पुण्यातले पुणेकर

Submitted by admin on 1 April, 2008 - 18:43
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! छान प्रतिसाद आलेत इथे!
साजिरा , मस्त फोटो.
फारेण्ड , मलाही तो फोटो पाहून मुंबईत अशा इमारती पाहिल्या सारखं वाटलं , म्हणून हा पुस्तक मेळावा कुठे आहे ते शोधलं आणि कनेक्शन कळलं.
कुठल्या इमारती ते पटकन आठवेना. पण कमानी बघता वांद्रे स्टेशन, सेंट झेवियर्स कॉलेज कॉलेजशी साधर्म्य आहे.
मुंबई फक्त बघायची म्हणून लहानपणीच बघितली असेल. त्यामुळे या इमारतींकडू थोडं दुरून , निरखून पाहणं कधी झालंच नाही.

पुस्तक प्रदर्शन नाही - पुस्तक महोत्सव आहे हा. नॅशनल बुक ट्रस्टने आयोजित केलाय. म्हणूनच इतका भारी होत असावा.

मुंबईत सालाबादप्रमाणे पुढच्या दोन महिन्यांत मॅजेस्टिक गप्पा + पुस्तक प्रदर्शन असतील. ( पार्ले - लोकमान्य सेवा संघ).
गेली काही वर्षे बोरिवलीत शब्द गप्पा व प्रदर्शनही त्याच वेळी असत. आता असतं का माहीत नाही.

आशिष बुक सेंटरची प्रदर्शनेही भरत असतात. - चर्चगेट - सुंदरबाई हॉल. पाच सहा वर्षांपूर्वी बोरिवलीतही भरलं होतं.

एन बी टी वाले पुस्तकं महोत्सव / बुक फेअर छानच असतात. फोटो बघून आमच्या वर्ल्ड बुक फेअर, दिल्ली ची आठवण येतेय. पण इकडे मराठी पुस्तकं आणि प्रकाशक नसतात. महाराष्ट्रातले तेच प्रकाशक असतात ज्यांची हिंदी/ इंग्रजी पुस्तकं पण आहेत. ( उदा - ज्योत्स्ना, मेहता).

सुरेख फोटो साजिरा. पुस्तक महोत्सवाच्या पोस्ट आवडल्या सगळ्याच.

रविवारी दुपारी चार वाजता पुण्यात पोचले. घरी सामान ठेवून, कपडे बदलून तडक फर्ग्युसन कॉलेजचा रस्ता पकडला. एवढी गर्दी पुस्तकांसाठी बघून फार आनंद झाला. माझ्या कामाशी संबंधित बाबीचं एवढं मोठं प्रदर्शन, गर्दी हे सगळं मुलीला दाखवायची फार इच्छा होती ती पूर्ण झाली. मुलीने ही भरपूर एन्जॉय केलं. खरेदी पण झाली भरपूर. खूप वेळ नाही देता आला, पण समाधान वाटलं.

फा, भरत- पुण्या-मुंबईत ही अशी ब्रिटिशकालीन स्ट्रक्चर्स खूपच आहेत की. विद्यापीठाची इमारत फारच मासिव्ह अशी आहे फर्गसनच्या तुलनेत. मुख्य इमारतीचा मागचा भाग सुद्धा अक्षरशः गुंगून जाऊन दिवसभर रेंगाळत राहण्यासारखा आहे. हीच नव्हे, तर इतरही इमारती- द.वा.पोतदारांचं नाव दिलेली अतिजुनी इमारत, परमेश्वराच्या वयाची जुनी झाडं आणि नव्याजुन्या इमारती यांच्या मिश्रणाने तयार झालेला टेम्प्टिंग अँबियंस, ससूनचा परिसर (आतला- जो बराचसा वापराविना आहे), वाडिया कॉलेज, डेक्कन कॉलेज, गोखले एज्युकेशन सोसायटी, भांडारकर हे सारे फार हिप्नॉटायझिंग आहेत. शिवाय बीएमसीसी, राजभवन, जीपीओ, विधानभवन (पुण्याचं), सेंट्रल बिल्डिंग्ज हे सारं खास जाऊन बघावं -असं आहे. दिवसातल्या वेगवेगळ्या प्रहरांतला इथले छायाप्रकाशाचे खेळ म्हणजे मेमोरेबल इमेजेस असतात. दरवर्षी ते 'ज्ञानवृक्षाखाली' मटाची जी मैफिल भरते, तिला जाण्याचं मुख्य प्रयोजन म्हणजे या अशा परिसरात शांतपणे वेळ घालवून फिरता येणं- हे असतं. एरवी चला भांडारकरला फिरायला- असं कसं जमेल? या सार्‍या ठिकाणी इतके कार्यक्रम होत असतात, तिथंही जाणं धड जमत नाही. आताही बुकफेस्टच्या निमित्ताने फर्गसनच्या मऊ दगडी अंधारात, पुस्तकोत्सवातल्या प्रखर दिव्यांमुळे आपसूक आकार घेतलेल्या दगडी इमारतींच्या आणि झाडांच्या सावल्यांत मनसोक्त भटकलो.

