Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फारएण्ड, लखू रिसबूडगिरी
फारएण्ड, लखू रिसबूडगिरी करायला मटेरियल- 'वंशवृक्षमधली कात्यायनी जेव्हा दुसरं लग्न करते तेव्हा ज्या ह्या होतात, दे वेअर म्हणजे अगदी ऑफुल!'![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या कार्यक्रमाला भैरप्पा येणारेत हे आम्हाला माहितीच नव्हतं! उमा कुलकर्णींना पुरस्कार मिळणार आहे आणि त्यांची मुलाखत होणार आहे असं कळलं होतं. प्रत्यक्षात मुलाखत नव्हती आणि स्टेजवर भैरप्पांना बघून सुखद धक्का बसला. या निमित्ताने पुण्यासारख्या (किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहराच्या) ठिकाणी अशा कार्यक्रमात ज्या प्रकारची सुसंस्कृत गर्दी दिसते तिची कन्नड आवृत्ती बघायला मिळाली
आपण राहतो तेथे अशा
आपण राहतो तेथे अशा कार्यक्रमांना सहज जाता येणे हे मोठ्या शहरांत आता दुर्मिळ होत चालले असावे >>> खरंय.
वंशवृक्षमधली कात्यायनी जेव्हा दुसरं लग्न करते तेव्हा ज्या ह्या होतात, दे वेअर म्हणजे अगदी ऑफुल!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
'वंशवृक्षमधली कात्यायनी
'वंशवृक्षमधली कात्यायनी जेव्हा दुसरं लग्न करते तेव्हा ज्या ह्या होतात, दे वेअर म्हणजे अगदी ऑफुल!' >>> वावे![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
वावे
वावे![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
वंशवृक्षमधली कात्यायनी जेव्हा
वंशवृक्षमधली कात्यायनी जेव्हा दुसरं लग्न करते तेव्हा ज्या ह्या होतात, दे वेअर म्हणजे अगदी ऑफुल!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आधुनिक वैद्यकीची शोधगाथा
आधुनिक वैद्यकीची शोधगाथा माझ्याही wishlist मध्ये आहे. आता घेतो वाचायला..
मी नुकतीच ४ पुस्तकं संपवली. रमेश देसाई यांचं वाघ आणि माणूस. अप्रतिम पुस्तक. अगदी दुर्गाबाईंच्या अस्वल जवळ जाणारं.. वाघ सिंह चित्ता बिबटा यांच्या फरकाबद्दल सुरेख माहिती आहे. कॉरबेटच्या लेखनातून व्हीलनिश वाटणारा वाघ एकदम जवळचा वाटू लागतो हे या पुस्तकाचं यश..
दुसरं पाटणकर यांचं १९४८ च्या सुमारास लिहिलं गेलेलं हिमालयाशी झुंज. एक सुरेख टाइम मशीन प्रमाणे मागे नेलेल्या काळातील पुस्तक. एकही अष्टहजारी शिखर तोवर म्हणजे १९४८ पर्यन्त पादाक्रांत झालेले नाही पण सर करण्यासाठी आखल्या गेलेल्या मोहिमांची माहिती मस्त मांडली आहे. बरीच माहिती वाचलेली असली तरी पुस्तक वाचताना मजा आणते. म्यालरीच्या मोहिमेवर ग्रिशमचं Paths of Glory सारखं सुंदर पुस्तक वाचलेलं असूनही या पुस्तकातील त्या मोहिमेची थरारकता कमी नाही.
तिसरं राहुल जोशी यांचं सिनेमाची शाळा. सिनेमा बनतो तेव्हाच्या सर्व तांत्रिक गोष्टींची ओळख अगदी सोप्या भाषेत लेखकाने करून दिली आहे. सिनेमा कसं बनत जातो याचा प्रवास पूर्ण झाल्यावर लेखकाने नमुन्यादाखल ३ सिनेमांची उदाहरणे देखील घेतली आहेत. Notebook, शोले आणि Shashawnk Redumption.
