डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy उषःकाल शब्दाला खरे म्हणजे जे डी व्हान्सचा फोटो पाहिजे Wink

नवीन टीमला शुभेच्छा! सुरूवातीला डोज वाले काय करतात याबद्दल उत्सुकता आहे.

म्हातार्‍याने निघताना अनेक उचापती केल्या आहेत. नको नको त्या मृत्युदंड मिळालेल्या लोकांना जीवदान दिले आहे. फक्त बळी गेलेला काळा व्यक्ती असेल तर अशा काही मूठभर लोकांना माफी दिली नाही. पण अगदी कोवळ्या पोरांना मारणार्‍या नराधमांना मात्र जन्मभर करदात्यांच्या खर्चाने पोसण्याची सोय केली आहे. अशी अनेक महान कृत्ये केल्यावर ह्या पिसाळलेल्या म्हातार्‍याने अशी खंत व्यक्त केली की आपण कुठला पूल किंवा तत्सम जागेला आपले नाव का नाही देऊ शकलो. जगाच्या इतिहासातील सर्वात थोर राष्ट्रपती आपण असताना आपले नाव कुठल्याच वस्तूला का नाही देऊ शकलो ह्याविषयी खूप हळहळ वाटली त्याला. दोन दिवसांनी त्याचे थोबाड बघावे लागणार नाही एवढाच आनंद!

ट्रंपचा शपथविधी हा मार्टिन ल्यूथर किंग डे ह्या दिवशीच होत आहे. ह्याचा अर्थ ह्या देशातील समान हक्क, वर्णद्वेषविरोध , वंशद्वेषविरोध आता नामशेष झाला आहे असे पुरोगामी मत नुकतेच वाचण्यात आले! वस्तुस्थिती ह्याच्या विपरित आहे. अमुक एक लेस्बियन आहे म्हणून तमुक पदावर नेमा, अमुक एक ट्रान्स आहे म्हणून त्याला देशाच्या न्युक्लियर मटिरियलचा सोक्षमोक्ष करायच्या पदावर नेमा वगैरे भेदभाव ट्रंपच्या काळात होणार नाही. लोकांचे कौशल्य बघून त्यांना कामावर घेतले जाईल अशी एक आशा आहे.

इस्रायल आणि हमासमधे बहुधा तह झाला आहे आणि ओलिसांना सोडून देणार आणि त्याबदल्यात अनेक अतिरेकी लोकांना इस्रायल सोडणार हे जवळपास ठरले आहे. ट्रंपने जी जोरदार धमकी दिली की मी सत्तेवर यायच्या आधी जर ओलिसांना सोडले नाही तर हमासला माझे तांडव पहावे लागेल, ह्या विधानाचा परिणाम असावा असेच वाटते. कारण म्हातार्‍याच्या मध्यस्थीला दोन्ही पार्ट्या भीक घालत नव्हत्या. म्हातारा काल काय बोलला हे आज त्याला आठवत नाही. ट्रंपचे तसे नाही. त्याने दिलेली धमकी तो खरी करून दाखवणे अगदी शक्य आहे.

ट्रंप असे कधी म्हणाला की तो ग्रीनलंडवर हल्ला करून ते ताब्यात घेणार आहे? त्याने कायम हेच म्हटले आहे की त्याला ग्रीनलंड विकत घ्यायचे आहे. इन्व्हेड शब्द लागू होत नाही. असो.
शपथविधी उघड्यावर न करण्याचे कारण बहुधा हल्ल्याचा धोका हे असावे. आणि थंडी हे सांगण्याचे कारण असावे असा माझा अंदाज.
प्राणावर बेतले ते कानावर निभावले असा अनुभव घेतलेल्या ट्रंपला कदाचित सुरक्षा यंत्रणांनी दिलेला इशारा मनावर घ्यावा असे वाटले असेल.

अर्थात ट्रंपचा तिरस्कार करणार्‍यांनी ह्यावरून असे निर्मळ हास्यविनोद करायला आजिबात हरकत नाही!

