डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे साउथ इस्ट एशिअन कंट्रीज मध्ये साउथ कोरिया, जपान आणि कदाचित ऑस्ट्रेलिया आहेत असं डिफेन्स सेक्रेटरी नॉमिनी कनफर्मेशन हिअरिंग मध्ये सिनेट मध्ये सांगतो. Biggrin
आपण लोटपोट हसायचं बास! Lol आपलं काय जातंय. घाला गोंधळ!

बर्थराइट सिटिझनशिप काढणार हे आत्ता जाहीर केले असले तरी घटनेत ते आहे. ते इतक्या सहजी निघेल असे वाटत नाही. दुसरे म्हणजे लहान मुलांना नागरिक असण्याचे फायदे जेव्हा खरोखर मिळतात तोपर्यंत अशी मुले ऑलरेडी नागरिक झाली असतील - जर त्यांचे पालक तोपर्यंत अमेरिकेत असतील तर - कारण जन्माच्या वेळी जरी पालक व्हिसावर असले, तरी पुढे काही वर्षांत ग्रीन कार्ड व नंतर सिटिझनशिपही मिळेल. त्यामुळे याचा नक्की प्रॅक्टिकल तोटा काय आहे भारतीयांना?

अंडरग्रॅडला "इन स्टेट" फायदे असतात त्यातही सिटिझनशिप लागत नाही.

बाय द वे, व्हॉट्सअ‍ॅपवर व इतर अनेक बातम्यांत एच१-बी वाल्यांना ग्रीन कार्डचा पाथ मिळणार नाही असे वाचले. याला अमेरिकन मिडीयामधे कोठे दुजोरा दिसला नाही. मुलांनाही त्यातून जावे लागणार व त्यामुळे ग्रीन कार्ड मागणार्‍यांची संख्या वाढून लागणारा काळ वाढेल हा अप्रत्यक्ष भाग आहे, पण मुळात ग्रीन कार्डला अ‍ॅप्लाय करता येते हे बंद करण्याबद्दल काही दिसले नाही.

यातून नवीन भारतीय लोक इथे येण्यावर काही फरक पडेल असे वाटत नाही. एकतर इथे येणारे अनेक लोक येताना २-३ वर्षे राहून परत जाऊ असे डोक्यात ठेवून येतात. इतका पुढचा विचार करणारे कमीच. दुसरे म्हणजे आत्ता जरी नियम आला तरी व्हिसाची ६ वर्षे होईपर्यंत ते पुन्हा बदलू शकते. ती आशा ठेवूनही काही जण येतील.

अजून एक शक्यता अशी आहे की आत्ता नाड्या आवळून नंतर काही अपवाद आणतील त्याच्यात व त्यातून लाँग टर्म व्हिसाहोल्डर्स वगळतील. आत्ता ट्रम्पला त्याने केलेल्या प्रॉमिसनुसार अ‍ॅक्शन दाखवण्याकरता या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स ("वटहुकूम"?) आणण्यात येतील. नंतर त्यावर कायदा येईल किंवा अमेण्डमेण्ट होईल तेव्हा त्यात बरेच बदल होतील अशीही शक्यता आहे.

<<कारण जन्माच्या वेळी जरी पालक व्हिसावर असले, तरी पुढे काही वर्षांत ग्रीन कार्ड व नंतर सिटिझनशिपही मिळेल. त्यामुळे याचा नक्की प्रॅक्टिकल तोटा काय आहे भारतीयांना?>>

फा, सध्याच्या नियमांनुसार, साधारण पणे २०१६ च्या पूढची प्रायॉरिटी डेट (इ बी २ व ३) असलेल्या भारतीयांना त्यांच्या जन्मात ग्रिन कार्ड व सिटीझनशीप मिळण्याची शक्यता शुन्य आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या इथे जन्मलेल्या मुलाने किंवा मुलीने २१वर्षांनंतर त्यांच्यासाठी ग्रिन कार्ड ला अप्लाय करणे हा एकच पर्याय उपलब्ध आहे. आता तोही जाईल.

