चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लिहिले आहे स्वाती. तुला आणि माधवला पाहिल्याबद्दल अनेक धन्यवाद कारण मला तुमच्याशी या विषयावर संवाद साधता आला. Happy

पैरो में पहना के बिछिया, लूट लियो' >>> ती मी जंग- जंग पछाडून शोधली आंतरजालावर, मला सापडली नाही. मला पुन्हा नीट ऐकायची होती.

अमलताशला जाता-जाता टोमणा मारण्यासाठी एक पॉईंट. Wink Happy

हो मग, सोडते की काय! Lol

बाय द वे, 'स्टिल अ‍ॅलिस' नावाचं पुस्तक वाचलं नसेल तर माझ्याकडून रिटर्न रेको. Happy
स्वतः कोलंबिया युनिव्हर्सिटीत लिन्ग्विस्टिक्स प्रोफेसर असणार्‍या अ‍ॅलिसला अर्ली ऑनसेट अल्झायमर होतो त्याची तिने तिच्याच (हरवत चाललेल्या) शब्दांत सांगितलेली गोष्ट.
अ‍ॅलिस हे कॅरेक्टर फिक्शनल आहे, पण लेखिकेच्या आजीच्या अनुभवांवर बेस्ड आहे. लेखिका स्वतः न्यूरोसायंटिस्ट आहे.
या पुस्तकावरून सिनेमाही निघाला आहे, पण मी पुस्तकाचीच शिफारस करेन.

या रुग्णांचे शब्द हरवतात - म्हणजे अक्षरश: मेंदूतून पुसले जातात. "अरेच्च्या अगदी तोंडावर आहे - काहीतरी 'म'ने सुरू होणारा शब्द आहे" वगैरे म्हणतो आपण तसं नव्हे! पार नाहीसेच होतात. मला एकदम पोटात खड्डा पडला होता वाचताना!

उच्च अभिरुची रेको म्हणजे दोन नंबरच्या धंद्यासारखे 'इस हात में लेना और उस हातसे देना' होत आहे. ते सुटकेसी बदलायचे दोन व्हिलन, तो सीन डोळ्यांसमोर आला. Happy

रेकोचा स्क्रीन शॉट घेतला आहे. धन्यवाद. सिनेमाबद्दल ऐकलेले आहेच. पण मला गोल्डफिश जितका आवडला, पोचला, भिडला अगदी गाण्यांसहित, तितकाच तुलाही. त्यामुळे मी 'फुलपाखरू' मोड मधे गेले आहे. Happy

पी एस साठी कोपच्यात घेऊयात का एकेकाला ? गरज पडली तर सांग. Wink

त्या ‘पाना’बद्दल लिहायचं राहिलं तरी. केअर फॅसिलिटीतल्या म्हाताऱ्याने ‘टिप’ म्हणून दिलेलं. बाहेरच्या जगात चालणारं कुठलंच चलन या माणसांकडे उरलेलं नाही. पैसेच नव्हे, शब्द नाहीत, स्मृती नाहीत, मीनिंगफुल कनेक्शन्स नाहीत, काही नाही. आता ते फक्त ‘आणखी एक पेशन्ट’ आहेत.

जॅकेटमध्ये ते वाळलेलं पान सापडतं, आणि आईला इतक्यात इतकं कफल्लक करू नये, ती कोणाला ओळखत नसेल, पण तिला ओळखणारे जिथे आहेत तिथे तिला राहू द्यावं असं वाटतं बहुधा तिला त्या क्षणी.

माणसाची ओळख म्हणजे काय असते नाहीतरी? आजवरच्या आठवणींची गोळाबेरीजच ना?

छान लिहिले आहे गोल्डफिश बद्दल तिन्ही पोस्ट .आर्ट फिल्म सारखा असला तरी बघावासा वाटतो आहे कल्की आवडते ये जवानी मधला तिचा रोल जास्त आवडला होता.

