चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अंजली Proud

नाही नाही. त्याहुन जास्त फॅक्चुअल. लताची दोन आणि आशाची दोन गाणी झाल्यावर कॅसेट मध्ये कभी तनहाईयोमे येतं, "लता व आशाची गाणी जेथे संपतात तेथे हे गाणे सुरू होते".

“ निव्वळ रोशनच्या संगीतासाठी त्याच्यावर फिल्म बनवणे मस्ट आहे असे मला वाटते.” - त्यासाठीच पहिला भाग मनोभावे बघितला.

“ ते संलीभ म्हणाला ना? त्याचं काय एवढं मनावर घेता! ” - ते ही खरंय म्हणा… Happy

"इस गीत को २०२५ मे कौन कौन सुन रहा है" - Lol

त्याहुन जास्त फॅक्चुअल. लताची दोन आणि आशाची दोन गाणी झाल्यावर कॅसेट मध्ये कभी तनहाईयोमे येतं, "लता व आशाची गाणी जेथे संपतात तेथे हे गाणे सुरू होते >>> Rofl पुणे-५२ मधे गिरीश कुलकर्णी स्कूटरवरून नुसताच इकडून तिकडे गेला. ते कशाचेच प्रतीक नव्हते, तसे झाले Happy

अंजली_१२ >> Lol

मी राजेश रोशनच्या संगीतावर सुद्धा मनोभावे पाहीन रोशनच्या इतकाच, इतके ते मला आवडते (९०ज वर जाउ नका. खुदगर्ज वगैरे म्हणत नाहीये मी Happy ). पण ती "एक तरफ" कॉमेण्ट जरा जास्तच होते Happy

> लताची दोन आणि आशाची दोन गाणी झाल्यावर कॅसेट मध्ये कभी तनहाईयोमे येतं.
Happy आईशप्पत प्रचंड हसलो.

लताची दोन आणि आशाची दोन गाणी झाल्यावर कॅसेट मध्ये कभी तनहाईयोमे येतं, "लता व आशाची गाणी जेथे संपतात तेथे हे गाणे सुरू होते". >> Lol

कुठल्याही गायिकेची तुलना करताना लता आशा निवडतात हे मला हल्ली हास्यास्पद वाटते. त्यांच्या जागी त्या गायिका चांगल्याच आहेत, त्यांना काही सुंदर गाणी मिळाली जी आज ५०-६० वर्षांनीही लोक ऐकताहेत. म्हणुन लगेच लता आशा पेक्षा भारी? हे असे रफी किशोरबाबत होताना कधी पाहिले नाही. तलत रफीपेक्षा भारी होता पण रफीने त्याला पुढे येऊ दिले नाही असे कोणीही म्हणत नाही. सुबीर सेन मस्त गायचा पण हेमंतकुमारने त्याला दाबले असे कोण म्हणत नाही. लता आशावर मात्र आजही हे आरोप करुन यु ट्युब चॅनेलला लाइक्स मिळवायची धडपड सुरु असते. हे असे का कळत नाही. ज्या गायिका दडपल्या गेल्या म्हणुन आरोप होतात त्यांची गाणी छानच आहेत पण लताशी तुलना केली की तृटी लक्षात येतात. माझ्या मनात कधी तुलनाही येते की अमुक एक गाणे लताने गायले असते तर कसे झाले असते वगैरे..

प्रत्येक क्षेत्रातले मानदंड असतात, त्यांच्यासारखे तेच म्हणुन त्यांना मानदंड म्हणतात. प्रत्येकाची तुलना त्या मानदंडांशी करुन ते मानदंडच कसे भिकार हे सिद्ध करण्याची आता फॅशन आलीय.

