Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमची एष्टी? Happy <<
आमची एष्टी? Happy <<
स्वतः पलीकडे जग आहे हे मान्य तर पाहिजे.
इथे :
मी ही हो माता.. पिता मी ही हो..
मी ही हो बंधु.. सखा मी ही हो..
असं आहे.
आणि जोपर्यंत हे मराठी
आणि जोपर्यंत हे मराठी माणसांनाच पटत नाही >> बरोबर.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मराठी पिक्चरला अडचणीचे शोज मिळतात म्हणून महिलाप्रधान चि. बनतात. गृहिणींना एकत्र जाउन जिवाचं पुणे / मुंबई करून पुन्हा "हे" यायच्या आधी घरात येण्यासाठी अडचणीचे शोज वरदान ठरतात. मुलांचं काही नसतं. एक बॅच झिम्मा ला गेली तर दुसरी बॅच त्यांची मुलं सांभाळतात. नाहीतर चावी ठेवलेली असते. खाऊ असतो किंवा एक दिवस उशीर झाला तर म्हणत धपाटा देता येतो.
म्हणून केदार शिंदेच्या पाठोपाठ सगळेच बायकांचे सिनेमे बनवू लागलेत.
बाकी कुंभ के मेले में बिछड़े हुए हे प्रेक्षकांना हव असेल तर महाराष्ट्रात बारा वर्षांनी कुंभ का मेला येत असल्याने मराठी पिक्चर मार्केट पासून बारा वर्षे लांब आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
चलो, आत्ता जे म्हणिंग वह बहुत दिनसे म्हणणे का था नाऊ आय म्हण्ड इट.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिल्यांदाच एव्हढा चर्चेत भाग घेतला.
मराठी पिक्चरला अडचणीचे शोज
मराठी पिक्चरला अडचणीचे शोज मिळतात म्हणून महिलाप्रधान चि. बनतात.
>>>
ही कारणमीमांसा सुद्धा योग्य वाटते.
आणि म्हणून असे चित्रपट चालतात सुद्धा..
पण गंमत म्हणजे सारखे काय बायकांचे आणि कौटुंबिक चित्रपट बनवतात म्हणून ओरडा सुद्धा चालू राहतो. प्रत्यक्षात तेच पिक्चर मराठी चित्रपटसृष्टीला बॉक्स ऑफिसवर बीजनेस देत आहेत.
येस. पूर्वी तमाशापट बनायचे
येस. पूर्वी तमाशापट बनायचे तेव्हा काय ते एकच एक.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मग दादा कोंडके मुळं डबल मिनिंग बनायला लागले. तर काय ते एकच एक लाट. मग बेर्डे अशोक सराफ जोडीला घेऊन विनोदी लाट आली. तेव्हा वेगळा विषय नाही का म्हणून टीका व्हायची.
हे सिनेमे पब्लिक ला पाहिजे म्हणून निघत नव्हते का?
आता प्रयोग सुरू केले तर लोकांना काय पाहिजे ते बघा असा ओरडा चालू आहे.
मराठी पिक्चर च्या बाबतीत काही करा ओरडा होतोच.
धुंद रवीनं एक स्किट बारा वर्षापूर्वी ई टिव्हीवर सादर केलं होतं होतं त्यात दुकानावर पाटी वाचून पुणेकर त्यात चुका काढत असतात. तो सर्वांना मान देत एक एक अक्षर खोडत जातो. शेवटी एकच शब्द राहतो तेव्हा तोच पहिला पुणेकर त्याच वाभाडे काढतो.
मायबोलीवर असेल तर वर काढेल का कुणी? धमाल आहे ते.
आमची एष्टी
आमची एष्टी![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
आमची एष्टी
आमची एष्टी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मायबोलीनेच साहित्य, संगीत,
मायबोलीनेच साहित्य, संगीत, चित्रपट , मालिका यांच्याकडे क्रिटिकली बघायला शिकवलं, नाही आवडलं म्हणायची हिंमत दिली आणि ते का आवडलं नाही हे शोधायची आणि सांगायची तयारी करून घेतली. >>> हे आवडलं.
आमची यष्टी![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
जिलबी- कै च्या कै आहे.
