Submitted by किल्ली on 11 November, 2024 - 05:57
नमस्कार.
सकाळी किंवा संध्याकाळी (कधीही सध्या वेळ महत्वाची नाहीये )
घरातून जागेवरून उठून केलेल्या निश्चयास अनुसरून जिम, running किंवा तत्सम ठिकाणी जेथे व्यायाम केला जातो तिथे कसे जावे?
स्थिरपणे निवांत बसलेले असताना, किंवा साखरझोपेतून जागी होऊन, जागेवरून उठून योगासन कशी करावीत?
.
व्यायाम विस्थापन व्यवस्थापन हा अत्यंत दुर्लक्षित विषय आहे. हयाविषयी कुणीही बोलत नाही म्हणून तुमच्या निदर्शनास हा प्रश्न आणत आहे.
कृपया मार्गदर्शन करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
२२ वर्षाची असतांना अपघात होऊन
२२ वर्षाची असतांना अपघात होऊन ४ महीने बेड रिडन होते. तेंव्हापासुन वजन वाढत गेलं. खुप प्रयत्न, व्यायाम, डायट, करून फरक पडला नाही . त्या अपघातानंतर हीप मध्ये प्लेट आणि स्क्रू बसवले जेतसेच ठेवुन मग टोटल हीप रिप्लेसमेंट झाली. वजन वाढतंच राहीलं. खुप नैराश्य येत गेलं. दोन वर्षा पुर्वी हे चित्र बदललं. त्यासाठी जो मंत्र माझ्या कामी आला तो आहे - विचाराच्या आधी आचार(action before motivation)
२२ वर्षाची असतांना अपघात होऊन
२२ वर्षाची असतांना अपघात होऊन ४ महीने बेड रिडन होते. तेंव्हापासुन वजन वाढत गेलं. खुप प्रयत्न, व्यायाम, डायट, करून फरक पडला नाही . त्या अपघातानंतर हीप मध्ये प्लेट आणि स्क्रू बसवले जेतसेच ठेवुन मग टोटल हीप रिप्लेसमेंट झाली. वजन वाढतंच राहीलं. खुप नैराश्य येत गेलं. दोन वर्षा पुर्वी हे चित्र बदललं. त्यासाठी जो मंत्र माझ्या कामी आला तो आहे - विचाराच्या आधी आचार(action before motivation)
सहीच पल्लवी ०९!
सहीच पल्लवी ०९!
हे माझ्याही हल्ली लक्षात आलंय. नीट विचार करुन कृती करायची हे आपल्याला शिकवलेलं असतं, पण ते फार अमंलात आणू नये. मनात आलेलं लगेच करुन टाकावं. त्याचे काय परिणाम होतील त्याची तयारी असतेच. मोठ्या परिप्रेक्षात फायदाच जास्त होतो तोट्यापेक्षा. शिवाय वेगळे अनुभव पदरी पडून तर कायमच फायदा.
विचाराच्या आधी आचार(action
विचाराच्या आधी आचार(action before motivation)>>
रोचक!
आता आठवून पाहिलं तर अस झालंय कधी कधी हे लक्षात आलं, पण हा मंत्र माहीत नव्हता.
१. वाड्यावर रोज
१. वाड्यावर रोज चहाबिस्किटांच्या पोस्ट टकणाऱ्यांनी त्या ऐवजी वेट्स, ट्रेडमिल, योगा mats च्या पोस्ट टाकाव्या.
२. खाऊगल्लीसारखे धागे बंद करून धावूगल्ली धागा सुरु करावा. त्यावर आपण आज किती आणि कसा व्यायाम केला त्याचे फोटो टाकावे.
खाऊगल्लीसारखे धागे बंद करून
खाऊगल्लीसारखे धागे बंद करून धावूगल्ली धागा सुरु करावा. त्यावर आपण आज किती आणि कसा व्यायाम केला त्याचे फोटो टाकावे.>>>>> हे आवडलं..काढते धागा...धावूगल्ली नावाने..
