![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/12/11/nEcoIDXz_400x400_0.jpg)
सध्या ChatGPT चा बराच बोलबाला आहे. हे खूप मोठ्या माहितीस्त्रोतावर प्रशिक्षण दिलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल आहे. याची बुद्धिमत्ता खरेच वाखाणण्याजोगी आहे. म्हणून तर सध्या ते फार चर्चेत आहे. ज्यांची उत्तरे वर्णनात्मक आहेत किंवा ज्या समस्या सोडवायला अनेक पायऱ्या (steps) असतात अशा प्रश्नांची उत्तरे सुद्धा तो देतो. संगणकाचे अल्गोरिदम लिहिण्यापासून कविता करण्यापर्यंत अनेकविध प्रश्न आपण त्याला विचारू शकतो आणि त्याची तो उत्तरे देतो. अनेकांनी आजवर असे प्रश्न त्याला विचारलेलेही आहेत. जसे कि रजेचा अर्ज कसा लिहावा, मूळ संख्या (primary numbers) शोधण्यासाठीचा अल्गोरिदम लिहून दे, तुला या xyz नेत्याविषयी काय माहिती आहे, मानवी ह्र्दय कसे काम करते ते सांग इत्यादी. हे विस्मयचकित करणारे आहे.
आता तुम्ही म्हणाल गुगल केल्याने या प्रश्नांची उत्तरे मिळतात. पण हे गुगल चे सर्च इंजिन नव्हे कि जे इन्टरनेट शोधून त्याधारे माहिती पुरवते. हा प्रशिक्षित यंत्रमानव आहे. त्याला इंटरनेटचा एक्सेस नाही. जी माहिती त्याला देऊन प्रशिक्षित केले आहे त्या आधारे तो एखाद्या मानवाने उत्तर दावे तसे उत्तर देतो ही त्याची खासियत आहे. येणाऱ्या काळात माहिती तंत्रज्ञान कोणत्या दिशेने जाणार आहे याची ही चुणूक आहे. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा
मी अनेक प्रश्न विचारत असतो त्याला.
उदाहरणार्थ:
हा एक प्रश्न आणि त्याचे त्याने दिलेले उत्तर (अर्थात, हे क्रोम मधून मराठी भाषांतर केलेले आहे. ChatGPT ला अजून मराठी तितकेसे कळत नसल्याने मूळ प्रश्नोत्तर इंग्लिशमध्ये होते):
मर्यादा:
१. जसे वर उल्लेख केलाय कि याला इंटरनेटचा एक्सेस नाही. त्यामुळे चालू घडामोडींवर तो उत्तरे देऊ शकणार नाही (जसे कि आता यानंतरची मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारी फ्लाईट कधी व कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकणार नाही)
२. त्याला अजून मराठी कळत नाही. त्याचे प्रशिक्षण मुख्यत्वे इंग्लिशमध्ये झाले असल्याने तुम्ही जर त्याला मराठीत माही विचारले तर एक तर तो काहीतरी गमतीशीर उत्तर देईल किंवा मला प्रश्न समजला नाही म्हणून सांगेल.
३. हा खूप मोठ्या माहितीवर प्रशिक्षित यंत्रमानव असल्याने जसे मानवाकडून उत्तर देण्यात चुका होतात तशा याच्याकरवी सुद्धा होऊ शकतात पण म्हणून लगेच 'मग काय उपयोग?' असे वाटून घेऊ नका. तो शिकतोय आणि तुमची उत्तरे देता देता स्वत:ला प्रशिक्षित सुद्धा करतोय. उत्तर पडताळून पहा (नेटचा वापर करून वगैरे) आणि काही चूक असल्यास तसं अभिप्राय त्याला दया
बालाजींना साकडे घातले तर
बालाजींना साकडे घातले तर तिकडे बाला कापून घेतात. मग हेअर द्रायरची गरज राहात नाही.
ChatGPT चे मराठी इतके चांगले
ChatGPT चे मराठी इतके चांगले नाही. भाषांतर किंवा नॉन-इंग्लिश भाषांसाठी सध्या गुगल आघाडीवर आहे. तुम्ही Google Gemini ला हाच प्रश्न विचारला तर बरेच चांगले उत्तर येईल
-------
रोजच्या वापरासाठी हेअर ड्रायरचा अतिवापर टाळणे चांगले.
हेअर ड्रायरमुळे केसांना तात्पुरती सुंदरता मिळते, पण सतत वापरल्याने केस खराब होऊ शकतात.