चौथे पुस्तक श्रीकांत बोजेवारांचे हिरव्या पोपटाची adult कथा हा कथासंग्रह. एक दोन कथांच्या कल्पना छान आहेत. ठीकठाक.
-हेम
रायगड यांनी फार सुंदर परिचय
रायगड यांनी फार सुंदर परिचय पुस्तकाचा. ट्रू स्टोरी बेस्ड फिक्शन हा आवडता जॉनर आहे.
राहुल जोशी यांचं सिनेमाची
राहुल जोशी यांचं सिनेमाची शाळा >>> इंटरेस्टिंग
एक मदत हवी आहे. माझ्या किंडल
एक मदत हवी आहे. माझ्या किंडल पेपरव्हाईट डिव्हाईसचा स्क्रीन गंडलाय. आपोआप फॉन्ट लहानमोठा होतो. पाने आपोआप स्क्रोल होतात. त्यासाठी माहीत असलेले सगळे उपाय करून झालेत. कोल्ड बूटिंग, वोर्म बूटिंग, फॅक्टरी रिसेट वगैरे.. काहीही फरक नाही. अमेझोनला मेल केला तर त्यांनी सर्विस स्टे. ला द्यायला सांगितले. किंडलची सर्विस स्टेशन्स कुठे कुठे आहेत महाराष्ट्रात ? किंवा हा स्क्रीन इश्यू असावा असं वाटतंय तर तो इतर कुणी बदलून देतं कां?
हेम
हेम
तुम्ही जर पुण्यात असाल तर
https://1stbestservice.com/amazon-echo-kindle-fire-tv-stick-service-cent...
पण हे लोक जुने मोडेल दुरुस्त करत नाहीत पण try करायला हरकत नाही.
बेबी सिटी - लेखक : फ्रिदा
बेबी सिटी - लेखक : फ्रिदा मॅकफदीन (इंग्रजी फिक्शन)
यातील बेबी सिटी म्हणजे मुले जन्माला येतात ती इस्पितळातील जागा म्हणजेच प्रसूती विभाग. या पुस्तकात प्रसूती विभागात येणाऱ्या स्त्रिया, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या मागण्या, तऱ्हा, त्यांच्यावर गुदरणारे प्रसंग, इत्यादींचे वर्णन आहे. प्रत्येक केस वेगळी. त्याचबरोबर प्रसूती विभागातील डॉक्टर्स यांचे हि आयुष्य दाखवले आहे. पुस्तकामध्ये नरम विनोदाचा शिडकावा आहे, त्यामुळे वाचायला मजा येते. पुस्तकाची नायिका व नॅरेटर हि एक स्त्री रेसिडेंट डॉक्टर आहे. तिच्या दृष्टिकोनातून कथा पुढे सरकत जाते. संपूर्ण पुस्तक प्रथम पुरुषी निवेदन आहे.
पुस्तकाची भाषा सोपी व ओघवती आहे, शब्द सोपे आहेत. कथेचा वेग छान आहे, कोठेही साचून राहत नाही. इतर इंग्रजी पुस्तकांच्या तुलनेत लांबी लहान वाटली. नवीन इंग्रजी वाचकांना सुद्धा वाचायला सोपे जाईल असे पुस्तक आहे. मला खूप आवडले.
बेबी सिटी - इंटरेस्टिंग!
बेबी सिटी - इंटरेस्टिंग!
