महाराष्ट्रियन घरात डिशवॉशर कितपत उपयुक्त?

Submitted by यक्ष on 20 December, 2024 - 06:38

आजकाल घरकाम बायांच्या सुट्ट्या बर्‍याच वाढत चालल्यायत. चालायचेच!
ऐनवेळी असा प्रसंग असल्यास अडचण होते. विषेशतः पाहुणे वगैरे असल्यास. तर, जसा रोबो फ्लोअर क्लिनर वगैरे हाताशी उपयोगी पडतो तसा डिशवॉशर उपयुक्त आहे का? भांडी आपली नेहमिचीच - ताट , वाटी, पेले, चमचे वगैरे...की घेतल्यावर आणी नवलाई संपल्यावर नुसताच ; मला पहा अन फुले वाहा! आणि मग नंतर नुसताच 'भुईला भार'?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dishwasher मोठा घ्यावा ज्यात कढाई कूकर वगैरे बसेल.
नुसत्या ताटल्या, वाटया बसणारा घेतला तर तेवढी मदत होते पण अर्धे काम आपल्याला करावे लागते.
जेवण झालं की ताट वाटी साफ करून dishwasher ला लावायची प्रत्येकाने शिस्त लावून घेतली की आणखी सोपे होते.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे dishwasher ला योग्य जागा हवी स्वयंपाकघराजवळ, हल्ली flat मध्ये एकच मशीन बसेल एवढी जागा असते.
जेवढं सोयीस्कर मशीन मांडल जाईल तेवढा effective उपयोग होईल

आम्ही dishwasher खूप वर्षे वापरतो. अतिशय उपयोगी आहे. लहान कुटुंबात load पूर्ण होण्यास वेळ लागतो. म्हणून आम्ही जास्त भांडी आणि cup ठेवतो.

यक्ष प्रश्न आहे खरा ..
पण मी बाल गंधर्व असल्याने मला यातले नॉलेज नाही Happy

अमेरिकन मित्रांकडे आहेत डिश washer..
ते वापरू शकतात तर आपण का नाही.. काय फरक पडतो नक्की?

बाईवरची dependancy कमी करायची असेल तर खुप उपयोगी आहे. स्टिल, काच, crockery, dw safe plastic चालतं.
कुकर, तवा, कढई आणि बाकी छोटी भांडी असं सगळं बसेल असाच घ्या.
Wm एवढीच जागा लागेल व inlet, outliची सोय.
Table top dwही मिळतो ओट्यावर मावेल असा.
सेटिंग्ज असतात अर्धा तास , १ तास, १.५ तास अशी.
आपल्या सोयीप्रमाणे लावायचं.
Dw पावडर, salt याबरोबरच १ लिक्विडही (rinse aid) मिळतं कंपनीकडूनच तेही मस्ट आहे नेहमी घालणं.
टॅब्लेट्सही मिळतात.
आम्ही घर बदलल्यावर नवीन ठिकाणी जास्तच क्षारयुक्त पाणी असल्याने असेल स्टिलचया भांड्यांवर थोडे पांढरे पट्टे रहातायत भांडी वाळल्यावर.
आधीच्या घरी असा problem नव्हता आला.
Wm सारखा dw ही वेळोवेळी साफ करावा लागतो.

माझ्या कडे Samsung चा आहे. चांगला आहे.
हार्ड वॉटर मुळे पावडरचा खर्च खूप आहे.

तवा आणि प्रेशर कुकर डिशवॉशरला टाकू नका. कढई सुद्धा विचार करुन टाका.
अल्युमिनिअम कधीही डिशवॉशरला टाकू नका. चकाकी दिलेलं काही असेल तर ते ही टाकलंच पाहिजे का विचार करा.
स्टील, ग्लास डोळे बंद करुन टाका. म्हणजे फुटतील. तर डोळे उघडे ठेवून टाका. बाकी इथे रिंस एड आणि ड्राईंग साठी कुठलं लिक्विड वापरत नाही. पण भारतात लागत असेल तर कल्पना नाही.

अमित, तुम्ही जेट ड्रायचं रिन्स एड वापरत नाही का? मी वापरुन आणि एक दोन वेळा रिफील करायला विसरल्यावर फरक पाहिला आहे. रिन्स एडने भांडी व्यवस्थित ड्राय होतात असं लक्षात आलं आहे.

नाही वापरत. सध्या बॉशचा हिटिंग एलिमेंट नसलेला डिवॉ आहे आणि त्याने हिटिंग एलिमेंट असलेल्या पेक्षा भांडी जास्त कोरडी होतात असा अनुभव आहे. (कारण हिटिंग एलिमेंटने कोरडी होऊन परत कंडेसेशनने ओली होतात. ते इथे होत नाही असं असावं) रात्री वर जाण्यापूर्वी डिवॉ पूर्ण झाला तर थोडा उघडून झोपायला जातो की सकाळी १०० % कोरडी झालेली असतात.
ते नाही जमलं तरी ९०% कोरडी असतात. त्या उरलेल्या १० साठी मुद्दाम केमिकल कशाला असं वाटतं. त्यामुळे नाही वापरत.