स्टीरिओटाइप्स अमेरिकन टीव्ही/मूव्हीजमध्येही दिसतात. 'वाइज अफ्रिकन अमेरिकन एल्डरली बाई' किंवा 'वाइज आणि मितभाषी नेटिव्ह अमेरिकन'. >> माईंड युअर लँग्वेज मालिकेमध्ये एक आफ्रिकन ब्रिटिश माणूस एज्युकेशन खात्याचा इन्स्पेक्टर म्हणून येतो तो भाग आठवला. प्रो ब्राऊन त्याला इंग्रजी भाषा शिकायला आलेला विद्यार्थी समजतो आणि तुमच्या देशात अमुक तमुक (काहीतरी मागास) असेल ना वगैरे स्टिरीओटाईप फेकतो व शेवटी तोंडघशी पडतो.

पी एस साठी कोपच्यात घेऊयात का एकेकाला ? गरज पडली तर सांग. >>>
काही उपयोग नाही! ज्यांना कोपच्यात घ्यायचं तेही तितकेच निर्ढावलेले आहेत! >>> Lol दिवसभर "हे कोणाबद्दल चालले आहे कोणास ठाऊक" असा पवित्रा घेउन मग शेवटी नाईलाजाने आलोच Happy

पण सिरीयसली, सुंदर पोस्ट्स आहेत या वरच्या. दोन तीन पानापूर्वीची अस्मिताची व इथल्या वरच्या माधव व स्वातीच्या!

फा, 'विमानात बघणेबल' ही आणखी एक कॅटेगरी? >>> Happy हो खरेच आहे तशी. सहसा कम्फर्ट वॉच टाइप, बहुतांश आधी पाहिलेले व हलकुफुलके पिक्चर्स.

भरत - धन्यवाद!

रोशनची गाणी तर आवडीची आहेतच. निगाहे मिलाने को मधे तर नूतन, आशा, साहिर आणि रोशन -सगळे तोडीस तोड आहेत.

मात्र परवाच हे गाणे पाहताना "वो जलवा जो ओझल भी, है सामने भी" ऐकले तेव्हा अरे हा तर श्रोडिंगरचा जलवा असा विचार करून स्वतःच स्वतःच्या विनोदावर हसून घेतले.

जॅकेटमध्ये ते वाळलेलं पान सापडतं >>> हो त्या पानात नक्कीच काही खास आहे. अ‍ॅनाचा निर्णय बदलण्याआधी तिला भेटलेली (दिसलेली नव्हे) सगळ्यात शेवटची वस्तू ते पान आहे. त्यामुळे खून झालेल्या व्यक्तीला सगळ्यात शेवटी भेटलेल्या माणसाला जे महत्व पोलीस देतात तेच महत्व त्या पानाला असायला हवे होते. पण ते पान अ‍ॅनाला नक्की काय सांगते ते नीटसे उलगडलेच नाहीये. मी काढलेला अर्थ - त्या पानाचा रंग आता उडाला आहे, थोडंस फाटल्यामुळे त्याचा तो ट्रेडमार्क मेपल-पान आकार ही गेलाय. ते होणारच होतं. पण ते पान त्याच्या झाडाखालीच राहिलं असतं तर निदान त्याची ओळख तरी राहिली असती. पण हा अर्थ माझा मलाच फार फेच्ड वाटला. तो तसा वाटला नसता तर सिनेमा खूप आवडला असता.

सिनेमातला एक खूप सुंदर घेतलेला प्रसंग एका हिशेबाच्या डायरीचा. अ‍ॅना सहज ती डायरी चाळत असते. एका पानानंतर त्यातले शब्द निरर्थक होतात (म्हणजे असे शब्द ज्यांचा हिशेबाशी काही संबंध नाही), मग पुढे शब्द म्हणजे अक्षरांचे समुह बनतात. त्या अक्षर-समुहांना काहीच अर्थ नसतो. आणि सगळ्यात शेवटी नुसतेच फराटे. खूप अंगावर येतो तो प्रसंग.

