Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2025/01/11/Screenshot_20250111_123755_Gallery_0.jpg)
आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अठीसा दांगडं नाही कऱ्याचं (
दांगाडो खांदेशी …
दांगाडो खांदेशी …
असेल, मी वरील तीनही भागात ऐकलाय
केक स्टँड सुंदर !
पिन्की धन्यवाद.
पिन्की धन्यवाद.
कुणाचे नीलकुमार, नीलवंती,
कुणाचे नीलकुमार, नीलवंती, नीलातै येईनात. आता मामींनी brown girl in the ring सुरु केले आहे.
ही घ्या आमची “मोहन जो दडो” प्लेट. Sturdy.
![4a9068f8-6fcc-4637-ad00-f2d983340066.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u63731/4a9068f8-6fcc-4637-ad00-f2d983340066.jpeg)
वय = १५+ निश्चित, मे बी २०.
कुणालाच आठवत नाही नीट.
फळ आणि प्लेट मेड फॉर ईच अदर
फळ आणि प्लेट मेड फॉर ईच अदर आहेत. डॉटेड!!
डॉटेड !
डॉटेड !
बरोबर ! ठिपक्याची नक्षी; Nature made + man made
वाह! प्लेट आवडलीच पण तो फोटो
वाह! प्लेट आवडलीच पण तो फोटो फार सुरेख आहे. पेंटिंगकरता योग्य असं शेडिंग आलंय.
फळ आणि प्लेट मेड फॉर ईच अदर आहेत. डॉटेड!! >>> +१
फळ आणि प्लेट मेड फॉर ईच अदर
फळ आणि प्लेट मेड फॉर ईच अदर आहेत. डॉटेड!!+2
हे अनदर डॉटेड फ्रुट शेक विथ क्लियर ग्लास
खाली क्लियर दिसतील 6 ग्लाससेस खालून जाड काच आहे आणि वरती नाजूक पातळ काच आहे ,चौकोनी शेप आहे .मला बघता क्षणी आवडले होते घरचे म्हणाले होते दोन दिवस टिकणार नाहीत, पण मी फक्त हाताळणार या बोली वर घेतले ,इतके काळजीने सांभाळुन वापरले आज 10 वर्ष झाली सगळे शाबूत आहेत.
प्लेट आणि फळं, दोन्ही खूप
प्लेट आणि फळं, दोन्ही खूप आवडले.
मामी, तुझा केक स्टँड मस्त आहे. मध्यंतरी फॅब मधून एका मैत्रिणीने सुरेख केक स्टँड घेतला होता. हे असलं बघून खूप मोह होतो, पण ठेवणार कुठे? आणि माझ्या घरातल्या पसाऱ्याला ही असली सुंदर क्रोकरी खूपच मिस मॅच होईल.
सिमरन गुलाबी प्लेट सुंदर
सिमरन गुलाबी प्लेट सुंदर
केक स्टँडला खोलगटपणा आहे का?
केक स्टँडला खोलगटपणा आहे का? केक स्टँड एकदम सपाट बघितले आहेत. केक हलवायला सोपे पडतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
का हा गोल फिरणारा आणि केक डिझाईन/ आयसिंग लागवताना वापरायचा स्टॅंड नाही तर सर्व करायचा आहे? तरी खोलगट का केला असेल प्रश्न पडला.
पेअर आणि प्लेट फार मस्त दिसते आहे. एकदम चित्रकलेतील स्थिरचित्र काढायला ठेवलेली वस्तू वाटली. किंवा वर्षा किंवा कोणी काढलेलं चित्रच वाटलं.
मामी,
मामी,
तुमचा पत्ता पाठवा, धाड घालायची आहे.
जबरी कलेक्षण मग, नीलपरी :बदाम: केक स्टँड... सगळंच
कप निळे बोल निळे प्लेटाही निळ्या>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नभ निळे रात निळी प्लेटाही निळ्या
झुलतो बाई सिरॅमिकचा झुला>>>>>>
कसली धमाल.
