मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट नुकताच बघितला.
बरेचसे कलाकार उत्तम आहेत, त्यांनी त्यांची कामे चांगली केली आहेत. १९४२ चा काळही छान उभा केलाय..
हा एक आवडलेला पंच,
"अरे काय वेळ जात नाहीये तर चिंचेच्या पानांच्या पत्रावळी लावताय का ... " ( शब्द इकडे तिकडे झाले असल्यास क्षमस्व).
ज्यांनी चिंचेचं झाड/ पाला बघितला नसेल त्यांच्या साफ डोक्यावरून जाईल
आणि आता एक गंडलेला किंवा ओढून ताणून विनोद कॅटेगरीतला :
" आता माईन कांफ २ ......?" ( शब्द इकडे तिकडे झाले असल्यास क्षमस्व).
हा १९४२ चा काळ, धूम , धूम २, धूम ३ .. असे सिक्वेल निघायच्या आधीचा होता. ( कदाचित लेखकाला माहीत असलेले outliers असावेत)
बघताना उगाच तांदळात खडा आल्यासारखं वाटलं. .
हे नाटक खूप चालले होते. पण ...
फार्सिकल कॉमेडी ह्या प्रकारात मोडणारा हा चित्रपट मधे मध्ये थोडेफार हशे कमवत होता. कथा, कलाकार, अभिनय, सेट उत्तम असूनही कुठेतरी पकड सोडतोय अस वाटलं. काहीसा पसरलेला, विस्कळीत जाणवला.
काहीच दिवसांपूर्वी हरीश चंद्राची फॅक्टरी बघितलेला ( दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा) , त्याची आठवण झाली आणि वाटून गेलं अरे त्याच्यासारखा नाही जमला..
####
ज्यांना कथा माहित नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात रुपरेषा...
दुसऱ्या महायुधदाच्या काळातील ही गोष्ट.. हिटलर जपांहून येत असताना त्याचे विमान बोंबिलवाडीजवळ पडते. बोमिबिलवडीच्या नाटक मंडळींच्या कपडे पटात तो कसा पोहचतो. त्या अनुषंगाने तिकडचे इंग्रज पोलीस, विस्चटन चर्चिल वगैरे वगैरे अनेक पात्र येत जातात....
हे नाटक पाहिलं होतं आणि ते
हे नाटक पाहिलं होतं आणि ते आवडलं होतं. पिक्चर जमला नसेल तर अरेरे!
आता माईन कांफ २ ......? >> मला नक्की आठवत नाही हे वाक्य कधी येतं ते. मागील पुढील संदर्भ द्याल का, म्हणजे नक्की विनोद काय आहे ते कळेल. ह्यात धूमचा काही संबंध लावला आहे का त्यांनी?
हिटलर ला लाल वाही मिळते... मग
हिटलर ला लाल वाही मिळते... मग ती दोन वेण्यातली मुलगी त्याला म्हणते "आता काय माईन kamf 2 (.लिहिणार ) का ?.."
इकडे ती हिटलरला आता माईन kamf २ म्हणजे माईन kamf च ( त्याच आत्मचरित्र) सिक्वेल) yeilsuchavte.
हा जोक(?) लेखकाने आता लिहिलंय, जेव्हा गाजणाऱ्या कला कृतींचे सिक्वेल निघायचा ट्रेण्ड आहे.. ( for eg. धूम , धूम २ ..) पण ती मुलगी १९४२ मध्ये आहे जेव्हा असा काही प्रघात नव्हता ..
म्हणजे लेखक एका काळातील आहे पण तो विसरून गेला की पात्र जुन्या काळातील आहे आणि त्याच्या तोंडी तो संवाद जाईल का?..
अर्थात हे सगळं माझ्या डोक्यातील चक्र... ( माझं interpretation चुकीचं असू शकेल... ) मला out of प्लेस वाटल.
हाहा अच्छा.
हाहा अच्छा.
लेखकाच्या दृष्टीने तो easy
लेखकाच्या दृष्टीने तो easy catch होता ( हमखास पंच/ हशा)
पण काळाच भान न रखल्यमुळे फाऊल/ नो बॉल झाला..
नाटक पाहिलंय live
नाटक पाहिलंय live
आणि youtube वर देखील.
फार्सीकल आहे.
यदाकदाचीत मध्ये मग असे विनोद खूप पेरलेले असायचे.
पॉलिटिकल सटायर. लेटेस्ट परिस्थिती.
तेवढेच घ्यायचे.
चित्रपट नाही पाहिला अजून.
कालसापेक्ष विनोद ( असं काही
कालसापेक्ष विनोद ( असं काही नसतं, एकतर हसू येणारा किंवा न येणारा इतकचं असतं) नाही कारण फ्यांटसीत दाखवलेल्या व्यक्तींचा, काल्पनिक घटनांचा काळ आणि विनोदासाठी वापरलेले इतर रॉ मटेरियल त्यांचा काळ हा सुसंगत नाही. :देवा: विनोदाची आणखी दुर्दशा काही होऊ शकेल का?