मुंबईत अर्थातच अशा इमारती खूपच जास्त आहेत, पण मी त्या फार अशा काही बघितल्या नाहीत. बघायला पाहिजे खूप वेळ काढून..

फार रिलेव्हंस नाही, पण आता आठवलं आहे तर, आणि वाहत्या बाफाची फांदी पकडून सांगायला हरकत नाही- एकदा घाशीराम कोतवालाचा वाडा बघायचाच असा चंग बांधून गेलो.

ते पूलगेटाच्या मागे कुठेतरी आहे. डेंजर ट्रॅफिकच्या आणि जाड दगडी भिंतींच्या पलीकडे काट्यांची आणि जंगली दिसतील अशी दाट झाडवनांची दाटी. मध्येच भिंती कोसळलेल्या, आणि आत नक्की काय आहे, ते संध्याकाळ असल्याने काहीच कळेना. आत कसं जायचं तेच काही कळेना. शेजारचे चाळकरी, वस्तीवाले संशय येऊन धावून आले आणि मग आम्ही काढता पाय घेतला.

आता यालाही झाली काही वर्षे. त्यानंतर गेलो नाही. आता गुगलमॅप्स दाखवेलही कदाचित अचूक लोकेशन आणि माहितीही. एकदा पुन्हा जाऊन बघायला पाहिजे.

विद्यापीठात वारसा सहल असते. ती चांगली असते.
कुणाला इच्छा असल्यास गावातले जुने वाडे (बाहेरून) दाखवेन.

हो खूप मस्त इमारती आहेत. लहानपणी कायम आजूबाजूला असत पण त्यांचे महत्त्व तेव्हा जाणवले नाही. विद्यापीठात तर मी दोन वर्षे होतो, मेन बिल्डिंग मधे कित्येकदा जायचो. आणि तेव्हाही हे काहीतरी भारी आहे हे जाणवायचे, पण "गुंगून, रेंगाळून" कधी बघितल्याचे आठवत नाही. आता बघायला पाहिजे.

मास्तर - नक्कीच. येईन तेव्हा संपर्क करेनच. पेठांमधल्या अनेक वाड्यांमधे नवीन बांधकामांच्या अधेमधे जुने वाड्याचे अवशेष व जुनी दगडी बांधकामे अजूनही सापडतात. सकाळ ऑफिस जवळ माझ्या आईच्या साइडचे जुने घर/वाडा होता. तेथील त्यांचा वाडा आता आहे की नाही माहीत नाही. पण अगदी अलिकडेपर्यंत तेथे एक प्रचंड दिंडीदरवाजा व लगेच आत असते तसे जुने बांधकाम होते. आतले जुने दगडी घर पाहिले आणि मूळ वाडा त्याच्या चौपट व तीन मजली होता हे त्यांच्याकडून ऐकले की त्याच्या भव्यतेचा अंदाज नुसता लावावा लागे.

हे वाडे व इमारती असोत, वा आख्खी शहरे - विरोधाभास हा आहे की तेथे राहणार्‍यांना बहुतेकांना तेथील नवी बांधकामे, पॉश पणा याचे आकर्षण असते, तर माझ्यासारख्या ते सोडून लांब आलेल्याला त्यांच्या जुनेपणाचे!

साजिरा, दोन्ही पोस्ट्स सुंदर. मऊ दगडी अंधार हे अगदीच चपखल वर्णन.

