शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फँ. .. असा आवाज कदाचित तो शिंकणारा काढत नसेलही..पण अतीव क्रोध आल्याने, तसे ऐकू येते/ वाटते अथवा व्यक्त होते !! Happy

चांगली चर्चा.
चला, गोरे यांच्या कोशाने आपल्या माहितीत भर पडली आणि थोडेफार मनोरंजनही झाले. Happy
या चार शब्दांच्या संचाबरोबरच गेल्या वर्षभर चालू असलेली एकाक्षरी शब्दांची नोंद आता थांबवत आहे.
धन्यवाद !

पूषा
= सूर्य. [सं. पूषन्]
हे उगवत्या सूर्याचे नाव आहे. उपनिषदांमध्ये त्याचा अर्थ,
‘हरवलेल्या लोकांना दिशा दाखवणारा देव’ असा आहे.

आसाममध्ये पूषन् हे मुलाचे नाव बऱ्यापैकी लोक ठेवतात. आपल्या महाराष्ट्रातही पूषन् वैद्य नावाचे गृहस्थ आहेत. त्यांचे नाव हे का ठेवले याची कथा त्यांच्याच तोंडून ऐकण्यात मजा आहे :
https://www.youtube.com/watch?v=shzWoFfI5hY
त्यांची मुलाखत बघण्यास सुरुवात केल्याकेल्याच हे सर्व उल्लेख झाल्याने या शब्दशोधाची प्रेरणा मिळाली. Happy

ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः। स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः।
स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः। स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु

हे आठवले लगेच. छान माहिती. Happy लिंक क्लिक करून बघितली. कॉमन नाव नाही हे.‌

पूषा
पांचवें आदित्य पूषा हैं जिनका निवास अन्न में होता है। समस्त प्रकार के धान्यों में ये विराजमान हैं। इन्हीं के द्वारा अन्न में पौष्टिकता एवं ऊर्जा आती है। अनाज में जो भी स्वाद और रस मौजूद होता है वह इन्हीं के तेज से आता है। देवता पूषा का रथ बकरों द्वारा खींचा जाता है। उनके हाथ में लौहदंड होता है। उनको घी मिले जौ के सत्तू का भोग लगाया जाता है। ( ऋग्वेद षष्ठम मंडल सूक्त 57)
-------------हिंदी विकिपीडिया.
???

>>> हरवलेल्या लोकांना दिशा दाखवणारा देव’
इन्टरेस्टिंग!
उगवता सूर्य दिसला की पूर्व दिशा नक्की झाली, ध्रूवतारा दिसला की उत्तर असे आडाखे असणार. त्यातही उदा. ढगाळ हवामानामुळे वगैरे तारे दिसणं तुलनेने बेभरवशी! सूर्य दिसणार म्हणजे दिसणारच तंतोतंत! Happy

सूर्य नमस्कारामध्ये पूष्णे नमः आहे.
ही चतुर्थी विभक्ती पूषन् या शब्दाची. प्रथमा पूषा.

पुष् धातु पासुन हा शब्द असावा, ओव्हर टू हर्पा.

>>> पुष् धातु पासुन हा शब्द असावा
म्हणजे हरवलेल्या लोकांना योग्य दिशेला push करणारा - असा अर्थ आहे तर! Proud

पूषा चर्चा रोचक.

अस्मिता, पूर्ण लिहा प्लीज.

हरवलेल्या लोकांना योग्य दिशेला push करणारा Lol

Happy पुष् - पोष धातू असावा. पोष म्हणजे पोषण करणारा. पुषन् असेल तर तृतीयेचे प्रथमेचे एकवचन होईल असे वाटतेय पण खात्री नाही. हर्पा SSSS Happy

अनिंद्य, शोधून बघते. Happy

अपडेट्स - मानवदादांचे बरोबर आहे. पुषन् शब्द राजन् शब्दाप्रमाणे चालतो म्हणून त्याचे विभक्ती प्रत्यय शोधले तर प्रथमा एकवचन आले. शाळेत नकारान्त पुल्लिंगी शब्द चालवताना 'राजन्' शिकवला होता. त्याचे प्रथमा एकवचन 'राजा' असे होते.

आमचं पुष्य नक्षत्र ज्याचा सिंबॉल आहे गाईचे आचळ, ते सुद्धा असेच पोषण करणारे नक्षत्र आहे. शरद उपाध्ये म्हणतात तसे - प्रेमळ कर्क, पंगतीत, वाढपी म्हणुन आली की प्रत्येक ताटासमोर इतका आग्रह करणार की मागे इतर वाढप्यांचा ट्राफिक जॅम Happy
या पुषाचा त्या पुष्यशी काही संबंध नसावा. पोष शी मात्र असावा. असे वाटते.