हिसाब बराबर कुणी पाहिलाय का ?
अर्धा पाहिला. छान वाटतोय. मध्यंतरी राउंड ऑफ केलेल्या पैशांचा आकडा केव्हढा जास्त होत असतो याबद्दल काही फॉर्वर्डस यायचे. ऑनलाईन खरेदीसाठी काही पेमेंट व्हाऊचर्स असायचे त्यात शिल्लक असलेले एक रूपया दोन रूपया किंवा वीस पंच्चवीस रूपये एक्स्पायर झाले कि त्याचा आकडा केव्हढा मोठा होतो हे कुणीतरी दाखवून दिल्याने असे व्हाऊचर्स बंद झाले.
बँका पण असा चुना लावतात हा सिनेमाचा विषय असी शकतो हे कधी डोक्यात आलं नव्हतं.

इस गीत को २०२५ मे कौन कौन सुन रहा है>>>>> हे तर हमखास असतंच. Lol
इतक्या भक्तीभावाने सगळीकडच्या कमेंट्स वाचणारे माबोकरच असतील >>> Lol
हिसाब बराबर कुणी पाहिलाय का ?>>>> ट्रेलर पाहून चांगला वाटतोय.

म्हणुन लगेच लता आशा पेक्षा भारी? हे असे रफी किशोरबाबत होताना कधी पाहिले नाही. तलत रफीपेक्षा भारी होता पण रफीने त्याला पुढे येऊ दिले नाही असे कोणीही म्हणत नाही. सुबीर सेन मस्त गायचा पण हेमंतकुमारने त्याला दाबले असे कोण म्हणत नाही. लता आशावर मात्र आजही हे आरोप करुन यु ट्युब चॅनेलला लाइक्स मिळवायची धडपड सुरु असते. हे असे का कळत नाही. <<
YouTube वर आत्ता हे पीक आलं. लाईक्स मिळवणं हा तिथला स्थायीभाव.. पण ही चर्चा आधीपासूनच चालू आहे, आत्ताच सुरु झाली असं नाही.
पुरुष (अथवा अन्य स्त्री) गायक/गायिकांबाबत असं का घडत नाही ह्या तुमच्याच विचारलेल्या प्रश्नातच कदाचित तुम्हाला न आवडणारं उत्तर असू शकेल.
आपल्या आवडत्या व्यक्ती, कलाकाराबाबत आपण असं ऐकायला अंतर्मनापासूनच नाखूष असतो ही एक वस्तुस्थिती आहेच.

ती फक्त लता आशा आणि मुबारक बेगमच्या सुनेहरी यादे छाप कॅसट मधल्या सिक्वेन्स वर फॅक्चुअल कमेंट असवी.
>>> Lol

साधना यांच्या अख्ख्या पोस्टला मम

इतक्या भक्तीभावाने सगळीकडच्या कमेंट्स वाचणारे माबोकरच असतील >>> Lol
लताची दोन आणि आशाची दोन गाणी झाल्यावर कॅसेट मध्ये कभी तनहाईयोमे येतं, "लता व आशाची गाणी जेथे संपतात तेथे हे गाणे सुरू होते". >> Rofl

< पण ही चर्चा आधीपासूनच चालू आहे, आत्ताच सुरु झाली असं नाही.>+१.
मुबारक बेगम स्वतःच असं सांगायची. विविधभारतीवरच्या मुलाखतीत ऐकलं आहे. सुलक्षणा पंडितबद्दलही लिहिलं गेलं आहे. अनुराधा पौडवालचं कधी कौतुक केलं नाही , तेच अलका याज्ञिकचं केलं असं लताचे भक्त म्हणवल्या जाणार्‍या पत्रकार कम लेखकाने लिहिलं होतं.

हिसाब बराबर सेकंड हाफ बराच फिल्मी आहे. तरीही फिल गुड मूव्ही आहे. सुरुवातीला डार्क हयुमरच्या अंगाने गेला होता. काही संवादाच्या वेळी भिंतीवर टांगलेली चित्रं बोलकी होती. नंतर तेच ते बलाढ्य खलनायकाच्या विरोधातला प्रोटेस्ट व्हायरल होणं. ओएमजी सारख्या मूवीत अनेकदा येऊन गेलं आहे.

विषय वेगळा आहे. एव्हढी चिकाटी आणि तो विषय मेनस्ट्रीम मूवीत आणणे हे आवडलं.

