Submitted by किल्ली on 11 November, 2024 - 05:57
नमस्कार.
सकाळी किंवा संध्याकाळी (कधीही सध्या वेळ महत्वाची नाहीये )
घरातून जागेवरून उठून केलेल्या निश्चयास अनुसरून जिम, running किंवा तत्सम ठिकाणी जेथे व्यायाम केला जातो तिथे कसे जावे?
स्थिरपणे निवांत बसलेले असताना, किंवा साखरझोपेतून जागी होऊन, जागेवरून उठून योगासन कशी करावीत?
.
व्यायाम विस्थापन व्यवस्थापन हा अत्यंत दुर्लक्षित विषय आहे. हयाविषयी कुणीही बोलत नाही म्हणून तुमच्या निदर्शनास हा प्रश्न आणत आहे.
कृपया मार्गदर्शन करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
<जिम, running किंवा तत्सम
<जिम, running किंवा तत्सम ठिकाणी जेथे व्यायाम केला जातो>
घरात व्यायाम करायला बंदी नसेल तर घरातच व्यायाम करता येतो. कुठेही जायची गरज नाही. सलग खूप वेळ हवा असंही नाही.
आपल्या रोजच्या जगण्यात फिजिकल अॅक्टिव्हिटी वाढवता येतात. लिफ्ट ऐवजी जिना वापरणे , बसने प्रवास करत असाल तर एक स्टॉप आधी उतरून उरलेले अंतर चालत येणे , मोबाइल फोनवर बोलताना आपणही मोबाइल होणे. डोळ्यांसाठी २०:२०:२० चा नियम आहे, तसा बैठे काम करणार्या शरीरासाठी दर ४५ मिनिटांनी उठून एक फेरी मारणे, स्ट्रेचिंग करणे, पाण्याची बाटली जवळ न ठेवता दर वेळी जाऊन पाणी पिऊन येणे, इत्यादि. सकाळी चहा करता करता ओट्याशी स्ट्रेचिंग करता येतं. टाचा, चवडे वर खाली करून तिथल्या स्नायूंचे व्यायाम करता येतात.
माझ्याकडे ही एक्झरबाइक होती. तीवर सायकलिंग आणि रोइंग करता येतं. दोहोंत रेसिस्टन्स लेव्हल कमी जास्त करता येते.
पुढे आर्थ्रायटिस मधून रिकव्हरीसाठी चक्क पुस्तकात पाहून व्यायाम केले. तोवर यु ट्यूब आणि फेसबुक क्लिप्सचं लोण आलं नव्हतं. स्मार्टफोन नव्हते. त्यात आधी बॉडी वेट वापरून व्यायाम केले. मग फँटाच्या ७०० मिलिच्या दोन बाटल्यांत आधी पाणी आणि मग माती भरून डंबेल्ससारख्या वापरल्या. मग खरे डंबेल्सही घेतले. एक्सरसाइक मॅट घेतलं. दहाच्या सेटपासून सुरुवात करून ३० गुणिले ३ पर्यंत पोचलो होतो. अनेक खंडांनंतर आता पुन्हा २० गुणिले २ वर आहे.
सध्या माझ्या ठरलेल्या रूटिनला 8fit या अॅपची जोड दिली आहे. माझे डिटेल्स घेऊन ते व्यायाम दाखवतं. त्यात स्ट्रेचिंग, स्ट्रेंग्थ ट्रेनिंग, अरोबिक्स हे सगळं असतं. ७-८ मिनिटांच्या एका प्रो ग्राममध्ये धाप लागेल आणि घाम येईल इतका व्यायाम होतो. दोन वर्षांपूर्वी त्यातली तिसरी लेव्हल गाठली होती. आता पुन्हा पहिल्या लेव्हलपासून सुरू केलं.
स्मार्ट वॉचमध्ये Sedentary Reminders लावलं आहे. दर तासाला किती पावलं चालली जायला हवीत, ते आपण सेट करायचं असतं. सध्या ४०० लावली आहेत.
सकाळी लवकर उठलं तर माझा व्यायाम होतो . त्यासाठी रात्री लवकर झोपायला हवं. पण आता उशिरा झोपलं तरी सकाळी ठरल्या वेळी जाग येते. आळस झटकून अंथरुणातून बाहेर पडलं तर व्यायाम होतो. ते जमलं की पुढे कोणताही अडथळा येत नाही.