ग च्या जागी चुकून ट पडला तर
ग च्या जागी चुकून ट पडला तर धागा वेड्यासारखा धावेल.
मी नुकताच यांच्याकडे योगा
मी नुकताच यांच्याकडे online योगा सुरू केला आहे. Zoom वर आहे.
https://www.yuvarunfoundation.org/
फक्त १५०० रुपये वर्षाचे. मनात घाकधूक होती, पण छान घेतात.
दिवसातून 7 वेळा वेगवेगळे प्रकार आणि रोजचं रेकॉर्डिंग पण आहे.
र आ
र आ
काढला धागा नवा...चांगल्या गोष्टी ला उशीर कशाला..
https://www.maayboli.com/node/85997
आशु 29 ,सर कूल बनण्याच्या
व्यायामासाठी जिम ला जाणे बेस्ट .पण जिम ला जायचे नसेल तर सकाळी उठून पाहिलं व्यायाम करायचा सोपा मार्ग म्हणजे एक व्हाट्सएप ग्रुप करा व्यायाम नावाने त्यावर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्यायामाच्या इंस्टा रील ,यूट्यूब शॉर्ट सेव्ह करायचे एकत्र आणि दररोज त्यातल्या 5 रीलस पहायच्या त्याशिवाय मोबाइलला मध्ये दुसरं काही पाहायचे नाही ते लावून व्यायाम करायचा, लहान व्हिडीओ असल्यामुळं कंटाळा येत नाही फक्त सकाळी ब्रश करून सुरू व्हायचं त्याचबरोबर सूर्यनमस्कार घालायचे दररोज 5 तरी त्याने फ्लेक्सिब्लीटी येते नंतर बारा पुढे अश्याप्रकारे वाढवत न्या.जास्त जमले नाही तरी रोज 5 तरी घालायचेच हा नियम ठरवा .सूर्यनमस्कार मस्ट आहे एकूण शरीर स्वास्थ्यासाठी आणि प्रत्येक जेवणानंतर ५ मिनिटांचा वॉक घ्या भले घरातल्या घरात किंवा ऑफिसमध्येही जागेवरून उठून एक चक्कर असो .बाहेर गेलात तर आणखी चांगलं.
धाग्याच्या मूळ मुद्द्यावर
आधी लिहिले कि दुपारची वेळ सुद्धा विचार करण्यायोग्य आहे. बऱ्याच लोकांना दुपारी वेळ असतो. काहींचे ऑफिस रात्री असते, तर काही लोकांना WFH, वेळ असेल तर दुपारी व्यायाम करण्याला विज्ञानात हरकत नाहीये. सकाळची झोपमोड होत नाही आणि संध्यकाळचा सोशल वेळ हि खर्ची पडत नाही. काही लिन्क देतोय.
दुपारी व्यायामाचे ५ फायदे
https://www.lafitstudio.com.au/5-benefits-of-exercising-in-the-afternoon/
व्यायामासाठी दिवसाची योग्य वेळ
https://time.com/5533388/best-time-to-exercise/
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर करायच्या वर्कआउटचे कॅलेंडर किंवा टाईम टेबल तयार करून ते भिंतीवर चिकटवून ठेवा.
आणि सकाळी उठल्यावर किंचितही डोके न चालवता टाईम टेबल मध्ये लिहिलेल्या प्रमाणे थेट कामाला लागा... स्वतःसाठी रोजचे शारीरिक क्षमतेच्या बाहेर असलेले ध्येय निश्चित ठेवा आणि ते काही झाले तरी ओलांडायचेच हा मगाशी विचार पक्का ठेवा..
त्यातून जो हुरूप येतो आणि प्रेरणा मिळते ते बाकी कशानेही मिळत नाही
विचाराच्या आधी आचार(action
विचाराच्या आधी आचार(action before motivation)>>
Shoot and then aim !