हेअर ड्रायरमुळे होणाऱ्या काही समस्या:
* केस कोरडे आणि तुटणारे: हेअर ड्रायरमधून येणारी उष्ण हवा केसांमधील नैसर्गिक तेल आणि आर्द्रता काढून टाकते, ज्यामुळे केस कोरडे, तुटणारे आणि बेजान होतात.
* टक्कल: सतत हेअर ड्रायर वापरल्याने टक्कल पडण्याची शक्यता वाढू शकते.
* खोकला आणि सर्दी: हेअर ड्रायरमधून येणारी उष्ण हवा श्वसनमार्गातील श्लेष्मल त्वचेला कोरडी करू शकते, ज्यामुळे खोकला आणि सर्दी होऊ शकते.
हेअर ड्रायरचा वापर कमी करण्यासाठी काही टिप्स:
* केस हवेमध्ये सुकू द्या: शक्यतो, तुमचे केस हवेमध्ये सुकू द्या.
* हेअर ड्रायरचा कमी तापमान आणि कमी वाऱ्याचा वेग वापरा.
* हेअर ड्रायर केसांपासून 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर ठेवा.
* हेअर ड्रायरचा वापर करण्यापूर्वी केसांवर हीट प्रोटेक्टंट लावा.
* आठवड्यातून दोन ते तीन वेळांपेक्षा जास्त हेअर ड्रायर वापरू नका.
जर तुम्हाला रोज हेअर ड्रायर वापरण्याची गरज असेल तर:
* चांगल्या दर्जाचा हेअर ड्रायर वापरा ज्यामध्ये आयनिक तंत्रज्ञान आहे.
* हेअर ड्रायरचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर केसांवर कंडिशनर लावा.
* तुमच्या केसांची नियमितपणे काळजी घ्या आणि त्यांना मॉइश्चराइझ करा.
हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीचे केस वेगळे असतात आणि हेअर ड्रायरचा त्यांच्यावर कसा परिणाम होतो हे वेगळे असू शकते. आपल्या केसांसाठी काय योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञ किंवा केसांच्या तज्ञाचा सल्ला घेणे चांगले.
अरे वा !
अरे वा !
अशी उत्तरे मिळू लागली तर ९०% धागे एक दोन प्रतिसादातच आटपतील.
( ट आणि प ची अदलाबदल केली तरी चालेल)
घरमालक डिपॉझिट परत करत
घरमालक डिपॉझिट परत करत नसल्यास काय करावे?
घरमालक डिपॉझिट परत करत नसल्यास तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
1. घरमालकाशी बोलून पहा:
* शांतपणे आणि व्यावसायिकपणे बोला.
* तुमच्या भाडेकराराच्या अटी आणि तुम्हाला किती डिपॉझिट परत मिळायचा हवा याची त्यांना आठवण करून द्या.
* तुम्ही घरातून निघताना घेतलेल्या फोटोंची आणि व्हिडिओची प्रत दाखवा ज्यात कोणतीही नुकसान झालेली नाही हे दर्शवते.
2. लिखित पत्र पाठवा:
* जर बोलून पाहिल्याने काहीच फायदा झाला नाही तर, तुम्ही घरमालकाला लिखित पत्र पाठवू शकता.
* पत्रात, तुम्ही तुमचा डिपॉझिट परत करण्याची विनंती केली आहे हे स्पष्टपणे सांगा.
* तुम्ही भाडेकराराच्या अटी आणि तुम्हाला किती डिपॉझिट परत मिळायचा हवा याची प्रत जोडा.
* पत्र नोंदीकृत डाके द्वारे पाठवा आणि पावती ठेवा.
3. भाडेकरू संघटनेशी संपर्क साधा:
* तुमच्या भागात भाडेकरू संघटना असल्यास, ते तुम्हाला मदत करू शकतात.
* ते तुम्हाला तुमचे कायदेशीर अधिकार समजून घेण्यास आणि डिपॉझिट परत मिळवण्यासाठी काय करावे याबद्दल सल्ला देऊ शकतात.
4. कायदेशीर कारवाई करा:
* जर तुम्ही सर्व पर्याय वापरूनही तुमचा डिपॉझिट परत मिळवू शकत नसाल, तर तुम्ही लहान दाव्यांच्या न्यायालयात कायदेशीर कारवाई करू शकता.
* कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी, वकीलाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
तुम्हाला खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:
* तुमच्याकडे तुमचा डिपॉझिट आणि तुम्ही घरातून निघताना घेतलेल्या फोटोंची आणि व्हिडिओची प्रत असल्याची खात्री करा.