एका सर्वशक्तिमान राष्ट्राच्या सर्वोच्च आणि पाशवी शक्ती असलेल्या पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीची अशी उठसूठ कोणत्याही कारणाने फाटत असेल तर अशी व्यक्ती तिरस्काराच्या नव्हे, तर कीव करण्याच्या लायकीची असते....असो.
......रच्याकने ब्रो डोलांड, फिकर नॉट हमाम मे हम भी नंगेईच है.... આવો ને બાબા Rofl
Screenshot_20250119-124119.jpg

<< निर्मळ हास्यविनोद करायला आजिबात हरकत नाही!>>
त्याच्यासाठी त्रंप्याचा तिरस्कारच करायला पाहिजे असे नाही. मी त्याचा मुळीच तिरस्कार करत नाही.
मला तर तो माणुस टीव्ही वर दिसला तरी हसायला येते. कुणी नुसते ट्रंप म्हंटले तरी मला हसू येते. आणि तो बोलायला लागला की आणखीनच! हा माणूस किम्मेल, कोर्बे, फॅलन यांचा धंदा बंद पाडणार आहे, कारण हा त्यासर्वांहून अधिक विनोदी आहे. करोनावर त्याने उपहासाने (असे म्हणतात) सुचवलेले उपाय अजून आठवत असतील!

>>>>>>प्राणावर बेतले ते कानावर निभावले असा अनुभव घेतलेल्या ट्रंपला कदाचित सुरक्षा यंत्रणांनी दिलेला इशारा मनावर घ्यावा असे वाटले असेल.

मर्चंट मरीन मधील मुलामुलींची ((नवर्‍याचे स्टूडंटस)) परेड होती इनॉगरेशनला. कसे करणार ते परेड? फार थंडी आहे. १२० स्टुडंटस गेलेले आहेत , प्रॅक्टिस झालेली आहे कित्येक दिवस. पण आता उत्साहावर विरजण पडलेले आहे.

सुरक्षेचा काही संबंध नसावा. त्या हल्ल्यानंतर त्याने कितीतरी सभा नंतर घेतल्याच होत्या. थंडीमुळे जरी आत घेणार असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. अमेरिकेच्या त्या भागात सध्या कडक थंडीची लाट आहे. हा ट्रम्पच्या एकट्याचा प्रश्न नाही. तेथे हजारो लोकांना बोचर्‍या थंडीत बाहेर बसवण्यापेक्षा आत चांगले.

मात्र काही पथके वगैरे कार्यक्रम करणार होते त्यांचे होणार माहीत नाही. आधीच्या प्लॅननुसार टेक्सासचे एक मराठी ढोलपथकही सादर करणार आहे असे व्हॉट्सअ‍ॅपवर पाहिले.

>>
एका सर्वशक्तिमान राष्ट्राच्या सर्वोच्च आणि पाशवी शक्ती असलेल्या पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीची अशी उठसूठ कोणत्याही कारणाने फाटत असेल तर अशी व्यक्ती तिरस्काराच्या नव्हे, तर कीव करण्याच्या लायकीची असते....असो.
<<
पाशवी शक्ती? म्हणजे काय हो? पशुला शोभेल अशी शक्ती? कुठल्या पशुकडे विमान उडवायची, ड्रोन उडवायची, पाणबुड्या, विविध युद्धनौका चालवण्याची शक्ती असते?
आपली सर्वोच्च शक्तीची कल्पना एखाद्या पशुकडे असणारी शक्ती इतकीच असेल तर आपण हॉलिवूडचे सिनेमे पाहणे कमी करायला हवे असा अनाहूत सल्ला देतो.
शक्तीमान देशाचा अध्यक्ष काही बुलेटप्रुफ त्वचा घेऊन जन्माला येत नाही. अजून हातात सत्ता मिळालेली देखील नाही. अनेक डीप स्टेट अ‍ॅक्टर ट्रंपच्या जीवावर उठले आहेत. जुलै मधे सिक्रेट सर्व्हिसच्या सहकार्याने कुठल्याशा सरकारी विभागाने ट्रंपच्या हत्येचा कट रचला होता जो केवळ दैवयोगाने फसला. अशी पार्श्वभूमी असताना बेदरकारपणे सुरक्षा यंत्रणांचे इशारे धुडकावून लावावेत तेही केवळ काही रेम्याडोक्या लोकांचे समाधान व्हावे म्हणून ही अपेक्षा जअअअअअरा अती होते आहे!

पाशवी शक्ती? म्हणजे काय हो? पशुला शोभेल अशी शक्ती?>>>> नाही समजलं?? काही हरकत नाही....जसं पाशवी बहूमत, त्यासारखीच पाशवी शक्ती, अनिर्बंध या अर्थाने.

