दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाकीर हुसेन , श्याम बेनेगल ..
भावपूर्ण श्रद्धांजली..!

१५ डिसेंबर च्या लोकरंग पुरवणीमधे श्याम बेनेगल यांच्यावर सुंदर लेख आहे.. त्यांच्या भूमिका ह्या चित्रपट संदर्भात.. लेख वाचून त्यांचा भूमिका हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारलेला आहे ते पुस्तक म्हणजे ' सांगत्ये ऐका' अभिनेत्री हंसा वाडकरांचे आत्मचरित्र... चित्रपटाचं कौतुक वाचुन चित्रपट पाहण्याआधी ग्रंथालयातून दुसऱ्या दिवशी पुस्तक आणलं .. चित्रपट पाहायचा आहे .. पाहते.. अंकुर लहानपणी पाहिला होता.

Four legends in 2024 - Sir Ratan Tata, Ustad Zakir Hussain, Shyam Benegal & dr. Manmohan Singh....great loss. Sad

स्वतःच्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय जनतेसाठी आमुलाग्र बदल घडवतील व ते आपल्या हयातीत प्रत्यक्ष पहायला मिळतील हे फार कमी राजकारण्यांच्या बाबतीत घडते.
भारतिय अर्थव्यवस्थेला(नरसिंह रावांच्या पाठिंब्याने ) जागतिक प्रवाहात आणण्याचे श्रेय डॉ. सिंग यांचेच.
श्रद्धांजली….

डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
स्वतःच्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय जनतेसाठी आमुलाग्र बदल घडवतील व ते आपल्या हयातीत प्रत्यक्ष पहायला मिळतील हे फार कमी राजकारण्यांच्या बाबतीत घडते.
भारतिय अर्थव्यवस्थेला(नरसिंह रावांच्या पाठिंब्याने ) जागतिक प्रवाहात आणण्याचे श्रेय डॉ. सिंग यांचेच.>+१११११

अमा (अश्विनी मावशी ) गेल्या . आताच पूर्णिमाशी (मुलीशी) संपर्क झाला .
माझी शालेय मैत्रीण , एकाच वर्गात , एकाच बाकावर १ ० वी पर्यंत शिकलो . लहानपणच्या खूप छान आठवणी आहेत . पण आता सुन्न आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

अमा Sad _/\_ फार शारीरिक त्रास आणि वेदना झाल्या तुम्हाला. ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो. अमा Sad

धक्का बसला.

भावपूर्ण श्रद्धांजली

अमा Sad _/\_ फार शारीरिक त्रास आणि वेदना झाल्या तुम्हाला. ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो. अमा Sad
खूपच आश्वासक आणि प्रसन्न व्यक्तिमत्व होतं त्यांचं.
त्यांचा लाल साडीतला, black टी मधला फोटो आठवतोय.. Pretty lady स्वभावाने आणि रूपाने.
खूप सोसलं त्यांनी आयुष्यात.
आता शांतता लाभू देत त्यांना

श्रद्धांजली अमा
हे इतक्यात असे श्रद्धांजली लिहावे लागेल असे वाटले नव्हते.
डेहराडून डायरीज वाचून आनंद झालेला, छान फिरू शकताय म्हणून.
वेगळा दृष्टिकोन असलेले लिहायच्या.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा