Submitted by बेफ़िकीर on 24 December, 2024 - 19:33
अपघातग्रस्त काही, अन्यायग्रस्त काही
बघतात बातम्या अन, जगतात मस्त काही
दुनियेत रोज भरतो बाजार हा मनांचा
काही महागडी तर, मिळतात स्वस्त काही
गझलेत भ्रष्ट काही ठरले स्वयंप्रकाशी
उदयासही न येता झालेत अस्त काही
निरखून पाहिले तर कळतात हे मुखवटे
वरतून त्रस्त काही, आतून त्रस्त काही
जी झोप घालवत ती, गेली कुठे कळेना
का घालतात स्वप्ने नवखीच गस्त काही
नसती मुळात वसली, तर वाचलीच असती
वसण्यामुळेच गावे झालीत ध्वस्त काही
कुठलीच गोष्ट येथे मिळणे अशक्य नाही
पण जीव गुदमरवती शहरे प्रशस्त काही
नाही परत मिळाले, मन जे दिले जगाला
का 'बेफिकीर' सूत्रे असतात व्यस्त काही
=====
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! आवडली
वाह! आवडली
मस्त !
मस्त !
मस्त.
मस्त.
मस्तच..
मस्तच..
खूप दिवसांनी (कुणाचीही)
खूप दिवसांनी (कुणाचीही) मराठी गजल वाचल्याने फ्रेश मूड मधे वाचून झाली. सविस्तर प्रतिसाद द्यावासा वाटला.
तुमच्या गझलबद्दल काय बोलावे ? एक वाचक म्हणून काय वाटले हे कळवावे म्हणून हा प्रतिसाद. ही मतं बरोबर आहेत हा दावा नाही. यावर गझलकाराने वाटल्यास प्रतिसाद द्यावा , नाही दिला तरी काहीही हरकत नाही. नोंद घेतल्याबद्दल आभार.
अपघातग्रस्त काही, अन्यायग्रस्त काही
बघतात बातम्या अन, जगतात मस्त काही >> हा विरोधाभास खूप प्रभावी पकडला आहे आणि सादर केला आहे. सत्य परिस्थिती आहे. भिडला हा शेर. ( मराठी गझलेत अपघातग्रस्त सारखा खूपच खडबडीत शब्द येतो, अर्थ न बदलता दुसरा शब्द वापरता आला असता का ? )
दुनियेत रोज भरतो बाजार हा मनांचा
काही महागडी तर, मिळतात स्वस्त काही >>> क्या बात है... फारच सुंदर
गझलेत भ्रष्ट काही ठरले स्वयंप्रकाशी
उदयासही न येता झालेत अस्त काही >>> शेर म्हणून ठीक. पण या गझलकारांच्या आपसातल्या लाथाळ्या हा विषय आता नको वाटतो.
निरखून पाहिले तर कळतात हे मुखवटे
वरतून त्रस्त काही, आतून त्रस्त काही >>> पहिल्या ओळीचं विस्तारीकरण वेगळ्याच पातळीवर गेलंय. बेफिकीर तुम्ही खरोखर उच्च दर्जाचे गझलकार आणि कवी आहात. पण वरतून त्रस्त आणि त्याच्या उलट असते तर अजून खुलला असता हा शेर ( काही या शब्दामुळे काय म्हणायचे आहे हे नेमके समजलेले आहे).
जी झोप घालवत ती, गेली कुठे कळेना
का घालतात स्वप्ने नवखीच गस्त काही >>> स्वप्नांची गस्त. मराठी गझलेत अशा कवीकल्पनांची वानवा दिसते त्यामुळे फार रूक्ष वाटतात. तुम्ही ती उणीव दूर करता. अभिनंदन.
नसती मुळात वसली, तर वाचलीच असती
वसण्यामुळेच गावे झालीत ध्वस्त काही >>> हा हा ... मस्त. गावाला लागू असलेली ही गोष्ट कित्येक बाबींना लागू होतेय. मांडणी मजेशीर.
कुठलीच गोष्ट येथे मिळणे अशक्य नाही
पण जीव गुदमरवती शहरे प्रशस्त काही >>> ठसठसती जखम आहे शहरांची आणि त्यातल्या जिण्यांची. मोठा लेख पाडून सुद्धा मांडता आले नसते ते दोन ओळीत आले. तुम्ही लेख लिहायचे बंद केलेत तर असे शेर आपोआप येतील. कारण व्यक्त होणं मग शेरांच्या माध्यमातूनच राहील.
नाही परत मिळाले, मन जे दिले जगाला
का 'बेफिकीर' सूत्रे असतात व्यस्त काही >>> तकिया कलाम चा वापर बेफिकीर या अर्थाने केला आहे का ? पण माफ करा मला नीटसा समजला नाही हा शेर.
आवडली
आवडली
मजा आली
मजा आली
गझलेत भ्रष्ट काही ठरले स्वयंप्रकाशी
उदयासही न येता झालेत अस्त काही>>> हा थीम शी Disparate वाटतोय थोडा.
शेवट थोडासा जास्तच इंप्लिसिट वाटतोय, पुर्ण गझलेचा जो पंच होता त्याची तिव्रता काहीशी कमी होते....पण बाकी सुरेख जमलीय... उचल्यांपासून वाचवा. पुलेशु.
वाह!
वाह!
सफाईदार गज़ल (कि गझल?)
सफाईदार गज़ल (कि गझल?)
>>>दुनियेत रोज भरतो बाजार हा
>>>दुनियेत रोज भरतो बाजार हा मनांचा
काही महागडी तर, मिळतात स्वस्त काही
वाह!
----------------------------
>>>>>>>जी झोप घालवत ती, गेली कुठे कळेना
का घालतात स्वप्ने नवखीच गस्त काही
आवडला हा शेरही.
वाह .. मस्त गझल
वाह .. मस्त गझल
खूप छान रचना
खूप छान रचना