मास्तर, थोडी मोठी सुट्टी घेऊन आलो की तुम्हाला कॉन्टॅक्ट नक्की करते. मला आवडतील जुने वाडे पहायला.
सध्या उभ्या राहणार्‍या प्रचंड उंच बिल्डींगा डोळ्यांना खुपतात. त्यांचं महाकाय असणं अंगावर येतं. विद्रूप झालंय माझं शहर Sad

हे वाडे व इमारती असोत, वा आख्खी शहरे - विरोधाभास हा आहे की तेथे राहणार्‍यांना बहुतेकांना तेथील नवी बांधकामे, पॉश पणा याचे आकर्षण असते, तर माझ्यासारख्या ते सोडून लांब आलेल्याला त्यांच्या जुनेपणाचे! >>> टोटली. फारेण्डा, जुने वाडे सहल करूया चल मास्तरांबरोबर Happy

विद्यापीठ पण चकाचक झाले आहे. बऱ्याच नवीन इमारती आणि डिपार्टमेंट झाली आहेत. डेक्कन कॉलेज मात्र अगदीच देखणे आहे. आतल्या काही इमारतींवर कसले सुंदर नक्षीकाम आहे.
बी एम आणि ils लॉ पण चकाचक झाली आहेत. बी एम मध्ये टाटा हॉल च्या दोन्ही साईड ने वरती जायला जिने आहेत, एकदम जुनाट.. आणि हॉल समोर डाव्या हाताला दोन तीन वर्ग.. मग तिथेच चार पायऱ्या उतरल्या की मोठा चौक आणि मग लायब्ररी इमारत आणि कॅन्टीन. पावसाची झड लागली की अगदी चौकातून लायब्ररी आणि कॅन्टीन पर्यंत जाईतो पूर्ण अंघोळ.. लायब्ररीचा खालचा मजला जादुई आहे, तिथे पोटमाळा आहे आणि वर चढून गेले की पुस्तकांची दुनिया.
Ils लॉ चा कॅम्पस पण भारीच होता, तो पण असा जुनाटच. सरस्वती आणि लक्ष्मी बिल्डिंग. Ils ची लायब्ररी मात्र केवळ अचाट होती. केवळ अचाट. लक्ष्मी बिल्डिंग पुढे छोटे दगडी पार होते, तिथे पेपर सुरू होण्याआधी बसून केलेली घोकंपट्टी आठवते. Happy
रानडे cha कॅम्पस आणि बिल्डिंग पण भारी होत्या. तिथे गाडी पार्किंग करणे हा एकच उद्देश असे. अगदी सर्रास आत मध्ये जाऊन पार्किंग करता येत असे.
@चिन्मय, आजच वाड्यात श्रवू पुणे जुने वाडा दर्शन बद्दल विचारत होत्या. तुझा रेफरन्स देतो.

फा, आमचा वाडा होता अगदी तू म्हणतोस तसा. शनिवार वाड्या समोर मुजुमदार बोळात. त्याला तसा दिंडी दरवाजा, त्यावर नाणी लावलेली आत जायला अंधारा चिंचोळा बोळ आणि मग एकदम लख्ख प्रकाश वाले सुरेख चौकोनी अंगण आणि मग तीन मजली वाड्याची इमारत.

आता हे वर्णन वाचले तर वाटेल वाह काय भारी. पण जेव्हा त्या वाड्यात पुरेसे पाणी येत नाही कॉर्पोरेशन चे, कोणत्याही मेंटेनन्स चे कुणीही पैसे भरत नाही, मातीच्या भिंती कधी कोसळतील अशी भर पावसात भीती वाटायला लागते तेव्हा परिस्थिती असताना नुसता वारसा म्हणून हे भय इथले संपत नाही गात बसायचे का अपडेटेड ठिकाणी स्वतः ला सुरक्षित ठेवायचे हा प्रश्न पडतो. हे म्हणजे ऍग्रो टुरिझम सारखेच आहे थोडक्यात, तुम्ही कष्ट करा, सांभाळा आम्ही फक्त कौतुक करतो. तिकडे निदान पैसा तरी आहे, इकडे लोक परस्पर बाहेरूनच बघतात, दाखवतात आणि वर लोक संशय घ्यायला लागले की पळून जातात. Proud

इकडे लोक परस्पर बाहेरूनच बघतात, दाखवतात आणि वर लोक संशय घ्यायला लागले की पळून जातात. >>>
आशूडी Proud
तुझं वाड्याबद्दलचं म्हणणं पटतंय. पण म्हणून आत्ताच्या अगडबंब बिल्डींगा जस्टीफाय कश्या करायच्या?