मी व मुलगी दोघी पुष्य नक्षत्र आहोत आणि दोघी खायला घालतो. मी फक्त विकतचे खायला घालते Wink मुलीला स्वयंपाकाची आवड आहे - कोरिअन, चायनिज, सूप्स वगैरे. पण ती प्रचंड खायला घालत असते. माझ्यासारखी प्रेमळ नाहीये ती. खमकी आहे - ते एक बरे आहे Happy

अस्मिता बरोबर आहे.
पुष् धातू आहे. म्हणजे पोसणे.
ह्या धातूपासून झालेले शब्द पुष्ट, पुठ्ठा, पुष्टि इत्यादि
म्हणजे सर्व चराचर सृष्टीचे पोषण करणारा तो सूर्य!
काय बोलता.

>>> पुष् धातू आहे. म्हणजे पोसणे... म्हणजे सर्व चराचर सृष्टीचे पोषण करणारा तो सूर्य!
होय, हा अर्थ सयुक्तिक वाटतो.

>>> सूर्य नमस्कारामध्ये पूष्णे नमः आहे
पण ती बारा नावं एकत्र असलेला जो श्लोक आहे, त्यात 'पूष'च म्हटलं आहे ना?
(मित्र रवी सूर्य भानु खग पूष हिरण्यगर्भ | मरिचादित्य सवित्रार्क भास्कराय नमो नमः || )

सुवर्णरेतसं कण्ठे स्कन्धयोस्तिग्मतेजसम् ।
बाह्वोस्तु पूषणं चैव मित्रं वै पृष्ठतो न्यसेत् ॥
पूष का पूषण?

पास्! Proud

https://thinkmaharashtra.com/the-origin-of-pagadi-for-residence-in-mumbai/
घरासाठी "पागडी" घेणे देणे मुंबईत प्रचलित होते. ह्या शब्दाचा इतिहास अत्यंत रंजक आहे.
Must Read!
ह्या इथे अजून काही शब्दांची व्यूत्पत्ति दिली आहे. ती पण रंजक आहे.

Oh, interesting indeed! ‘टक्या’ची माहितीदेखील!
धन्यवाद! Happy

अजून एक एकाक्षरी शब्द.

ख (Kha)
उमेश करंबेळकर - July 31, 2020 5
‘ख’ हे वर्णमालेतील एक अक्षर असले तरी ‘ख’ हा एकाक्षरी शब्दही आहे. ख म्हणजे आकाश. त्यावरून आकाशातील ग्रहांना खगोल आणि त्यांच्या अभ्यासाला खगोलशास्त्र असे म्हटले जाते. ‘ख’ म्हणजे आकाशात, ‘ग’म्हणजे गमन करणारा असा तो खग (पक्षी).

ख हा शब्द इयत्ता चौथीत समानार्थी शब्दांमध्ये शिकवला होता बाईंनी. पण तो मराठीत स्वतंत्रपणे कुठे वापरला गेला आहे का माहीत नाही. तद्भव समासात (खग) आहे. मध्यंतरी खेश नावाच्या एका (तमिळ) मुलाला भेटलो होतो. त्याच्या नावाच्या अर्थाचा आज उलगडा झाला.

आकाशात गमन करणारा या अर्थाने सूर्याला पण खग म्हणतात. ॐ खगाय नमः!

पूषन् शब्द आहे मूळचा. मानव यांनी परफेक्ट सांगितलं आहे. त्याची प्रथमा पूषा होते (असंच अश्वत्थामन् मूळचा शब्द आहे आणि त्याची प्रथमा अश्वत्थामा होते), पूष्णे चतुर्थी. वरती केकू यांनी दिलेल्या श्लोकात त्याची द्वितीया विभक्ती आहे - पूषणम्.

मूळ धातु काय आहे हे माहीत नव्हतं. धातुरूपावलीत पुष् आणि पूष् असे दोन्ही धातु दिसत आहेत - दोन्हीला पोषण करणे असा अर्थ आहे.

हरवलेल्या लोकांना योग्य दिशेला push करणारा >> Lol

व्वा मस्त चर्चा.
आता मला खद्योत (काजवा) चा अर्थ लागला.
ख - आकाश, सूर्य
द्योत - द्युत्, चमकणारा
आकाशातील सूर्याप्रमाणे चमकणारा.
आणि म्हणूनच सूर्य आणि काजवा अशी तुलना केली जात असावी?
बरोबर?

मस्त चर्चा. Happy
धातुरूपावलीत पुष् आणि पूष् असे दोन्ही धातु दिसत आहेत - दोन्हीला पोषण करणे असा अर्थ आहे.
>>> धन्यवाद.

ख (सूर्य , खग) हा शब्द येथे येऊन गेला आहे आधी. खद्योत मात्र नवीन आहे.

अवांतर संपादित केले मी पण.

Pages