मला वाटत हा नियम इलिगली इथे येवुन मुलाना जन्म देवुन त्याच्या सिटिझनशीप च्या दोरिला पकडून युएसलाच चिकटून राहायच असा मनसुबा असणार्‍या लोकाना लक्षात घेवुन बनवला आहे...ओल्या बरोबर सुके तस लिगली इथे येणार्यानाही ते लागु होणार.

<<हे बायडन ने केले असते तर शेंडे नक्षत्र ने काय केले असते ?>>

काहीहि केले नसते. त्रंप्याने सांगितले सूर्य पूर्वेला मावळतो नि पश्चिमेला उगवतो तर केलीअ‍ॅन कॉन्वे, हॅनिटी, टकर, लेव्हिन सगळे हो हो म्हणणार, दुसरे काय?
बायडेन दहा वेळा खोटे बोलला तर त्रंप्याला हजारदा खोटे सांगायला हरकत नाही असे रिपब्लिकनांचे मत असते.

>>>>>> त्यांना त्यांच्या इथे जन्मलेल्या मुलाने किंवा मुलीने २१वर्षांनंतर त्यांच्यासाठी ग्रिन कार्ड ला अप्लाय करणे हा एकच पर्याय उपलब्ध आहे.
मला वाटते की जर आपले मूल बाय बर्थ, सिटीझन असेल तर त्या मूलाचे पालक स्पेशल (आणि एक्स्पिडिएटेड) कोट्यात येतात. मी चूक असू शकते.
पण जर तसे असेल तर २१ वर्षे थांबावे लागत नाही.

>>>>>>>
- दुसरे म्हणजे आत्ता जरी नियम आला तरी व्हिसाची ६ वर्षे होईपर्यंत ते पुन्हा बदलू शकते. ती आशा ठेवूनही काही जण येतील.
- अजून एक शक्यता अशी आहे की आत्ता नाड्या आवळून नंतर काही अपवाद आणतील त्याच्यात व त्यातून लाँग टर्म व्हिसाहोल्डर्स वगळतील.
- नंतर त्यावर कायदा येईल किंवा अमेण्डमेण्ट होईल तेव्हा त्यात बरेच बदल होतील अशीही शक्यता आहे.

तीन्ही उत्तम मुद्दे मांडलेत फा.

<<मला वाटते की जर आपले मूल बाय बर्थ, सिटीझन असेल तर त्या मूलाचे पालक स्पेशल (आणि एक्स्पिडिएटेड) कोट्यात येतात. मी चूक असू शकते.>>
मुल बाय बर्थ जरी सिटीझन असेल तरी आई वडीलांसाठी ग्रिन कार्ड ला (आणि पर्यायाने सिटीझनशीप साठी) अप्लाय करण्यासाठी २१ वयापर्यंत थांबावे लागते.

>>बर्थराइट सिटिझनशिप काढणार हे आत्ता जाहीर केले असले तरी घटनेत ते आहे. ते इतक्या सहजी निघेल असे वाटत नाही.<<
तुमचा रोख घटनेत बदल करावा लागेल असा दिसतोय. पण तो घटना अमेंड वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाहि. त्या क्लॉजचं इंटरप्रिटेशन काय आहे, या मुद्द्यावर जोर देउन पुढे जाइल सुप्रीम कोर्टात. स्कोटसने त्याचं इंटर्प्रिटेशन ग्राह्य मानलं कि ते अंमलात आणलं जाइल..

तीच मेथड ग्रीनलंड आणि पॅनमा कनॅल अ‍ॅक्वायर करण्या करता वापरली जाइल. पण इथे, स्कोटस ऐवजी काँग्रेसचं लेवरेज वापरलं जाइल...