आपण हॉलिवूडचे सिनेमे पाहणे कमी करायला हवे असा अनाहूत सल्ला देतो.>>> आपण मराठी वाचतांना स्थळ-काळातील बोलीभाषेतील संदर्भ/ वापर लक्षात घेऊन वाचावे,समजून घ्यावे असा औपचारिक सल्ला मलाही द्यावासा वाटला होता, पण एखाद्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे (खासकरुन जेव्हा समोरच्याच्या वास्तविक क्षमतेची खात्री पटलेली असते)

.अशी पार्श्वभूमी असताना बेदरकारपणे सुरक्षा यंत्रणांचे इशारे धुडकावून लावावेत तेही केवळ काही रेम्याडोक्या लोकांचे समाधान व्हावे म्हणून ही अपेक्षा जअअअअअरा अती होते आहे! >>>> नक्कीच असे काही म्हणणे नव्हते, फक्त तुम्हीच आधी जी शंका उपस्थित केलेली ( >>>शपथविधी उघड्यावर न करण्याचे कारण बहुधा हल्ल्याचा धोका हे असावे. आणि थंडी हे सांगण्याचे कारण असावे असा माझा अंदाज.
) त्यावर एक ठराविक जातकूळी असलेल्या लोकांमध्येच ही बाब प्रकर्षाने कशी आढळते त्याबद्दल केलेला 'निर्मळ हास्यविनोद ' होता तो. Happy

पाशवी म्हणजे पशू ह्या शब्दापासून बनलेले विशेषण. बीस्टली इंग्रजीत.
शब्दाचा अर्थ समजून न घेतां आपल्या मनात जो अर्थ आहे तोच ह्या शब्दातून व्यक्त होतो असे समजणे चूक आहे.
पाशवी बहुमत हा वापरही चुकीचा आहे. मतदार किंवा आमदार किंवा खासदार संख्येने कितीही मोठ्या प्रमाणात असले तरी ते पशू होत नाहीत. मानवच राहतात. जेव्हा एखाद्या पक्षाचे मोठे बहुमत आपल्याला पटत नाही तेव्हा त्याला पाशवी म्हणून हिणवत असावेत. असो.

पाशवी म्हणजे पशू ह्या शब्दापासून बनलेले विशेषण. बीस्टली इंग्रजीत.
शब्दाचा अर्थ समजून न घेतां आपल्या मनात जो अर्थ आहे तोच ह्या शब्दातून व्यक्त होतो असे समजणे चूक आहे.>>
pashvi.JPGgoog_trans.JPGbrute_force.JPGbeastly.JPGbeastly2.JPG

एखाद्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे >>> रच्याकने, या माझ्या मताला अधिक बळकटी दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏

म्हातारबाने जाता जाता जे6 कमिटीच्या सदस्यांसाठी preemptive pardon घोषित केले. न जाणो ट्रम्प आपल्यासारखाच व्हिंडिकेटिव्ह विच हंटर निघाला तर!?..
वर म्हणे "Baseless and politically motivated investigations wreak havoc on the lives, safety and financial security of targeted individuals and their families."
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा!

एका कन्विक्टेड क्रिमिनिल व राजकीय उठावाचा प्रयत्न करुन स्वःताच्याच उप राष्ट्रपतीचा जीव घेण्याचा प्रयत्न कारण्यार्या व्यक्तीला निवडून देवून आज राष्ट्रपती पदावर बसवून देणार्या अमेरिकेन जनतेचे हार्दीक अभिनंदन व नविन राष्ट्रपतींस यशस्वी वाटचाली बद्दल भरघोस शुभेच्छा. देव करो व त्यांना अमेरीकेस पुन्हा ग्रेट बनवण्यासाठी प्रभु येशु ची भरपूर क्रुपा होवो.

