Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
“ खोसला का घोसला आणि भेजा
“ खोसला का घोसला आणि भेजा फ्राय हे दोन्ही फार मस्त आहेत. ” - येस्स!! भेजा फ्राय परत बघायला हवा, त्यातले डिटेल्स आता इतके आठवत नाहीत. पण खोसला का घोसला खूप वेळा बघितल्यामुळे व्यवस्थित आठवतो.
भेजा फ्राय मधला त्यांचा भारत
भेजा फ्राय मधला त्यांचा भारत पाक झगडा बेस्ट आहे.
'खोसला का घोसला' मस्त होता.
'खोसला का घोसला' मस्त होता. भेजा फ्राय म्हणजे रजत कपूरच्या पाठीत उसण भरते व योगायोगाने विनय पाठक तेथे असतो, तो थोडा वेळ बघितला आहे. त्याचेही सिक्वल आहेत.
फार्स आणि सहेली, पोस्टी वाचल्या. 'मिथ्या' नोंदवला आहे.
सामो, हो. 'आजा नचले' मधील माधुरीने साकारलेली नायिका आवडत्या स्त्री भूमिकेपैकी आहे.
The Goldfish हा दीप्ती नवल व
Goldfish हा दीप्ती नवल व कल्की केक्लां आणि छोट्या भूमिकेत रजत कपूर यांचा चित्रपट पाहिला. अतिशय सुंदर वाटला. नेहमीपेक्षा फारच वेगळा आहे. आई आणि मुलगी यांच्यातल्या ताणलेल्या नात्यावर आहे. मी सुरू केला तो फक्त दीप्ती नवलचे नाव बघून पण कल्कीचेही काम अप्रतिम आहे.
आईपासून दुरावलेली मुलगी आईचा डिमेंशिया वाढत गेल्यामुळे परत येते व तिला धड काळजी घेणं जमत नाही, त्यात नात्यात प्रचंड तिढा, दुखऱ्या आठवणी, आईचं रोज काही तरी विसरून जाणं/ प्रसंगी धोकादायक वागणं. जुन्या आठवणी काढून नात्यातील दुरावा कमी करावा म्हटलं तरी आई आणि मुलीचे पूर्णपणे वेगवेगळे भावविश्व, दृष्टिकोन व मतवादी स्वभाव. आईचा नवा मित्र रजत कपूर, व शेजारी रहाणारी लोक यांच्याशी जुळवून घेणे. आईला डिमेंशिया रुग्णांच्या केअर सेंटर मधे ठेवण्याचा निर्णय घेणे वगैरे फार फार सुंदर दाखवले आहे. बॅकग्राऊंडची गाणी/ गझला व ठुमऱ्या अतिशय सुंदर आहेत.
टिपिकल वृद्ध आणि तरूणाई यांच्या नातेसंबंधावर (जुनं फर्निचर - गळे काढणे, आम्हाला कुणी विचारत नाही, वृद्धाश्रमात 'सोडणे' टाईप बंबाळ करून सोडत नाही, लवलेशही दिसला नाही) नाही किंवा उगाच इमोशनल ब्लॅकमेल नाही. वास्तवाला धरून आहे, खरा आहे. दोघींमध्येही भरपूर दोष आहेत, आईनेही पालकत्वाच्या भरपूर चुका केल्या आहेत, एकमेकींना आयुष्यभर जज केले आहे. याची दोघींनाही जाणीव आहे. त्यात डिमेन्शियाची लटकती तलवार असताना आपोआपच नाते सुधारत जाते ते फार मस्त दाखवले आहे.
काही काही पंचेस एकदम भन्नाट आहेत - कल्की मैत्रिणीला कंटाळून म्हणते, माझ्या आईला मी आवडत नाही, बहुतेक तिला अजूनही माझ्या जन्माच्या वेळेचे पोस्टपार्टम डिप्रेशन आहे आणि दीप्ती लेकीला म्हणते,' young people talk, old people pry. कल्कीचे नॅरेशन मधेमधे येते, तेही फार छान आहे. गोल्डफिश या मासळीला एकावेळी फार टिकणारी स्मृती वा 'अटेंशन स्पॅन' नसतो म्हणून हे नाव दिले असावे. कथेचा शेवटही हृद्य आहे अगदी.