रामास्वामी "डोज" मधुन बाहेर पडला, ओहायोच्या गवर्नर पदासाठी प्रयत्न करणार आहे. सहसा दोन स्ट्रॉग (अल्फा, डॉमिनेटिंग) पर्स्नॅलिटिज एकत्र मिळुन काम करणं जरा अवघडंच असतं, त्यात मस्क थोडा सन्कि आहे. सो इट वाज बाउंड टु हॅपन. असो..

पुढे कदाचित मस्क आणि ट्रंपचं वाजलं तर आश्चर्यचकित होउ नका...

On January 21, 2025, President Trump issued a full and unconditional pardon for Ross Ulbricht, who had been serving a life sentence for his role in operating Silk Road.

ट्रंप झिंदाबाद !

पुढे कदाचित मस्क आणि ट्रंपचं वाजलं तर आश्चर्यचकित होउ नका...>>> तुमचा काय अंदाज? कधी होईल काडीमोड? सध्या हनिमून फेज मधे आहेत तर मस्क आनंदी आनंद गडे म्हणून नाचतोय. बघितला की नाही त्याचा नाच?
रामास्वामीला काढण्यामागे मागा क्राऊडला चुचकारण्याचा प्रयत्न असावा.

जेडी भाऊंची पोरं क्युट आहेत! पोट्टी उचलून घ्यायचा हट्ट करते, बँडडेड लावून मिरवते. पोरगा झोपतो. सर्कस मध्ये एकदम ह्युमन एलिमेंट बघून टडोपा झालं. Happy

सहसा दोन स्ट्रॉग (अल्फा, डॉमिनेटिंग) पर्स्नॅलिटिज एकत्र मिळुन काम करणं जरा अवघडंच असतं, त्यात मस्क थोडा सन्कि आहे. सो इट वाज बाउंड टु हॅपन. असो.. >>> हो खरे आहे.

तुमचा रोख घटनेत बदल करावा लागेल असा दिसतोय. पण तो घटना अमेंड वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाहि. त्या क्लॉजचं इंटरप्रिटेशन काय आहे, या मुद्द्यावर जोर देउन पुढे जाइल सुप्रीम कोर्टात. स्कोटसने त्याचं इंटर्प्रिटेशन ग्राह्य मानलं कि ते अंमलात आणलं जाइल.. >>> हो तोच रोख होता. इंटरप्रिटेशन चा पर्याय आहेच. तो त्याला हवा तसा करायला मूळ अमेण्डमेण्ट मधे किती स्कोप आहे ते बघितलेले नाही. आणि खुद्द ट्रम्पच्या कॅम्पेन स्पीचेस मधे त्याने इल्लिगल्स वर जास्त भर दिला आहे.

विनायक - पॉइण्ट समजला - समजा पुढच्या महिन्यात एक नवीन कपल भारतातून आले. त्यांना नंतर पुढच्या वर्षी मूल झाले. आता ते तिघेही एच१ व एच१ वरचे डिपेण्डंट्स असे राहतील. व्हिसाची मुदत सहा वर्षे जास्तीत जास्त व ग्रीन कार्ड मुळे जर तशीच वाढवत गेले तर ते मूल २१ चे झाल्यावर सुद्धा ते तिघे त्याच स्टेटस मधे राहतील. हाच मुद्दा आहे ना? तो बरोबर आहे. पण मला वाटते हा प्रश्न कोणत्यातरी मार्गाने सोडवला जाईल. इतक्या संख्येने लोक दोलायमान स्थितीत असतील तर कंपन्याही लॉबीइंग करतील. दुसरे म्हणजे इथे जन्मलेल्या व ज्यांचे पालक लीगल स्टेट मधे इथे आहेत अशा मुलांना ग्रीन कार्डचा मार्ग आधी कदाचित खुला केला जाईल. जे लोक लीगली इथे आले व इथेच राहणार आहेत अशा लोकांना "इन प्रिंसिपल" ना ट्रम्पचा विरोध आहे ना बहुतांश ट्रम्प समर्थकांचा. सुरूवातीला जरी एक्स्ट्रीम नियम आणला, तरी माझा अंदाज आहे की त्यात नंतर अपवाद आणले जातील.