<<अजून हातात सत्ता मिळालेली देखील नाही. >>
तरीहि हमास, इस्राएल मधे शांतता स्थापित केली, टिक टॉक परत चालू केले. अशी कितीतरी महत्वाची कामे आताच केली त्रंप्याने!! धन्य धन्य.
आता आपण आपले लक्ष ग्रीनलँड, पनामा कॅनाल नि कॅनडा घेण्याकडे वळवू. ग्रीनलँड वर हला करायची गरजच नाही, कारण तिथे अमेरिकेचे सैनिक आधीपासूनच आहेत असे उपराष्ट्राध्यक्ष म्हणतात. वाटल्यास प्युओर्टॉ रिको डेन्मार्कला देऊन आपण ग्रीनलँड घ्यावे. सौदेबाजी करण्याबद्दल त्रंप्याने पुस्तक लिहिले आहे.
तर आता पहिले काम श्रीमंत लोकांचे टॅक्सेस कमी करणे. असे केल्याने श्रीमंत व्यक्ति सोडून इतर कुणाचे कल्याण झाल्याचे गेल्या पन्नास वर्षात कुणिहि कुठेहि सिद्ध केले नाही, तरी आपण हेच करायचे.
आता तुम्ही म्हणाल, त्यापेक्षा रोजच्या वापरातल्या, अंडी, पाव वगैरे गोष्टींचे भाव कमी करण्याचे उपाय का शोधत नाही? कमला हॅरिस लो आय क्यू होती, त्रंप्या तर स्टेबल जिनियस आहे, त्यालाहि हे करणे कठिण वाटावे?

पण मोरोबा, शेंडेनक्षत्र यांन्ना हे विचारू किंवा सांगू नका. कारण
<<<असा औपचारिक सल्ला मलाही द्यावासा वाटला होता, पण एखाद्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे (खासकरुन जेव्हा समोरच्याच्या वास्तविक क्षमतेची खात्री पटलेली असते)>>> असे वर लिहीलेच आहे.

ट्रंपने पदभार स्वीकारल्यावर एक विधान केले जे दहा वर्षापूर्वी एक निरर्थक आणि उथळ विधान समजले गेले असते. असले वाक्य आवर्जून म्हणावे इतका राष्ट्रपती मूर्ख आहे का? असा प्रश्न विचारला गेला असता. पण आजच्या घडीला हे विधान काही लोकांना अत्यंत वादग्रस्त, द्वेषमूलक, हिंसक वाटेल तर काहींना पुन्हा एकदा डोके ठिकाणावर असणारे, पाय जमिनीवर असणारे लोक सरकार चालवू लागले म्हणून सुटकेचा नि:श्वास सोडावासा वाटेल!
हे ते विधान
"यापुढे अमेरिकेचे धोरण असे असेल की माणसांत केवळ दोन लिंगे आहेत. स्त्री आणि पुरुष!".
हे विधान आजच्या काळात इतके वादग्रस्त आहे की ते व्यक्त केले म्हणून अनेक लोकांना सोशल नेटवर्क जसे फेसबुक, ट्विटर ने कायमची बंदी घातली आहे. अनेक लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. अनेक लोकांना मित्रमंडळींनी वाळीत टाकले आहे. असे हे भयंकर विधान आहे!

जानेवारी ६ ला आंदोलन करणार्या लोकांना माफी देऊन ट्रंपने एक उत्तम काम केले.
जानेवारी ६ ला जे काही झाले ते पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, पर्ल हार्बर, ९/११चा हल्ला या सगळ्यांच्या एकत्रित परिणामापेक्षा कितीतरी पट भयानक होते असे ज्वलंत मत कमला हॅरिस आणि अन्य डाव्या विचारवंतांंनी मांडले होते. लिझ चेनी ह्या इराक हल्ल्याच्या कट्टर समर्थक आणि लोकशाही भक्त ह्याही ह्याच् मताच्या आहेत आणि त्यांना त्याकरता सर्वोच्च सन्मानही मिळाला आहे.
पण दुर्दैवाने मतदारांनी असे काही मानण्यास साफ नकार दिला. बहुतेक अमेरिकन मतदारांना लोकशाहीची मेली किंमतच नाही! असो.

ह्या आंदोलनात सहभागी असणार्या अनेक लोकांना अत्यंत सामान्य गुन्ह्याकरताही भयानक अमानवी शिक्षा देऊन म्हातार्याच्या सरकारने आपला कोतेपणा दाखवला. एकीकडे अब्जावधीची मालमत्ता लुटणारे, जाळणारे, नष्ट करणारे बी एल एम आणि अँटिफाच्या लोकांना सोडून दिले आणि ह्या लोकांना मात्र कमालीच्या क्रूर शिक्षा दिल्या. ट्रंपने त्यांची शिक्षा माफ करुन या नरकयातनांतून सुटका केली.
हे तथाकथित आंदोलन मोठे करण्यात एफ बी आय चे लोक सामील होते. त्यांचा सह भाग उघडकीस येणार नाही याचे आटोकाट प्रयत्न बायडन आणि त्याच्या बगलबच्च्यांनी केले. कधीतरी हे प्रकरण उघडकीस यावे. पण भ्रष्ट म्हातारड्याने सगळ्यांना ब्लँकेट पार्डन देऊन टाकले आहे!

