ChatGPT: विचारा तर खरं

Submitted by अतुल. on 11 December, 2022 - 03:33

सध्या ChatGPT चा बराच बोलबाला आहे. हे खूप मोठ्या माहितीस्त्रोतावर प्रशिक्षण दिलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल आहे. याची बुद्धिमत्ता खरेच वाखाणण्याजोगी आहे. म्हणून तर सध्या ते फार चर्चेत आहे. ज्यांची उत्तरे वर्णनात्मक आहेत किंवा ज्या समस्या सोडवायला अनेक पायऱ्या (steps) असतात अशा प्रश्नांची उत्तरे सुद्धा तो देतो. संगणकाचे अल्गोरिदम लिहिण्यापासून कविता करण्यापर्यंत अनेकविध प्रश्न आपण त्याला विचारू शकतो आणि त्याची तो उत्तरे देतो. अनेकांनी आजवर असे प्रश्न त्याला विचारलेलेही आहेत. जसे कि रजेचा अर्ज कसा लिहावा, मूळ संख्या (primary numbers) शोधण्यासाठीचा अल्गोरिदम लिहून दे, तुला या xyz नेत्याविषयी काय माहिती आहे, मानवी ह्र्दय कसे काम करते ते सांग इत्यादी. हे विस्मयचकित करणारे आहे.

आता तुम्ही म्हणाल गुगल केल्याने या प्रश्नांची उत्तरे मिळतात. पण हे गुगल चे सर्च इंजिन नव्हे कि जे इन्टरनेट शोधून त्याधारे माहिती पुरवते. हा प्रशिक्षित यंत्रमानव आहे. त्याला इंटरनेटचा एक्सेस नाही. जी माहिती त्याला देऊन प्रशिक्षित केले आहे त्या आधारे तो एखाद्या मानवाने उत्तर दावे तसे उत्तर देतो ही त्याची खासियत आहे. येणाऱ्या काळात माहिती तंत्रज्ञान कोणत्या दिशेने जाणार आहे याची ही चुणूक आहे. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा Happy

मी अनेक प्रश्न विचारत असतो त्याला.
उदाहरणार्थ:
हा एक प्रश्न आणि त्याचे त्याने दिलेले उत्तर (अर्थात, हे क्रोम मधून मराठी भाषांतर केलेले आहे. ChatGPT ला अजून मराठी तितकेसे कळत नसल्याने मूळ प्रश्नोत्तर इंग्लिशमध्ये होते):

मर्यादा:

१. जसे वर उल्लेख केलाय कि याला इंटरनेटचा एक्सेस नाही. त्यामुळे चालू घडामोडींवर तो उत्तरे देऊ शकणार नाही (जसे कि आता यानंतरची मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारी फ्लाईट कधी व कोणती आहे? या प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकणार नाही)

२. त्याला अजून मराठी कळत नाही. त्याचे प्रशिक्षण मुख्यत्वे इंग्लिशमध्ये झाले असल्याने तुम्ही जर त्याला मराठीत माही विचारले तर एक तर तो काहीतरी गमतीशीर उत्तर देईल किंवा मला प्रश्न समजला नाही म्हणून सांगेल.

३. हा खूप मोठ्या माहितीवर प्रशिक्षित यंत्रमानव असल्याने जसे मानवाकडून उत्तर देण्यात चुका होतात तशा याच्याकरवी सुद्धा होऊ शकतात Happy पण म्हणून लगेच 'मग काय उपयोग?' असे वाटून घेऊ नका. तो शिकतोय आणि तुमची उत्तरे देता देता स्वत:ला प्रशिक्षित सुद्धा करतोय. उत्तर पडताळून पहा (नेटचा वापर करून वगैरे) आणि काही चूक असल्यास तसं अभिप्राय त्याला दया

Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी Revati1980 यांनी सांगितल्याप्रमाणे आजकाल Bard च जास्त वापरतोय ChatGPT पेक्षा.
https://bard.google.com/
मस्त आहे. बोल्ले तो एकदम टकाटक, भिडू. (आधीच मी तसाही गुगल चा पंखा आहे)

बाय द वे कोणास वर्णन देऊन त्यानुसार इमेजेस बनवणारी चांगली AI Service माहिती आहे का? (शक्यतो फ्री मधी Proud )

थांबा थांबा लगेच गुगल करू नका Lol मी ट्राय केलेत ते आधी सांगतो:

Midjourney: हे यासाठी फेमस आहे (कि होते म्हणू?) चांगल्या इमेजेस बनवते. पण याचा प्रोब्लेम हा आहे कि एक तर हे Discord मधून वापरावे लागते. तिथे पब्लिक चाटरूम मध्ये सगळ्या गावभरचे पब्लिक आपापल्या इमेजेस बनवून घेत बसलेले आहे. आपल्या सोबत सगळ्यांच्या इमेजेस स्क्रोल होत राहतात. It's pretty annoying. शिवाय याला फ्री मध्ये मर्यादा सुद्धा आहेत.

गुगल करून इतर काही फ्री सर्विसेस आहेत त्या ट्राय केल्या पण Midjourney इतके खास नाही.

<<बाय द वे कोणास वर्णन देऊन त्यानुसार इमेजेस बनवणारी चांगली AI Service माहिती आहे का? (शक्यतो फ्री मधी >>

मायक्रोसॉफ्ट चे बिंग. एका प्रॉम्प्ट मध्ये ३० इमेजेस मिळतात. दहा प्रॉम्प्ट मध्ये ३००. Totally free.

हो आत्ताच पाहिले. मायक्रोसॉफ्टचे. त्यासाठी बिंग च इंस्टाल करावा लागतो. Which is still fine.

बाय द वे, OpenAI ने सुद्धा सुरु केली आहे हि सर्विस:
https://openai.com/research/dall-e

अजून गुगल यात आलेले दिसत नाही.

Sharadg. Turnitin सॉफ्टवेअर प्रमाणे आता GPTZero हा अँटी-प्लेगियरिझम प्रोग्राम मिळतो. त्यात ही chat GPT वापरून तयार केलेला शोध निबंध पकडता येतो.

ओपनएआयचे (चॅट जीपीटी ) माजी कर्मचारी डॅनिएला आणि डारियो अमोदेई यांनी स्थापन केलेल्या एन्थ्रोपिकने काही दिवसा पूर्वी क्लॉड नावाचा एआय चॅटबॉट लॉन्च केला.एन्थ्रोपिकने DuckDuckGo, Quora आणि Notion या टेक कंपन्यां बरोबर चॅटबॉटची चाचणी केली आणि ती जीपीटी ४ लाही टक्कर देऊ शकेल असे त्यांचे म्हणणे आहे.

चॅट जीपीटीच्या यशानंतर, आता क्लॉडचा दबदबा वाढेल असे वाटते. सार्वजनिक डेमो दरम्यान चॅटबॉटने चुकीचे उत्तर दिल्याने गुगलचा बार्ड लाँच करण्याचा प्रयत्न फसला होता. बार्डने त्यात सुधारणा करून आता ब्राझील आणि यूरोप मध्ये लॉन्च केले आहे. मायक्रोसॉफ्ट स्वतःच्या उत्पादनांमध्ये जीपीटीला पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना आणि गुगल स्वतःचे एआय मॉडेल तयार करताना गोंधळतोय अशावेळी , एन्थ्रोपिकने या दोघांसमोर एक कडवे आव्हान उभे केलेले दिसते .

क्लॉड लॉन्च करतेवेळी त्याची बुद्धिमत्ता दाखवण्यासाठी, एन्थ्रोपिकने The Great Gatsby (४५००० शब्द) ही संपूर्ण कादंबरी लोड केली आणि असे करताना त्यातली फक्त एक ओळ चुकीची टाकली. ही चूक क्लॉडने फक्त २२ सेकंदात शोधून काढली. आता क्लॉडचे पुढचे वर्जन क्लॉड-२ तयार आहे आणि त्यावर रजिस्टर करायला आता मोठी वेटिंग लिस्ट आहे.

Lol फारेंड. Proud अशक्य आहे. चांगली शिक्षा व्हायला हवी ज्यांनी सबमिट केलंय त्यांना.

ChatGPT,  Google Bard, HuggingChat
Zapier AI, Microsoft Bing AI, Perplexity, YouChat, Jasper Chat, copy.ai , ChatSonic, ZenoChat
 ChatSpot,  Personal AI,  Pi,
playground, Poe, DeepAI Chat, CharacterAI, Snapchat My AI, GitHub Copilot, Amazon CodeWhisperer. इत्यादी
Chatbot चा एकदा तरी उपयोग करून पाहण्यासारखा आहे.

सध्या मी हे तीन वापरतोय:

१. गुगल बार्ड:
https://bard.google.com/

२. चाट जीपीटी:
https://chat.openai.com/

३. बिंग चाट:
https://www.bing.com/search?&q=What+can+the+new+Bing+chat+do+for+you%3f&...

एखादा विषय समजून घ्यायचा असेल तर किंवा प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर या तिघांच्या सोबत उलटसुलट चर्चा करणे. खूप छान सोय Happy विविध उत्तरे येतात त्यातून परत शंका तयार होतात त्यावर पुन्हा तिघांशी चर्चा. असे करून क्लिष्ट विषय सुद्धा छान समजतो.

(इतर आहेत त्यापैकी पर्प्लेक्सिटी https://www.perplexity.ai/ नुकतेच ट्राय करत आहे. बाकीचे अजून पाहिलेले नाहीत. पण हे तीन चार 'गुरु' पुरेसे वाटत आहेत सध्यातरी)

चॅट जीपीटीच बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ओपन एआय चे कस्टमर कमी होत गेलेत. मायक्रोसॉफ्टचा रस बिंग मध्ये जास्त आहे. एलोन मस्क स्वतःच त्याचे Xai आणतोय.
https://analyticsindiamag.com/why-is-microsoft-distancing-itself-from-op...

कालच वाचलं माणसाच्या मेंदूत एखाद्या विशिष्ट वेळी कुठले विचार चाललेत यावर CHatGPT संशोधन सिंगापूरला चालू आहे काही निवडक स्वयंसेकांवर.
Reporting will be in text format.
वैयक्तिक माहिती सार्वजनिक?

तसंही आजकाल काय वैयक्तिक राहिलं आहे म्हणा! तेल संपत आलं आहे आता किराणा दुकानातून आणायला पाहिजे हा विचार नुसता करेपर्यंत गुगल आपल्याला तेलाच्या ब्रँडच्या जाहिराती दाखवायला सुरुवात करतो. कधी गुडघ्यात नुसती चमक भरली हे कुणाला सांगायच्या आत युट्यूबवर संधिवाताच्या क्रीमच्या जाहिराती येतात. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे.

Register करताना मोठाच्या मोठा मेसेज असतो आणि खाली चेक बॉक्स असतो I agree चा जो आपण फार विचार न करता क्लिक करून रजिस्टर करतो. तिथे हे सगळे लिहिलेले असते Biggrin Light 1

Lol

बाय द वे, ऑन अ सिरीयस नोट - दोन्ही जरी एआयचाच भाग असले तरी "जनरेटिव्ह" इंटेलिजन्स आणि एखाद्याच्या बोलण्यातून, वेब सर्च मधून काहीतरी पकडून त्याला अ‍ॅड्स दाखवणे - हे दोन्ही पूर्ण वेगळे तंत्रज्ञान आहेत. अ‍ॅड्स दाखवण्याशी चॅट जीपीटी किंवा इतर कोणत्यही जनरेटिव्ह अल्गॉरिदम्स चा संबंध नाही. त्याचा मुख्य भाग हा एखाद्याच्या पोस्ट मधून निवडक शब्द घेउन त्याच्याशी संबंधित उत्पादने दाखवणे हा आहे. त्यातही कोणाचे उत्पादन प्राधान्याने दाखवायचे वगैरे कमर्शियल अँगल्सही आहेत.

याउलट जनरेटिव्ह म्हणजे टेक्स्ट किंवा पिक्चर्स जनरेट करणारे तंत्रज्ञान. इतके दिवस एआय जास्त वापरात होते ते फ्रॉड डिटेक्शन वगैरे करता. म्हणजे उपलब्ध डेटामधून निष्कर्ष काढत एखाद्या प्रश्नाचे उत्तर "हो" किंवा "नाही" देणारे (उदा: एखादे क्रेडिट कार्ड ट्रॅण्झॅक्शन शंकास्पद आहे का ई), किंवा उपलब्ध पर्यायातून एक निवडणारे (शंभरएक व्हेरिएबल्स तपासून चार इन्शुरन्स पॉलिसीज पैकी कोणती एक चपखल बसेल हे ठरवणे). जनरेटिव्ह एआय असाच डेटा वापरून तुम्हाला एखादा पॅराग्राफ किंवा प्रोग्रॅम लिहून देऊ शकते - जे आधीच्यापेक्षा पूर्ण वेगळे आहे.

हे सगळे मला पूर्ण झेपले आहे असा अजिबात दावा नाही. जशी माहिती होत आहे तसे देतोय Happy

चॅटजीपीटीने जर माबो अकाउंट उघडलं तर ते कसे प्रतिसाद देईल, हे मला बघायचं होतं. उदाहरण म्हणून मी माझीच एक दुर्लक्षित कविता रिक्षा चालवल्यासारखी तिकडे घेऊन गेलो आणि मराठीत अभिप्राय द्यायला सांगितला. तर चॅटजीपीटीचा अभिप्राय असा होता -
------
ह्या कवितेत पंढरपुराला प्रवास करण्याच्या सौम्यांची आराधना केली गेली आहे. कवीच्या मनात एक गंभीर इच्छा आहे की पंढरपुराला भेट देऊन पंडुरंगाच्या (विठ्ठलाच्या) दिव्य दृष्टीला मिळवावी, ती भक्तिची आवाज दिली गेली आहे.

या श्लोकांत त्याच्या भक्तिपूर्ण आवाजांची स्थलयात्रेची सन्निध्याची चित्रण केली आहे, चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर भक्ते गाणे गातात, ताळ-मृदंगांची मेळवणी केली जाते. संतांच्या आणि नेतृत्वांच्या भेटीचा सुखद आत्मसातव्य आणि सज्जनांच्या संगीतातल्या आनंदाची चित्रण केली आहे.

कवी महत्त्वाची असंगती म्हणून दिवा, ज्यावर विठ्ठलाच्या दिव्य दर्शनाची अपेक्षा आहे, त्या वेळेला एक पवित्र आणि उत्साहित दृष्टीक्षणाची अपेक्षा केली आहे. "विठू" (विठ्ठल) या नावाचे पुनरावृत्ती करणे भक्तीचं आणि व्यक्तीच्या मनाच्या एकवचनीयतेचं दर्शवतं.

या पद्यांत, आंतरिक आणि बाह्य तीर्थयात्रेचं सिंबॉलिक चित्रण केलं आहे, ध्यानाने दिव्य अनुभव शोधण्याची अटी आणि आत्मनिरीक्षणाचा महत्त्व वाचवते.

सारांशात, ह्या कवितेत पथविश्रांतीच्या, भक्तीच्या आणि आध्यात्मिक अभिलाषेच्या अस्तित्त्वाचं आवाज कुठेही बदलून राहणार नाही.
------

बाकी काही असलं, तरी शेवटच्या चार ओळींवर आधारित "या पद्यांत, आंतरिक आणि बाह्य तीर्थयात्रेचं सिंबॉलिक चित्रण केलं आहे" हे फार विशेष निरीक्षण नोंदवलं गेलं आहे. त्याबद्दल मला चॅटजीपीटीची कमाल वाटली.

Interesting!
Chatgpt ला हुशार करु नका हर्पा. Proud
मला ते robot चं युग आलं आणि माणूस हतबल झाला tyeps लहानपणी लिहिलेले निबंध आठवतात.

हा धागा बरेच महिने अपडेट नाही झाला. दरम्यानच्या काळात गुगल बार्डचे गुगल जेमिनी झाले. ChatGPT बरेच सुधरले. इतरही बऱ्याच AI साईट्स चमकू लागल्यात. डॉट काम चा जसा बूम आला होता तसा डॉट ए आई चा बूम आलाय जणू. अलाना डॉट ए आय, फलाना डॉट ए आय असे काय वाटेल ते येऊ लागले आहे.

आता तर AI वापरून लोकं मराठी गाणी सुद्धा बनवू लागलेत.
आणि आज तर चक्क व्हाट्सपने सुधा मेटा ए आई भारतात लॉंच केलेलं दिसत आहे (निदान माझ्या फोन वर तरी दिसत आहे)

ChatGPT:
In Browser: https://chat.openai.com/
Android App: https://play.google.com/store/apps/details?id=com.openai.chatgpt

Google Gemini:
In Browser: https://gemini.google.com/
यात दिलेल्या वर्णनानुसार इमेजेस सुद्धा बनवता येतात फक्त मानवी प्रतिमा अजून बनत नाहीत
Android App: https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.go...

Microsoft Copilot:
In Browser: https://copilot.microsoft.com/
Android App: https://play.google.com/store/apps/details?id=com.microsoft.copilot

Microsoft Copilot Image Generator:
Microsoft Copilot च्या ब्राउजर लिंक मध्ये उजव्या बाजूला Designer ऑप्शन येतो. त्यातून आपण दिलेल्या वर्णनानुसार इमेज बनवता येते.
याशिवाय हि लिंक वापरून सुद्धा तेच करता येते: https://www.bing.com/images/create?FORM=GENILP
(वरच्या दोन्हीत काय फरक आहे माहिती नाही)

सर्व धागा वाचुन काढला
खुपच उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद.
मी देखिल विचारुन घेतले, XLS मधे एफेमेरिज calculation कशी करु, त्याने python चे उदाहरण बर्याच माहितीसहित दिले.
मग विचारले, माझ्या laptop वर python कसे इन्स्टोल करू, त्याचीही सविस्तर उत्तरे मिळाली.
बघु, काय काय करता येईल.

रोजच्या वापरासाठी हेअर ड्रायर चांगला की वाईट?

हे खालीलपैकी काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या आणि त्यानुसार आपल्याला निर्णय करावा:

1. **हेअर टाइप**: आपल्याला कोणत्या प्रकारचे केस आहेत हे महत्वाचं आहे. केसांसाठी बालीचे, केमिकल प्रक्रिया केलेले किंवा घालीचे बाल होऊ शकतात. जर आपले बाल अतिरंजित आणि केमिकल प्रक्रियेसह सहजपणे कडक झाले असतील, तर कम गरमीचा वापर करा.

2. **हेअर ड्रायरची गरज**: किती काळ आपल्याला हेअर ड्रायर वापरायचा आहे ते खूप महत्वाचं आहे. कधीकधी ते विकत घेतले जाणारे आहेत ज्यामुळे ते थांबवलेल्या अवस्थेत आहेत. गरमी आणि गट्ट काही वेळांना खूप वापरायचं असतं, परंतु त्यामुळे आपल्याला आपल्या बालांच्या क्षतीबद्धता व्हायला असू शकते.

3. **हेअर कन्डिशनिंग**: हेअर ड्रायर वापरताना आपल्याला हेअर कन्डिशनर वापरायला हवं त्यामुळे आपल्याला आपल्या बालांना मदत करता. आपल्याला वापरलेल्या वस्तूंच्या शीर्षिका पाहण्यास एक आहे.

4. **हेअर स्टाइलिंग उत्पादने**: आपल्याला कोणत्या हेअर स्टाइलिंग उत्पादने वापरायचं आहे ते आपल्याला हेअर ड्रायर विचारताना नक्की कळू द्या. काही उत्पादने उत्तमपणे काम करतात अशा उत्तम विशिष्टतांसह आहेत ज्यामुळे ते हेअर ड्रायरसह संगणकीय असतात.

5. **बजेट**: हेअर ड्रायर्सची किंमतेचे महत्व आहे. आपल्याला त्यांची किंमत प्राथमिकपणे पाहावी. त्यामध्ये खासगी लक्षात घेता की तो आपल्या आवडीनुसार असल्यास विशेष वैशिष्ट्ये आणि अभिनवता त्याच्यामध्ये आहेत का.

आपल्याला आपल्या बालांच्या प्रकृतीच्या आधारे हे सर्व मूल्यांकन करायला हवं. आपल्याला त्यांची निवडणी करताना आपल्या बालांच्या क्षमतेच्या ध्यानात ठेवायला हवं, जसे की ते उन्नत गरजी सांगतात किंवा आपल्या बालांना किती गरमी प्रतिकूल असते.

Pages