विचाराच्या आधी आचार(action
विचाराच्या आधी आचार(action before motivation)>>
Shoot and then aim !>>> जरा काळजीपुर्वक वाचलंत तर त्यांनी कंसात action before thought ( जे मला तुम्ही तुमच्या कंमेटद्वारे केल्याचे वाटतेय ) ऐवजी action before motivation असं लिहीलं आहे.... मराठीत लिहीताना यमक साधण्याच्या प्रयत्नात नक्कीच चुकिचा अर्थ निघतोय, पण ते तसं नाहीये हे नक्की.
साधा , सोपा आणि खूप वर्षे
साधा , सोपा आणि खूप वर्षे करता येण्यासारखा व्यायाम निवडावा. त्या व्यायामाबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करणे सर्वात उत्तम.
(काहीही करण्या आधी आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना सहज जाता जाता भेटून सल्ला फी देऊन चर्चा करणे केव्हांही उत्तम ). चालायला जाण्यासाठी डॉक्टरांना विचारण्याची गरज नाही.
सायकल चालवू शकता. रोज ३० मिनिटे सायकल चालवणे फायद्याचे असते. सुरूवातीला पायाचे स्नायू घट्ट होईपर्यंत जास्त ताण देऊ नये. हळू हळू वाढवत न्यावी. नंतर शरीराला इतकी सवय होऊन जाते कि एक दिवस गेलं नाही तर अस्वस्थ वाटते.
कुठे मसाजची सोय असेल तर महिन्यातून / पंधरा दिवसातून नक्की करून घ्यावा. महिलांच्या बाबत घरी येणारी मसाजिस्ट असेल तर खूप चांगले. थोडं खर्चिक प्रकरण असल्याने ज्याने त्याने खिसा पाहून करावं.
युट्यूबवर ३० मिनिट सायकलिंगचे फायदे असा सर्च दिला तर चांगल्या दर्जाचे व्हिडीओ मिळतील.
कधी करावं ?
कधीही करावं.वेळ मिळेल तेव्हां करावं. एखादे दिवशी शक्य झाले नाही तर पाच मिनिटं, दहा मिनिटं करावं. हे जरासं मानसशास्त्रीय आहे. खाडा झाला कि जाऊ दे आजपण मारू खाडा असं करत व्यायाम बंद होतो.
दुसर्या एका धाग्यावर पावसाळ्यात सायकल घरात चालवण्यासाठी अॅटॅचमेण्ट दिली आहे. त्या इतक्या महागड्या आहेत कि त्या मधे एक गिअरची चांगली सायकल आणि दोन घरात चालवायच्या सायकली येतील. पावसाळ्यात इतर व्यायाम शोधून काढला तरी चालण्यासारखे आहे.
मला टेकडी चढण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पावसाळ्यात तिथपर्यंत कारने जाऊन छत्री घेऊन टेकडी चढता येते.
वॉर्मिंग अप करा. नाही केले तरी व्यायाम टाळू नये.
काही दिवसांनी रूटीन बसले कि छानच. रूटीन बसले कि सगळ्या अॅक्टिव्हिटीज मस्त एका रेषेत येऊन जातात.
ज्याने त्याने आपापला व्यायाम निवडून आपापल्या पद्धतीने रूटीन बसवणे उत्तम.
मला वेगळा वेळ काढता येत नसल्याने ऑफीसला जाण्यायेण्याचा वेळ ( थोडं लवकर निघून) सायकलवर जाणे हा पर्याय मला सर्वात सुटसुटीत वाटला.
घरच्या घरी करण्यासाठी youtube
घरच्या घरी करण्यासाठी youtube वर happy walk चा ४५ मिनिटांचा video आहे. तो पण खूप छान आहे.
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
खूप छान सल्ले मिळाले आहेत.
वेळ मिळाला की उत्तरे देईन
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
खूप छान सल्ले मिळाले आहेत.
