली असते.ती त्याच्या बॉसचीच मुलगी निघते.तिचा धाकटा भाऊ अत्यवस्थ असतो.त्याला वाचविण्यासाठी ब्रॅंडीची गरज असते.बगाराम ती अनेक क्लुप्त्या करून मिळवतो.
सिनेमातल्या गोपीकांचे वस्त्रहरण या दृश्यात श्रीकृष्णला उद्देशून बावळट बगाराम म्हणतो देवा आम्हालाही एकदा चान्स द्या की. हा संवाद आणि दृश्य चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडून कापून टाकावयास भाग पाडले होते. अश्लील मार्तंड कृष्णराव मराठे यांनी ब्रँडीची बाटलीवर टीका केली. त्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या सभा ठिकठिकाणी झाल्या. बँडीची बाटलीची हिन्दी आवृत्ती ‘‘ब्रांडी की बोतल” म्हणून प्रदर्शित झाली होती. हिंदीत मा. विनायकांनी
दामुअण्णाची भूमिका केली.
हा धागा वाचून मला ह्या सिनेमाची आठवण झाली.
सध्या २०२५ चालू आहे, पण संवेदना त्याच आहेत.

Pages