वैधानिक इशारा -आर्ट फिल्म किंवा उच्च अभिरुची गटात येत असावा. चित्रपट इंग्रजी आहे, युकेची पार्श्वभूमी आहे. एखाददुसरा संवाद तेवढा हिंदी होता.
-'केक्लां' शब्दाचा उच्चार योग्य पद्धतीने लिहिण्यासाठी ॲन्कींना थॅंक्स. मूळ शब्द फ्रेंच आहे हे विसरून 'कोचलीन' लिहिले होते आधी.
माधव व स्वातीला आवडेल असे वाटते आहे.
परीक्षण छान आहे, अस्मिता. पण
परीक्षण छान आहे, अस्मिता. पण उच्च अभिरुची नसल्याने माझा पास
मी दिवाना पहिला काल टोटल मसाला मूव्ही. मस्त गाणी, कॉमेडी, रोमान्स, ॲक्शन, ट्रॅजेडी सब चीजोंसे मालामाल! शिवाय वैचारिक नसल्याने डोक्याला ताप नाही - वीकांत सुखाचा जाहला. शाहरुखच्या एन्ट्री पासून पिक्चरची एनर्जी जी काही वर जाते त्याला तोड नाही
हायला तुम्ही लोकं आता
हायला तुम्ही लोकं आता शाहरुखचे पिक्चर उच्च अभिरूचीचे नसतात बोलून मला काडी लाऊ नका
शाहरुखच्या एन्ट्री पासून
शाहरुखच्या एन्ट्री पासून पिक्चरची एनर्जी जी काही वर जाते त्याला तोड नाही
>>> मलाही आठवतंय सुरूवातीचा शाहरुख उत्साहाने सळसळणारा होता, आवडायचा तेव्हा.
गोल्डफिशचे परीक्षण आवडले.
पण एकंदरीत आयुष्य रिझेंबल करणाऱ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायची अलिकडे नावड निर्माण झालीय. काहीतरी फिक्शनल, ग्लॅमरस, डोक्याला ताप न देणाऱ्या गोष्टींची चटक लागलेय. सो माझा पास.
पण एकंदरीत आयुष्य रिझेंबल
पण एकंदरीत आयुष्य रिझेंबल करणाऱ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायची अलिकडे नावड निर्माण झालीय. काहीतरी फिक्शनल, ग्लॅमरस, डोक्याला ताप न देणाऱ्या गोष्टींची चटक लागलेय >>> +१
केक्लां!!! जन्मात सुचला नसता
केक्लां!!! जन्मात सुचला नसता हा उच्चार त्या स्पेलिंगचा. मी कोचलिन किंवा अगदीच पॉश उच्चार करावासा वाटला तर कोशलिन म्हणायचो.
बाकी पोस्ट चांगली आहेच अस्मिता पण वैधानिक इशारा पाहता सध्या फक्त नोटेड.
केक्लां >> Koechlin चा हा
केक्लां >> Koechlin चा हा उच्चार वाचून मी स्पेलिंगचा अभ्यास मागे Foechlin.
हर्पा..
हर्पा..
हर्पा, फोक्लां ?
हर्पा, फोचलिन ?
फा, तू तरी 'कोशलिन', मी तर चँडलरला 'शँडलर' केलेले आहे एकदा आणि ते तर फ्रेंचही नाही. काही आप्लं
माझेमन , रमड समजू शकते.
उच्च अभिरूचीला सिरियसली घेऊ नका, उच्च अभिरूची म्हणजे नेमके काय हे मलाही माहीत नाही म्हणून 'असावा' म्हटलेय. आणि असलाच उच्च तरी पाच मिनिटे 'मॅडम एक्स' व दहा मिनिटे 'बेताज बादशाह' बघून उथळ अभिरूचीवर परत आले आहे.