वेबसिरीज निघायचं पोटेन्शियल असावं असं वाटतंय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
नितीन कोतापल्लेंची 'गुरू' ही
नितीन कोतापल्लेंची 'गुरू' ही कादंबरी अलीकडेच, जानेवारी २०२५ मध्ये प्रकाशित झालीय. फारच आवडली. म्हणजे यात एवढी कशिश आहे की एक संपूर्ण दिवस चिटकून बसलो आणि आरपार संपवूनच टाकली. पहिली तीन प्रकरण, 'दुःख', 'तृष्णा', 'गंध', एकदम क्लास आहेत. 'दुःख' या प्रकरणात एका प्रलयंकारी पावसाचं आणि त्यामुळे हाहाःकार उडालेल्या भावी शहराचं विदारक चित्रण वाचताना सारामागोच्या ‘ब्लाईंडनेस’ची आठवण झाली. आख्खं प्रकरणभर असा कहर बरसणारा, जाणीवा सुंद करून टाकणारा पाऊस मराठीत आजवर झालेलाच नाहीये.!
एकविसाव्या शतकाच्या या पूर्वार्धातली जीवनशैली, तिची गुंतागुंत, त्याखाली रगडल्या जाणाऱ्या माणसांची नस यामध्ये नेमकेपणाने पकडलीय. रिअल इस्टेटशी, नगररचनेशी संबंधित व्यवहारांतील भाषेची लेखकाला फार चांगली जाण आहे. शिवाय आश्रमांचं, कार्पोरेट बुवाबाजीचं, मिडीयाचं, सोशल मिडियाचं, एकूणच सगळ्या जगण्याच्याच बाजारीकरणाचं चित्रण वास्तवदर्शी आहे. एखादा गंभीर लेखक किती अनेक अंगांनी भोवतालाचा वेध घेऊ शकतो, बाजार-व्यवस्थेकडून हे जे मायाजाल विणलं गेलंय, त्याला किती ताकदीनं भिडू शकतो, आणि ते ध्वस्तही करू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
कादंबरी एकूण सहाशे पानांची आहे. थकवणारी आहे. त्यापैकी ३३६ व्या पानापर्यंत सगळं जबरदस्त आहे.! पण तिथून पुढे जरा वेगळाच गिअर टाकलाय. तिथून वास्तवाचा सांधा सुटून कल्पिताच्या, स्वप्नाच्या प्रदेशात जास्तच वावरत गेल्यासारखी वाटते (म्हणजे मला तरी तसं वाटलं). तरीही अवश्यमेव वाचण्यासारखी आहे.
समकालीन हिंदी साहित्यात असा मोठा अवकाश निरखणारे, तेवढा दमसांस असणारे चार-पाच लेखक वाचून माहिती झाले आहेत. आता मराठीतही अशा एका दमदार कादंबरीचं आगमन झालं आहे, याचं अप्रूप/कौतुक वाटलं.
![Screenshot_20250130_151720~2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u80363/Screenshot_20250130_151720~2.jpg)
छान परिचय संप्रति.
छान परिचय संप्रति.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दमसांस >>> शब्द आवडला.
गुरु : मुखपृष्ठ इतके छपरी का
गुरु : मुखपृष्ठ इतके छपरी का आहे?
वेबसिरीज निघायचं पोटेन्शियल
वेबसिरीज निघायचं पोटेन्शियल असावं असं वाटतंय Wink >>> ललिता-प्रीति, नक्कीच पोटेन्शियल आहे . पण अमेरिकेत अगोदरच बऱ्याच मेडिकल-ड्रामा वेबसिरीज आहेत . त्यामुळे या पुस्तकावरून कोणी काढेल असे मला वाटत नाही . यावरून सहज - भारतात अशी मेडिकल - ड्रामा वेबसिरीज आहे का ? पाहायला आवडेल .
विजया मेहतांची जीवनरेखा
विजया मेहतांची लाईफ लाईन म्हणुन एक होती. आताचे माहित नाही.
दिल मिल गए नावाची एक मेडिकल
दिल मिल गए नावाची एक मेडिकल टीव्ही सिरीज होती.
मुराकामीचं 'नॉर्वेजिअन वूड'
मुराकामीचं 'नॉर्वेजिअन वूड' वाचायला घेतलं.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कंटाळा येऊन मध्यात सोडून दिलं.
मुराकामीचं what i talk about
मुराकामीचं what i talk about when i talk about running छान आहे जर रनिंग आवडत असेल तर..
'एव्ह्रीबडी इज नॉर्मल टिल यु
'एव्ह्रीबडी इज नॉर्मल टिल यु गेट टु नो देम' - फार फार मस्त पुस्तक आहे. थोडं शेवटी शेवटी ख्रिश्चिअॅनिटीकडे झुकतं म्हणजे बरच झुकतं. पण जो मुद्दा मांडलेला आहे तो जबरदस्त छान मांडलेला आहे. आपण सारेच साळिंदर आहोत. आपले आपले काटे असतात आणि तरी जंगलातील साळिंदर जसे एकत्र येतात तसेच आपणही एकमेकांवरती प्रेम करायला शिकतच असतो. नव्हे 'संघ' किंवा 'परिवार' ही आपली मुलभूत गरजच असते. संघ म्हणजे 'संघम शरणम गच्छामि' मधील संघ. परिवार म्हणाजे मित्र परिवार, आपली ट्राइब.
माझ्या विपूत या पुस्तकातील मला आवडलेली वाक्ये नोंदवली आहेत. जरुर वाचा.
मुराकामीचं what i talk about
मुराकामीचं what i talk about when i talk about running छान आहे जर रनिंग आवडत असेल तर.. <<>>>> काही ठिकाणी फार कंटाळवाणं झालं मला.
तो अ थेन्सच्या रस्त्यावर ४२ किमी धावला तो भाग मला आवडला.
मुराकामीची १-२ पुस्तकं
मुराकामीची १-२ पुस्तकं वाचायचा प्रयत्न केला. आवडली/झेपली नाहीत. नाद सोडला.
रायगड यांनी फार सुंदर परिचय पुस्तकाचा. ट्रू स्टोरी बेस्ड फिक्शन हा आवडता जॉनर आहे. > माझेमन, धन्यवाद!!
हा जॉनर आवडत असेल तर आवडेल हे पुस्तक. मागे मी १-२ अजून या जॉनरच्या पुस्तकांचे परिचय लिहीलेत. ती पण आवडतील.
मी सध्या Canoe Country
मी सध्या
Canoe Country आणि
Snowshoe Country
ही एका कपलच्या मिनेसोटातल्या समर आणि विंटर explorations च्या अनुभवांची पुस्तकं वाचतेय..सुंदर वर्णनं आणि
स्वत: रेखाटलेली सुंदर चित्रे!! शांत बसून निवांत वाचावी अशी पुस्तकं!
गेल्या वीकेंडला रवी आमले
गेल्या वीकेंडला रवी आमले यांचे 'परकीय हात' हे पुस्तक वाचून संपवले. सरफरोश चित्रपट येईपर्यंत अन त्यात पाकिस्तानचे नाव ओपनली घेईपर्यंत परदेशी कारवायांबद्दल अशी भोंगळ स्टेटमेंट करण्याची राजकारण्यांना सवय होती. त्यामुळे नाव आवडले.
पुस्तकही वाचनीय आहे. भारताचे लष्करी व परराष्ट्र संबंध यावर प्रकाश टाकताना हे पुस्तक काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतील अपप्रचाराला उघड पाडतेच. शिवाय हेरगिरीच्या कहाण्या आणि कोल्ड वॉर संपेपर्यंत भारत हा देश हेरगिरीसाठी सुपीक का होता याबद्दल उत्तम इन्साईट देते. पण यातला महत्वाचा भाग म्हणजे फक्त हेरगिरीवर कॉन्सन्ट्रेट न करता आपला प्रपोगंडा चालवण्यासाठी काय काय केले जाते याच्या कहाण्या रम्य आहेत. त्यातले एक नाव होते USAID. सोमवारी ट्रम्प सरकारने USAID चे फंडस् फ्रीझ केले. Kind of ephiphany.
Pages