जिलबी- कै च्या कै आहे. लहान मुले घर घर खेळताना हुबेहूब सगळे मोठ्यांसारखे करायचा प्रयत्न करतात ( प्रत्यक्षात दाण्याचे लाडू आणि पुठ्ठ्याचे घर बनवतात) तसे अनेक थ्रिलर्स बघून त्यातले फक्त क्लीशे पकडून आम्ही पण थ्रिलर बनवल्याचा आव आणलेला आहे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जी काही थोडिफार कथा आहे त्यात रहस्य या लेवल चे की पहिल्याच सीन मधे दाखवलेल्या दोन लोकांचे पुढे काय होणार ते प्रेक्षकाला इन्स्टन्टली कळावे. उरलेले नुसत्या त्या भूमिकेत कोणाला कास्ट केले आहे त्यावरून समजावे
पण स्वजो त्यासाठी जीप मधून तास भर धाव पळ करून शेवटी अचानकच विना लॉजिक सर्व फिगर आउट करणे हे विनोदी आहे ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वजोला टफ सुपरकॉप + बॅडबॉय रोल मधे फकाफका सिगरेट ओढताना, उगीच कारण नसताना गोळ्या झाडताना वगैरे दाखवणे. जे हास्यास्पद वाटते. उगीच स्वॅग सदृश कै च्या कै डायलॉग्ज ही दिलेत, वर ते डिलिवर करणार स्वजो - उदा "नाव नीट लक्षात ठेव - करमरकर !!" किंवा "कमाल! क मा ल!! " ( हे मुं- पु -मुं टोन मधे) ममव थ्रिलर म्हणजे किती ममव असावा
बर प्रसाद ओक चे तुम्हाला अजीर्ण झालेले नसेल तर आता नक्की होईल कारण डबल रोल आहे!! ( हे रहस्य नाही)
कथा तर फसलेली आहे. पूर्वी आब्बास मस्तान च्या सिनेमात ट्विस्ट साठी ट्विस्ट असायचे. विथ स्ट्रिक्टली नो लॉजिक . तसे यात आहे. एका प्रसंगात एकमेकाला मारणारे लोक पुढच्या प्रसंगात टाळ्या देताना मिठ्या मारताना दाखवायचे पण लॉजिक काहीच नाही
आमची यष्टी >>
आमची यष्टी >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
"नाव नीट लक्षात ठेव - करमरकर !!" किंवा "कमाल! क मा ल!! " ( हे मुं- पु -मुं टोन मधे) >> हे साक्षात ऐकू आलं.
बघावा का नाही?
बघावा लागेल ना आता
बघावा लागेल ना आता![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साइनफिल्ड च्या एका भागात इलेन ला साइनन्फिल्ड सोबत मूव्ही ला जायचे नसते तर तो इलेन ला म्हणतो "व्हॉट? सो अॅम आय सपोज्ड टू मेक सारकॅस्टिक रीमार्क्स टु स्ट्रेन्जर्स ?!!"
(No subject)
(No subject)
“सो अॅम आय सपोज्ड टू मेक
“सो अॅम आय सपोज्ड टू मेक सारकॅस्टिक रीमार्क्स टु स्ट्रेन्जर्स ?!!” -![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अनेक थ्रिलर्स बघून त्यातले
अनेक थ्रिलर्स बघून त्यातले फक्त क्लीशे पकडून आम्ही पण थ्रिलर बनवल्याचा आव आणलेला आहे. >>> मै
ते स्वॅग्ज उगाच अवसान आणल्यासारखे वाटतात.
स्वजो टफ सुपरकॉप + बॅडबॉय
स्वजो टफ सुपरकॉप + बॅडबॉय रोल >>> हरे राम
"नाव नीट लक्षात ठेव - करमरकर !!" किंवा "कमाल! क मा ल!! " ( हे मुं- पु -मुं टोन मधे) >>>> हे फारच पिसं काढणेबल मटेरियल दिसतंय.
मैत्रेयी वेगळा धागा का नाही काढत? लोकहो बघाच आता.
जिलेबी ओटीटी वर आली की
जिलेबी ओटीटी वर आली की थिएटरला जाऊन बघितली?
मी नाही बघू शकलो जिलबी.
मी नाही बघू शकलो जिलबी.
खूनबीन आवडतात बघायला पण इथे दिली बंदूक घाल गोळ्या कोणाला कशाला. बंदुकीतून गोळी मारताना नेम बिम धरायचा गावीच नाही यांच्या. सगळे बंदूक सरळ धरतात हा आडवी धरतो. डोळे आणि क्रॉस हेअर आणि सध्याचा जिवंत माणूस कमीत कमी एका प्रतालात तरी ठेव ना. मी नर्फ गन ने यापेक्षा जास्त नेम धरतो.
