मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला!

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 October, 2024 - 12:25

केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या भाषांना आज अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे.
याआधी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, संस्कृत आणि उडिया या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीचे निकष -

1) भाषेचे साहित्य हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
2) भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने होणारे फायदे -

1) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
3) अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

थोडक्यात सांगायचे झाल्यास मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी भाषेचा अभिमान असलेल्या प्रत्येकाला ही बातमी आणि या घटनेचे महत्त्व समजायला हवे असे वाटल्याने वरील माहिती गुगल करून शोधली आहे.

सर्वांचेच अभिनंदन Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्याम मनोहर यांचे मुद्दे जर मला नीट समजले असतील, तर ते पटले नाहीत.

स्वाती आंबोळे यांच्या 'टाळ्या' या प्रतिसादात आलेला अभिमान हा शब्द श्याम मनोहर यांना त्यांचे भाषण करताना अभिप्रेत होता की नव्हता हे त्यांच्या भाषणाचे अंश जरा घाईघाईने वाचताना लक्षात आले नाही. मात्र, बहुधा ते अभिमानाबद्दल काही म्हणालेले दिसले नाही.

>>> प्रेम तांत्रिक बाबींपेक्षा महत्वाचे वाटते - या सामो यांच्या विधानाशी सहमत!

ऋन्मेषने फार अचूक लिहिले आहे. (प्रेम, जोडीदार इत्यादी)!

भाषेला शासनाकडून काहीतरी दर्जा मिळणे हे मूलतः सुविधा, निधी, सवलती याच्याशी निगडित असणार. Ultimately त्याचा फायदा भाषा व्यवहारात राहणे, तिची व्याप्ती वाढणे, तिच्यात उत्तम साहित्य निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळणे अश्याप्रकारे होणार.

यात अस्मिता, अभिमान, मुळात सरासरी भाषा सर्वांना येते का याचा संबंधच असू नये.

ग्रामीण भाग आणि महाराष्ट्रातील प्रांतीय मराठी हे निकष बघितले तर 'सरासरी' वगैरे मुद्दे लागू होऊ शकणार नाहीत कदाचित!

उदाहरणार्थ:

असे लिहिले जाते

आणि

असे लिहिल्या जाते

यातील 'लिहिल्या जाते' हे आपल्यापैकी अनेकांना रुचत नाही, पण महाराष्ट्रात कैक भागात असेच बोलले व लिहिलेही जाते.

तो पतंग की ती पतंग यास्त एकाच मराठी भाषेत मतभेद आहेत

अभिजात दर्जासाठी श्याम मनोहर यांनी सुचवलेले निकष बहुतेक त्यामुळे लागू होणार नाहीत

घराघरात, गावागावात तर मराठीचे काहीही व्हर्जन वापरले जात असेल, हे सर्वच भाषांच्या बाबतीत होत असेल.

थोडी गल्लत आहे.

नुसतं प्रभुत्व पुरेसं नसेल, किंवा 'आवश्यक' नसेल, तर मग 'प्रेम' पुरेसं आहे का- हा प्रश्न.

प्रेम हे आतुन येतं हे खरंच आहे, त्याला काही खास वेगळे कष्ट करावे लागत नाहीत. अस्मिता, अभिमान, गर्व दाखवायलाही अजिबात कष्ट करावे लागत नाहीत. आणि एक्झॅक्टली हीच गोष्ट सोपी असल्याने आजूबाजूला आणि सर्वत्र दिसते. ती स्वातीने म्हणल्याप्रमाणे भाषा, देव, धर्म, प्रांत, देश- या सार्‍या बाबतीत दिसते. कझाकिस्तानात जन्मलो असतो तर त्या भाषेवर प्रेम असतं माझं. पण ते तर नैसर्गिक अपघाताने होतं. त्यात माझं स्वतःचं असं काय आहे? (धर्म, जात, प्रांत, देश- याबद्दलही हेच.)

प्रभुत्व मिळवायला अभ्यास करावा लागेल, 'आत' बघावं लागेल. आणि आत बघितल्यावर अनेक नकोशा गोष्टी सापडतील- हा माझा जुनाच मुद्दा आहे. (झुंडशाही, कळ्पशाही, पंथशाहीच्या भजनी लागण्यामागे हेच मुख्य कारण आहे. एक थवा वा कळप आपला मानला, की चिंतनाची आवश्यकता संपते. झुंडीचं प्रोफाईल पिक्चर हे माझं स्वतःचं होतं, आणि मग मला फार काही विचार करायची गरज राहत नाही.- हा जरा आणखी वेगळा मुद्दा आहे. तो नंतर स्वविस्तर बोलता येईल.)