* तुम्ही भाडेकराराच्या अटींचे पालन केले आहे याची खात्री करा.
* शांत आणि व्यावसायिक रहा.
आशा आहे की हे माहितीपूर्ण आहे!
तुम्हाला तुमचा डिपॉझिट परत मिळवण्यासाठी शुभेच्छा!
तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल?
तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल?
edit
Show drafts
volume_up
दुर्दैवाने, मला पुरेशी माहिती नाही की तो/ती कोणते गाणे म्हणेल. मला गाण्याची भाषा, शैली, किंवा विषय यासारखी काही माहिती द्या.
तुम्ही मला त्या व्यक्तीबद्दल काहीतरी सांगू शकता का? त्यांचे आवडते गाणे कोणते आहे? ते सध्या कशा मूडमध्ये आहेत?
तुम्ही मला अधिक माहिती दिल्यास, मी तुम्हाला त्या व्यक्तीने कोणते गाणे म्हणण्याची शक्यता आहे याचा अंदाज लावण्यात मदत करू शकतो.
जर एक चतुष्पाद प्राणी (कुत्रा
जर एक चतुष्पाद प्राणी (कुत्रा किंवा मांजर) प्रियाराधन करताना मराठी गाणं म्हणणार असेल तर मस्करीत, ते "माझं कुत्रं कसं आहे चविष्ट" असं म्हणू शकेल. पण खरंच कोणतं गाणं म्हणेल हे कल्पनाविष्कारावर अवलंबून आहे. याला मनोरंजनासाठी म्हणाल्यास, खालील गाणं उदाहरणार्थ घेता येईल:
"माझं प्रिय प्राणी, माझं प्राणसखा,
तूच माझ्या जीवनात आनंदाचा क्षण,
तुझ्यासोबत हसता, खेळता क्षणभर,
माझ्या जीवनात तूच आनंदाचा किरण."
हे गाणं पूर्णपणे कल्पनेवर आधारित आहे आणि विनोदाच्या दृष्टिकोनातून दिलं आहे. असे अनेक गोड गाणी किंवा कविता तयार करता येतील ज्यात प्राण्यांच्या आणि त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या नात्याचं वर्णन केलं जाईल.
मला वाटलं आता चॅट जीपीटी त्या
मला वाटलं आता चॅट जीपीटी त्या गाण्यात 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे पण घालेल की काय!
मालकाने भाडेकरूचे डिपॉझिट कसे
मालकाने भाडेकरूचे डिपॉझिट कसे बुडवावे :
भाडेकरूचे डिपॉझिट बुडवण्याची प्रक्रिया सामान्यतः खासगी नियमांनी वाढविलेल्या असतात, परंतु त्याची सामान्य पद्धत काही आहे:
१. **मुलाखत:** मालकाने तुमच्याशी मुलाखत करून तुमच्या आवश्यकतांवर विचार केल्यानंतर, त्यांनी तुमच्या डिपॉझिटच्या प्रक्रियेबद्दल चर्चा करण्याची संधी दिली पाहिजे.
२. **डिपॉझिट बुक:** मालकाने तुमच्या डिपॉझिटच्या प्रमाणपत्र आणि बुक उपलब्ध करून देण्याची दिशा दिली पाहिजे. त्यात डिपॉझिट रक्कम, डिपॉझिट बुकचा नंबर, वेळेची सूचना, आणि संपूर्ण प्रक्रियेची माहिती असते.
३. **प्रमाणपत्र:** मालकाने तुमच्यासाठी डिपॉझिट बुक उपलब्ध करून देण्यासाठी एक अनुदानपत्र किंवा प्रमाणपत्र प्रदान करू शकतात. यात डिपॉझिट रक्कम, जमा केलेल्या दिनांक, बुडवलेल्या दिनांक, आणि मालकाचे स्वाक्षर असतात.
४. **बुडवणी:** डिपॉझिट बुडवण्यासाठी, तुम्हाला बँक किंवा वितरणीयांकडून मालकाच्या खात्यात डिपॉझिट रक्कम भरण्याची प्रक्रिया करावी लागेल.
तुमच्या ठिकाणीच्या कायदेशीर क्षेत्राच्या नियमांनुसार प्रक्रिया विविध असू शकते, त्यामुळे या सर्व प्रक्रियेबद्दल स्थानिक व्यक्तिंच्याशी संपर्क साधावं.