गन रेंज वर मारे नेम धरून आणि मारताना येरे माझ्या मागल्या. बरं धनाधन जॉन विक प्रकार आहे का? तर नाही. व्यवस्थित वन at अ टाईम खून करायचे आहेत.
रहस्य ... राहीलच. झोपच आली. मरुदे पीस काढण्याच्या लायकीचा ही नाही.
मराठीमध्ये कॉप universe
मराठीमध्ये कॉप universe आणतायत असं म्हणाला स्वप्नील जोशी त्या whyfal च्या गप्पांमध्ये. त्यातला आहे हा सिनेमा म्हणे.
हिंदी चित्रपटात हिरो अशी गोळी
हिंदी चित्रपटात हिरो अशी गोळी मारतो की हाताला जखम सुद्धा न होता हातातली बंदूक पडते. याउलट व्हीलन गोळी मारताना हिरो एकच्या आकड्यात पळत असतो तरी एकही गोळी त्याला लागत नाही. हे सगळे आपण चालवून घेतो आणि आपल्या मराठी हिरोने बंदूक आडवी धरत जरा काही swag दाखवला तर त्याच्या नेमबाजी आणि लोजिकवर प्रश्नचिन्ह.. अश्याने कसे चालणार मराठी चित्रपट?
बावळट डायलॉग्ज कमी म्हणून की
बावळट डायलॉग्ज कमी म्हणून की काय, ती ओठावर सुरवंट बसल्यासारखी स्वजो ची खोटी मिशी! काहीही केले तरी झपाटलेला बाहुला लूक लपत नाही![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सुरवंट डोळ्यासमोर आली मिशी!
सुरवंट
डोळ्यासमोर आली मिशी! शी शी!
ऋन्म्या बंदुक सोडून दे. तुला
ऋन्म्या बंदुक सोडून दे. तुला त्यात काही चांगलं सापडलं तर सांग. मी परत बघेन.
डोळे आणि क्रॉस हेअर आणि
डोळे आणि क्रॉस हेअर आणि सध्याचा जिवंत माणूस कमीत कमी एका प्रतालात तरी ठेव ना.
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
>>>
प्रतल शब्द खूप वर्षांनी वाचला.
तुला त्यात काही चांगलं सापडलं
तुला त्यात काही चांगलं सापडलं तर सांग. मी परत बघेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>>
छे.. सगळीकडे असेच प्रतिसाद आले तर मी नाही बघणार
सध्या मी जुने चित्रपट शोधून बघतो. जुने म्हणजे गेल्या दहा बारा वर्षातील. या काळात बरेच कमी चित्रपट पाहिल्याने बरेच सुटले आहेत.
प्रतल शब्द खूप वर्षांनी वाचला
प्रतल शब्द खूप वर्षांनी वाचला.
>>>>
हा शब्द मी सुद्धा माझ्या एकदोन लेखात वापरला आहे.
आठवले सापडले तर लिंक देतो. अजून एकदा वाचायला मिळेल.
एक डाव भुताचा सापडला.
एक डाव भुताचा सापडला. कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही.
पहिलाच विनोदी भूतपट असेल.
डोळे आणि क्रॉस हेअर आणि
डोळे आणि क्रॉस हेअर आणि सध्याचा जिवंत माणूस कमीत कमी एका प्रतालात तरी ठेव ना. मी नर्फ गन ने यापेक्षा जास्त नेम धरतो. >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अमित तू जिलबीचे स्पूफ म्हणून "मठ्ठा" नावाचा पिक्चर काढ व मनोजकुमार स्टाइलने समोरचा माणूस कोठेही असला तरी तिसरीकडे बघत नर्फ गनचा नेम धरलेला असा एक पोस्टर बनवू आपण
("मठ्ठा" हे लग्नात जिलबीबरोबर असते म्हणून. मठ्ठा हे इथे संबोधन नाही
)
(No subject)
"मठ्ठा" हे लग्नात जिलबीबरोबर
"मठ्ठा" हे लग्नात जिलबीबरोबर असते म्हणून. मठ्ठा हे इथे संबोधन नाही >>> याला बेकार फुटले![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
ओठावर सुरवंट! आणि नाकातुन
ओठावर सुरवंट! आणि नाकातुन रक्त काढून दाखवलं की नाही त्याने?
Pages