8 fit app free आहे का?
8 fit app free आहे का?
आपल्या मुलांबरोबर करता येईल
आपल्या मुलांबरोबर करता येईल असा व्यायाम शोधावा. सायकलिंग, स्विमिंग इ. व्यायाम प्रकार आपल्याला झेपेल असा असावा. (मुलं किक बॉक्सिंग पण चूज करतील. आपली पात्रता शुद्ध हिंदीत लक्षात ठेवावी.) नेसेसरी इक्विपमेंटस् विकत घ्यावीत व मुलांसोबत एक वेळ ठरवावी. मुलं इतकी भुणभुण लावतात की ती थांबवण्यासाठी आपण व्यायाम करतो.
हा उपाय टीनेजर्सच्या पालकांना लागू नाही. टीनेजर्सना तुमच्यासोबत काहीही करायचे नसते. त्यांच्या व त्यांच्यापेक्षा मोठ्या मुलांच्या पालकांनी, नॉन पालकांनी कुत्रा पाळावा. सलग ४ दिवस ठराविक वेळेला त्याला चालायला घेऊन जावे. पुढचा परीणाम सेमच असेल.
माझा तोच व्यायाम आहे.
माझा तोच व्यायाम आहे.
सकाळ, संध्याकाळ मिस डॉगीला फिरायला न्यायचे. ती कुत्रं मांजर दिसलं कि जोरात ओढते. आपोआपच रनिंग, ब्रिस्क वॉकिंग होत.
मी तिला नाही, ती मला फिरायला नेते.
>>>>>>>>>>>मुलं किक बॉक्सिंग
>>>>>>>>>>>मुलं किक बॉक्सिंग पण चूज करतील. आपली पात्रता शुद्ध हिंदीत लक्षात ठेवावी.

माझेमन, हे शब्दश: भीक नको पण
माझेमन, हे शब्दश: भीक नको पण झालं...
आधी टीन आहे ते कमी त्यात कुत्रं आणलं तर हाल कुत्रं खाणार नाही.
मी तिला नाही, ती मला फिरायला
मी तिला नाही, ती मला फिरायला नेते.
हाल कुत्रं खाणार नाही.
>>>>
आधी टीन आहे ते कमी त्यात
आधी टीन आहे ते कमी त्यात कुत्रं आणलं तर हाल कुत्रं खाणार नाही>>> हेच डोक्यात आलं. टीन सांभाळतेय ते काय कमी आहे का?
काहीच न करण्यापेक्षा हे बरं
काहीच न करण्यापेक्षा हे बरं म्हणून ह्याला चांगलं म्हणा >>> करेक्ट, किल्ली! हा अप्रोच वर्क होतो माझ्यासाठी बरेचदा. आणि मी सुद्धा तुझ्यासारखीच सुरूवात केलेली आहे सहा महिन्यांपूर्वी. अजूनतरी कन्सिटंट आहे.
काहीच न करण्यापेक्षा हे बरं
काहीच न करण्यापेक्षा हे बरं म्हणून ह्याला चांगलं म्हणा >>> करेक्ट, किल्ली! हा अप्रोच वर्क होतो माझ्यासाठी बरेचदा. आणि मी सुद्धा तुझ्यासारखीच सुरूवात केलेली आहे सहा महिन्यांपूर्वी. अजूनतरी कन्सिटंट आहे.
माझेमन
मी तिला नाही, ती मला फिरायला नेते.
हाल कुत्रं खाणार नाही.
>>>>
घरातून निघून व्यायामाला
घरातून निघून व्यायामाला जाण्याचे अवघड असेल तर सध्या सौरभ बोथरा चे habit yog session हा उत्तम पर्याय आहे. तो पुष्कळ movements आणि योगासने घेतो. दिवसात ६ बॅच असतात.
सौरभ बोथरा चे video पाहिले
सौरभ बोथरा चे video पाहिले. Youtube वर.
Beginner वाला try केला.
हे जमेल, मला जमतील तसे दोन तीन video select करून रोज करते आता.
किल्ली, हे बघा. आत्ता 21 दिवस
किल्ली, हे बघा. आत्ता 21 दिवस फ्री batch चालू आहे
https://habit.yoga/#register
Pages