अनिंद्य,
कुठे दडवली होती "मोहन जो दडो" प्लेट इतक्या दिवस?
सिमरन
मस्त ग्लास....
छान कलेक्शन होत आहे इथे.
एका कॉन्फरन्स मध्ये मिळालेली
एका कॉन्फरन्स मध्ये मिळालेले स्मरणचिन्ह - काद्री आर्टची मार्बल प्लेट.
.. कुठे दडवली होती?
.. कुठे दडवली होती?
उत्खननात सापडली आज
मार्बल प्लेट 👌
असे asymmetric design जनरली नसते यात. फिनिश तेव्हढे घाईचे काम वाटले. की फोटोचा दोष ?
ओह्ह सुंदर प्लेट ऋतुराज
ओह्ह सुंदर प्लेट ऋतुराज
त्यावरून आठवले आग्र्याहून आम्हीपण अशीच एक प्लेट आणलीय. शोधली पाहिजे.
हो फिनिशिंग नाही.
हो फिनिशिंग नाही.![20250203_210433.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u61683/20250203_210433.jpg)
हे एक सिरॅमिक कोस्टर....
त्यावरून आठवले आग्र्याहून
त्यावरून आठवले आग्र्याहून आम्हीपण अशीच एक प्लेट आणलीय. शोधली पाहिजे.>>>>> करा उत्खनन.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आग्र्याला जाऊन प्लेट्स विकत
आग्र्याला जाऊन प्लेट्स विकत घेणारे खरे रसिक. 👍
मला फक्त पंछीचा पेठा, दालमोठ, ज़र्द हलवा आणि मलाई गिलौरी खाणे हेच सुचले असते. पानाच्या द्रोणात का देईनात ते![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ही घ्या माझ्याकडची एक निळाई
ही घ्या माझ्याकडची एक निळाई
-
या प्लेटची एक छोटीशी कहाणी आहे.
आम्ही तलसा मधे असतानाची ही गोष्ट. तलसा मधे एक शाळा आहे Street School नावाची. ही शाळा अश्या मुलांसाठी आहे ज्यांना शिक्षणात अडचणी आहेत पण तरीही त्यांना शिकायचं आहे. इथल्या मुलांपैकी काही अशी मुलं आहेत जी इतरत्र शिकत होती पण तिथे बुलिंग झाल्यामुळे त्यांना शाळेची भीती बसली आहे, शिक्षणात लक्ष लागत नाहीये. किंवा मग अशी मुलं आहेत की ज्यांच्या घरी शिक्षणाला अनुकुल वातावरण नाही - कोणाचे पालक व्यसनाधीन आहेत म्हणून, कोणाचे पालक तुरूंगात आहेत म्हणून किंंवा अन्य काही प्रॉब्लेम आहे म्हणून. इथे अशीही मुलं आहेत ज्यांना पालकच नाहीत आणि अशीही मुलं आहेत जी खूप लहान वयात स्वतःच पालक झाली आहेत. तर या अश्या सगळ्या मुलांसाठी ही शाळा मेंटर्स देते, त्यांना कौन्सेलिंग देऊ करते, त्यांना सर्वतोपरी मदत करून पुढच्या शिक्षणासाठी, चांगल्या भविष्यासाठी तयार करते. इथली काही काही मुलं पुढे जाऊन पीएचडी वगैरे सुद्धा झाली आहेत.