हो आशुडी खरे आहे. आमचा चिंचवडचा वाडा पण असाच होता. ती नाणी किंवा जे काही पितळी होते दरवाज्यावर ते गोल गोल फिरत असे आणि ते फिरवण्यात काय मजा वाटे. मग आत आल की काळया फरशीचा मोठा चौक ज्याच्या बाजूने घरे, मग एक बोळ आणि त्या बोळातून पलीकडे गेलं की मोठं अंगण जिथे नाना तऱ्हेची झाडे. शेवटची वर्षे मात्र फारच धाकधुकीत गेली. खासकरून पावसाळा आला की कोणती भिंत कधी पडेल ह्याचा नेम नाही. शेवटच्या वर्षीच्या पावसात मागच्या अंगणातली भिंत धापकन खाली.. मग वडिलांनी निर्णय घेतला आता इथे राहण्यात राम नाही अन वाडा सुटला. काही महिन्यातच पूर्ण वास्तू जमीनदोस्त झाली, वाडा पडला..

जुने वाडे सहल करूया चल मास्तरांबरोबर >>> Happy नक्कीच.

इकडे लोक परस्पर बाहेरूनच बघतात, दाखवतात आणि वर लोक संशय घ्यायला लागले की पळून जातात >>> Lol यातला संदर्भ माहीत नाही तोपर्यंत नुसते पोकळ हसून घेतो. संदर्भ कळाला की त्यात भर घालेन Happy

आशूडी - पण तुझा पॉइण्ट कळाला. माझे वाक्य (आता मलाही वाचताना) जितके जजमेण्टल वाटते, तितके ते नाही. केवळ आकर्षण असे नाही, तू लिहीले आहेस तसे गरज म्हणूनही नवीन बांधकामे केली जातात व लोक त्यात राहायला जातात. माझ्यासारखे लोक जे लांब आले आहेत त्यांचा नॉस्टॅल्जिया त्या जुन्यात अडकलेला असतो. पण इतरांच्या नॉस्टॅल्जिया करता तेथे राहणार्‍या लोकांनी कष्टात राहावे असे नाहीच. जुन्या वाड्यातील लाइफस्टाइल मधे आता मला पुन्हा राहायला जायचे म्हंटले तरी प्रत्यक्षात आवडणार नाही. तेथे अनेक प्रॉब्लेम्सही होतेच. टॉयलेट्सची अवस्था आठवली तरी पुरेसे आहे त्या नॉस्टॅल्जियाचा अंमल उतरायला Happy आमचे घर वाड्यात नव्हते पण मी सपे मधे आत्याकडे इतका राहिलो आहे की सगळे तितकेच माहीत आहे.

बाय द वे, आता किती लोकांना कळणार म्हणून तुझा उल्लेख "_डी" असा न करता "आशूडी" केला तेव्हाही मला इथला एक जुना वाडा पडल्यासारखे वाटले Happy

आपण कोण जस्टिफाय करणारे रमड? Happy जे व्हायचं ते होतच राहणार.
तिथून जिथे आलो त्याची पण री development ची वेळ आली आता.

अगदी लंपन. आपण त्या बालपणीच्या श्रीमंत आठवणी ठेवायच्या फक्त. माझी इथली पहिली कथा, अखेरचा हा तुला दंडवत ही त्याच घटने वरची होती. आमचा वाडा पाडला तेव्हाची! सुदैवाने इतकं अस्सलझनक (शब्द साभार साजिरा) दुःख त्या वयापर्यंत दुसरे कुठले वाट्याला आलेच नव्हते कदाचित.

जे व्हायचं ते होतच राहणार >>> हो यार! त्या हतबलतेचंच दु:ख आहे बहुधा.
तिथून जिथे आलो त्याची पण री development ची वेळ आली आता >>> खरंय.

यातला संदर्भ माहीत नाही >>> फा, वरची साजिराची घाशीराम वाली पोस्ट वाच. Happy

लंपन, छान पोस्ट.

हे असं वाड्यात राहणं वगैरे कधी झालंच नाही त्यामुळे मला रिलेट नाही करता येत आहे. पण गावचं घर पाडलं तेव्हा वाईट वाटलं होतं - मी कधी त्या घरात राहिले नसले तरीही.