आता एक फसलेला प्रसंग. अ‍ॅनाला अश्विन कोण ते कळलंय पण आईने घर त्याच्या नावावर करण्याइतके त्यांच्या नात्यात काय होते ते नाही कळलंय तिला. तो घरी चहाला येतो आणि कपाटातून त्याने बनवलेला खास ब्लेंडचा चहा काढतो. म्हणजे खूप छान प्रसंग आहे, हाताशी ३ कसलेले अभिनेते आहेत. पण संवाद आणि दिग्दर्शन गंडलं आहे त्यामुळे त्या प्रसंगातून असं वाटतं की अश्विन अ‍ॅनाला शालजोडीतली देतोय की तुला साधा तुझ्या आईला कसा चहा आवडतो ते पण माहीत नाही. तो कसा बनवायचा ही तर दूरची गोष्ट. सिनेमात "Tea at 4" हा शब्दप्रयोग य वेळेला येतो. पण त्याला शेंडा बुडखा काहीच नाही ना त्याचा कुठे वापर केलाय.

सिनेमात संगीताचा फार सुंदर वापर केला आहे >>> अगदी अगदी! 'पैरो में पहना के चांदिकी बिछिया, लूट लियो माटीकी समथींग (ते समथींग काय ते नाही समजले) ' सुंदरच आहे. आणि लक्ष्मी जाते तेंव्हा म्हटलेली बंदिशही (का दोन्ही बंदिशी एकच आहेत?)

ही पोस्टही सुरेख आहे माधव. Happy

जॅकेटमध्ये ते वाळलेलं पान सापडतं >> तोच क्षण निर्णय बदलण्यातला महत्त्वाचा पॉईंट ठरतो.

अश्विनी खन्ना आणि तो स्टुडंटही तिला माहीत नाही कारण ती तीन वर्षांनी परत आलीये. त्यामुळे काही लोक जे आईचे जवळचे आहेत, ते तिला पूर्णपणे अपरचित आहे. आपल्या शिवायच्या आईच्या आयुष्याशी ती कनेक्टेड नाही. त्यामुळे ती लोक अनाहूतपणे आल्यासारखी वाटतात. जे तिच्या आईला तिच्यापेक्षा जास्त ओळखतात हे तर थोडे अपमानास्पद(?) सुद्धा वाटते. एकमेकींशिवाय आयुष्य थांबलेले नाही दोघींचेही पण अपूर्णता आहे. नाते जितके जवळचे तितके भावनिक उतारचढाव तीव्र असतात, त्यात इतक्या गाठी...!

त्या बंदिशी एकच वाटल्या नाही मला.

>>> श्रोडिंजरचा जलवा
Lol

माधव, Tea at 4 हा ब्रिटिश शब्दप्रयोग आहे afternoon tea या अर्थी. तिचा वेळकाळाचा सेन्स गेला आहे त्याचं सूचन, बाकी त्या कॅरेक्टर्सशी स्पेसिफिक काही नाही.

तिचा वेळकाळाचा सेन्स गेला आहे. >>> ओह! हे मिसलं मी. चहाची वेळ संध्याकाळाची नाहीये हे नोट नाही केलं. आता त्या संवादाला अर्थ आला.

नेफ्लि - खुफिया इथे येऊन गेला आहे का ?
तब्बू सस्पेन्स फिल्म्स मधे रमलीय. तिला या वयात सुद्धा महत्वाचा रोल असतो. वय लपवत नाही हे खूप आवडलं.
मूवी फर्स्ट हाफ पर्यंत उत्कंठावर्धक आहे. नंतर भरकटला आहे आणि एकदम संपवला आहे. धक्कातंत्राचा खूप जास्त वापर केला नाही हे आवडलं.
पण एक जबरदस्त रहस्य असेल असं वाटत राहतं त्याचा काहीच मागमूस राहत नाही. मुख्य पात्रांच्या खासगी लाईफच्या फोडण्या बेमालूम नाहीत. विशाल भारद्वाज आहे डायरेक्टर.

बब्बन यांच्या म्हणण्याचा अर्थ त्यांना त्या गाण्यांचे संगीतकार रोशन आहेत हे आधी माहीत नव्हतं. ती वेबसिरीज पाहिल्यावर कळले.-> बरोबर.

राजेश रोशन ह्यांनी बहुतांशी म्युजिक ईंग्लिश धुना/गाणी चोरून बनवले आहे. प्रितम हून जास्त चोरी केलीये-> असु द्या हो. त्या निमिताने चन्गल्या चाली ऐकायल्या मिळाल्या ना.