तर धनि या शाळेचा बोर्ड मेंबर होता आणि त्यासोबतच त्यांच्या वार्षिक फंडरेजर साठी सुद्धा काम करत होता. या फंडरेजर मधे तिथल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूही असायच्या. संध्याकाळच्या कार्यक्रमाची तयारी, मांडामांड करत असताना दुपारीच त्याची नजर या प्लेटवर पडली आणि त्याने मला तात्काळ फोन करून सांगितलं की आपण ही प्लेट विकत घेतो आहोत. फूल ना फुलाची पाकळी म्हणून का होईना, आमच्याकडून त्या मुलांना मदत होते आहे हे मलाही खूप छान वाटलं. आणि त्याच संध्याकाळी ही प्लेट आमच्या घरी आली. त्यानंतर आजतागायत ती आमच्या लिव्हिंग रूम मधे विराजमान आहे.
Such a heart warming gesture
Such a heart warming gesture ! ❤️
Loved the story a little more than the blue plate.
Loved the story a little more
Loved the story a little more than the blue plate. >>> १००++
दुकानदार कश्या शेवटी शेवटी
दुकानदार कश्या शेवटी शेवटी ठेवणीतल्या साड्या काढतो तसे माबोकर ठेवणीतला माल शेवटी काढतायत तर.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
-------
रमड मस्त आठवण. प्लेटही काय सुंदर आहे.
ठेवणीतला माल शेवटी ???
ठेवणीतला माल शेवटी ???
शेवट फाssssssss र दूर आहे अजून. अभी तो पार्टी शुरु हुई है !
ऋतुराज.
ऋतुराज.
तुमचा सेरेमिक कोस्टर एकदम निराळाय. Hand made असावा.
साळिंदर ?
यात फक्त चारदा वापरलाय फिका आकाशी रंग पण such subtle yet dramatic effect !
ऋतुराज फारच सुरेख कलेक्शन.
ऋतुराज फारच सुरेख कलेक्शन.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>>>>शेवट फाssssssss र दूर आहे अजून. अभी तो पार्टी शुरु हुई है !
इन्शागोविंदा!
स्ट्रॉबेरी शेक, मार्बलची इनले
स्ट्रॉबेरी शेक, मार्बलची इनले वर्कची प्लेट, सिरॅमिक कोस्टर सुरेख.
रमड, ती निळी प्लेट फार सुरेख दिसतेय. मला खूप आवडली आहे.
वरळीला लोटस सिनेमाजवळ जी ब्लाइंड स्कूल आहे तिथे दरवर्षी (बहुतेक डिसेंबरात) तिथल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या हँडमेड वस्तूंचे प्रदर्शन भरवले जाते. मी त्यातून अनेक सिरॅमिकच्या वस्तू घेतल्या होत्या. त्यात मोठाले हिरवे बेडुक आणि मशरूम्सही होते.
अमितव, स्टँड फिरणारा नाहीये. सर्व करायला आहे, आयसिंगचा नाही. खोलगटही नाहीये पण हां अगदी सपाटही नाही. लाकडी स्टँडवर एक अतिशय उथळ प्लेट लावली आहे. केक हलवायला त्रास होणार नाही इतपतच कड आहे.
शेवट फाssssssss र दूर आहे अजून. अभी तो पार्टी शुरु हुई है ! >>> अनिंद्यो, आन द्यो......
rmd, हृद्य आठवण आणि सुंदर
rmd, हृद्य आठवण आणि सुंदर प्लेट.....
पुलंचा निळाई धडा आठवला.
तुझिये निढळीं कोटि चंद्र प्रकाशे ॥
कमल नयन हरीचे वदन भांसे II
शेवट फाssssssss र दूर आहे अजून. अभी तो पार्टी शुरु हुई है !>>>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Brown beauty - for eating
Brown beauty - for eating “one square meal”![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पिज़्ज़ा, डोसा, पराठे सर्व आता चौकोन आकारात करतात, मग प्लेट चौकोन का नको ?
.
.
मुंबई पुष्पोत्सव मध्ये एका स्टॉलवर हे सिरॅमिक कंटेनर होते विकायला
जिराफ आणि मेंढे प्र चं ड
जिराफ आणि मेंढे प्र चं ड आवडले आहेत. सगळेच पळवून आणावेसे वाटतायत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages