Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आमच्याकडे आठवड्यातून तीनवेळा
आमच्याकडे आठवड्यातून तीनवेळा तरी पोहे होतात.
पोहे छान दिसतायत.. आमच्याकडे
पोहे छान दिसतायत.. आमच्याकडे खुप आवडतात. दर रविवारी मुलगाच करतो पोहे ब्रेक फास्ट ला.
बाहेर मिळणाऱ्या इंदोरी
बाहेर मिळणाऱ्या इंदोरी पोह्यांमधे भदाभदा साखर टाकलेली असते ते नाही आवडत.
घरी कस्टमाइज़्ड मिळतात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कांदेपोह्याचा संबंध आपल्या
कांदेपोह्याचा संबंध आपल्या प्राचीन संस्कृती सोबत देखील जोडला गेला आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
https://www.maayboli.com/node/54988
प्राचीन संस्कृती
प्राचीन संस्कृती![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
… नातेवाईकांकडे नाश्ता म्हणून बहुतांश वेळा कांदेपोहेच मिळायचे. असे काही मोजून मापून केले जायचे की प्रत्येकाला एकच प्लेट मिळावी.…
Absolutely relatable ! अतीच प्रेमाचे पाहुणे (मोस्टली गृहिणीच्या माहेरचे) आल्यास पोह्यांसोबत शिरा मिळायचा कणकेचा.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पोहे मस्तंच... मला वाटतं ते
पोहे मस्तंच... मला वाटतं ते वाक्य संगमनेर च्या आठवण पोहे सेंटर च्या बोर्डावर आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी खाल्ले होते आठवण पोहे. To be precise २ सप्टेंबर २००८ ला.. अहाहा... अप्रतिम
अजूनही तीच चव राखली आहे का माहित नाही.!
…. मला वाटतं ते वाक्य आठवण
…. मला वाटतं ते वाक्य आठवण पोहे सेंटर च्या बोर्डावर आहे….
मनिम्याऊ, ते नाही माहित. मी अहमदनगरला पाहिले. गाडीतून जात असतांना तो बोर्ड बघितला आणि मोठ्याने हसायला आले. पोहे नाही खाल्ले तिथे. आज सहज आठवला तो बोर्ड आणि text.
त्याच रस्त्यावर पुढे “जिवाला खा, जिवाला खा - अनारसे बंधू समोसे” असा लिहिलेला मोठाच फलक असलेले दुसरे दुकान होते. त्यालाही असेच हसू आले. नाट्य-सिनेकर्मी सदाशिव अमरापुरकरांच्या cremation चा दुखद प्रसंग असूनही मोठ्याने हसलो म्हणून सोबतचे स्थानिक लोक नाराज झाले. असो.
आठवण पोहे सेंटर >> हे तर
आठवण पोहे सेंटर >> हे तर आमच्या संगमनेर चे प्रसिद्ध आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हायला !
हायला !
ये क्या होरा ! पोहे - नगर- संगमनेर !!!!!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
त्या धाग्यावर तूरीच्या
त्या धाग्यावर तूरीच्या सोलेभाताची आठवण झाल्यानंतर राहावत नव्हतं.
![Screenshot_2025-01-29-20-22-33-732-edit_com.miui_.gallery_optimized_100.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u67203/Screenshot_2025-01-29-20-22-33-732-edit_com.miui_.gallery_optimized_100.jpg)
मनिम्याऊ.. जबरदस्त दिसतोय भात
मनिम्याऊ.. जबरदस्त दिसतोय भात
धनि यांच्या रेसीपीने केलेल्या
धनि यांच्या रेसीपीने केलेल्या शेंगोळ्या
![20250129_211531.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u61683/20250129_211531.jpg)
वाह जबरी तोपासू दिसत आहेत.
वाह जबरी तोपासू दिसत आहेत.
व्वा! मस्त दिसतायत शेंगोळे,
व्वा! मस्त दिसतायत शेंगोळे, ऋतुराज!
पास्ता पालक सूप
पास्ता पालक सूप
जबरी दिसतंय. 😋
जबरी दिसतंय.
Wow
Wow
देशी शेंगोळे आणि विदेशी बो
देशी शेंगोळे आणि विदेशी बो पास्ता - एकामागे एक !
जाळ नी धूर संगटच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थंडी निमित्त गरमागरम खाऊ करणे
थंडी निमित्त गरमागरम खाऊ करणे चालू आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पास्ता पालक भले फार आवडीचे
पास्ता पालक भले फार आवडीचे नसेना पण दिसतेय तरी छान..
ऋ, त्यात मिरे पूड आणि लसूण
ऋ, त्यात मिरे पूड आणि लसूण आहे त्यामुळे चव छान लागते. आणि प्रो टिप अशी आहे की वरून थोडं किसलेलं चीज घालून अजूनच भन्नाट लागते. ट्राय करून पाहा.
छान दिसतंय पास्ता पालक सूप.
छान दिसतंय पास्ता पालक सूप. डीटेल्ड रेसिपी येऊ द्या सूपची. कुठल्या ना कुठल्या प्रकारे पालक खाऊ घालायचा आहे लोकांना.
सुरमई आणि पोहेही झक्कास.
जाळ नी धूर संगटच Happy>>>>>
जाळ नी धूर संगटच Happy>>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हो असे आले लसुन सांगू नका.
हो असे आले लसुन सांगू नका. रेसिपीच द्या. घरी मुलांना आवडतो पास्ता. जमेल तसे करून देतो. त्यामुळे बटर आणि चीज बरेचसे काम सोपे करते याची कल्पना आहे.
पालक पराठा, पालक पुरी ते खातात आवडीने.. म्हणजे त्या फ्लेवरशी सुद्धा काही वावडे नाही.
रमड छान अहे फोटो. टोमॅटो
रमड छान अहे फोटो. टोमॅटो बेस्ड दिसत नाही. चिकन स्टॉक (ब्रॉथ) मध्ये करत जा. वेजिटेरिअन करायचे झाले तर वेजी ब्रॉथ.
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझेमन, ऋ : आमच्या धनिंना सांगते पाकृ टाकायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सामो, गुड सजेशन.
ब्रॉद मध्ये मीठ असते पण मीठ
ब्रॉद मध्ये मीठ असते पण मीठ नसलेले जरासे महाग ब्रॉदस येतात. चुकून जास्त मीठ पडेल म्हणुन सांगीतले
बाकी सूप छानच दिसतय.
घरी लो सोडियम चिकन ब्रॉथच आहे
घरी लो सोडियम चिकन ब्रॉथच आहे गं. त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही. मी धनिला विचारलं, तर तो म्हणाला मला यात घालायचं नव्हतं कारण लसूण आणि पालकची चव यायला हवी होती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धनि? का? त्यांची रेसिपी आहे
धनि? का? त्यांची रेसिपी आहे का? त्यांना का विचारलस?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
की
मी मिस केले काही?
जाउ देत. सॉरी.
लसूण + पालक कडक काँबो आहे.
आज लंच, डिनर No Grains.
आज लंच, डिनर No Grains.
फक्त फलाहार.
Pages