ओके. किती केमिकल एकावेळी वापरलं जातं काही कल्पना नाही. मी साधारण तीनेक आठवड्यातून रिफील करते.

कोरोना मध्ये बायका बंद केल्या होत्या तेंव्हा Counter-Top डिशवॉशर घेतला होता. आता परत बाई लावली आहे, त्यामुळे तो डिशवॉशर पडून आहे . बाईच्या तुलनेत डिशवॉशर चे तोटे -
गोळ्या व पावडरीचा खर्च बराच येतो .
वीजबिल वाढते . वीज गेली कि मशीन बंद .
डिशवॉशरला स्वतः भांडी लावावी लागतात व ततपूर्वी विसळावी लागतात.
जागा लागते . किचन कट्टा आमच्यासारखा छोटा असेल तर अडचण होते.
एक नळ कायमचा डिशवॉशर साठी पाईपने जोडावा लागतो. पाणी भरपूर लागते .
बाहेर पडणाऱ्या पाण्याची व्यवस्था करावी लागते . आम्ही किचनच्या सिंक मधेच आउटलेट टाकला होता. त्यामुळे मशीन सिंकच्या जवळच ठेवावे लागते.
तसेच जवळच ३ पॉईंट प्लग असावा लागतो . जर लांब असेल तर मशीन बरोबर आलेली वायर पुरत नाही . मग एक्सटेंशन वापरावे लागते. आमचे एक एक्स्टेंशन जळाले होते. दुसरे मात्र व्यवस्थित चालले .
नॉन - स्टिक, ऍल्युमिनिअम भांडी चालत नाहीत असे ऐकून आहे . (या मुद्द्याची खातरजमा करावी)
बराच वेळ लागतो. साधारण २ तासाचे वगैरे एक सायकल असते.

आता माझ्याकडे भांडी घासण्यासाठी व स्वयंपाकासाठी वेगळ्या बायका आहेत . जर भांडीवाली आली नाही तर स्वयंपाकवाल्या बाईंकडून भांडी घासून घेतो. त्याचे त्यांना त्या दिवसाचे जास्त पैसे देतो. जर एकाच दिवशी दोन्ही बायकांनी दांडी मारली तर बाहेरून ऑर्डर करतो आणि पेपर प्लेट्स मध्ये खातो. Lol

पाणी वाचते. एक स्टँडर्ड अंडर द काऊंटर साइज डिवॉ ४ गॅलन म्हणजे 15 लिटर मध्ये तीन स्तरांवर ठेवलेली भांडी धुते. नळ चालू करून याच्या कित्येक पट जास्त पाणी लागेल (मला).

भरतः धागा अँटोमँटिकली 'भांडी आणि घरातली उपकरणे' मध्ये गेलेला दिसला. ज्याने केले असेल त्यास धन्यवाद!
आमच्याकडे वापरास हार्ड वॉटर आहे. त्यामुळे Samsung मोहिम सुरु करण्यात येइल. तसाही मी Samsung फँन आहेच. सोबत बॉश ही बघतोय.

Chaitrali - महत्त्वाची महिती दिलीत.

ऋन्मेऽऽष - मायबोलीवर असणार्‍या प्रतिभाशाली, सुजाण, अभ्यासू, ज्ञानाने समृद्ध अश्या धुरंधर सदस्यांमध्ये मी अगदीच 'य' / 'क्ष' (XY) माणुस आहे ह्याची जाणीव असल्याने माझे नांव 'यक्ष' आहे (हो 'यझ' - i.e. Y-Z पण नक्कीच नाही !). आपण 'बालगंधर्व' हे श्रेष्ठ नांव 'भांडी आणि घरातली उपकरणे' ह्या संदर्भात वापरणे हे नाही आवडले!

गोळ्या व पावडरीचा खर्च बराच येतो . >>> आम्हाला कंपनीच्या इन्स्टॉलेशन टीमने कंपनीच्या गोळ्या वगैरे वापरू नका म्हणून सांगितले होते. प्रत्यक्षात जो माणूस इन्स्टॉलेशनला आला त्याने तर दुकानात मिळणारी कुठली तरी पावडर सांगितली होती (लक्षात नाही नाव). बहुतेक मीठ पण सांगितले होते. पण त्याने भांड्यावर पांढरा थर जमला. इन्स्टॉलेशन टीमने कानावर हात ठेवले. कंपनीने पण असं काही करायचं नाही हे सांगितलं होतं.

नंतर पुन्हा त्या टीममधल्या एकाने सांगितलं कि जो माणूस आला होता तो आमच्याकडे कामाला नाही. त्या दिवशी माणसं नसल्याने हा खासगी कामं घेणारा माणूस पाठवला होता. त्यांनी त्यांच्याकडची पावडर दिली, गोळ्या वापरू नका म्हणाले. ती पावडर वापरून मशीन चांगले चालते. तीन वर्षे काहीही कटकट झाली नाही. नंतर त्या पावडरला पर्याय अमेझॉनवर सापडला. ते ही चांगले चालले. खर्चात चांगलीच बचत झाली.