यातला संदर्भ माहीत नाही तोपर्यंत नुसते पोकळ हसून घेतो. >> कशाला,हेच पान पुन्हा वाच Wink
आता किती लोकांना कळणार म्हणून तुझा उल्लेख "_डी" असा न करता "आशूडी" केला तेव्हाही मला इथला एक जुना वाडा पडल्यासारखे वाटले >> काय लिहिलंस! नको की मग, _डी च लिही. आवडते मला ते. ज्याच्या मागे कथा कहाण्या आहेत ते सगळंच सुरस वाटते अजूनही.

दुःख त्या वयापर्यंत दुसरे कुठले वाट्याला आलेच नव्हते कदाचित.> हो नक्कीच. वाडा पडायच्या आधी आणि घर सोडल्यावर एकदा जाणं झालं होत. पूर्ण घरात गवत उगवले होते. दिवाणखान्याची, स्वयंपाक घराची, ओसरीची अशी दयनीय अवस्था.. Sad

उतरायला आमचे घर वाड्यात नव्हते पण मी सपे मधे आत्याकडे इतका राहिलो आहे की सगळे तितकेच माहीत आहे.>> यावर लिहायचे होते पण पुढच्या तुझ्या वाक्याने नवाच नॉस्टलजिया जागा झाला आणि राहिले.
जजमेंटल नाही रे, पण काही फार बेसिक प्रश्न असतात त्या त्या ठिकाणचे आणि ते असे भरभर उघड नाही सांगता येत. नुसतेच वाडे चिरेबंदी असतात पण पुढच्या पिढ्या छंदी ऐतखाऊ निघाल्या असेही असते. कसब्यात तर प्रत्येक वाड्यात एक तरी वेडसर किंवा अपंग माणूस सापडायचाच. कसला तरी शाप लागून पडे पर्यंत उभे राहायची शिक्षा भोगत आहेत ते वाडे असे वाटायचे. जीव गुदमरून जायचा. अजूनही जे वाड्यात राहतात त्यातले नव्वद टक्के केवळ नाईलाज म्हणून, अशी मला खात्री आहे.

हेरिटेज हे भरल्यापोटंचे उद्योग आहेत हे अगदीच खरं. आणि ते बक्कळ पैसे असलेल्यांनीच (ते ही इच्छा असेल तर) + आणखी पैसे कमवायला किंवा सरकारने स्वखर्चानेच उत्पन्नाचे साधन म्हणून करावे. त्यातुन उत्पन्न (किमान खर्च) येणार नसेल तर जपणे शाश्वत कसं काय असेल? एखाद पिढी जपेल पुढे काय? आणि मनात नसेल तर का जपावं?
त्यापेक्षा नवं करावं काही. जुन्याचा सोस बास झाला. आपली परंपरा फक्त आत्ता उभ्या असलेल्या इमारती आणि जिवंत असलेल्या माणसांपुरतीच. एकदा माणूस गेला की किती का महान असेना! फार किम्मत नाही त्याला.

बाकी मला पण फुकटचे फोटो बिटो काढायला आवडतात. तिकिट लावून कोणी दाखवलं तर जाईन एखाददा किंवा नाही पण जाणार.

हॅलो. आमचा वाईचा २५० वर्ष जुना वाडा अजूनही रहाता आहे. जातो तिथे कधीतरी रहायला. तिथे छत्रसाल आले होते, अण्णासहेब कर्वे आले होते, भाउसाहेब पाटील आले होते :). आता तिथे कुणी कायम रहात नाही. नंतरचे रहाण्याची शक्यता दूरान्वये नाही. माझ्या वडिलांनी आणि नंतर चुलत भावाने संभाळलं. अजून २५-३० वर्षानी वाड्याशी आतून भावनीक नातं अस्णारं कोणीच नसणार. सगळेच बघे आणि प्रवासी. काय करणार. लिहिताना सुद्धा डोळ्यात पाणि येतय. असो.

पण वाईचे १०० जुने वाडे हे गेल्या १० वर्षात पडलेत. माझ्या लहानपणीची वाई आता दिसत नाही जेंव्हा रस्ता फक्त चालणा-यांसाठी होता. आता ट्राफिक जाम असतो. जावसच वाटत नाही.

