चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

09516D98-8531-478E-91A2-2CB8D7606149.jpeg

माझी आठवत दगा देत नसेल , तर मोहित्यांची मंजुळा मध्ये हिरो बहिर्जी नाईक आहे . सूर्यकांत बहिर्जी. चंद्रकांत शिवाजी महाराज असतील.
शिवाजीमहाराज आणि संभाजीराजे दोन्ही असलेला चित्रपट थोरातांची कमळा.

हा वरचा प्रायव्हेट व्हिडीओ आहे म्हणून येत आहे यूट्यूबवर.<<<

हो.. प्रायव्हेट केला वाटतं आता...
इथे आहे... बघायलाच हवा असा बावळटपणा...

https://www.instagram.com/reel/DFzUCZzod5p/?igsh=Z2ZqdTI0MzZmbHpl

"असं आतून बुडबुडे आल्यासारखे होत आहे" हा रोमॅण्टिक डॉयलॉग आहे?
>>>> Lol
आमच्याकडे बुडबुडा आला म्हणजे 'सीदन्ति मम गात्राणि'चं प्राकृत रूप होतं आणि आहे.

छावाच्या ट्रेलरमधे आपले लोक पाण्यात लपून बसून मग एकदम ८-१० फूट वर कसे उचलले गेले कळाले नाही.
>>> ते बाजीप्रभूंवरच्या पिक्चरच्या दिग्दर्शकाला विचारा. त्याने सुरुवात केली. मुळात मावळे क्लोज एन्काऊंटर्समध्ये धनुष्य विथ अनलिमिटेड सप्लाय ऑफ बाण का वापरत होते तेच आधी सांग म्हणावं.

छावाच्या ट्रेलरमधे आपले लोक पाण्यात लपून बसून मग एकदम ८-१० फूट वर कसे उचलले गेले कळाले नाही.
>>> ते बाजीप्रभूंवरच्या पिक्चरच्या दिग्दर्शकाला विचारा. त्याने सुरुवात केली. मुळात मावळे क्लोज एन्काऊंटर्समध्ये धनुष्य विथ अनलिमिटेड सप्लाय ऑफ बाण का वापरत होते तेच आधी सांग म्हणावं.
>>>>>

हे असं नाही दाखवलं तर सिनेमा सपक, डॉक्युमेंटरी होतो म्हणे आणि मग आपल्या थोर पुरुषांचा इतिहास लोकापर्यंत पोचत नाही म्हणे

त्यामुळे बाजीराव असोत की तान्हाजी का संभाजी राजे
त्यांना आणि मावळ्यांना डोंबारी उड्या, हवेतून उडत जाणे, शत्रूला जमिनीवर आपटून 20 फूट उंच उडवणे, झालंच तर आपल्या बायकोसोबत भर चौकात नाचगाणी करणे हे करावं लागतं
तरच लोकं सिनेमा बघतात म्हणे

Pages