धन्यवाद सर्वांना.
केक्लां!!! जन्मात सुचला नसता
केक्लां!!! जन्मात सुचला नसता हा उच्चार त्या स्पेलिंगचा. >>>>>>>> मला पुढच्या सात जन्मात.
माझं घोडं अजून Meiyazhagan चा उच्चार मेयाळगन / मैंयाळगन कसा इथेच अडकलय
आम्ही बापडे chameleon ला अजून शॅमेलियन म्हणणारे
@अस्मिता, छान लिहिलं आहे परीक्षण.
हरपा
केक्लां >>>
केक्लां >>>
एकदा तिच्याच मुलाखतीत ऐकला होता हा उच्चार म्हणून माहितीये. नाहीतर मी कल्कीवरच फुलस्टॉप घ्यायचे. सिर्फ नामही काफी है।
ती बऱ्याचश्या indie कॅटेगरीत मोडणाऱ्या पिक्चरमध्ये काम करते. पण मेनस्ट्रीममधलं तिचं जिंदगी ना मिलेगी दोबारातलं व ये जवानी है दिवानीतलं काम आवडलं होतं.
पाच मिनिटे 'मॅडम एक्स' व दहा
पाच मिनिटे 'मॅडम एक्स' व दहा मिनिटे 'बेताज बादशाह' बघून उथळ अभिरूचीवर परत आले आहे. >>> अभिरूची पुन्हा जागेवर आणण्याच्या औषधातले घटक पदार्थ वाटतात हे
हपा
मला केल्कां हे बड्डे पार्टी सुरू होऊन बराच वेळ झाला तरी केक आतून कोणी जेथे कापायचा तेथे आणत नाही बघून कोणीतरी हिंदी बोलीभाषेत ते सांगितल्यासारखे वाटते उच्चार कसा आहे हे लक्षात ठेवायला सोपे
माझेमन - हो यूट्यूबवर तिचीच एक क्लिप आहे उच्चार स्पष्ट करणारी.
मी तर चँडलरला 'शँडलर' केलेले
मी तर चँडलरला 'शँडलर' केलेले आहे >>> I can't let this go मग तू जोईच्या रोलकरता ऑडिशन करायला हवी होतीस
अगदी, it is kind a like
अगदी, it is kind a like chandelier असंच वाटायचं मलाही, म्हणूनच 'च' चे 'श' केले. तुझ्या विपूतच आहे पुरावा. तो टायपो नव्हता.
हिंदी बोलीभाषेत ते सांगितल्यासारखे वाटते >>>>
ती बऱ्याचश्या indie कॅटेगरीत मोडणाऱ्या पिक्चरमध्ये काम करते. पण मेनस्ट्रीममधलं तिचं जिंदगी ना मिलेगी दोबारातलं व ये जवानी है दिवानीतलं काम आवडलं होतं.
>>> +1 ती दिसतेही अभारतीय, त्यामुळे ती पारंपरिक नायिकेच्या रोलमधे सूटही होत नाही.
धन्यवाद ऋतुराज, कमिलिअन , मैयाळागन
शाहरुखच्या एन्ट्री पासून
शाहरुखच्या एन्ट्री पासून पिक्चरची एनर्जी जी काही वर जाते त्याला तोड नाही>>> सहमत! आमच्या कॉलनीजवळच एक थेटर होते...नविन झालेले..तेव्हा डॉल्बी सिस्टिम जोरात होती..दिवाना गाण्याला लोक अशरशः सुट्टे पैशाचा पाउस पाडायची पडद्यावर..सगळाच आचरट प्रकार होता पण सिन्गल स्क्रिन वैगरेची मजा वेगळीच.
कल्कीच आडनाव नव्यानेच कळल..
कल्कीच आडनाव नव्यानेच कळल...मी कोचलिनच एकल,वाचल आहे आतापर्यत.