आशुडी फा ला पुपु वाडा पण पडायला आलाय अस म्हणायचं होत बहुतेक. Happy
म्हंणतात ना, हवेलीकी उम्र सौ साल.

सिओईपी ची मेन बिल्डिंग सुद्धा १८६५ सालची ब्रिटीश शैलीतील वरील फोटोंवरून आठवणारी आहे. पण मऊ वगैरे काही वाटायची नाही.

'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते' Happy
आपल्याला आपल्या लहानपणचं, जुनं गाव/शहर हवं असतं. पण ते तसं राहणं प्रॅक्टिकल नसेल तर ते बदलणार. माझं खेडेगाव माझ्या लहानपणी माणसांनी भरलेलं होतं, आता रिकामं आहे. सणासुदीला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत काही दिवस लोक मुंबईहून गावाला येतात तेवढंच. जुनी घरं, शेणाने सारवलेली अंगणं गेली. शेतं ओसाड झाली. नवीन घरं चांगली चकाचक आहेत, अंगणात फरशी आहे. कुठेतरी जुनं गेल्याची खंत वाटते.पण आपण स्वतः तिथे कायमस्वरूपी रहायला तयार आहोत का, म्हणजे तसं राहणं प्रॅक्टिकल आहे का, असा विचार केला की खंत वगैरे वाटत नाही. त्यापेक्षा जे आहे, जसं आहे त्यात आनंद घ्यावा.
सीओईपीच्या इमारती मलाही मऊ वगैरे वाटायच्या नाहीत. Happy उलट परक्या वाटायच्या. बंद पडलेली घड्याळं वाटायची ती.

विषयांची सरमिसळ झाली. मी, चिन्मय, फारेंड इ. म्हणतोय ते वेगळं आहे.

मलाही सोयी संपलेल्या जुन्या वाड्यांत पाणी उपसावं लागलं, सेंट्रल बिल्डिंग्स मध्ये रोज कारकुनी करावी लागली, जीपीओ मध्ये पार्सलांवर शिक्के मारावे लागले किंवा COEP मध्ये रोज रुक्ष विषय शिकावे लागले तर अजिबातच मऊ उबदार वाटणार नाही., आणि त्या दगडी इमारतींत गंधांचे आणि उजेडा-अंधाराचे खेळ आकर्षक वाटणार नाहीत.

गप्पांच्या ओघात विषय निघत जातात, मुद्दे येत जातात- ते ठीकच आहे.

कसब्यात तर प्रत्येक वाड्यात एक तरी वेडसर किंवा अपंग माणूस सापडायचाच.>>> हे त्रब्यकेश्वर बाबत पण सान्गतात की घरटी एक वेडा,अपन्ग किवा मोठ्ठा आजार असलेली व्यक्ती आहे..तिथेच कालसर्प्,नारायण नाग बळी वैगरे विधी होतात..त्यामुळे आहे अस म्हणतात...खर खोट महादेव जाणे.
माझी मावशी शनिवारात राहायची तेव्हा वाड्याचा एन्ट्र्सच तसाच ठेवुन आत बिल्डिन्ग बान्धलेली , वर्तक तपकिरी कारखाना जवळ..त्याआधीही मावशी वाड्यातच राहायची.
नाशिकमधेही खुप जुने वाडे आहेत...जुन्या नाशिक मधे अजुनही काही चान्गल्या अवस्थेत असलेले आहेत.
बाकी जुन्या जिर्ण वास्तु साभाळण भयकर जिकिरिच होत पुढच्या पिढिला याबाबत अगदी सहमत..आमच गावच मन्दिर आणी घर आता खुप जिर्ण झालय..मधे दोनदा दुरुस्ति केली..नवरा आणी दिर ही आठवी पिढी बाकी कुणीही अ‍ॅक्टिव्हली बघत नाही.

कोतवालाचा वाडा बघायचाच असा चंग बांधून गेलो.> मी पण अशीच शोधत गेले होते. भलतिकडुन आहे त्याची एंट्री. नेते तुला हवतर Happy

हेल्लो ऑल!

अमाच्या निमित्ताने मायबोलीवर आले. पुपु पार तिसऱ्या पानावर सापडला. कसे आहात सगळे?

अमितव, यंदा भारतवारी झाली की नाही? तेरा कुच सामान हमारे पास (दो सालों से) पडा है!