आणि पुन्हा ट्रम्पची चार वर्षे झाली की नवा गडी नवा राज मधे हे सगळे पुन्हा बदलू शकते.

ब्रो डोलांड रिमेम्बर, ऑल म्हातारडे आर खोटारडे, सम आर मोअर खोटारडे दॅन अदर्स. 😉

Capture_AI.JPG

तात्या स्वतः सोबत अख्ख्या जगाला खड्ड्यात घालणार बहुतेक, एआय मध्ये इतक्या वेगाने अड्वान्समेंट होते आहे की स्ट्रिक्ट रेगुलेशन्स अभावी ५ वर्षांनंतर कोर्स करेक्शनला देखील कितपत वाव असेल याबाबत शंका आहे. बाकी काही नाही खड्ड्यात जायचंच आहे तर स्वतः जा आणि तुझ्या गाढव पाठीराख्यांना घेऊन जा सोबत, इतरांना कशाला भुर्दंड? 😡

fool.JPG

DEI ला प्राधान्य दिल्याबद्दल कोस्ट्गार्ड्च्ला अ‍ॅडमिरल ला डच्चू दिला अशी कुजबुज आहे. बाकी कारणं वेगळी दिलीत.

विवेक रामस्वामी Got fired! Proud

त्याला खड्यासारखे बाहेर फेकुन दिले ट्रंपने.

“Our American culture has venerated mediocrity over excellence for way too long (at least since the 90s and likely longer)” he wrote. “A culture that celebrates the prom queen over the math olympiad champ, or the jock over the valedictorian, will not produce the best engineers.” Ramaswami said.

हे त्याने म्हटल्यापासुन व अमेरिकन कल्चरला नावे ठेवल्यापासुन मागा क्राउड, स्टिव्ह बॅनन व खुद्द ट्रंप त्याच्यावर जाम भडकले होते. त्यामुळे त्याचा जॉब गेला यात मला तरी काही नवल वाटले नाही. बाकी इलॉन मस्क व तो असे “ दोन् अल्फा मेल्स“ एकत्र काम करु शकले नसते हे त्याच्या “ फायर“ होण्याचे नुसते शुगर कोटींग आहे.

ही बातमी व ट्रंपने पहिल्याच दिवसात दाखवुन दिलेल्या बर्‍याच गोष्टींमुळे वर कोणीतरी म्हटले होते ते खरच आहे की “ ये तो सिर्फ शुरुवात है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!” Proud

>>>>> ये तो सिर्फ शुरुवात है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!” Proud

जब रात है ऐसी मतवाली
तो सुबह का आलम क्या होगा Wink

Ross Ulbricht ची केस इथे कुणी फॉलो करत असेल असे वाटत नाही.

त्याच्यावर प्रचंड अन्याय झाला होता. लहान मुलांचे सेक्स ट्रॅफिकिंग करणार्‍या Ghislaine Maxwell ला वीस वर्षे आणी याला मात्र दोन जन्मठेपी आणी वर वीस वर्षे. त्याच्यावरचा खटलाही एकतर्फीच होता. तो जिवंत बाहेर येणार नाही असेच मला वाटलेले.
Libertarian Convention मध्ये ट्रंप ने मी जिंकलो तर त्याला पार्डन करेन असे आश्वासन दिले होते आणी पठ्ठ्याने ते पाळले देखील !

J6 च्या आरोपींना दिलेले पार्डन ही योग्यच आहे असे माझे मत आहे.