हर्पा, फोचलिन ? >> आता
हर्पा, फोचलिन ? >> आता फेक्लां असा उच्चार करायचा ठरला आहे ना?
शाहरुखच्या एन्ट्री पासून
शाहरुखच्या एन्ट्री पासून पिक्चरची एनर्जी जी काही वर जाते त्याला तोड नाही
>>>>
हो, तो शाहरूखचा एक कल्ट रोल होता.
खरे तर हे डरबाबत म्हणतात लोकं ज्यात त्याने तेव्हाचा ॲक्शन हिरो म्हणून टॉप असलेल्या घायल फेम सनी देओलला खाऊन टाकले होते आणि नवा सुपरस्टार उदयाला आला आहे हे डिक्लेअर केले होते.
पण त्याआधी माझ्यामध्ये दिवाना होता ज्यात त्याने ती एनर्जी आणली होती आणि नव्या युगाची नांदी दर्शवली होती.
ऋषी कपूर पुन्हा एकदा बोल राधा बोल स्टाईल भूमिकेत होता आणि लोकांना आवडला सुद्धा होता. त्याच्या मरणाचे दुःख पचवणे सोपे नव्हते प्रेक्षकांना पण ते शाहरूखमुळे जमले.
या दोन्ही चित्रपटात शाहरुखने आधीचा ट्रेण्ड ब्रेक केला.. जे होईल याची दिग्दर्शकाला सुद्धा कल्पना नसावी.
ॲन्कींना थॅंक्स
ॲन्कींना थॅंक्स
>>
मी एकच आहे...
बहुवचन कायको...???
आदरार्थी वगैरे नको
केस पांढरे होतात अजून...
रच्याकने
रच्याकने
साबरमती रिपोर्ट पाहिला
चांगल्या थीम वर खूप साधारण सिनेमा
खूप चांगला करायला स्कोप होता, पण विक्रांत मासी च्या पॉप्युलारिटी ला एंकॅश करण्याच्या नादात बाकी पाट्या टाकल्या आहेत.
साबरमती रिपोर्ट >>
साबरमती रिपोर्ट >>
मी पण पाहिला.
हा चित्रपट बघून मोदींच्या डोळ्यात पाणी आलं म्हणे... एवढा वाईट बनवलेला सिनेमा बघून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. पहिल्यांदाच माझं अन मोदींच एकमत झालंय.... खि... खि...
केक्लां, फेक्लां
केक्लां, फेक्लां
साबरमती रिपोर्ट बाबत सहमत
साबरमती रिपोर्ट बाबत सहमत
केहना क्या चाहते हो भाई मोमेंट खुप त्यात
>>>>>>>पहिल्यांदाच माझं अन
>>>>>>>पहिल्यांदाच माझं अन मोदींच एकमत झालंय.... खि... खि...
>>>>केक्लां-फेक्लां
हाहाहा
अस्मिताचा उच्च अभिरूचीवाला
अस्मिताचा उच्च अभिरूचीवाला प्रतिसाद वाचून इतर माबोकर (माझ्यासहित)
मुझे उच्च अभिरूचीवाली फिल्में बिल्कुल पसंद नहींं आती |
अस्मिता
वावे
वावे
आता कळाले 'रेको घ्या रेको' म्हटलं तरी सगळे दूर का पळून जातात. अधूनमधून बंडल सिनेमांवर लिहून मी 'ॲव्हरेज' मेन्टेन करत असते ह्याची नोंद घ्यावी.
उच्च अभिरुची, सगळा इंग्रजी,
उच्च अभिरुची, सगळा इंग्रजी, एखाद दुसरा हिंदी संवाद... टेंशनच आहे! टेंशन आवडून घ्यायचं घ्यावं का नावडून ते ठरवावं लागेल आधी
फोच्लिन आणि फेक्लां एवढीच धाव आमची
यावरुन तो बंडुरंग जोक आठवला
Pages