त्या रोशन्स चा पहिला भाग बघितला, आवडला. दुसर्या भागात ‘दुनियाके सारे म्युझिक डायरेक्टर्स एक तरफ़, और राजेश रोशन एक तरफ़‘ ऐकल्यावर बंद केला Happy

रोशन्सवर फिल्म बनवावी असे का वाटले असेल? की सगळ्या घराण्यांवर फिल्म्स आहेत?

मी हिंदी गाणी भरपुर ऐकते पण गाणे ऐकुन हे रवीचे, रोशनचे, एस्जेचे वगैरे ओळखता येत नाही.. शास्त्रिय हिंट देऊन जातेय असे वाटले की नौशादचे असावे वाटते, पंजाबी बाज वाटला की ओपी वाटतो पण तरी त्याम्चेच आहे हे ओळखता येत नाही.

स्वतःच प्रोड्यूस केलीय (दुसरं कोण करणार होतं?)
>>>>

मग पिक्चरच काढायचा होता. जसा धोनीने काढला. तो देखील निवृत्त व्हायच्या आधीच. ब्लॉकबस्टर..

एच बी ओ मॅक्स वरती 'ब्रीद ऑफ फायर' अर्थात कुंडलिनी योगा वरची डॉक्युमेन्टरी पाहीली. मला आवडली नाही बेसलेस आरोप आहेत. गुरु भजन सिंग जे की कुंडलिनी योगा चे फाऊंडर आहेत त्यांच्याविरुद्ध बरच काही आहे पण पुरावा? शून्य. मते (ओपिनिअन्स) खूप. मत प्रत्येकालाच असतं. पुरावा हवा ना इतकं बॅड माऊदिंग करायला.
अगदी सिरीअस चेहरा ठेउन, इंडियातल्या अमक्या अमक्या शाळेत पेडोफाइल्स असल्याची रुमर होती.
अरे रुमर काय रुमर. एकांगी आणि भारतिय गुरु विरोधी बंडल डॉक्युमेंटरी.
शीख समाजात सेवा असते आणि उस्फूर्त असते. तर या आपण होउन गेलेल्या २-३ बाया म्हणतायत 'लेबर कँप' झालेला म्हणे तो स्टुडिओ. झेपत नाही तर त्या धर्माच्या वाटेला जावं कशाला.

सूक्ष्मदर्शिनी हा मल्याळम सिनेमा हिंदीत डिस्ने हॉटस्टार वर आहे. जबरदस्त आहे !
परिसरात राहायला आलेला एकजण, त्याचे संशयास्पद वागणे, अगम्य घटना आणि या सगळ्यांचा अनपेक्षित शेवट.
नक्की बघा.

रोशन्सवर फिल्म बनवावी असे का वाटले असेल? की सगळ्या घराण्यांवर फिल्म्स आहेत? >> निव्वळ रोशनच्या संगीतासाठी त्याच्यावर फिल्म बनवणे मस्ट आहे असे मला वाटते.

‘दुनियाके सारे म्युझिक डायरेक्टर्स एक तरफ़, और राजेश रोशन एक तरफ़‘ >> हो तो अचाट प्रकार होता, विशेषतः रोशन वर पहिला भाग झाल्यावर.

विशेषतः रोशन वर पहिला भाग झाल्यावर. >>> फेफ, असामी Lol

मी मधे कोठेतरी स्नेहल भाटकरांबद्दल लेख होता त्यात "हमारी याद आयेगी..." लिहीलेले वाचले होते की "लता व आशाची गाणी जेथे संपतात तेथे हे गाणे सुरू होते". तेव्हा असेच काहीतरी वाटले होते. म्हणजे गाणे चांगले आहे यात वाद नाही पण हे जरा जास्तच होतंय Happy

ती फक्त लता आशा आणि मुबारक बेगमच्या सुनेहरी यादे छाप कॅसट मधल्या सिक्वेन्स वर फॅक्चुअल कमेंट असवी.

Happy म्हणजे यूट्यूबवर असतात तशी कॉमेण्ट का?

"shabbir kumar great voice"
"मेरे बचपन की सुनहरी यादें ताजा हो गई"
"proud of my country India"
"इस गीत को २०२५ मे कौन कौन सुन रहा है" ..... ई. ई.

Pages