<<इंटरप्रिटेशन चा पर्याय आहेच. तो त्याला हवा तसा करायला मूळ अमेण्डमेण्ट मधे किती स्कोप आहे ते बघितलेले नाही.>> इंटरप्रिटेशन हाच एकच पर्याय आहे. १४ व्या दुरुस्ती मधे बदल करण्यासाठी लागणारं संख्याबळ व मेहनत बघता हे एड्मिन त्या वाटेला जाणार नाही. तसेच, युएस वि वोंग किम आर्क च्या केस मधे न्यायालयाने १४ व्य दुरुस्ती संदर्भात स्पष्ट निकाल दिलेला आहे.
ह्या एडमिन ची सर्व मदार १४ व्या दुरुस्तीमधील "सब्जेक्ट टू द जुरीसडीक्शन देअरऑफ" ह्या शब्दांवरती आहे. तात्यांनी स्वःताच भरलेले सुप्रीम कोर्ट ह्या शब्दांअधारे इल्लीगल्स ना १४ वी दुरुस्ती लागू होत नाही हे ह्या अ‍ॅडमीन चे ईंटर्प्रिटेशन ग्राह्य धरू शकते. व एकदा सु. कोर्टाने ही ए. ऑ. ग्राह्य धरली की घटना दुरुस्ती ची गरज पुढची १२ वर्षे तरी (ट्रंप ची ४ व वान्सची ८) रहाणार नाही.

<<समजा पुढच्या महिन्यात एक नवीन कपल भारतातून आले. त्यांना नंतर पुढच्या वर्षी मूल झाले. आता ते तिघेही एच१ व एच१ वरचे डिपेण्डंट्स असे राहतील. व्हिसाची मुदत सहा वर्षे जास्तीत जास्त व ग्रीन कार्ड मुळे जर तशीच वाढवत गेले तर ते मूल २१ चे झाल्यावर सुद्धा ते तिघे त्याच स्टेटस मधे राहतील.>>
हो. पण २१ वर्षांनंतर त्या मुलाला एच १ - बी किंवा एफ १ नसेल तर देश सोडून जावे लागेल. तसेच त्याच्या आई वडीलांना देखील रिटायर्मेण्ट नंतर ग्रिन कार्ड व सि. शीप अभावी देश सोडून जावे लागेल.

<<पण मला वाटते हा प्रश्न कोणत्यातरी मार्गाने सोडवला जाईल. इतक्या संख्येने लोक दोलायमान स्थितीत असतील तर कंपन्याही लॉबीइंग करतील.>> कदाचीत अश्या मुलांसाठी डाका मुलांप्रमाणे काही आणावे लागेल. तरीसुद्धा आई वडीलांना मात्र जावंच लागेल.

<<जे लोक लीगली इथे आले व इथेच राहणार आहेत अशा लोकांना "इन प्रिंसिपल" ना ट्रम्पचा विरोध आहे ना बहुतांश ट्रम्प समर्थकांचा>> आशा करतो की हे तुम्ही विनोदाने लिहीत आहात. नसाल तर सांगतो, ट्रम्पचे सामान्य एवरीडे समर्थक सुद्धा (फक्त एक्स्ट्रीम राईट विंगर्स नाही), इथल्या लिगल व इल्लिगल देसीज ना आता हेट करु लागले आहेत. कामा निमित्त माझा अगदी रुरल भागातील ट्रंप सपोर्टर्स शी संबंध येतो. गेल्या दहा बारा वर्षां मधे हा बदल प्रकर्षाने जाणवतो. कदाचीत देसींची विजीबली वाढती संख्या ह्याचे कारण असू शकेल. आणि ही हेट फक्त नविन आलेल्या देसी लोकांबद्दल लिमिटेड न रहाता २-३ दशकांपासून आलेल्या देसींवरही स्पील होते. २० वर्षा पुर्वी नागरीक झालेले भारतीय ही गोष्ट मान्य करणार नाहीत, पण ही ग्राऊंड रिअ‍ॅलिटी आहे.