वेळ मिळाला की उत्तरे देईन
खूपच कमी आहे फी
खूपच कमी आहे फी

मला सुधा कंटाळा येतो एकेकदा
मला सुधा कंटाळा येतो एकेकदा ऊठून जिम ला जायचा.. पण फक्त आजच जाऊ ऊद्या सुट्टी मारू असा लहान पोरासारखः स्वतःलाच समजावते.
तरी जिम मधे जरा handsome मेंबर आहेत ते एक वेगळंच मोटिव्हेशन हा हा हा..
एन्जॉय व्हाइल ईट लास्ट्स
एन्जॉय व्हाइल ईट लास्ट्स
२० मिनिटे व्यायाम झाला. पण
२० मिनिटे व्यायाम झाला. पण एनरजेटिक.
आज संध्याकाळी थोडी सायकल करेन.
------------------
२०२५- शेपमध्ये येणे. हा संकल्प केला पाहीजे.
२०२५- शेपमध्ये येणे. हा
२०२५- शेपमध्ये येणे. हा संकल्प केला पाहीजे. >> असे संकल्प करू नका.
का बरं र आ?
का बरं र आ?
मी जेंवा जीमला जायचो तेंव्हा
मी जेंवा जीमला जायचो तेंव्हा सोपी पद्धत ठरवली होती.
गजर लावयचा. जाग आली की विचार करायचा नाही(हे महत्वाचे). बूट घालायचे. जिमला जायचं. दोन वर्षे जमल..
@मानव
@मानव

>>>>>>>>>>तासभर व्यायाम हेच खरे शॉपिंग असे मनावर ठसवुन घ्या.
---------------------
The brain releases dopamine during shopping, a neurotransmitter that plays a role in how we experience pleasure and pain. The brain also releases dopamine in anticipation of a reward, and the unpredictability of the reward increases the amount of dopamine released. For example, online shopping can create anticipation because the buyer has to wait for the purchase.
विक्रमसिंह
विक्रमसिंह
सामो जी,
असा संकल्प केलात तर स्वतःचा स्वतःवर दबाव येईल. व्यायाम एण्जॉय करायला शिका. वजन चेक करणे हे फक्त व्यायाम व्यवस्थित होतोय कि नाही / डाएट बरोबर आहे कि नाही यासाठी सुरूवातीला करावे. पण असे संकल्प करू नयेत. रोजचं छोटं टार्गेट ठेवा हवं तर. कदाचित संकल्प न करता आधीच रिझल्ट्स मिळतील.
ओके धन्यवाद.
ओके धन्यवाद.
>>>>>>>>वजन चेक करणे हे फक्त व्यायाम व्यवस्थित होतोय कि नाही / डाएट बरोबर आहे कि नाही यासाठी सुरूवातीला करावे.
हॉलिडेज मुळे डाएट कोलमडले आहे. तरी यावर्षी सिनॅमन एगनॉग नाही आणलेला. आय ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्व्ह इट!!!
घरातून उठून बाहेर व्यायाम
घरातून उठून बाहेर व्यायाम करायला जाणे हे मोठं challange.
म्हणून मी घरात सूर्यनमस्कार आणि मिळेल त्या वेळेला अर्धा पाऊण तास जलद चालणे हे सुरु केले आहे.
हे जेव्हा consistently करेन तेव्हा घरातून उठून जिम शोधून तिकडे जाईन, धावू गल्लीवर update देत राहीन.
काहीच न करण्यापेक्षा हे बरं म्हणून ह्याला चांगलं म्हणा
किल्ली, सुरुवात तर केलीस हे
किल्ली, सुरुवात तर केलीस हे छानच आहे पण खंड नको..सातत्य ठेव म्हणजे लागेल सवय..एक दिवस पण व्यायाम चुकवावा वाटणार नाही.. चुकलाच कधी तर दिवसभर गिल्टी वाटत राहते..
Pages