Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साबळेच कुणीतरी ग्रुप मोडरेटर
साबळेच कुणीतरी ग्रुप मोडरेटर आहे सिनेमागलीवर, बहुतेक वसुंधरा साबळे..
त्या ग्रुपच्या पोस्ट वाचायचो, पण शाहीर साबळेच्या वेळी वीट आलेला
अपा +१२३४५
अपा +१२३४५
तसे असेल तर ते साहजिकच आहे.
तसे असेल तर ते साहजिकच आहे. एखादा ग्रूप जे चालवत आहेत त्यांचे आर्थिक भावनिक वा कुठलेही हितसंबंध ज्यात गुंतले आहेत त्या विरोधात तुम्ही काही पोस्ट कराल तर मॉडरेशन होणारच.. हे प्रत्येक फेसबुक ग्रुप किंवा मायबोली मिसळपाव सारख्या प्रत्येक मराठी संकेतस्थळाला लागू. कोणीही आपलीच बँड वाजवायला तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार नाही हे समजून घ्यायला हवे अश्यावेळी.
दाभाडेचा trailer बघून movie
दाभाडेचा trailer बघून movie बघण्याची खूपच ईच्छा होती..म्हणून उद्याचा plan पण केला़ होता़....पण आत्ता 2,3 reviews अशे वाचले की लहान मुलांना दाखवण्यासारखा नाही...मला 2 लहान मुली आहेत ...
So मुलींसाठी कोणतीच risk घेऊ शकत नाही म्हणून नाईलाजाने तूर्तास तरी plan cancle केलाय ..ईथे बघितलाय का कोणी?
आज राहुल देशपांडे सिंहगड
आज राहुल देशपांडे सिंहगड पायथ्याशी भेटले. आमच्या तले जे पाठीमागून सायकलवर आले होते त्यांचा चहा चालला होता म्हणून आम्ही बाहेर वाट बघत होतो. इतक्यात राहुलजी मला दिसले. आमचे सर त्यांना मायबोली चा पत्ता देत बसले होते. अमलताश बद्दल चर्चा झाली. निगेटिव्ह रिव्ह्यूज नक्कीच आवडतील असे राहुल सर म्हणाले. त्यांना भेटायचं दडपण आलं होतं. डाउन टु अर्थ व्यक्ती आहेत.
या रविवारी २६ जानेवारीची सुटी
या रविवारी २६ जानेवारीची सुटी असल्याने सिंहगडावर खूप मोठा ग्रुप घेऊन आम्ही गेलो होतो. राहुल देशपांडेंच्या निमित्ताने दोन गोष्टी झाल्या.
पिठलं भाकरीच्या सोबत मराठी पिक्चर बद्दल चर्चासत्र सुरू झालं. गंमत म्हणजे नेहमी भेटणारे लोक पण मायबोलीवर आहेत हे तेव्हांच कळलं. यातले वाचनमात्रच जवळपास सगळे. मी सोडून.. वाचनमात्र का याची कारणे पण कळाली. जे अधून मधून येतात त्यांना सदस्य नसताना मायबोलीचा फरक काय पडतो हेच माहिती नाही. नवीन प्रतिसाद दिसत नाहीत किंवा ग्रुपपुरते मर्यादीत धागे पण दिसत नाहीत.
नाव काय तुझं खूप जणांना आवडला. त्या व्हिडीओच्या खाली पण तशाच प्रतिक्रिया आहेत. अशा शॉर्ट फिल्म कडून तर्कशास्त्र, अभ्यास याची अपेक्षा मी तरी ठेवत नाही. तसेच बरेच जण ठेवत नाहीत. जेव्हां मोठ्या स्केलवर काही तरी भव्य दिव्य घेऊन यायचा दावा केलेला असतो त्या दाव्या प्रमाणे सिनेमा नसेल तर मग आपण क्रिटीकल होतो. रहस्य हा युएसपी असेल तर ते पुरेसं नीटनेटकं आहे का हे पाहिलं जातं. भय हा युएसपी असेल तर आपण त्यातल्या अंधश्रद्धा वाढीला लावणार्या गोष्टी माफ करून भीती वाटायला लावली का हेच बघत असतो कि. नाहीतर कुठलाच भयपट चालणार नाही.
एव्हढी चाळणी पठाण , जवा,, आर आर आर ला लावली तर ते सिनेमे कधीही चालणार नाहीत. आर आर आर मधला घोडा आणि ट्रेनचा सीन फिजिक्सचे नियम वेड्यात काढणारा आहे. पण आपण तिथे माफ करून टाकतो. मराठीत मग आपण का इतके क्रिटीकल होतो ? असा लोकांचा टोन असतो. कदाचित असे क्रिटीकल होणं हे पण त्या सिनेमाचं यशच आहे. म्हणजे अशा अपेक्षा ठेवल्या जाणे हे कमी आहे का ?
पण तरीही मराठी पिक्चरला महाराष्ट्रात पुण्यामुंबईत हॉल मिळत नाही याबद्दल चीड आहे लोकांमधे. इतर शहरात होतात रिलीज. सिंहगडावर सगळीकडे रेंज येत नाही. जिथे येते तिथे गर्दी जास्त. नाहीतर या धाग्यावर किमान एक ओळ तरी लिहा असा आग्रह नक्की केला असता सर्वांना.
सॉरी, पण ही चर्चा याच धाग्यावर झालेली आहे. वेगळा धागा मला तरी नाही सापडला. खूप दिवसांपासून कंट्रोल केलं होतं या विषयावर मत द्यायचं.
रानभूली,
रानभूली,
तुम्ही ऑलरेडी राहुल देशपांडे भेटल्यावर त्याही गर्दीत अमलताश, मायबोली, मराठी सिनेमा वगैरे शक्य तितकी सांगोपांग चर्चा केलीत आणि राहुल देशपांडे यांनीही आपले सेलिब्रिटीत्व (आता यावर कोणी आक्षेप घेऊ नका. गायनासाठी त्यांचे फॅन्स आहेत भरपूर) बाजूला ठेवून, वेळात वेळ काढून चर्चा करण्याची, इथले रिव्ह्युज वाचण्याची तयारी दर्शवली हे सारेच कौतुकास्पद आहे. त्यामुळे अजून सॉरी म्हणू नका. इथे सर्वांनी किमान एक एक ओळीचा प्रतिसाद टाकण्याची इच्छा सुद्धा चांगली होती तुमची.
सर्वांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद !!
पियू खूप खूप आभार.
पियू खूप खूप आभार.
मायबोली हे पहिलं प्रेम आहे. मायबोलीकरांची मतं ही अन्य कोणत्याही सोमि पेक्षा वाचनीय असतात. सध्याच्या माझ्या व्यक्त होण्याबद्दल मी स्वतःच समाधानी नाही. तुम्ही समजून घेत आहात याबद्दल खरंच खूप थॅंक्स!!
मी राहुलसरांच्या पुढ्यात जायचं टाळलं. शास्त्रीय संगीतातले दिग्गज असल्याने दडपण होत. नट, नट्या कुणी अन्य सेलेब्रिटी असते तर मग नसती वाटली भीती.
मराठीत सुद्धा महाराजांवरचे
मराठीत सुद्धा महाराजांवरचे चित्रपट लॉजिकची चाळणी बाजूला ठेवून बघतातच की लोक. बाजीप्रभूंवरच्या एका चित्रपटात मावळे पाण्याखाली लपून बसतात आणि शत्रूसैन्य आल्यावर त्यांना भॉ करून घाबरवतात. बाजीप्रभूला गोळ्या लागल्यावरही तो सलमान खानसारखा लढतो .
मुळात प्रेक्षक हा एकजिनसी नसतो. शिवपट पाहायला जाणारा प्रेक्षक अमल्ताश बघायला जाईलच असं नाही. तसंच एकच प्रेक्षक वेगवेगळे चित्रपट वेगवेगळ्या अपेक्षा ठेवून बघतो. डेव्हिड धवन , रोहित शेट्टीचे चित्रपट पाहायला डोकं घरी ठेवून जाईल, तेच राजू हिरानीचे बघताना सोबत नेईल. मग राजू कमी पडला की तो चित्रपटही पडेल.
--
तुझं नाव काय लोकांना आवडला म्हणजे त्यात इथे नोंद झालेल्या त्रुटी नाहीत, असं होतं का? सगळेच प्रेक्षक बघताना एवढा विचार करतात का? एक चांगली सकारात्मक कथा, गोड शेवट आणि संदेश आणि नीटस एक्झिक्युशन पुरतं. त्या निकषांत तुझं नाव काय पास झाला असेल. आता ते आम्हांला एवढे व्ह्युज आले म्हणून खुष झालेत. म्हणूनच मेकिंग काढलाय. (कपाळावर हात).
--
मायबोलीनेच साहित्य, संगीत, चित्रपट , मालिका यांच्याकडे क्रिटिकली बघायला शिकवलं, नाही आवडलं म्हणायची हिंमत दिली आणि ते का आवडलं नाही हे शोधायची आणि सांगायची तयारी करून घेतली.
रानभुली,
रानभुली,
पियूंनी तुमच्याबद्दल लिहिलंय त्याबद्दल सहमत. धन्यवाद.
भरत,
मायबोलीनेच साहित्य, संगीत, चित्रपट , मालिका यांच्याकडे क्रिटिकली बघायला शिकवलं, नाही आवडलं म्हणायची हिंमत दिली आणि ते का आवडलं नाही हे शोधायची आणि सांगायची तयारी करून घेतली.>>>>> मस्त. सहमत.
क्रिटिकली पहाणं हा
क्रिटिकली पहाणं हा इंटेलेक्चुअल राईट आहे. तर मराठी चित्रपट जगावा म्हणून थोडं उदार व्हावं हा विचार इमोशनल + व्यावहारिक शहाणपण आहे. आपल्या भाषेतला चित्रपट जगवावा. नाव काय तुझं ही शॉर्ट फिल्म आहे. हजार रूपये घेऊन थेटरात बघायची फिल्म नाही. हौशी लोकांचा प्रयत्न आहे. इथले क्रिटिकल रिव्ह्यूज त्यांना उपयोगी पडतील.
तरी पण प्रश्न उरतोच कि फिल्मचा उद्देश मनोरंजन आहे ही भुमिका एकदा घेतली कि दोन न्याय कसे लावायचे? पठाण, जवान किंवा साउथचे कुठलेही मूवीज घ्या. आपणच हिट करतोय. मग इथे क्रिटीकल रिव्ह्यूज का नाहीत? तक्रार नाही.
राहुल देशपांडे वगैरे लोक नवकोट नारायण नाहीत. खिशातून पैसा घालून सिनेमा करायचा नंतर थिएटरच मिळत नसेल तर कोण बनवेल मूवी? अमलताश मी पाहिला नाही पण चांगले मूवीज पण रिलीज होत नाहीत.
कंगनाचा पोलिटिकली मोटिवेटेड इमर्जन्सी रिलीज झाला. आपटला. पण थेटर तर मिळालं. असे कितीतरी मूवीज वाईट असून थेटरात पोहोचतात. मग मराठी मूवीकडे मेरीट नाही म्हणून रिलीज होत नाही हे कसं काय?
जे जसं जमलं तसं सांगितलं.
इथून पुढे क्राउडफंडींग करूनू मग मराठी मूवी बनवावा लागेल.
समजा तेच तेच लोक दिसतात. हा
समजा तेच तेच लोक दिसतात. हा आक्षेप तर जेन्युईन आहे.
पण एव्हढे शिक्षण सम्राट, सहकार सम्राट आणि कसले कसले सम्राट आहेत यांना मराठी मूवी जगावा असं का वाटत नाही?
गौतमी पाटीलच्या एका इव्हेंट साठी एकूण जेव्हढा पैसा खर्च होतो त्यात दोन तीन मराठी सिनेमे बनू शकतात.
ही मंडळी पुढाकार घेत नाहीत जे घेतात त्यांची हेटाळणी करतात.
मराठी सिनेमा बंदच व्हावा का? कुणालाच नको असेल तर सरळ हिंदीतच बनवावेत.
एका मराठीच्या समर्थक पक्षाचे फॅमिली मेंबर्स हिंदी चित्रपट बनवायचे.
असं आहे सगळं.
राहुल देशपांडे यांनीही आपले
राहुल देशपांडे यांनीही आपले सेलिब्रिटीत्व (आता यावर कोणी आक्षेप घेऊ नका. गायनासाठी त्यांचे फॅन्स आहेत भरपूर) >>
भरत यांचा प्रतिसाद आवडला.
फसक्लास दाभाडे. ठीके.
फसक्लास दाभाडे. ठीके. कौटुंबिक आहे.
अमेय वाघ लाऊड वाटला. नॉनपुणेरी भाषेचा लहेजा पकडायला जमत नाहीये त्याला.
सिद्धार्थ चांदेकर अगदीच आवडला. सहज, मॅच्युअर होत चाललाय.
येस.. मायबोली वाचायला नेहमीच
येस.. मायबोली वाचायला नेहमीच आवडते .. आणि सगळीकडून छान प्रतिसाद असतात. सगळ्या बाजूने विचार करता येतो, नवीन viewpoints मिळतात.. मलातरी.
दाभाडे... ट्रेलर आवडलाय. मुख्य म्हणजे वयाला शोभणारे आणि फ्रेश लोकं आहेत.. तोच रटाळ पणा नाही वाटला.. मला मराठी सिनेमे मनापासून आवडतात , कसलेले कलाकार आहेत आपले सगळे.. पण सध्या काई काई पिक्चरबरोबर connect नाही होत.
वाळवी खूप आवडला होता.. नंतर फार नाही कुठला.
>>>>>क्रिटिकली पहाणं हा
>>>>>क्रिटिकली पहाणं हा इंटेलेक्चुअल राईट आहे. तर मराठी चित्रपट जगावा म्हणून थोडं उदार व्हावं हा विचार इमोशनल + व्यावहारिक शहाणपण आहे.
होय मी दुसर्या वर्गात. म्हणुनच फुलवंती विकतच घेतला. अर्थात परवडेल तसे घेते. अगदी सगळे घेउही शकत नाही. ना सिनेमाची आवड आहे.
मला तर वाटतं मराठी चित्रपट
मला तर वाटतं मराठी चित्रपट आवडणारी आपली पिढी कदाचित शेवटची असेल...कारण आता पुढच्या पिढीला english medium मधून शिक्षणामुळे मराठीशी तेवढे connect नाही होता येत...अर्थात मराठी medium मधून शिकणारे मुले पण असतील पण ratio बघितला तर असमतोलच असेल...शिवाय आजकालच्या मुलांच्या आवडी निवडी बघून पुढे जाऊन मराठी चित्रपट बघतील की नाही ही शंकाच आहे...
आय नोच. मला पण ना तीच फिअर
आय नोच. मला पण ना तीच फिअर वाटते समटाईम. कसं होणार या मराठी लँग्वेजचं!
@अमितव : मी मराठी बद्दल
@अमितव : मी मराठी बद्दल लिहिताना मधेच बरेच इंग्रजी शब्द वापरते हे माहीत आहे मला...पण सहसा आपण जसे बोलतो तसे लिहीण्याचा प्रयत्न असतो माझा... आणि मायबोलीवर लगेच कोणी निष्कर्ष काढणार नाही (judge करणार नाही ) ही भाबडी अपेक्षा पण असते...असो... जरी बोलण्यात,लिहिण्यात इंग्रजी येत असेल तरीही इतर
इतर भाषांपेक्षा मराठीवर प्रेम नक्कीच जास्त आहे मग ते वाचन असो वा चित्रपट प्राधान्य मराठीलाच...
नो वरीज.
नो वरीज.
आपल्या सोश्योइकॉनॉमिक का काय
आपल्या सोश्योइकॉनॉमिक का काय त्या गटातील लोकांच्या पुढच्या पिढीला रिलेट होणार नाही कदाचित. पण आपण किती टक्के आहोत? प्रचंड महाराष्ट या गटाच्या बाहेर आहे. त्यामुळे मराठी बघणारे भरपूर असतील. टार्गेट प्रेक्षकवर्ग थोडाफार बदलेल. ऑलरेडी बदलत आहे.
मराठी सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांत जगात १७ वी आहे. या लोकसंख्येत इंग्रजी मिडियम मधे शिकणारी पुढची पिढी असलेले किती टक्के असतील? मला वाटत नाही १०% पेक्षा जास्त असतील.
टिचन किप्स आहे तोवर मराठीला
जोवर "टिचन किप्स" आहे तोवर मराठीला मरण नाही
संदर्भ : लष्कराच्या भाकऱ्या BB
मुले इंग्रजी माध्यमात शिकेनात
मुले इंग्रजी माध्यमात शिकेनात.. घरी बोलतात मराठी
त्यामुळे मराठी पुस्तके वाचणार नाहीत...पण चित्रपटांना मरण नाही..
फक्त आपल्या पिढीला जसे लक्ष्या अशोक सचिन वगैरे हिरो होते, नंतरही एखादा अंकुश चौधरी आणि आपला लाडका स्वप्निल जोशी होता.. सई होती.. तसे नव्या पिढीला देखील कोणी चेहरे हवेत. ज्यांच्या सोबत त्यांना कनेक्ट होता येईल. अन्यथा आपण दाखवू ते चित्रपट ते बघतील, पण फॉलो करणार नाहीत.
हेमंत ढोमेची अमुक तमुक मुलाखत
हेमंत ढोमेची अमुक तमुक मुलाखत बघितली. काही चांगले मुद्दे मांडले आहेत.
मराठी लोकांना सिनेमा बघायचा नाही ठेत्रात असं नाहीये. त्यांना जे हवंय ते त्यात असलं की महाग तिकीट काढून पण बघतात. उलट त्यांना आकृष्ट करायला सिंघम, पुष्पा सारख्या सिनेमात मराठी संवाद असतात. पण मराठी सिनेमावाले प्रेक्षकांना काय हवंय हे सोडून मला काय हवंय ह्यावर अडून राहणार असतील तर त्यांनी तो न चालल्यास नंतर रडू नये.
फायनान्स किंवा मीडिया हा धंदा आहे. त्यांना जे चालेल असं वाटतं त्यावरच ते पैसे लावणार. त्यामुळे मासेसना सुखावणारे चित्रपट असतील तर तिथून मदत मिळते. (अन्यथा त्याचा अमलताश होतो - हे मी मनात)
“ आपला लाडका स्वप्निल जोशी
“ आपला लाडका स्वप्निल जोशी होता” - आमची एष्टी?
आमची एष्टी? >>> फेफ
आमची एष्टी? >>> फेफ
आधी मराठी सिनेमा का चालत नाही
आधी मराठी सिनेमा का चालत नाही टाईप दोन तीन वेळा चर्चा झाल्या होत्या. त्यात भाग घेतला नव्हता.
मागे पण दोन तीन गोष्टींकडे दुर्लक्ष झालंय असं माझं मत आहे. जे मार्केट थिअरी लावतात ते दुनियादारी चांगला चालला असताना का उतरवला याबद्दल मौन पाळून असतात. मार्केटला काय हवं हे कोण कसं ठरवतं ?
कंगनाच्या इमर्जन्सीला थेटर कसे मिळतात ? हा मार्केटला हवा असलेला सिनेमा होता का ? कंगनाचे अलिकडचे सर्वच सिनेमे आपटले तरी तिला थेटर कोण देतं ? मराठीत सगळेच सिनेमे मला हवं तेच दाखवणार टाईप असतात ही function at() { [native code] }इशयोक्ती वाटते.
मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाही हा मुद्दा नजरेआड होतो आणि त्याचं जस्टीफिकेशन करताना हिंदीत त्याहून वाईट सिनेमांना थिएटर मिळतं याकडे दुर्लक्ष होतं. हिंदीत पण सर्वच सिनेमांना मिळतं असं नाही. मार्केटवर काही मूठभरांची पकड आहे का ? या लोकांपैकी कुणाचा चित्रपट रिलीजहोणार असेल तर मराठी चित्रपट चाललेला असताना उतरवला जातो.
याला मार्केटला हवंय ते हे जस्टीफिकेशन लागू पडत असेल का ? मार्केटला हवंय असं काही नसतं. पहिल्यापासून हिंदीवाले त्यांना पाहीजे तेच बनवत आलेत आणि आपण ते ट्रेण्ड समजून बघत आलोय. आपण काय लेखी मागण्या केल्या होत्या का सगळे भाऊ हरवलेले दाखवा मग शेवटी सापडले म्हणून दाखवा. का मार्केटने सार्वमत घेतलेलं ?
मराठीतल्या सैराटचं तरी मार्केटिंग कुठं झालं होतं ? यातला कण्टेण्ट त्या वेळी जहाल होता. उलट तो स्विकारला जाणार नाही अशाच चर्चा नव्हत्या का ? झी सिनेमाच्या पाठिंब्यामुळं सैराटला थिएटर्स मिळाले. पिक्चर जबरदस्त होता यात वादच नाही. पण एकट्या नागराज मंजुळेला स्क्रीन्स मिळवता आल्या असत्या का ?
ऐतिहासिक चित्रपटांचा मुद्दा वर आणला आहे. पण याबाबतीत असं ऐकून आहे कि हा एक ग्रुप सत्तापक्षाच्या जवळचा आहे त्यामुळं त्यांना थिएटर्स मिळतातच. शिवाय ऐतिहासिक त्यातही शिवकालीन चित्रपटांना प्रेक्षकांचा तोटा नाही. पण म्हणून काय तीनामागे एक मराठी चित्रपट ऐतिहासिकच असावा हा अट्टाहास नाही का ? मार्केटला हवं म्हणून वेगळे विषयच नाही हाताळायचे का ? त्यांना स्क्रीन मिळाल्याशिवाय कसं समजेल कुठले प्रेक्षकांना आवडतात ते ?
अर्थ नावाचा एक सिनेमा होता , तो मार्केटला हवा या कॅटेगरीत होता का ? गुरूदत्तचे सिनेमे दिग्दर्शकाला हवे तसेच होते. असे विषय सध्या मराठीत हाताळले जातात. रिलीज होऊ देत मग फ्लॉप झाले तर ठरेल ना ?
माझं झालं लिहून
आमची एष्टी
आमची एष्टी
स्वप्नील - एषटी काय प्रकार
स्वप्नील - एषटी काय प्रकार आहे?
मी संदर्भ मिसले असतील इथले..
रानभुली योग्य मुद्दा आहे.
रानभुली योग्य मुद्दा आहे.
एका वडापावची गाडी स्टेशन बाहेर लावली आणि एकाची स्टेशनपासून दहा पंधरा मिनिटे दूर निर्जन जागी तर कोणाचा धंदा जास्त होणार हे उघड आहे.
स्टेशन बाहेर एकाला गाडी सकाळ संध्याकाळ लावायला दिली आणि एकाला दुपारी अन रात्री लाव म्हटले तर कोणाचा धंदा जास्त होणार हे उघड आहे.
कोण दुपारच्या गाडीवरचा वडापाव आवडतो म्हणून तो खायला ऑफिसला हाफ डे टाकून येणार?
आणि जोपर्यंत हे मराठी माणसांनाच पटत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार.
पटले तरी पुढे काय हा प्रश्न आहेच म्हणा...
Pages