फक्त हार्ड वॉटर असल्याने सेटींग शेवटच्या मार्कला आली आहे. त्यामुळं सध्या डिवॉ बंद ठेवला आहे. हार्ड वॉटरची ट्रीटमेंट केल्यावर चालू करणार.

मी गेली तीन वर्षे बॉशचा डिशवॉशर वापरत आहे. मी अत्यंत खूष आहे त्याच्या कामावर.
१) जर भाजी वगैरे करपलेली असेल तर घासायला ठेवण्यापूर्वी जरा वेळ कढईत पाणी घालून ठेवते. तसंच, तूप कढवलेल्या भांड्यात आणि दुधाच्या पातेल्यातही.
२) इतर भांडी/ताटांच़ फक्त खरकटं काढून टाकते. विसळत नाही.
३) स्टीलचा कुकर डिशवॉशरला लावते. झाकण नाही.
४) ऑटो मोडवर लावते बहुतेक वेळा. लवकर हवी असतील भांडी तर फास्ट मोड.
५) आधी एकदोन वर्षे पावडर, मीठ, रिन्स एड वेगवेगळे वापरत होते. पण आता तिन्ही एकत्र असलेल्या गोळ्या वापरते. हे खूपच सोपं वाटतं.
६) मी बरीचशी भांडी/कढया स्टीलच्या वापरते. नॉनस्टिक/लाकडी पोळपाट-लाटणं/ अल्युमिनियमची एखादी कढई हाताने घासते.

अजून काही आठवलं तर लिहीन. माझ्या मते तरी अत्यंत उपयुक्त आहे डिशवॉशर.

यक्ष, धाग्याचा ग्रुप तुम्ही बदलला नाही, म्हणजे अ‍ॅडमिन / वेबमास्तरांनी बदलला. त्यांचं इतक्या बारीकसारीक गोष्टींवर लक्ष आहे, हे पाहून बरं वाटलं.

डिशवॉशर उपयोगी आहे का? मग एअर फ्रायर घ्यावा का? असे मोह मोह के धागे वाचून मला निग्रह अधिक कठोर करावा लागतो आहे.

इथे चांगली माहिती मिळते आहे.

मी तवा, स्टिलचा कुक र, कढई लावते dw ला.
भांडी विसळायची गरज नाही. फक्त खरकटं निपटून काढायचं व्यवस्थित.
कोरडीच लावायची dw.
_--------+*-----------

ती पावडर...कुठलीतरी पावडर...पावडरीला पर्याय...
ह्या सगळ्याची नावंही लीहा..म्हणजे ईतरांना उपयोग होईल कुठली वापरायची..कुठली नाही वापरायची..

https://www.amazon.in/dp/B09JW1FFLP?ref=ppx_yo2ov_dt_b_fed_asin_title

https://www.amazon.in/dp/B01G0U6CO6?ref=ppx_yo2ov_dt_b_fed_asin_title

https://www.amazon.in/dp/B00SX7ASOA?ref=ppx_yo2ov_dt_b_fed_asin_title ( हे त्यांनी दिलेलं)

हे मला सॅमसंगसाठी चालतं. इतर कंपन्यांच्या डिवॉ साठी चालेल का हे माहिती नाही.

मीही डिवॉ घ्यावा (च) या निर्णायाला आलेय. दरदिवशी एक दिड तास केवळ भांडी घासायला देणे परवडत नाही आणि कामवालीने घासलेली भांडी आवडत नाहीत ही कारणे आहेत. पण डिवॉ घ्यायचा तर किचनमध्ये मेजर बदल करावे लागणार. टे टॉ पेक्षा ओट्याखालचा बरा असे वाटतेय.

आपण 'बालगंधर्व' हे श्रेष्ठ नांव 'भांडी आणि घरातली उपकरणे' ह्या संदर्भात वापरणे हे नाही आवडले!
>>>>

ते त्या संदर्भाने नव्हते वापरले. धाग्याचा विषयाशी त्याचा काही संबंध नव्हता. कुठलाही विषय असता तरी ती पोस्ट तशीच राहिली असती.
किंबहुना तुम्ही या विषयाला हलके का लेखले हा प्रश्न मलाच पडला.
तुम्ही जो आपल्या लेखाच्या सुरुवातीला "घरकाम बाया" असा उल्लेख केला आहे तो देखील बरेच जणांना आवडत नाही. हे वादाला वाद म्हणून सांगत नाहीये तर आवडीला आवड म्हणून नमूद करत आहे.
मात्र माझ्या पोस्ट मध्ये यक्ष शब्द मी वापरणे तुम्हाला रुचले नसेल तर येस, त्या बद्दल मी दिलगीर आहे. राग लोभ नसावा.