तुमच्यापैकी कुणी मल्याळी, तामिळी, बंगाली, किंवा फॉर दॅट मॅटर- हिंदी साहित्य बघितलं असेल, आणि भाषांतरित का होईना, वाचलं असेल. काही फरक जाणवतो का?

मराठीवर माझंही प्रेम आहे (याचं एक महत्वाचं कारण- मला व्यक्त व्हायला दुसरा मार्ग नाही, हे लक्षात आलं का?). पण इतर भाषांत कितीतरी जास्त पटीने चिरंतन मुल्यं असलेलं साहित्य निर्माण झालं आहे. जगाच्या भाषा सोडाच, पण इतर भारतीय भाषांतही. याची मला संपूर्ण जाणीव आहे. एक 'भाषा' म्हणून ती कुठेतरी कमी पडत असेल, तर तिला नुसतं 'अभिजात' म्हणण्याने किंवा एखाद्या सरकारी प्रमाणप्त्राने काय फरक पडणार?

प्रेम असलं तरी मराठीवर माझं प्रभुत्व नाही, याचं मला वाईट वाटतं. माझ्या जन्माच्या आणि इथं असण्याच्या अर्थाचं कुठे कुठे विस्कळितसं मला थोडं थोडं कळलं आहे, पण ते मला माझ्या भाषेत सांगता येत नाही. इतकंच काय, पण अजून मला नीट शब्द सापडत नाहीत. भांडण झालं तर अनेकदा असं होतं की योग्य ते शब्द आणि वाक्यरचना मला ते सारं संपल्यावर सुचतात, किंवा अर्धवट सुचतात, आणि मी अस्वस्थ होतो.

माझी भाषा 'अभिजात' झाली हा त्यापेक्षा फारच दुय्यम मुद्दा आहे. त्यातलं पॉलिटिकल इन्क्लिनेशन लक्षात घेतलं तर मला आणखीच निराशा येते.

"आपल्याला आपलीच भाषा अजून नीट येत नाही" अशा अर्थाचे प्रतिसाद मी दुसर्‍या पानावर लिहिले होते त्याचा संदर्भ हा आहे.

यावर मला अजून खूप बोलायचं आहे, जमलं तसं लिहिन.

>>> भांडण झालं तर अनेकदा असं होतं की योग्य ते शब्द आणि वाक्यरचना मला ते सारं संपल्यावर सुचतात, किंवा अर्धवट सुचतात, आणि मी अस्वस्थ होतो.

थोडी गल्लत येथे आहे असे वाटून गेले.

नंतर सुचले तरी 'ते सुचले'!

नाही सुचले तरी भांडू शकलो.

सरासरी मराठीचे निकष तरी काय, असा प्रश्न पडावा.

ज्याला जशी वाटेल तशी भाषा!

अभिजात = विशिष्ट कालावधीपासून अस्तित्वात असलेली, वगैरे वगैरे!

अभिजात दर्जा देण्याचा उद्देश = निधी, सुविधा, प्रोत्साहन

आपण दोघे दोन संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी बोलत आहोत. आपण रजा घेऊ.

'थोडी गल्लत आहे', हे तुमच्या पोस्टला उद्देशून नव्हतं. ती नंतर बघितली. नसती बघितली तरी काहीच फरक नसता पडला, पण गैरसमज नको, म्हणून हा खुलासा.

साजिरा तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कळले.
नैसर्गिक अपघाती प्रेम - हे नेमक्या शब्दात सांगितलेत. मराठीवर असं माझंही प्रेम आहे, पण त्याला काय अर्थ आहे?

एखाद्या भाषेच्या (ती मातृभाषा असो, नसो) प्रेमात पडायला तिच्या खोलात शिरून व्यक्त होण्यासाठी तिची ताकत, सुलभता, लवचिकता, शब्दसंपदा इत्यादिंची अनुभूती यायला हवी, आणि याकरता तिची तुलना इतर एकातरी भाषेशी
(आणि तिचे ही तेवढे ज्ञान हवे) व्हायला हवी ना? (कदाचित चुकत असेन मी.) अन्यथा ते नैसर्गिक अपघाती प्रेमच असेल आणि त्याला कितपत महत्व द्यावे असे वाटते.