उसने घेतलेले पैसे कसे
उसने घेतलेले पैसे कसे बुडवावेत :
यदि व्यक्ती अपने द्वारा जमा केलेले पैसे वापस लेना चाहता है, तो इसकी प्रक्रिया विभिन्न तरीकों से की जा सकती है, जो निम्नलिखित हो सकती हैं:
१. **चैक:** व्यक्ति बैंक या वितरणीय बैंक के माध्यम से एक चैक ले सकता है जो की उसने डिपॉजिट के समय जमा किया था। यह चैक उसे मालामाल करने के लिए प्राप्त होगा।
२. **ट्रांसफर:** व्यक्ति अपने बैंक खाते के माध्यम से उस राशि को अपने बैंक खाते में ट्रांसफर कर सकता है जिस राशि को उसने डिपॉजिट के समय जमा किया था।
३. **नगद पेमेंट:** यदि संभव हो, तो मालिक व्यक्ति को पैसे नगद दे सकता है। इसके लिए व्यक्ति और मालिक के बीच किसी अधिकृत स्थान पर मिलना और लेन-देन करना पड़ सकता है।
४. **इलेक्ट्रॉनिक पेमेंट:** व्यक्ति और मालिक द्वारा उपयुक्त इलेक्ट्रॉनिक पेमेंट सेवा का उपयोग करके, जैसे कि वॉलेट, नेट बैंकिंग, या अन्य डिजिटल वितरणीय।
इन सभी तरीकों में, व्यक्ति और मालिक द्वारा सही तरीके से आवश्यक निर्देशों और प्रक्रिया का पालन करना महत्वपूर्ण है। अगर कोई संदेह हो, तो स्थानीय बैंक या वितरणीय संस्था से संपर्क करके उनसे सलाह लेना बेहतर होगा।
नीम हकीम खतरा ए जान , असा का म्हणतात हे आज उदाहरणासहित कळले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तळटीप : उसने हा शब्द हिंदी आहे म्हणून उत्तर हिंदी मध्ये आलं आहे
https://gemini.google.com/app
https://gemini.google.com/app
https://g.co/gemini/share/ebffccd9800e
जरा बाळबोध समस्या
जरा बाळबोध समस्या(गुगल स्टॅकओव्हरफ्लो गीक्सफॉरगीक्स करून झालंय बरं का)
मला 1D1 असा फॉरमॅट असलेला(डबल प्रिसीजन रिअल नंबर) स्ट्रिंग पायथॉन मध्ये नंबर ला कन्व्हर्ट करायचा आहे.साधा फ्लोट 'D' अक्षर ओळखत नाही.एरर देतो.
64 बिट फ्लोट D अक्षर ओळखेल, नम्पि.फ्लोट64.चॅट जीपीटी ला सहज विचारलं बेस्ट मार्ग दे, तर त्याने सगळे 'D' e ने रिप्लेस करा आणि मग तो स्ट्रिंग नम्पि.फ्लोट64 ला खाऊ घाला म्हटलंय.मला या अप्रोच मध्ये बेसिक लोचा वाटतोय.हे कोणा फ्रेशर मुलाने 'घाईत आहे, जुगाड करून काहीतरी देऊन टाकू' म्हणून काढलेलं सोल्युशन वाटतंय.
बऱ्याच काळ इंजिनिअरिंग मॅथ शी संबंध न आल्याने जरा सावधपणे घेतेय.तसं तर 'सगळं वापरून बघा आणि ज्याने यश मिळेल तो मार्ग वापरा' हा नेहमीचा धडक अप्रोच आहेच.
(वापरून पाहिला.एरर गेली.अर्थात यावर बारीक लक्ष ठेवणार आहे. चॅटजीपीटी ने दिलेल्या सोल्युशन वर माझा विश्वास पुण्याच्या रिक्षावाल्यांवर असलेल्या विश्वासाइतकाच आहे.)
तुम्चा प्रश्न एन्ग्लिश मध्ये
अरे वा झाल ..
बदल्ते प्रतिसाअद
धन्यवाद!! विपु केलीय बघ.
धन्यवाद!! विपु केलीय बघ.
मायबोलीकर इग्नोरास्त्र कधी
मायबोलीकर इग्नोरास्त्र कधी उपसतात?
https://g.co/gemini/share/d3f78ac5278b
यात मायबोलीकर ऐवजी 'सासरचे'
यात मायबोलीकर ऐवजी 'सासरचे' 'ऑफिसचे' 'सरकारी कर्मचारी' असे वेगवेगळे पर्याय वापरून उत्तर सारखं येतं का बदलतं तेही बघता येईल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सासरचे / सरकारी कर्मचारी हसून
सासरचे / सरकारी कर्मचारी हसून कधी बोलतात?
रआ, ते जेमिनी इंजिन चांगली
रआ, ते जेमिनी इंजिन चांगली उत्तरं देतंय.विचारून बघते काहीकाही.
उत्तर इथे पोस्ट करा की!
उत्तर इथे पोस्ट करा की!
मला वापरायचं नाही पण उगा आपली एक उत्सुक्ता!
आधी D चा e करा इतकं स्पेसिफिक उत्तर सापडलं म्हणून जरा जास्तच! D चा d का नाही? D ठेवणीतला शब्द आहे का? एस्केप करून होईल ना मग?
मी काय शोधलं होतं ते आठवून
मी काय शोधलं होतं ते आठवून परत शोधून शेअर करते.
![Screenshot_2024-06-19-17-32-46-507_com.android.chrome.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/Screenshot_2024-06-19-17-32-46-507_com.android.chrome.jpg)
माझा यावर विश्वास नाही.पण बरंच गुगल करून नीट तोडगा सापडेना त्यामुळे सध्या यावर सेटल होऊन पुढचा मोठा प्रश्न स्वतः सोडवायला घेतला आहे.(ऑटो करेक्ट ने नम्पि ला बंपी केलंच.)
आता भारतात सुद्धा Chat GPT
आता भारतात सुद्धा Chat GPT सारखेच दुसरे काहीतरी अॅप लिहिले आहे म्हणे.
काय आहे Deepseek AI? यामुळे
काय आहे Deepseek AI? यामुळे संपूर्ण जगात उडाली खळबळ, अमेरिकेच्या स्टॉक मार्केटला मोठा झटका
https://www.lokmat.com/tech/chinese-deepseek-ai-wakes-up-big-companies-l...
https://www.esakal.com/sci-tech/what-is-deepseek-china-ai-model-disrupti...
मी DeepSeek विषयीच लिहायला
मी DeepSeek विषयीच लिहायला आलो होतो तर सियोना यांचा प्रतिसाद दिसला.
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या बाबतीत जागतिक पातळीवर प्रचंड प्रमाणात चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. परवा परवा गुगल जेमिनी जोरात होते. अगदी लेटेस्ट घडामोडींवर सुद्धा उत्तर देत होते.
तोच त्याला टक्कर देत चाटजीपीटी पुढे आले. जेमिनी मागे पडताना दिसू लागले. त्यात आणि मध्यंतरी व्यक्तींची चित्रे काढताना फक्त गोऱ्याच लोकांची चित्रे काढल्यामुळे त्यांना चित्रे काढणारा बॉट मागे घ्यावा लागला. त्यातून गुगल अजूनही सावरलेले दिसत नाही. तोवर चाटजीपीटीने लेटेस्ट घडामोडींवर सुद्धा उत्तर देण्याइतकी मजल मारलीच शिवाय दिलेल्या वर्णनानुसार चित्रे/चलचित्र सुद्धा बनवू लागले.
तोच आता मुसंडी मारून चायनीज डीपसिक चर्चेत आले आहे. हे वरील दोघांपेक्षा फास्ट आहे. शिवाय त्या दोन्हीपेक्षा याला खूपच कमी उर्जा आणि कम्प्युटींग पावर लागत असल्याने त्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
यांच्या रणधुमाळीत Meta, Claude, Mistral यांचा सुद्धा आपापल्या परीने धुरळा उडवत आहेत. एकंदरीत बरीच जोरात सुंदोपसुंदी सुरु आहे.
अतुल सांगोपांग माहीतीबद्दल
अतुल सांगोपांग माहीतीबद्दल आभार.
मुख्य म्हणजे DeepSeek फुकट
मुख्य म्हणजे DeepSeek फुकट आहे. OpenAI साठी पैसे मोजावे लागतात.
ओपन ए आय कंपनीचा चॅट्जीपीटी,
ओपन ए आय कंपनीचा चॅट्जीपीटी, इन्टर्व्ह्युकरता खूप मदत करतो. प्र-चं-ड. आपले उत्तर (व्हर्बल) तो रेट करतो व त्यात सुधारणा सुचवतो.
(No subject)
सियोना, हे चित्र आवडलंच एकदम!
सियोना, हे चित्र आवडलंच एकदम! ती जाहिरात आठवली.
Pages