खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

बाहेर मिळणाऱ्या इंदोरी पोह्यांमधे भदाभदा साखर टाकलेली असते ते नाही आवडत.

घरी कस्टमाइज़्ड मिळतात Happy

प्राचीन संस्कृती Lol

… नातेवाईकांकडे नाश्ता म्हणून बहुतांश वेळा कांदेपोहेच मिळायचे. असे काही मोजून मापून केले जायचे की प्रत्येकाला एकच प्लेट मिळावी.…

Absolutely relatable ! अतीच प्रेमाचे पाहुणे (मोस्टली गृहिणीच्या माहेरचे) आल्यास पोह्यांसोबत शिरा मिळायचा कणकेचा. Wink

पोहे मस्तंच... मला वाटतं ते वाक्य संगमनेर च्या आठवण पोहे सेंटर च्या बोर्डावर आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी खाल्ले होते आठवण पोहे. To be precise २ सप्टेंबर २००८ ला.. अहाहा... अप्रतिम
अजूनही तीच चव राखली आहे का माहित नाही.!

…. मला वाटतं ते वाक्य आठवण पोहे सेंटर च्या बोर्डावर आहे….

मनिम्याऊ, ते नाही माहित. मी अहमदनगरला पाहिले. गाडीतून जात असतांना तो बोर्ड बघितला आणि मोठ्याने हसायला आले. पोहे नाही खाल्ले तिथे. आज सहज आठवला तो बोर्ड आणि text.

त्याच रस्त्यावर पुढे “जिवाला खा, जिवाला खा - अनारसे बंधू समोसे” असा लिहिलेला मोठाच फलक असलेले दुसरे दुकान होते. त्यालाही असेच हसू आले. नाट्य-सिनेकर्मी सदाशिव अमरापुरकरांच्या cremation चा दुखद प्रसंग असूनही मोठ्याने हसलो म्हणून सोबतचे स्थानिक लोक नाराज झाले. असो.

हायला !

ये क्या होरा ! पोहे - नगर- संगमनेर !!!!!! Lol

Wow

ऋ, त्यात मिरे पूड आणि लसूण आहे त्यामुळे चव छान लागते. आणि प्रो टिप अशी आहे की वरून थोडं किसलेलं चीज घालून अजूनच भन्नाट लागते. ट्राय करून पाहा.

छान दिसतंय पास्ता पालक सूप. डीटेल्ड रेसिपी येऊ द्या सूपची. कुठल्या ना कुठल्या प्रकारे पालक खाऊ घालायचा आहे लोकांना.

सुरमई आणि पोहेही झक्कास.

हो असे आले लसुन सांगू नका. रेसिपीच द्या. घरी मुलांना आवडतो पास्ता. जमेल तसे करून देतो. त्यामुळे बटर आणि चीज बरेचसे काम सोपे करते याची कल्पना आहे.
पालक पराठा, पालक पुरी ते खातात आवडीने.. म्हणजे त्या फ्लेवरशी सुद्धा काही वावडे नाही.

रमड छान अहे फोटो. टोमॅटो बेस्ड दिसत नाही. चिकन स्टॉक (ब्रॉथ) मध्ये करत जा. वेजिटेरिअन करायचे झाले तर वेजी ब्रॉथ.

धन्यवाद सगळ्यांना Happy

माझेमन, ऋ : आमच्या धनिंना सांगते पाकृ टाकायला Happy

सामो, गुड सजेशन.

ब्रॉद मध्ये मीठ असते पण मीठ नसलेले जरासे महाग ब्रॉदस येतात. चुकून जास्त मीठ पडेल म्हणुन सांगीतले Happy बाकी सूप छानच दिसतय.

घरी लो सोडियम चिकन ब्रॉथच आहे गं. त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही. मी धनिला विचारलं, तर तो म्हणाला मला यात घालायचं नव्हतं कारण लसूण आणि पालकची चव यायला हवी होती Happy

धनि? का? त्यांची रेसिपी आहे का? त्यांना का विचारलस?
की
मी मिस केले काही? Happy
जाउ देत. सॉरी.
लसूण + पालक कडक काँबो आहे.

Pages