आपली भाषा अभिजात आहे की नाही हे काही निकषांवरून आता ठरवले गेले. यात माझा/आपला सहभाग काय? ती अभिजात आहे म्हणजे आधीपासून होतीच, चार टाळक्यांनी आता त्याला मान्यता दिली (हे राजकारण बाजुला ठेवून म्हणत आहे) याउपर काही घडले नाही. आता पैसा मिळुन अजुन कुणीतरी चार जास्तीची टाळकी ती शिकतील एवढा विचार जरा सुखावून जातो, त्यातही माझा काही सहभाग काहीच नाही.
मराठी (किंवा कुठल्या भाषेवर) चांगले प्रभुत्व मी मिळवेन असे वाटत नाही, पण माझ्या मराठी भाषेत सुधार करण्याचा प्रयत्न करत आहे, सध्या जमेल तसाच.

मी आधी म्हटल्याप्रमाणे भाषा अभिजात असणे आणि भाषा आज कुठल्या अवस्थेत आहे या दोन वेगळ्या गोष्टी आहे असे मला वाटते. यात अभिजात असणे ही दुय्यम बाब आहे हे अगदीच पटले.

हा दर्जा मागच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत मिळाला असता तर योग्य ठरला असता हे काहींचे मत उशिरा लक्षात आले

आता वाचनमात्र

कुठल्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. It is like wetting your pants in a dark suit - you get a warm feeling but nobody else notices.

कुठल्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही
>>>>>>>>>

आपली मातृभाषा असेल तर सुखावायला होऊ शकते जर इमोशनली कनेक्ट असू तर..
अन्यथा ऑलिंपिक मध्ये एखाद्या भारतीयाला सुवर्णपदक मिळाल्यानंतर देखील आपल्या आयुष्यात काय एवढा फरक पडतो.

हो मानव, हेच म्हणायचे आहे.

यासंदर्भात आणखी काही मुद्दे डोक्यात आहेत. मात्र ते विस्ताराने लिहून काढावे लागतील. अन्यथा १-२ वाक्यांत लिहिलेल्या मुद्द्यांना- बोलीभाषा, प्रमाणभाषा, शुद्धलेखन, राजकारण, मातृभाषा- अशी सोयीस्कर काठाकाठाने फिरणारी, आकलन घ्यायचं नाकारणारी आणि मूळ विषयाशी अजिबात संबंध नसलेली पोश्टींरूप उत्तरं बघून डोक्याला हात लावावा लागेल.

माबोवर एखादं संस्कृत दालन काढता येइल का जिथे संस्कृतशी संबंधित धागे, काव्य- शास्त्र-विनोद तसेच 'लर्निंग मटीरीअल' असेल.>>>>+1
मलाही 10 वी ला पूर्ण मार्काचं संस्कृत होत .स्कोअरिंग आणि अ वर्गाला कॉम्पलसरी म्हणून घेतलं होतं आज मला एकही वाक्य संस्कृत मध्ये बोलता येत नाही पण संस्कृत फार गोड भाषा आहे ती ऐकायला वाचायला आणि अर्थ समजून घ्यायला आवडते .जे लोक त्यात ज्ञानी आहेत किंवा लेखनात संस्कृत सुभाषित वापरतात त्यांच्या बद्दल फार आदर वाटतो.
मराठीचा अभिमान आहे की नाही यात मी पडत नाही पण मराठीवर प्रेम आहे आणि इथे मराठीत वाचता ,लिहीता ,व्यक्त करता येतं याचा फार आनंद होतो आहे.

>>>>>>>>मराठीचा अभिमान आहे की नाही यात मी पडत नाही पण मराठीवर प्रेम आहे आणि इथे मराठीत वाचता ,लिहीता ,व्यक्त करता येतं याचा फार आनंद होतो आहे.
असेच म्हणते.
'अभिमान' वगैरे अतिच स्नॉबिश आणि अनावश्यक पैलू असून, अज्ञानातून येतो असे माझे तरी मत आहे.

मातृभाषा, मातृभूमी यांच्यावरचे प्रेम नैसर्गिक उपजत असेच असते. पण त्याला महत्व का द्यायचे नाही हे मात्र समजले नाही.

ते आतून सहज येते म्हणून त्यात काय विशेष म्हणत त्याला हलके का लेखायचे?

आई वर प्रेम करताना आपण कधी असा विचार करतो का की आधी ती एक माणूस म्हणून कशी आहेस समजून घेऊया. मग तिचा आदर, तिच्यावर प्रेम करूया. अन्यथा त्या प्रेमाला काही अर्थ नाही, ते तर कोणीही आपल्या आईबद्दल करते. आपण दुसऱ्या आईच्या पोटी जन्म घेतला असता तर तिच्यावर केले असते., मग त्यात काय विशेष.. वगैरे वगैरे..