दोन्ही म्हातारड्यांनी खिरापतीसारखी पार्डन्स वाटली आहेत त्यामुळे वर शेन्डे नक्की कुठल्या म्हातारड्याबद्दल बोलतायत हे कळले नाही Happy

कशाला वेळ पांघरून पेडगावला जाता?
बायडन ने अनेकदा असे आश्वासन दिले होते की मी माझ्या दिवट्या पोराला अध्यक्षीय माफी देणार नाही. आणि शेवटी काय केले? तर ब्लँकेट पार्डन दिले.
आपण अत्यंत खोटारडे आहोत. आपल्या शब्दाला काहीही किंमत नाही..वैयक्तिक स्वार्थ हाच खरा असे आपल्या कृतीने दाखवले!
Trump ने निवडणुकीच्या प्रचारात स्पष्ट सांगितले की जानेवारी ६ च्या आंदोलनात सहभाग होता म्हणून शिक्षा झालेल्या लोकांना माफी देण्याचा विचार करेन. हे भयंकर आश्वासन देऊनही लोकांनी त्याला निवडून दिले. आणि निवडून आल्यावर दिलेल्या शब्दानुसार त्याने त्या पीडित लोकांनां माफ केले. आपल्या शब्दाला किंमत आहे हे त्याने दाखवून दिले. कुणी निंदा वा कुणी वंदा!

ह्या आंदोलनात सहभागी असणार्या अनेक लोकांना अत्यंत सामान्य गुन्ह्याकरताही भयानक अमानवी शिक्षा देऊन म्हातार्याच्या सरकारने आपला कोतेपणा दाखवला. एकीकडे अब्जावधीची मालमत्ता लुटणारे, जाळणारे, नष्ट करणारे बी एल एम आणि अँटिफाच्या लोकांना सोडून दिले आणि ह्या लोकांना मात्र कमालीच्या क्रूर शिक्षा दिल्या. ट्रंपने त्यांची शिक्षा माफ करुन या नरकयातनांतून सुटका केली. >> नशिब आमचे कि ह्या सर्व बरळण्यामधे त्यात सहभागी असलेले नि शिक्षा झालेले लोक निरपराधच होते नि जन ६ झालेच्नाही, फेक मिडीयाने सगळे स्टेज केले होते वगैरे नाहीये. Wink

दोन्ही म्हातारड्यांनी खिरापतीसारखी पार्डन्स वाटली आहेत त्यामुळे वर शेन्डे नक्की कुठल्या म्हातारड्याबद्दल बोलतायत हे कळले नाही Happy >> मै Lol

Lol
मजा वाटली हा धागा वाचुन. अमेरिकनांनो तुम्ही भारताच्या साडेदहा वर्षे मागे आहात बरं Wink Light 1

बरं मला एक प्रश्न आहे -
जर सिटिझनशिप बाय बर्थ काढून टाकलेली आहे, एच १ वाल्यांना आता १०० वर्षे वाट पाहून मग ग्रीन कार्ड मिळणार आहे. वगैरे अडथळे आणि 'अशक्यता' (इम्पॉसिबिलिटीज) आहेत तर आता अमेरिकेत यायला तयार कोण होणार?
बहुसंख्य लोक भविष्याच्या शाश्वतीकरता अमेरिकेत येतात बरोबर? की फ्युचर सेक्युर व्हावे. आता लोक अन्य देशात नशीब शोधणार. मग अमेरिका ही कौशल्याची तूट कशी भरुन काढेल?

अमेरिकन प्रेसीडेंटला स्पेन BRICS चा भाग नाही हे माहित नाही. रीपोर्टरने सांगितल्क्यावर त्याचीच अक्कल काढली. हे बायडन ने केले असते तर शेंडे नक्षत्र ने काय केले असते ?

देश महान बन्वायला निघालेल्या महाभागांना कंसेप्शनच्या वेळी लिंग ठरलेले नसते हा बेसिक भाग माहित नाही. महिनाभर आधीपासून ऑर्डर बनवणार्‍यांना बेसिक चेक्स करता येत नाहीत.

Pages