इतक्या भक्तीभावाने सगळीकडच्या कमेंट्स वाचणारे माबोकरच असतील >>>

अवांतर : हाव ना राव. मी इन्स्टाग्रामवर कमेंट्स वाचून हसते तेव्हा बरेच लोक मला "इन्स्टाग्रामवर कमेंट्स कोण वाचतं? इतका रिकामा वेळ आहे तुझ्याकडे?" असं विचारतात. पण मायबोलीमुळे ४ reels कमी बघितली तरी चालतील पण बघितलेल्या reels वर काय कमेंट्स आल्या आहेत ते वाचायला मज्जा येते. तिकडे तर कोणीच ओळखीचे आयडी वगैरे पण नसतात इथल्यासारखे. तरी काही काही reels च्या कमेंट्स सेक्शन मध्ये धमाल चालू असते. ती सगळी वाचते मी.

मी सुद्धा वाचतो कॉमेंट.. चांगल्या कॉमेंट शेकडो लोकांनी लाईक केलेल्या असतात आणि वर येतात.. त्यामुळे शोधायचे कष्ट वाचतात..
कपिल शर्मा शो मध्ये आलेल्या गेस्टचे सोशल मीडियावरचे फोटो आणि त्या खालील फनी कॉमेंट दाखवतात. तो सुद्धा मजेशीर आयटम वाटतो.
अश्या ह्युमरस कॉमेंटचा एक धागा काढायला हवा.

बाई दवे
इथे २०००+ पोस्ट झाल्या.. त्याचाही नवा धागा काढा

सूक्ष्मदर्शिनी - प्रथम जरा बोरींग वाटला पण नंतर पकड घेतो. ज्यांनी पाहिला त्यांच्यासाठी प्रश्न:
स्पॉयलर ---

ती बहिण (डायना) सर्वांना बायबाय करुन परत न्यूजीलंडला जाते असं दाखवलेय ते कसे काय? हे ती कधी करते? तिचा तर खून केलेला असतो ना..मी काहीतरी मिस केलं बहुतेक.

स्पोईलर अलेर्टः

.

.

तिला एअरपोर्ट पर्यंत नेतात आणि वाटेत उडवतात बहुतेक. मलाही ते नीट समजले नाही. ती आली व परत गेली हे लोकांना कळायला हवे असे नम्तरच्या एका संबादात येते. तिला आईचा आजारपणाचा विडिओ दाखवुन बोलावतात, ती येतेही. मग आईच्या हरवण्याचा, तेही दोनदा, सिन का उभा केला कळले नाही. त्याची गरज नव्हती.

प्रियदर्शिनीची सुक्ष्मदर्शिनी व्हायची धडपड बघुन why can’t people mind their own business असे वाटले. मुलगा म्हणतोय आई आजारी आहे तर असेलही. सगळेच आजार तुम्हाला माहित असतीलच असे नाही. Happy चित्रपटासाठी बर्‍याच गोष्टी ओढुन ताणुन बसवाव्या लागतात.

इथे २०००+ पोस्ट झाल्या.. त्याचाही नवा धागा काढा

>> +१२३. चिकवा ११ ची गरज आहे.. मी काढायचा प्रयत्न केला पण मला चक्क forbidden दाखवत आहे मी ग्रुपची सदस्य असूनही.

बहुतेक माझा सिनेमाविषयक व्यासंग इथल्या थोरामोठ्यांसारखा नाहीये हे मायबोली AI ने हेरलं असावं Lol

मागच्या शतकातील गुंडा बघितला नाहीये मी अजून Uhoh

पण मला चक्क forbidden दाखवत आहे-पियू

तुम्ही चिकवा १० च्या नोड (85328) वरुन काढायचा प्रयत्न केला असेल. मूळ चित्रपट या ग्रूपवर जाऊन नवीन धागा काढा.

आता कळले.. धागा काढणे म्हणजे इतकी सोपे गोष्ट नसते. जे सातत्याने काढतात त्यांचा रिस्पेक्ट करा यापुढे..

Pages