भाषांचे ज्ञान असणे उत्तम याबद्दल वाद नाही. किंबहुना जगात कुठलेही ज्ञान असणे चांगलेच. पण या दोन गोष्टी वेगळ्या का ठेऊ शकत नाही आपण..

ज्यांना भाषेचा अभ्यास करायचा त्यांनी अभ्यास करा ...
ज्यांना फक्त प्रेम करायचे त्यांनी प्रेम करा...
ज्यांना दोन्ही करायचं त्यांनी दोन्ही करा..
फक्त आपण जे करत आहोत त्याचा अहंकार दाखवू नका.

असल्या पोश्टी टाकून स्वतःला अवॉर्ड घेतच असतो तो. त्याला आणखी अवॉर्डची गरज नाही.

ते आई वगैरे बाजूला ठेवून भाषेवर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं यावर २५ ओळींचा निबंध लिही. म्हणजे मनातल्या मनात करायचं नि गपचिप बसायचं का काही अ‍ॅक्शनही घ्यायची ते लिव. 'भाषेच्या संवर्धनाचे उपाय' (उदा. - भाषेवर प्रेम असल्याने मी फक्त माझीच भाषा बोल्णार इ.) असा वगैरे निबंध नको.

भाषेवर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं- हे कुणाच्या डोक्यात नीट नक्की ठरलं असेल तर मुद्देसूद लिहून काढायला हरकत नाही. फारतर स्वतःपुरतंच ठेवा, इथं टाकू नका. पण इथं टाकलं तर उत्तमच. त्यातून चांगली चर्चा होईल.

प्रेम करण्याबद्दल -
१) मला माझीच भाषा नीट येत नाही. इतर भाषाही नीट येत नाहीत, किंवा अजिबात येत नाहीत. तर मग माझ्याच भाषेवर प्रेम का करायचं? तीसोबत तेलुगु, काश्मीरी किंवा जपानीवर का नाही? तीही माणसांचीच भाषा ना?
२) जी येते तीवरच प्रेम करावं असं काही ठरलं असेल, तर ती 'किती' यावी असं काही मोजमाप, प्रमाण वगैरे आहे का? नसेल तर ठरवायचं का?

हल्ली काही बंगाली पुस्तकांचे हिंदी अनुवाद ऐकले. किती रसाळ आणि समृद्ध लिहिता येऊ शकतं याचा परिपाठच होता. शंभर टक्के हिंदी होतं ते, पण बोजड नाही वाटलं. उगाच संस्कृतचा आधार घेतलेलं ही नाही वाटलं. गोष्ट ऐकत होतो, त्यामुळे भाषा आणि शब्द हे काहीसे त्याक्षणी दुय्यम होते, पण कुठेही न अडखळता ऐकत रहावं असं हिंदी होतं.
मी मराठी लिहिताना अनेकदा मुद्दाम मराठीकरण करावं का रुळलेला आहे इंग्रजी शब्द म्हणून पुढे जावं असा विचार करुन अनेकदा दुसरा पर्याय निवडतो. ते शक्य तितक्या वेळा बदलून मराठी (संस्कृत न्हवे) शब्द आठवून/ शोधून लिहायचा/ सोपे लिहायचा सर्वतोपरी प्रयत्न करायची इच्छा आहे.

इथली चर्चा वाचून मराठी मंडळाच्या कार्यक्रमाच्या प्लॅनिंग मिटिंग मधे झालेली “Why should we give preference to Marathi programs….. Marathi culture” वगैरे चर्चा आठवली. Happy

मला माझीच भाषा नीट येत नाही
>>>>
सिरीयसली ब्रो!
इथे मायबोलीवर कोण आहे ज्याला नीट मराठी येत नाही???
मायबोली सोडा, माझ्या माहितीत असा एक मराठी माणूस नाही ज्याला मराठी नीट येत नाही.
अगदीच आता ज्यांची मुले इंग्लिश मिडीयम मध्ये असतील आणि घरातही जे लोकं मराठी न बोलता इंग्लिश बोलत असतील त्यांची मुले कदाचित मराठी नीट बोलत नसतील. पण माझ्या ओळखीत तरी असे कोणी नाही.
किंबहुना आमच्या सोसायटीमध्ये अमराठी सुद्धा छान मराठी बोलतात. आमच्या घरी हिंदी मराठी ट्युशन घेतली जाते त्यामुळे मला कल्पना आहे. इथे सर्व शाळांमध्ये मराठी हा विषय कम्पल्सरी आहे.

मला येत नाही. माझं सोड. मघाशी प्रेमाचं धरलेलं झाड सोडून हे नवीन पकडलंस तेही सोड.

तुला वर दिलेली असाईनमेंट जमणार आहे का? मला काही नको, तुझाच फायदा आहे त्यात. मी रिकामाच आहे म्हणून उत्तर देतो आहे. मला कंटाळा आला किंवा काम आलं की तुझा विजय झाला असं समज. पण तो स्वाध्याय नक्की कर.

Why should we give preference
>>
मी कोण तुम्हाला सांगणार, पण लिहून काढायचं. मुद्दा १ २ ३ ४ ५ वगैरे. अशाने व्हॅलिड रीझन्स सापडतातही. नाही सापडली तर सिस्टेमॅटिकली रूल-आऊट करण्याची मेथॉडॉलॉजी सापडली याचा आनंद तरी होईल.

धागाकर्त्यापेक्षा माझं वय २-३ महिन्यांनी जास्त आहे याचा फायदा घेऊन मी त्यालाही हेच सांगतोय. पण त्याला जंक पोश्टी टाकण्यात इंट्रेस आहे.

भाषेवर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं- हे कुणाच्या डोक्यात नीट नक्की ठरलं असेल तर मुद्देसूद लिहून काढायला हरकत नाही.
>>>>>>>>>>>

हेच लिहायचे म्हणत आहात ना?
लिहितो की.. नीट नक्की विचार करून स्वतः पुरते प्रामाणिक आणि मुद्देसूद.. झाल्यास स्वतंत्र धागा काढून लिहितो. तो तर छंद आहे माझा. फक्त आतून येऊ दे.. त्यामुळे अगदी उद्याच नाही पण या आठवड्यात लिहितो.

#####

इथली चर्चा वाचून मराठी मंडळाच्या कार्यक्रमाच्या प्लॅनिंग मिटिंग मधे झालेली “Why should we give preference to Marathi programs….. Marathi culture” वगैरे चर्चा आठवली >>>>
Lol Lol Lol
सहमत

दीड वर्ष मराठी मंडळासाठी / त काम करताना घेतलेल्या अनुभवातून बाहेर आलेलं हे
पिल्लू

या आठवड्यात लिहितो.
>> खरंच लिही. मी सिरियसलीच म्हटलेलं. काही पटेल काही नाही. शिवाय प्रत्येकाला वेगळं पटेल, आणि किकस्टार्ट्स मिळतील. चर्चा होईल. नवीन काही समोर येईल..

फेफ, अहो मी कधी ते प्रत्यक्ष बघितलं, ना भाग घेतला. त्यांची/ तुमचीही काही प्रोसेस असेलच ना. म्हणून म्हटलं..

अनुभवातून बाहेर आलेलं हे पिल्लू
>>
अनुभवांतून बाहेर आलेली पिल्लं भारीच असतात Proud यावरही चर्चा झाली पाहिजे.

<< भाषेवर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं- हे कुणाच्या डोक्यात नीट नक्की ठरलं असेल तर मुद्देसूद लिहून काढायला हरकत नाही.
>>>>>>>>>>>

हेच लिहायचे म्हणत आहात ना?
लिहितो की.. नीट नक्की विचार करून स्वतः पुरते प्रामाणिक आणि मुद्देसूद.. झाल्यास स्वतंत्र धागा काढून लिहितो. तो तर छंद आहे माझा. फक्त आतून येऊ दे.. त्यामुळे अगदी उद्याच नाही पण या आठवड्यात लिहितो.>>

----- assignment, स्वाध्याय या धाग्यावर दिला गेला होता.

एका आठवड्यात गृहपाठ पूर्ण करण्याचे आश्वासन ३ तारखेला दिले होते, आज १८ फेब्रुवारी आहे.

Oops सॉरी.. डोक्यात विचार केलेला पण ऑफिस काम वाढले आहे. म्हणून बरेच धागे pending आहे.. पण हे या विकेंड लिहितो नक्की.

बीअर बायसेप्सवर धागा काढणे आणि प्रतिसादांचा रतीब घालणे हे ऑफिसचे वाढलेले काम?

सर, चँपियन्स कप सुरू झालाय. शर्माजींच्या आरत्या लिहायच्यात. त्यात हे कुठे लिहिताय.

<< Oops सॉरी.. डोक्यात विचार केलेला पण ऑफिस काम वाढले आहे. म्हणून बरेच धागे pending आहे.. पण हे या विकेंड लिहितो नक्की. >>

----- आरामात लिहा... कामाचा बोजा आणि प्राधान्यक्रम समजू शकतो. Happy

Pages