खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

Healthy junk food ..
आमच्या घरच्या ८ वर्षीय शेफ ने केलेली डिश. Roasted Schezwan Veggies with plain Maggie noodles and egg on top..
Screenshot_2025-01-25-20-06-52-537-edit_com.miui_.gallery.jpg

साज,
सुरमई अगदी जबरी झाली आहे.
अगदी तुकडा मोडून तोंडात टाकावी अशी.
ती प्लेट पण मस्त आहे...बॉर्डर वेगळीच आहे.

छल्ला
मिश्र भाज्यांचे लोणचे पण अगदी चटपटीत दिसते आहे.

भूक लागली आता.

सुरमई प्रचंड तोंपासू!

पालक पुऱ्या आणि लोणचे पण मस्त.

गोष्टी फोटोतून काढून घ्यायची सोय हवी होती Proud

सुरमई प्रचंड तोंपासू!

पालक पुऱ्या आणि लोणचे पण मस्त.

गोष्टी फोटोतून काढून घ्यायची सोय हवी होती>>> सगळ्याला +१

भाज्यांचे लोणचे तोपासू...
मासे बघून भूक चाळवतेच.. भले पोटभर जेवलेले का असेना..
सुरमैला झब्बू होता.. पण फोटो नाही काढला.
पालक पुरी आमच्याकडे हिट आहेत. पण तेलकट नको म्हणून पराठेच प्रीफर करतो. सध्या रोज सकाळी ऑफिस डे असताना नाश्ता म्हणून पालक, मेथी, कोबी यापैकी एखादा पराठा असतो.

बेकन - चविष्ट असल्याने, वरचे वर झाले असते पण भयंकर फॅटी असल्याने मधे मधे होते.

करताना -

केलेले-

आम्हां गरीबांना परवडणारे
तुम्हां श्रीमंतांना आवडणारे

पोहे ssssss

336c0477-e591-4cfa-b0dd-e58040f73903.jpeg

अहमदनगरला एका रोडसाइड छोट्या टपरीवर लिहिलेले होते हे, ते चोरले आहे. सो जस्ट चिल Happy

अहाहा.
पोहे...माझा सगळ्यात आवडता पदार्थ. मस्तच
त्यात ती रतलाम शेव आहे का?

खास लोकाग्रहास मान देऊन शेंगोळ्यांची कृती टाकली आहे. >>>>> धन्स धनि Happy

सगळेच फोटो मस्त. पोह्यांवर शेव आणि डाळिंबाचे दाणे आहेत. ही माळवा भागातली पद्धत. कच्चा कांदाही असतो. पण प्रमाण महाराष्ट्रीय दिसतंय Wink .

माळवा पद्धत मात्र प्रमाण महाराष्ट्रीय 👍

blame it on my family’s diverse culinary influences Happy

ती रतलाम शेव आहे का?

होय. लवंगाची. तिखट्ट !

त्यात ती रतलाम शेव आहे का? >> हेच विचारणार होतो. >> खाऊन पाहायला पाहिजे असे

पोहे दर विकांताला हवेच असतात

पोहे...माझा सगळ्यात आवडता पदार्थ >>> माझाही Lol

मला रतलाम शेव जाम आवडते. पण पोह्यावर घालून खाल्ली नाही कधी. ट्राय करायला हवी.

सुरमयी मस्त .केवढे मोठे पीस आहेत !
सामो बेकन कधी खाल्ले नाहीत पण तू म्हणतेस छानच लागत असणार
तुमच्या पोह्यांना झब्बू अनिंद्य
IMG_20250128_115947.jpg
शेव पोहे आणि चहा डेडली कॉम्बिनेशन आहे. माझ्या फोटोतली लसूण शेव आहे.
पोहे हे महाराष्ट्रीयन घरांचं स्टेपल फूड म्हटलं तरी हरकत नाही आमच्याकडे इतर दिवशी असले नसले तरी संडे ला पोहे असतातच.

शेव पोहे आणि चहा डेडली कॉम्बिनेशन आहे. पोहे हे महाराष्ट्रीयन घरांचं स्टेपल फूड म्हटलं तरी हरकत नाही>>>>> अगदी अगदी.
पण मला स्वतः इंदोरी पोहे नाही आवडले तितके.
लसूण शेव मला लालबागच्या चिवडा गल्लीतलीच आवडते.

Pages