विनायकच्या पोस्टशी पूर्ण सहमत.
जगात आता अमेरिकेला कोण मित्र राहिल ते बघणं मनोरंजक असणार आहे. एकुण मजा येणार आहे.
बाकी हे बर्थराईट पूर्वलक्षी प्रभावाने करता येईल ना? इंटरप्रिटेशन केलं, नवा नियम आणला नाही की त्याचा प्रभाव हा पूर्वलक्षीच असला पाहिजे. बरोबर ना? Wink आणखी मज्जाच मज्जा.

बाकी ब्लॅकेट पार्डन झालं. आता परत असा काही हल्ला झाला की पोलिस काय करतात ते बघणंं तर फारच मजेचं असणार आहे.
https://www.theguardian.com/us-news/2025/jan/22/trump-january-6-pardons-...
पोलिसांवर हल्ला केला, त्यांना मारलं तरी काय होत नाही. आहे की नाही मज्जा!

J6 च्या आरोपींना दिलेले पार्डन ही योग्यच आहे असे माझे मत आहे. >> जान ६ झालेच नाही असे म्हणू शकता विकु. तुमच्यासारखे सदसदविवेकद्धी असलेले लोक असे म्हणू लागल्यावर काय बोलणार *हताश*

ही ग्राऊंड रिअ‍ॅलिटी आहे. >> +१. मी डॅलास मधे राहतो. हा प्रभाव अर्बन अरीयामधून बाहेर गेले कि जाणवायला लागतो.

आशा करतो की हे तुम्ही विनोदाने लिहीत आहात >> विनोदाने नाही. विशफुल थिंकिंग म्हणा हवंतर. त्याच्या कॅम्पेन मधली त्याची भाषणे, पाहिलेल्या मुलाखती, त्याच्या मतदारांच्या मुलाखती, अगदी मागा रॅलीज मधे बोलणारे लोक यातून बनवलेले मत आहे ते.

जेथे इन जनरल रेसिझम आहे ते वगळले, तर गेल्या १-२ महिन्यांत जास्त जाणवलेला हेट हा रामस्वामीच्या वक्तव्यांमुळे आहे असा माझा समज आहे. जो आधीपासून आहे तो वेगळा.

भारतात जातियतावाद आहे हे आता इथे पोराटोरांनाही माहीत झालेले आहे. प्रमिला जयपाल बाईच्या सिअ‍ॅटलमध्येच पहीले जातीविरोधी विधायक पास झाले (https://www.npr.org/2023/02/22/1158687243/seattle-becomes-the-first-u-s-...). हीच ती डेमोक्रॅटिक पक्षाची काँग्रेस वुमन जिला जयशंकरनी भेट देण्याचे नाकारले होते. सांगायचा मुद्दा हा की जातियवादाचा डंका, कीर्ति,अमेरिकेत झालेली आहे. घरची धुणी इथे धुवुन झालेली आहेत. अ नॅरेटिव्ह इज ऑलरेडी सेट. ते चान की वाईट याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये पण हे कोलित आहे.

ज्या कोणी परदेशातील स्त्रिया भारतात जातात त्यांना त्रास झालेला असतो. (माझ्याकडे २-३ च डाटा पॉइन्टस आहेत) या सर्वामुळे रेसिस्ट लोकांचे फावते. आयतेच कोलित मिळते त्यांना. आणि तसेही येन केन प्रकारेन त्यांना छळायचे असतेच ते वेगळे.
२०१३ - २०१६ मी रेसिझमच त्रास सहन केलेला आहे. स्थळ - डुलुथ्/मिनेसोटा. बर्‍यापैकी नॉन अर्बन भाग. तेव्हा सहन केला (तेव्हा सिटीझनशिपही नव्हती कोण करणार एच आर वाले कज्जे-खटले! आपल्याच पायावर कुर्‍हाड पडायची.). पुढच्या वेळी सहन करण्याऐवजी मी एच आर कडे जाइन. वन्स बिटन ट्वाइस शाय. (अर्थात एच आर ला कशाचच काही पडलेलं नसतं ते वेगळच. दे डोन्ट वाँट टु रॉक द बोट)

Pages